शाहीद - एक करूण कहाणी
लेखनप्रकार
भवानी तीर्थंकरच्या डायरीतील एक पानः
लक्षवेधी: हे डायरीतील एक पान आहे. त्यामुळे इथे छायाचित्र टाकता येणार नाही. वास्तविक शाहीदला ते हवं होतं, पण डायरीतल्या पानासोबत छायाचित्र म्हणजे संपादकीय (तेच ते, अग्रलेख किंवा उग्रलेख) चौकटी असं वाटायला नको, असं आमच्या पत्रकार मित्राचं मत झालं. त्याच्या मते ही शाहीदची (फुकट) जाहिरातही झाली असती, सबब छायाचित्र का नाही यावर वाद न घालणंच बरं, कसें?
लक्षवेधी संपली, डायरीतले पान सुरू ...
---------------------------------------------------
स्थळः दक्षिण मुंबईतला एक पॉश बार.
आमचे एक पत्रकार मित्र आहेत; त्यांना काही बारबालकांवर अभ्यास करायचा होता. अर्थात विठ्ठलाला भेटायचं तर पंढरीत जावं लागतं, किंवा खरा सिंह पहायला गीरलाच जावं लागतं, तसं बारबालकांना भेटायला कुठे जाणार? मग प्रश्न आला, कारण या बारमधे एकट्या पुरूषाला जाता येत नाही, कारण एकतर हा शुद्ध स्ट्रेट बार आहे. दुसरं म्हणजे एकट्यादुकट्या पुरषाने जाणं म्हणजे कामपिसाट स्त्रियांच्या वखवखलेल्या नजरांना आमंत्रणच. फाटलेले कपडे सांभाळत, कण्हत कण्हत बाहेर यावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग माझा फोन वाजला. अलिकडे खरडी आणि प्रतिसादांचा धंदा मंद असल्यामुळे मलाही वेळ होताच. मी लगेच सहकार्य जाहीर केलं. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की या नव्या विश्वात मी वेगळ्या, शरीराचा बाजार करणाऱ्या पण आतून खऱ्याखुऱ्या हाडामासाच्या माणसांनाच भेटणार होते.
---------------------------------------------------
आतमधे बर्यापैकी उजेड आणि वर लागलेलं ढणढणाट 'म्युझिक' आणि त्यावर कडी करणारे फ्लॅशसारखे दिसणारे डिस्को लाईट्स! डोळ्यांना सरावायला थोडा वेळच लागला. मग मी आणि मित्र एक टेबल पकडून बसलो. मुंबईतल्या बारमधे जाण्याची माझी पहिलीच वेळ; या आधी फक्त सायबाच्या देशातल्या पब आणि बारमधेच गेल्यामुळे मी थोडी बुजलेच होते. तेवढ्यात माझ्या शेजारी एक हँडसम म्हणावा असा पुरूष येऊन बसला. हा बहुदा माझ्या मित्राच्या ओळखीचा असावा, आता याच्याकडून कोणा बारबालेशी ओळख होईल अशी मी समजूत करून घेतली. मी किती सेक्सिस्ट आहे, माझ्यात जेंडर बायस किती भरलेला आहे याची मला एवढ्या चटकन जाणीव होईल असं मला वाटलं नव्हतं. दोन मिनीटांपूर्वी 'काय हँडसम आहे ना हा' असा मी ज्याच्याबद्दल विचार केला होता त्यालाच भेटायला आम्ही आलो होतो हे संवादांतून दोन मिनीटांत माझ्या लक्षात आलं. सवयीप्रमाणे त्याने मुलाखतकाराला टाळले आणि माझ्याशेजारीच खुर्ची ओढून बसला. खरंतर त्याच्या चेहेर्यावरचा आत्मविश्वास, शांतपणे माझ्याशेजारी येऊन बसणं, त्याची पिळदार शरीरयष्टी ... मी त्याला पाहिलं आणि ... आणि अशी मुलं माझ्या वर्गात कधी का नव्हती असाच विचार माझ्या डोक्यात आला. हे बरं होतं, म्हणजे एकतर मित्रावर उपकार केल्याचा आव आणायचा आणि वर पोरंही बघायला मिळतायत तर! उगाच का खोटं बोला, पण जीव खुळा होण्याचा मक्ता काय फक्त बारबालांच्या चाहत्यांनीच घेतलाय का? मुलाखतीला सुरूवात झाली होती. खरंतर त्याला त्या दिवशीची टिप, भाडं सगळंच माझ्या मित्राच्या मॅगझिनकडून मिळणार होतं. पण शाहीदच्या मनात काहीतर वेगळंच होतं. शाहीद कपूरच्या चेहेर्याशी साधर्म्य होतं म्हणून यानेही आपलं नाव शाहीद ठेवून घेतलं होतं. काय फरक पडतो मला, त्याचं नाव जॉन असेल नाहीतर शाहीद नाहीतर आणखी काहीतरी! एकूणच त्या बारमधे येणार्या इतर बायकांप्रमाणे त्याने माझ्यातही गिर्हाईक पाहिलं होतं. त्याचा काय दोष म्हणा यात, बारमधे येणारी प्रत्येक स्त्री म्हणजे त्याच्यासाठी पैशांचा स्रोत, फक्त पोट भरण्याचं साधन. बाप रे, काय हे जीवन होतं याचं!! एखादा माणूस समोर दिसला की कोणी अण्णा, कोणी चिमा, कोणी पिल्लू, कोणी काकू असे विचार माझ्या डोक्यात येतात आणि हा तर स्त्री दिसली की फक्त उदरनिर्वाहाचा विचार करतो. आणि उदरनिर्वाहासाठी काय तर समोरच्या गिर्हाईकाला खूष करायचं. आणि मग त्यासाठी रोज व्यायाम करायलाच पाहिजे, शरीर बेताल सुटलेलं असेल तर आकर्षक कसं असणार? रोज आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण दिसलंच पाहिजे, नाही तर कशाला ढुंकून पाहतील याची गिर्हाईकं याच्याकडे? मुलाखत सुरू होतीच, एकीकडे हा बोलत होता आणि माझ्या मनात मात्र त्याच्याबद्दल असणारं आकर्षण क्षणोक्षणी बदलत होतं. "कसला हँडसम आहे हा!" इथपासून "बिचारा, काय लाईफ आहे सालं याचं!" इथपर्यंत माझे विचार सुरू झाले होते. पण तरीही त्याच्याबद्दल एक विचित्र आकर्षण वाटत होतं हे खरं!
मुलाखत घेणार्या मित्राला बाजूला सारून मीच शाहीदशी गप्पा मारायला लागले होते. रोज शरीरसुखासाठी येणार्या स्त्रिया त्याच्याकडून काय काय कामं करवून घेत असतील याची मला कल्पनाही आली नसती. नवरा महिनोन-महिने घराबाहेर असतो, वेळेत लग्न झालं नाही, नवरा फार डॉमिनेटींग आहे म्हणून घरात कवडीची किंमत नाही, लग्न म्हणजे जबाबदारी आणि ती नको, किंवा उगाच गंमत म्हणून अशा अनेक कारणांसाठी तिथे येणार्या अनेकविध आकार, रूपांच्या स्त्रिया; पण सगळ्यांमधे एक गोष्ट कॉमन, "मी मालक आहे. मी पैसे मोजून तुला आत्ता विकत घेतलं आहे" ही बॉसी भावना! आणि या वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीमधून शाहीदला सहन कराव्या लागणार्या अनेक गोष्टी! हे सगळं ऐकून बारमधल्या गुबगुबीत खुर्चीवर, एसीत बसल्याजागी मला घाम फुटला की काय मला वाटत होतं.
एक मात्र होतं, कोरडेपणाने प्रश्न विचारणार्या माझ्या पत्रकार मित्रापेक्षा शाहीद माझ्याकडेच जास्त मोकळेपणाने बोलत होता. पैसे मोजून एक पत्रकार त्याच्या अंतःकरणाला हात घालू शकला नव्हता, पण सहजच आत्मीयतेने केलेल्या चौकशी आणि बोलण्यातून मी मात्र त्याच्या करूण कहाणीला हात घातला होता. "का रे करतोस हे सगळं नाही आवडत तर? घरी कोणी काही बोलत नाही का तुला? लग्न कसं होणार तुझं?" माझं मध्यमवर्गीय डोकं घरचे, लग्न, संसार यापुढे जातच नव्हतं. "लग्न ... त्यामुळेच तर सगळा प्रॉब्लेम झालाय!" आता मात्र मला सगळ्यात मोठा बॉम्ब माझ्यावर पडल्यासारखं वाटायला लागलं होतं. त्याने खिशातून तिचा फोटोच काढून दाखवला. "माझी बायको आणि मी एकाच ट्रेकिंग ग्रुपमधे होतो. तिच्या धाडसी स्वभावामुळेच मी तिच्याशी लग्न केलं. पण लग्नामुळे शिक्षण सोडून द्यावं लागलं. कमावतं कोणी नव्हतं ना घरी! मी एका कॉल सेंटरमधे ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. बायकोचंही शिक्षण सुरू होतं. तिला एयर होस्टेस बनायचं होतं. आणि तुला तर माहित असेल किती खर्च होतो आजकालच्या जगात. त्यातच माझे सासरे आजारी पडले. त्यात खूप खर्च झाला पण ते वाचले. आता फार हट्टी झाले आहेत ते! आता त्यांचं ऐकलं नाही तर ते व्हायलंट होतात आणि असं झालं की बायकोला सहन होत नाही. माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, तिचं दु:ख मी पाहू शकत नाही. मग तिनेच उपाय दाखवला. खरंतर मला माझी चांगली नोकरी सोडायची नव्हतीच. पण काही पर्यायच नव्हता. सासर्यांचं आजारपण आणि बायकोचं शिक्षण यांच्यासमोर माझ्या नोकरीचं काय महत्त्व?" शाहीद बोलत होता आणि आम्ही दोघं आश्चर्यचकीत होऊन ऐकत होतो. चांगल्या घरातला मुलगा अशा मार्गाला लागला याचं वाईटही वाटत होतं, पण आम्ही काय करू शकणार होतो? 'स्टारकास्ट' मॅगझिनमधे सत्यशोधक या पदावर काम करणारा माझा मित्र आणि गेली पाचेक वर्ष फुटकळ नोकर्या करत फिरणारी मी, आम्ही किती शाहीदना मदत करू शकणार होतो? आयुष्यांच्या मशाली पेटवायला आमची हिंमत नव्हती, नाही हे निश्चित!
मी शाहीदला बोलतं केलं खरं, पण ते नकोसं होतं खरं तर. पत्रकार मित्राच्या प्रश्नांवर मग त्यानं तितक्याच तटस्थपणे या धंद्यातील प्रवेश, त्यानंतर आलेले अनुभव सांगण्यास सुरवात केली. आमचे हे मित्र ते टिपून घेत होते. मग शाहीदनं त्याच्या घरी येण्याचंही निमंत्रण आम्हाला दिलं. आपली कोणी मुलाखत घेतंय हेच त्याला इतकं भावून गेलं होतं की, तो आपल्या जिंदगीची सारी किताबच आमच्यासमोर खुली करत गेला. घरी त्याची पत्नी नव्हती, पण सासरे होते. खाटेवर पडून हातात रिमोट अशा स्थितीत ते होते. समोर टीव्हीवर फॅशन चॅनल सुरू होता. आपल्या पक्षाघाती अपंग पण तरीही हिरवट सासर्याला शाहीद मेतकूट-भात भरवत होता. भरवता भरवता त्याचाशी आपुलकीनं बोलत होता. मध्येच त्याच्या तोंडातून भातखिमट बाहेर येत होता तो पुन्हा चमच्याने नीट त्याला भरवत होता. म्हातार्याच्या चेह-यावर भावनेचा लवलेश नव्हता, अगदी या पोराबद्दल कृतज्ञताही नाही! इतक्या हाल-अपेष्टा सोसून फॅशन चॅनल साठी केबलवाल्याची दरमहा फी भरणे खायचे काम नाही! त्याकडे पहात शाहीदनं फक्त आमच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातील ते हजार सशांच्या व्याकूळतेला लाजवणारे भाव... आम्ही काही करू शकत नव्हतो पाहण्यापलीकडे. घरचं वातावरण अगदी मध्यमवर्गीय ते उच्चमध्यमवर्गीय. बोलता-बोलता शाहीदनं मग पत्रकार मित्राशी शेअर बाजाराचीही चर्चा केली. त्याची तिथं गुंतवणूक होतीच. भविष्यासाठी केलेली. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठीची. त्याला कम्प्यूटर इंजिनियर करायचं आहे असं तो म्हणत होता. मुलगा फर्स्ट क्लास मिळवतो म्हणाला. म्हणजे तसा इंजिनियर करायचं तर पैसे लागणारच हे त्यानं आत्ताच ओळखलं होतं. शाहीदला या विश्वातून बाहेर यायचं होतं का? असावंही. पण तो तसं स्पष्ट बोलत नव्हता. जिंदगी-जिंदगी काय असते शेवटी भवानी? असं तो मलाच विचारत होता आणि माझ्याकडे त्याचं काही उत्तर नव्हतं. पत्रकार मित्राकडंही उत्तर नव्हतंच.
मी ते दृष्य पाहात होते... भारावून गेले... मोठ्यांबद्दल आदर, प्रेम, विश्वास या नवीन पिढीत नाही असं कोणी म्हातारे मला सांगायला लागल्यावर मला शाहीदचीच आठवण यावी. या विचारांतून माझी तंद्री भंगली. मिश्कील चेहेर्याने शाहीद मला विचारत होता, "तुलाही आहे का अॅडव्हेंचरस लाईफची आवड?"
बरंच काही लिहीण्यासारखे अनेक विषय डोक्यात असतात. पण असा एखादा शाहीद असा चमकून जातो आणि मग लिहावंसं वाटतं. बाकीचे विषय पुन्हा कधीतरी.
आभारप्रदर्शन: डायरीतले पान इथे टाकण्यात मदत करणार्या सर्व आयडी श्रावण मोडक, बेसनलाडू आणि राजेश घासकडवी यांचे आभार.
वाचने
15876
वाचनखूण
प्रतिक्रिया
68
खुपच चटका लावणारी करूण कहाणी.
In reply to खुपच चटका लावणारी करूण कहाणी. by मृत्युन्जय
+१...
करुण कहाणी
रि डि क्यु ल स !!
बिच्चारा शाहिद!
तरुण आणि करुण दोन्ही
हट के!
त्यांचे विश्व..
वा
लेख वाचून पडलेले काही प्रश्न
मुक्तसुनीतांना पडलेले प्रश्न
In reply to मुक्तसुनीतांना पडलेले प्रश्न by शुचि
गरगरलेल्या डोक्यावरचा इलाज
In reply to गरगरलेल्या डोक्यावरचा इलाज by मुक्तसुनीत
स्टन गन
In reply to स्टन गन by आळश्यांचा राजा
+१
In reply to गरगरलेल्या डोक्यावरचा इलाज by मुक्तसुनीत
ट्यूबलाईट
In reply to गरगरलेल्या डोक्यावरचा इलाज by मुक्तसुनीत
हाहा!
In reply to मुक्तसुनीतांना पडलेले प्रश्न by शुचि
तो विनोद होता हे मान्य. पण
वाह!
शीर्षकसूचकतेचा पायंडा
In reply to शीर्षकसूचकतेचा पायंडा by सुनील
किंचित स्पष्टीकरण
In reply to किंचित स्पष्टीकरण by मुक्तसुनीत
(ज्योतीने तेजाची आरती)
In reply to (ज्योतीने तेजाची आरती) by सुनील
मुसुंना आजकाल बर्याच गोष्टी
In reply to मुसुंना आजकाल बर्याच गोष्टी by प्रभो
व्हय म्हाराजा
मस्त
लेखिकेच्या प्रामाणिकपणाविषयी
In reply to लेखिकेच्या प्रामाणिकपणाविषयी by आळश्यांचा राजा
आमचे मत्त
In reply to आमचे मत्त by मुक्तसुनीत
स्टन गन लागल्यामुळे काही
संवेदनाहीन लिखाण
बार . वेश्या . दारु.
फालतू
'आयुष्यांच्या मशाली ' शब्द
कृपया
In reply to कृपया by मिसळभोक्ता
कोकसस्थ
In reply to कोकसस्थ by daredevils99
-१
In reply to कृपया by मिसळभोक्ता
खरंय!
In reply to खरंय! by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुला
In reply to तुला by मिसळभोक्ता
नेहेराच पण
In reply to नेहेराच पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ
रिअलिस्टिक!
या शाहीद वर जर आअणखी रौशनी
In reply to या शाहीद वर जर आअणखी रौशनी by विजुभाऊ
(विषय दिलेला नाही)
In reply to या शाहीद वर जर आअणखी रौशनी by विजुभाऊ
मान्य आहे विजुभाऊ
In reply to मान्य आहे विजुभाऊ by ३_१४ विक्षिप्त अदिती
खरंय... पुढचा लेख विजुभाऊ
- सूर्य.
हॅहॅहॅ!!!
झकास जमून आलाय लेख. आणि
In reply to झकास जमून आलाय लेख. आणि by परिकथेतील राजकुमार
कुमच्याने नदीची वाट अडवणं हे
करूण
In reply to करूण by नंदन
+१
In reply to +१ by सहज
+२
In reply to +२ by मिसळभोक्ता
मिपासदस्यांकडून काही मदत
वा !!! आकाशावर रोखलेली
ह्म्म्म
वा वा वा
In reply to वा वा वा by आदिजोशी
+१
आँ?!
चान ...... विक्षिप्तपणा
तुझा लेख मला खरोखर अगदी मनापासून आवडला
In reply to तुझा लेख मला खरोखर अगदी मनापासून आवडला by सुधीर काळे
का कुणास ठाऊक
In reply to का कुणास ठाऊक by श्रावण मोडक
कुठल्या वाक्याने तसे वाटले यावर बोट ठेवता आले नाहीं म्हणून!
In reply to कुठल्या वाक्याने तसे वाटले यावर बोट ठेवता आले नाहीं म्हणून! by सुधीर काळे
आरओएफएल !
चान चान....
जगातील एक खरी बाजु मांडली आहे
!!!
जगावेगळा अनुभव
In reply to जगावेगळा अनुभव by कवितानागेश
हॅहॅहॅ
आदितीबैंना दंडवत!!
गिगोलो