Skip to main content

पुस्तक - रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन

लेखक शुचि
Published on सोमवार, 15/11/2010
लेख सुरू करण्यापूर्वी - या लेखामध्ये जेथे भाषांतर मारक ठरले असते तेथे ईंग्रजी वाक्य तशीच ठेवली आहेत. रेडिओ आणि टेलिव्हिजन या माध्यमांमधून लॅरी किंग हे प्रसिद्ध झालेले आहेत. या मुलाखतकाराने नामवंत, गुणवंत, सौंदर्यसंपन्न, श्रीमंत, बुद्धीमान अशा ३०० कलाकारांना, खेळाडूंना, बिझनेसमधील व्यक्तींना १ प्रश्न केला तो हा की - "त्यांच्या पश्चात, लोकांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं, आठवावं असं या लोकांना वाटतं? " या प्रश्नाला या ३०० लोकांनी जी उत्तरे दिली त्यातून " रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन" हे पुस्तक जन्मास आलं. यातील उतारे अनेकविध प्रकारची आहेत- काही निखळ विनोदी तर काही अंतर्मुख करणारी तर काही त्या त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेचा आदर वाढवणारी आहेत.पुस्तकात एकूण व्यक्तीमत्वांचे व्यवसायानुसार ९ भाग आहेत - चित्रपट तारे/तारका, खेळाडू, लेखक, व्यंगचित्रकार, विनोदसम्राट, बिझनेसमधील लोक, पत्रकार, संगीतकार आणि स्टेजवरील कलाकार. १ नक्की की अनेकांना या प्रश्नाने आयुष्याकडे गंभीरतेने पाहण्यास भाग पाडले आहे. आता सुरुवात करू यात की त्या त्या व्यक्तीला तिच्या थडग्यावर काय लिहीलेले आवडेल अशा काही उदाहरणांची - भाग १ चित्रपट तारे तारका- (१) जोआन बार्न्स - शेवटी एकदाची पार्कींगची जागा मिळाली बाई! (२) शेली बर्मन -वर्षानुवर्षे मी हे पटविण्याचा व्यर्थ प्रयत्न केला की मी देखील तुमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती आहे. आशा करते आतातरी तुम्हाला ते पटेल. (३) फ्लोरेन्स हेंडरसन- जीवनाचा प्रारंभ श्रद्धा, आशा आणि प्रेम या मूल्यांनी झाला. जीवनाच्या अंतीम काळी श्रद्धा, आशा, प्रेम ही मूल्ये होती. मधल्या काळात मी संशयाच्या भोवर्‍यात गटांगळ्या खात होते. (४) शर्ली नाईट - या जन्मी मला ही गोष्ट कळली की हिंसा हे कोणत्याही समस्येचे समर्थक उत्तर होऊ शकत नाही हे मला कळले याबद्दल मी उपकृत आहे परंतु या गोष्टीचे वाईट वाटते की बऱ्याच लोकांना ही गोष्ट कळण्यासाठी १ जन्मदेखील पुरत नाही. (५) जॅनेट लेह - ईश्वरी तत्त्व आपल्या वागणूकीमधून प्रकट करण्याकरता आयुष्य ही एक संधी तुम्हाला दिलेली असते. मी ते दर वेळेस प्रकट करू शकलोच असे मी म्हणू शकत नाही पण ईश्वर जाणतो की मी प्रयत्न केला. (६) जॉर्ज चॅकीरीस - क्षण कितीही काळा असो, प्रेम आणि आशा यांना सदैव संधी असते. (७) स्टेसी कीच - Here Lies Stacy Keach A georgia peach Lived At the beach Now out of Reach भाग २ खेळाडू - (८) बॉब कुसी - जेव्हा कोणाचम लक्ष नव्हतं तेव्हा त्याने त्याचे सर्वोत्तम देणे देऊ केले (९) डोमिनो डिमॅजीओ - A guy who thrived on challenges large and small. (१०) बॉबी नाईट- When my time on earth is done and i have breathed my last I want they bury me upside down So my critics can kiss my ass. (११) जेरी कूसमॅन - पहीला आणि शेवटचा गडी बाद करणं सोपं होतं. मधल्या सर्वांनी माझे केस करडे केले. (१२) टॉमी लासोर्डा - Dodger stadium was his address but every ballpark was his home. भाग ३ लेखक- (१३) जॅक कॅनफील्ड - त्याची प्रत्येक कथा ही दुखऱ्या जगावर केलेली मलमपट्टी होती. (१४) फॅनी फ्लॅग - म्हणजे? पुस्तकांचा दौरा संपला म्हणायचा की काय? (१५) क्लाईव्ह कसलर - It was a great party while it lasted I trust it will continue elsewhere (१६) अँड्र्यू ग्रीले - May it be said When I am dead His sins were Scarlet His books were read (१७) इव्हान हंटर - तो एखाद्या देवदूतासारखा लिहीत असे
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1865
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

लॅरी किंग... याने घेतलेली मार्लन ब्रान्डोची एक मुलाखत तुनळीवर बघितली होती. हा मला त्या निखिल वागळेंसारखा वाटला. म्हणजे समोरच्या पेक्षा आपणच जास्त बोलायचं..आणि आपल्याला हवं तसं आणी तेवढंच समोरच्याला बोलू द्यायचं. पुस्तकाची तोंडोळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आणखी थोडं विस्तृत लिहीलं असतं तर आवडलं असतं. विशेषतः तुम्हाला सर्वांच्या मतांमध्ये कुठे काही समान धागा सापडला का वगैरे...

In reply to by स्वानन्द

http://books.google.com/books?id=Ro-CGz9QwyQC&pg=PT6&lpg=PT6&dq=max++baer+epitaph+remember+me&source=bl&ots=8TnZiMqH3t&sig=lcDH12TbHaVP-A8V4onQY0RYECQ&hl=en&ei=K3zhTKeMDsaAlAeXzZzsAw&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&sqi=2&ved=0CBoQ6AEwAQ#v=onepage&q&f=false येथे पुस्तकाचा बराचसा अंश सापडेल असे वाटते.

'ती' च्या थडग्यावर : देवा, ज्या आनंदाने मी तिला तुझ्याकडे पाठवतोय, त्याच आनंदाने तो तिचा स्वीकार कर. हिअर लाईज जेन. कोल्ड, अ‍ॅज ऑल्वेज 'त्या'च्या थडग्यावरः तो एक चांगला मित्र होता, एक उत्तम नवरा होता, पण एक वाईट इलेक्ट्रिशियन होता. बाबा, तुमच्या आठवणींप्रित्यर्थ तुमच्या लाडक्या मुलांकडून (रिचर्ड सोडून कारण त्याने काहीही पैसे दिले नाहीत) देवा, आता जॉनचा तूच सांभाळ कर, त्याला आपल्या कुशीत बसवून घे. फक्त तुझे पाकीट सांभाळ. हिअर लाईज जॅक. स्टिफ, अ‍ॅट लास्ट!

अनेकांना या प्रश्नाने आयुष्याकडे गंभीरतेने पाहण्यास भाग पाडले आहे. आयुष्याकडे गंभीरतेने बघितल्याने आयुष्यात काय फरक पडतो?

In reply to by वेताळ

आपण आपली अ‍ॅटीट्युड बदलतो, आपल्या पश्चात काय रहावं या दृष्टीने पावले उचलतो, कधी कधी या गोष्टीची जाणीव होते की कुटुंब हे अधिक महत्वाचे आहे अन्य सर्व गोष्टींपेक्षा. हे काही फायदे असू शकतात.

एक सहज ,सुंदर आणि निरोगी आयुष्य जगले तरी सगळे सहज शक्य आहे. माझा एक मित्र आहे. तो एका चांगल्या कुटुंबातला व अभियंता आहे. त्याचे शिक्षण पुर्ण झालेवर त्याला अशीच विचार करण्याची सवय लागली.वर सर्वत्र आकाश आहे. मग त्या पलिकडे काय आहे?आकाश कश्यावर पेलले आहे.मी असे केले तर ते पाप होईल का? असे कायबाय विचार करत शुन्यात नजर लावुन बसत असे.त्याच्या घरच्यानी योग्य वेळी योग्य ती दखल घेवुन त्याला सामान्य पातळीवर आणला.आता तो व्यवस्थित त्याचा धंदा करत आहे.

In reply to by वेताळ

आपण सामान्य माणसे "डाऊन टू अर्थ" असतो पण या सेलीब्रिटीज असतात यांच्या डोक्यात हवा गेलेली असते. 95% of them have their personal lives in shambles. तशा व्यक्तींना या प्रश्नाचा उपयोग झालेला असू शकतो.