Skip to main content

(एक प्रश्न)

(एक प्रश्न)

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आज लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट यांची पुण्यतिथी. डंबलडोरवधाबद्दल व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली. डंबलडोर हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद डंबलडोरवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात. (आणि क्रुशिअ‍ॅटस कर्स ऐवजी स्टुपिफाय, किंवा एक्स्पेलिआर्मस वापरतात.) अवारा-केडावरा म्हणजे हत्या हे समजत असतानाही लॉर्ड व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली? तो हॅरी पॉटरचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित डंबलडोरवादी करतीलही, पण एकाही ऑर्डर ऑफ फीनिक्स वाल्याने या हत्येला अक्षेप घेतला नाही, त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे. (वास्तविक व्हॉल्डेमार्टला अझकबानला पाठवता आले असते.) आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन डंबलडोरवाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय हेडमास्तर असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला मिनिस्ट्री ऑफ मॅजिकचे ब्रीदवाक्य आठवले - "मॅजिक ईज माईट") ही हत्या म्हणजे डंबलडोरवादाचा पराभवच नाही का?

याद्या 4538
प्रतिक्रिया 32

येथे 'मगल्स' लोकांची वस्ती आहे. 'मुघल्स'बद्दल लिहलेत तर अनेक प्रतिसाद मिळतील. सहज न्युटन (ब्लुम्सबरी प्रकाशनवाले)

मूळ लेखात जुन्या विषयाला रिनर्व्हेट चार्म वापरल्यावर खरं तर सायलेन्सिओ वापरला गेला असता तर बरं झालं असतं असं वाटत होतं. पण तुमचा रि़ड्डिक्युलस स्पेल पण चांगला जमलाय.

In reply to by राजेश घासकडवी

रिड्डिक्युलस हा स्पेल्स फक्त बोगार्टला घालवण्यासाठी वापरतात. (मराठीत : बागुलबुवा).

In reply to by मिसळभोक्ता

बोगार्ट नाहीये होय? तुम्हाला खरे डिमेंटर आहेत असं वाटत होतं तर एक्स्पेक्टो पेट्रोनम म्हणायचंत ना!

In reply to by राजेश घासकडवी

एक्स्पेक्टो पॅट्रोनम म्हणून उगाच माकड वगैरे निघालं, तर काय घ्या ? त्यापेक्षा चॉकलेट खावं हेच उत्तम !

In reply to by मिसळभोक्ता

एक्स्पेक्टो पॅट्रोनम म्हटल्यावर काय बाहेर येईल याची भीती बाळगली तर बागुलबोवेच डिमेंटर बनून फिरणार नाहीत का? आणि निघालं माकड तर बसवायचं त्याला टंकायला. :)

मगलू समाजाच्या डोक्यावरून जाईल.. विडंबन भारी आहे.... हॅरीला एक्सपेलीआर्मस ऐवजी हिंसक कर्स वापरण्यास प्रवृत्त करणारे लांडगामानव लुपीन यांचा निषेध.... लुपिन उजव्या प्रवृत्तीचे हेर होते काय ???

In reply to by अवरंग

हॅरीला एक्सपेलीआर्मस ऐवजी हिंसक कर्स वापरण्यास प्रवृत्त करणारे लांडगामानव लुपीन यांचा निषेध... सहमत आहे. निषेध केला असता, पण आप्ल्या ऑर्डरमधले आहेत, आणि निंफाडोराचा नवरा आहे, म्हणून सोडले.

In reply to by मिसळभोक्ता

ऑर्डरपेक्षाही लुपीन हा निंफाडोराचा नवरा आहे या कारणास्तव आपण निषेध करत नाही असा एक समज ऑर्डरमध्ये पसरला आहे त्याचे काय? आणि सिरिअस ब्लॅकच्या वेळी डंबलडोर कुठे होते? त्याना सिरिअसचे मरण थोपवणे शक्य असूनही त्यांनी त्यावेळी काहीच हलचाल का केली नाही? की सिरिअसच्या सो कॉल्ड 'हिंसात्मक' विचारांचा तिटकारा असल्यानेच डंबलडोर यानी ऑर्डरच्या सिरिअसला वाचवण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले काय? -- आलहोमोरा

चान चान............ काय मी .भो ...... हल्ली काही सुचत नाही असं दिसतंय..... (मिसळपाव चा दर्जा घसरलाय याच उत्तम उदाहरण म्हणजे हा धागा....... निरर्थक पणाचा कळस............)

विडंबन ठीक आता या विडंबनाचे संपादन होणार का? (सर्वसामान्य सदस्य )चेतन अवांतरः (मला दिलेली कारणे ईथे लागु होतात का?) धोरण क्र. १ प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल. सदर लेख व्यक्तीचे विडंबन करणारा नव्हता, परंतु दुसर्‍या संकेतस्थळावरील लेखाचा संदर्भ न देता, कसले विडंबन आहे हे स्पष्ट न करता लेख लिहीला गेला. तसेच, लेख हा दुसर्‍या संकेतस्थळावरील (उपक्रमावरील) वैचारिक लेखाला प्रत्युत्तर म्हणून देताना त्यात ओढूनताणून आणलेल्या संख्या, काल्पनिक संस्थांचे काल्पनिक संशोधन असे लेखन योग्य वाटले नाही.

In reply to by चेतन

मला नाही वाटत ह्या विडंबनात काहीही संपादित करण्यासारखे आहे. तुमचे विडंबन उडाल्याचा राग इथे का काढता आहात? तुमचे उडाले कारण,
लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.
विषय संपला! चियर अप!!

In reply to by चेतन

मला नाही वाटत ह्या विडंबनात काहीही संपादित करण्यासारखे आहे. तुमचे विडंबन उडाल्याचा राग इथे का काढता आहात? तुमचे उडाले कारण,
लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.
विषय संपला! चियर अप!!

ह्या निमित्ताने हिंसा म्हणजे काय, हे कळले तर उत्तम. (उदाहरणार्थः अँटिबायोटिक घेणे म्हणजे हिंसा आहे का ?) -- पैसाभोक्ता (आमच्याकडे फक्त दुधाला विरजण लावून मिळेल)

विंगार्डियम लेव्हिओसा ;)

एका जेष्ठ सदस्याने दुसर्‍या जेष्ठ सदस्याच्या धाग्याच्या असे विडंबन करावे काय ? परालिया थत्ते

अवारा-केडावरा म्हणजे हत्या हे समजत असतानाही लॉर्ड व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली? एका खुन्याला "लॉर्ड" असे म्हणणारी प्रक्षोभक विधाने करून आपल्याच लेखांना शेकडो प्रतिसाद मिळवत स्वतःच्या टॉप २५ च्या यादीत घुसण्याचा ह्यात छुपा हेतू दिसत आहे. ;) अवांतरः सीएनएनवर कृष्णशुक्रवारासंदर्भातील बातमी आधी वाचनात आली असल्याने, व्हॉल्डेमार्ट च्या ऐवजी वॉलमार्टच वाचले.

तो हॅरी पॉटरचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित डंबलडोरवादी करतीलही, नाही तो व्हॉल्डेमार्टचा गाढवपणा होता. मूळात प्रश्न हा आहे की व्हॉल्डेमार्टचा हा जीवन्त होता काय ? तर त्याचे उत्तर नाही असेच देता येइल, मी आठवा भाग वाच्लेला आहेत त्यात असे स्पश्ट लिहले आहे कि १ ते ७ या भागामधे जे लीहले आहे ते एक हॅरी पॉटरला पडलेले स्वप्न होते.

आयला 'पावटा' स्वस्त झाला का काय?