आत्महत्या २० -२२व्या वर्षी.
आत्महत्या ----
का करावी वाटते आत्महत्या, आणि ते सुद्धा वयाच्या २० -२२व्या वर्षी.
जमलेले सगळे झालेल्या घटनेला अतर्क्य, अकल्पित वगॆरे म्हणत होते, पण आदर्शला का वाटलं असेल
या मार्गानं जावं असं, असतील काही समस्या, प्रश्न आणि जटिल पण असतिल तरी हे पाउल घेण्याआधी सगळे इतर मार्ग संपल्याची खात्री केली होती त्यानं ?
कोणि नसेल का भेटला त्याला जसा पार्थाला भगवान भेटला, आता मान्य कि पार्थ आत्महत्या करायला चालला नव्हता , पण एका क्षत्रियानं युद्ध नाकारणं म्हणजे आत्महत्याच होती की एका प्रकारे.त्याला आमक्लेश झाला होता किंवा होत होता,पण भदवदगीता ऎकुन त्याचा आत्मक्लेश दुर झाला.पण या मझ्या मित्राच्या बाबतीत असं म्हणणं बरोबर ठरेल का कि त्याचा आत्मक्लेशच त्याच्या आत्महत्येला कारणीभुत ठरला.
दारु सिगारेट वगॆरे होतं पण व्यसन होईल इतकं नाही, एक दोन प्रेम प्रकरणं सुद्धा होऊन गेली आहेत.
मी आता विचार करतो आहे, मी त्याच्या क्रुष्ण व्हायला हवं होतं का ? मी होऊ शकलो असतो का क्रुष्ण,सांगु शकलो असतो त्याला आमच्या दोघांच्या आयुष्यापुरती गीता ? करु शकलो असतो का त्याचा आत्मक्लेश दुर ज्यामुळे त्याने अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला नसता ?
असे बरेच प्रश्न आता पडत आहेत माझ्या मनाला पण मेंदु म्हणतो अरे वेड्या जर असं समजलं असं की त्याच्या दुखाचं कारणच तु आहेस तर, तर काय केलं असतंस? त्याची माहिती असलेली प्रेम प्रकरणं ठिक आहे पण असं समजलं असतं की तो कस्तुरी वरच प्रेम करतो आहे तर, मग तुझ्यातल्या क्रुष्णानं काय केलं असतं? उगाच नसतं विचार करु नकोस. काल पर्यंत तो होता आणि आता नाही हेच एकमेव आणि अंतिम सत्य आहे आणि तुला ही हेच ..
क्रमश...
हर्षद
पुर्व प्रकाशित - http://harshad-gaaanikha.blogspot.com
वाचने
3338
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
एवढंस लिहून क्रमशः टाकलं होय! पूढचा लिहा आता पटापट! ;)
पुढचे पटापट लिहा , का 'स्पा' ला लिहायला सांगु ?
कॉलिंग 'स्पा' ...
In reply to पुढचे पटापट लिहा , का 'स्पा' by परिकथेतील राजकुमार
साल्या नालायक आहेस......................................... ;)
BUT खरच.. आयुष्यात अशी वेळ येते कि काहीच मनासारखं होत नाही.......
सगळीकडून फक्त अपयश..... येत असतं .......
हेच एक SOLUTION मग दिसायला लागतं .......
वेळेवर बाहेर पडलं तर ठीक............
आता सुद्धा माझी " परिस्थिती" फारशी बदलली नाहीये.....
पण मी बदललोय ......(प्रयत्न करतोय)
मिपाचं व्यसन लावून घेतलंय.....
(आता काही दिवसांनी ते कसं सोडवू यावर एक धागा काढावा लागेल......)
सो माझ्यामते.......
i think life is like a test match cricket... u can turn around the game at the last session of the final day also............... so waiting for that WINNING MOMENT...............................................................................
In reply to साल्या नालायक by स्पा
BUT खरच.. आयुष्यात अशी वेळ येते कि काहीच मनासारखं होत नाही....... सगळीकडून फक्त अपयश..... येत असतं .......हे असे काही ऐकले वाचले की मला कायम "I received nothing I wanted, But everything I needed" हे वाक्य आठवते :)
In reply to साल्या नालायक by स्पा
i think life is like a test match cricket... u can turn around the game at the last session of the final day also............... so waiting for that WINNING
सगळ्या दु:खांचं मूळ तॄष्णा हे आहे असं गौतम गुर्जी सांगायचे. असो. बाकी तुमचा तो 'असं वाटतं की आत्महत्या करावी ' वाला धागा सॉलिड प्रतिसादखेचू होता.
खरय..................
यातील आत्महत्येची घटना खरी आहे आणि त्या मागची कारणं शोधताना आम्हां मित्रांच्या ज्या चर्चा झाल्या त्यांचा गोषवारा या कथेत घेण्याच्या प्रयत्न करीत आहे.
आपणं सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
पुढिल भाग २९ला रात्री टाकेन.
हर्षद
पचवायला शिकायलाच पाहीजे, यशस्वी व्हायचं असेल तर.. स्वानुभावावरुन सांगतोय.
संपवून टाकावं आपलं जगणं!
कि बास ना....कय करायचय अजुन जगत राहुन?
पटकन कुठेतरी accidetal आत्महत्या करुन टाकावी!...... कोणाला कळले नहि पाहिजे की हे असं आहे..it should look like an accident!
खुप विचित्र फेज होती तेव्हा....
मीही हाच विचार करायचे...२६ व्या वर्षी जगणं पुरे असं का वाटतं आहे मला?
....बाहेर आले त्यामधुन ..... but that thought itself was worth worry! Isnt it?
का असं झाल होत ...काय माहिती?
त्यामुळे या स्पा चा लेख वाचला ना त्यावेळी कुठेतरी स्वतःला रीलेट केल होत!
In reply to .....मला ही वाटायचं मध्ये.....एक फेज होती तेव्हा..की by जाई अस्सल कोल्हापुरी
आइल्ला ...
म्हणजे २५ -२६ हे वयच असतं की काय असे विचार येण्याचं अशी एक शंका येऊ लागली आहे.
>>कि बास ना....कय करायचय अजुन जगत राहुन?
अगदी अगदी... असेच विचार येऊन कित्येकदा मी दिवस्च्या दिवस कोंडलेल्या अवस्थेत घालवले आहेत. अजूनही कधी कधी असे झटके येतात. :(
स्वतःला संपवण पण इतका सोप्पं नाहीये....... जाई तै......
(जाम फाटते............. )
हिम्मत वाले लोकंच असं करू शकतात.......
(आता काही जण म्हणतील .. स्वतःला संपवण सोप्प असतं, पण प्रोब्लेम ला face करणं कठीण....., पण स्वतःला संपवण देखील खूप कठीण असतं )
agree!
ह्या विषयावरचं लिखाण माझ्या मित्र वर्गामध्ये वादग्रस्त होत असल्याने, तसेच हि घटना आता मा. न्यायालयात दाखल झाल्याने या विषयावरील लिखाण थांबवत आहे.
हर्षद.
फार वाईट वाटतं असं कुणी केलं की.
आपलाच लेखाची प्रसिद्धी करण्याचा दोष लागण्याची शक्यता असूनसुद्धा, मी अगोदर याच उद्वेगातून लिहिलेल्या लेखाची लिंक इथं देतो. - http://www.misalpav.com/node/5680
आज पराभाउंचं देशद्रोही वालं परीक्षण वाचलं. कमाल खान ला सुद्धा आत्महत्या करावीशी वाटत नाही मग इथल्या लोकांना का वाटत्येय कोणास ठाउक ?
(जिंदगी झंडवा फिरभी हमें घमंडवा)
काय राव?