Skip to main content

दाल पक्वान..

लेखक डावखुरा
Published on शुक्रवार, 12/11/2010
दाल पक्वान.. (मैद्यामधे,गरम तेल,मीठ,ओवा,थोडी पिठीसाखर याचा गोळा भिजवुन पुर्‍या लाटुन घ्या...) (पुदिना, कोथिंबिर,मिरची आणि मीठ याची चटणी) (हळद,मीठ,हिंग घालुन उकडव्लेली हरभरा दाळ) गरज वाटली तर थोडा चाट मसाला आणि तिखट पण फवारले तरी चालते.. (चिंचेची चटणी) (कांदा-टमाटा यापेक्षा बारीक चिरला तर अजुन छान लागतो.. ;) पण खायची घाई असेल तर काय..) (पण नेहमीप्रमाणेच कोथिंबिर नसेल तर.. घरात सुगरण नसेल तर घराला काय अर्थ तसेच पदार्थावरील सुगरणीची पदवी कोथिंबिरीला बहाल..) आणि त्यावर बारीक शेव... मग गट्ट्म... चला तर पुन्हा एकदा जिभल्या चाटुयात...

याद्या 10530
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

चित्र पाहून तोंडाला पाणी सुटले. आता बनवून खायला लागेलच! (हावरट)बेसनलाडू

छान पाकृ. चित्रं पाहूनच तोंडाला पाणी सुटलं :)

In reply to by नंदन

असेच म्हणते.

In reply to by चित्रा

डिट्टो म्हणतो

दिसायला भल्यामोठ्ठ्या शेवपुरीसारखं दिसतंय (म्हंजे मला आवडणारच :-) )

धन्यवाद सेरेपी(माफ करा पण तै की भौ?)..भलीमोट्ठी शेवपुरी...वा काय रम्य कल्पना आहे... प्राजुतै आणि चित्रातै धन्यु... टीपःपुरी जरा कडक तळली जाण्यासाठी बारीक लाटुन झाल्यावर फुगु नये म्हणुन त्यावर जरा सुरीने चरे पाडुन घ्या... खाद्यलालसा..

सुरेख. दाल पकवान हा सिंधी पदार्थ आहे. सहसा महाराष्ट्रात बघायला मिळत नाही पण जिथे सिंधी वस्ती भरपुर आहे तिथे मात्र सर्रास याची हाटेलं आढळतात. पण शक्यतो सकाळीच मिळतो. उल्हासनगरात किंवा आमच्या पिंपरीत आलात तर जरूर हा पदार्थ खावयास मिळेल.

एका सिंधी मैत्रीणीने कॉलेजमध्ये असतांना हा पदार्थ आणला होता. छानच लागतो चविला. आज पुन्हा त्याची आठवण झाली :)

उल्हासनगरला तीन नंबर कँपच्या चौकात गीता भवन नावाचे एक हॉटेल आहे तेथे उत्कृष्ट मिळतो. खिशाला परवडावा म्हणून छोटा पकवान आणि बडा पकवान अशा दोन नावानी मिळतो. लालसा पांजो दोस्तार आहे .माडू सुठो आहे. लालसाके मुंजो खास अभिनंदन .

पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद. पण चित्रात दाखवल्याप्रमाणे खातात का अशी शंका आहे. वल्लीनी उल्लेख केलेल्या पिंप्री कॅंपातील हाटेलात अनेकदा खाल्ले आहे. पण असे खात नाहीत.

In reply to by चिंतामणी

पकवान वेगळे व दाल वेगळी असेच मिळते. दाळीत मस्त कांदा-मिरची घातलेली चिंचेची चटणी खुमारी अधिक वाढवते.

अरेच्च्या, असं असतं काय दाल- पकवान! मी हा पदार्थ बाहेर कुठेच खाल्लेला नाही. माझ्याकडच्या एका पुस्तकातली पाक्रू वाचून मी अनेक वर्षं ते करत आले आहे, पण त्यात चित्र, खाण्याची पद्ध्त, पुरी कडक की मऊ इ काही दिलं नसल्यामुळे आम्ही पुर्‍या कुलचा/ भटूरा सारख्या करून छोले- भटूरे खातात तसं खात असू. तेही अत्यंत चविष्ट लागतं, पण ही पद्धत आज कळली.

हा खास सिंधी पदार्थ. माझ्या सिंधी मैत्रिणीनं सांगितलं की हे पकवान खास आदल्या दिवशी केलं जातं आणि मग दुसर्‍या दिवशी मस्त आडवा हात मारायचा. आणि वरती कुणी म्हटलंय तसं धाग्यात दिलेल्या पद्धतीनं हे खाल्लं जात नाही. डाळ, त्यात चिंचेची आंबटगोड चटणी आणि वरून कांदा. आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलं!!! :-) सिंधी नसलेल्या किंवा उल्हासनगरमध्ये न राहणार्‍या लोकांसाठी: शीव(सायन)ला एस.आय.इ.एस. कॉलेजजवळ गुरूकृपा नावाचे एक हॉटेल यासाठीच प्रसिद्ध आहे. फक्त सकाळी ९-१० वाजेपर्यंत गेलं तरच दाल पकवान मिळतं नाहीतर मग ती तहान दाल-समोशावर भागवावी लागते. चेंबूरला दोन 'झामा स्वीटस' ची दुकानं आहेत. तिथेही हा पदार्थ मिळतोच मिळतो.

कृपया लालसा ह्यांचे सदस्यत्व रद्द करावे. धन्यवाद. अवांतर :- वरती काही तरुणींनी (?) बळच आपल्याला सिंधी मित्र मैत्रिणी आहेत हे दाखवण्याच केलेला केविलवाणा प्रयत्न बघुन फिस्सकन हसायला आले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वा वा वा अशी तरुणी उपाधी मिळणार असेल तर मी देखील वर उपप्रतिसाद देते खोटा खोटाकी माझी एक सिंधी मैत्रिण आहे म्हणून ;)

पिंप्री क्यांपात एका हॉटेलात हा पदार्थ चाखून पाहिला आहे. जबरदस्त पाककृती.

मस्तच दिसते आहे,करुन पाहिले पाहिजे. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

फटुत दिसते तशी (म्हणजे शेवपुरीसारखी) ही पाकृ नसते. वाटीत दाल, त्यात कांदा आणि चिंचेची चटणी असते. आणि पकवान वेगळे देतात डिशमधे.

प्रभो,प्राजक्तातै,चित्रातै,संदीप चित्रे भौ.... धन्यु.. पैसाताई जायंट शेव्पुरी ही कल्पनाच भारीये..आणि खायला खुप छान वाटते.. प्राजुतै..., नगरीनिरंजन भाउ धन्यवाद...लई भारी प्रतिक्रिया.... वल्ली तै माहितीबद्दल धन्यवाद..मी पण उल्हासनगरचं दाल पक्वान चा चाहता.. खादाड पिंगू..कधीही या घर आपलंच..आहे. रेवतीतै ईनो संपला का? ;) रामदास काका धन्यु..(लालसा पांजो दोस्तार आहे .माडू सुठो आहे. लालसाके मुंजो खास अभिनंदन .)पण हे काय आहे मराठीत पण समजवाना... वल्लीजी आणि चिंतामणी काका अहो सगळे पदार्थ तेच आहेत फक्त सुटसुटीत मांडली आहे..खायला सोपी ..पहायला भारी..(त्याचे काय आहे..आई एका खुप दिवसां पुर्वी एका सिंधी मैत्रीणीच्या घरी भिशी(ती भिशी खरी आम्हा खवैय्यांसाठी पर्वणीच ठरली) साठी गेली होती तेव्हा तिथे अशाच प्रकारे सर्व्ह केले होते..आणि त्यानंतर ..घरी छोटासा कार्यक्रम ठेवला होता..प्रत्येकाला वेगळे देत बसण्यापेक्षा सगळे मस्त मसाला पापड सारखे मांडुन देउन पाहिले....)तुम्ही म्हण्ता तशी पण पाककृती द्या की ती पण ट्राय करु.. स्वाती तै...निवेदिता-ताई , शहराजाद्तै...धन्यवाद.. कुक भाउ कोण्त्या कृतीबद्दल बोलत आहात मला तर तसे काही वाटत नाहीये तरी काही कमी असेल तर कृपया सांगण्याची तसदी घ्या... धन्यु.. शुचि तै जरा सांभाळुन प्रतिक्रिया द्या..मला तर माझ्या आय्डीचा जीव जायची धमकी मिळालीय.. ;) उपप्रतिसादाच्या प्रतिक्रियेसाठी :) मस्त कलंदर..चांगलेच खवय्ये दिसतात हो तुम्ही..तुम्ही सांगितलेल्या ठिकाणांवर जाउन चव घेउन पाहील नक्किच..माहितीबद्दल मंडल आपले आभारी आहे.. पराभाऊ मांडवली नाही होणार का? आजानुकर्ण काभॉ..?(अश्लील) सगळ्या प्रतिक्रिया देणार्या मिपाकरांचे हार्दिक धन्यवाद..

वा..!

छान.. धुळ्यात खाल्याचे आठवते. तिथे खाखरावजा पदार्थावर उसळ (मिसळीत असते तशी) घालून दिले होते. आवडले नाही. तुमचा पदार्थ डाळीमुळे वेगळा दिसतोय आणि आता ट्राय केलाच पाहिजे. फोटो आणि लेख दोन्ही आवडले.

गगनविहारी धुळ्यात? धुळ्यात तर मी चेतना सोडुन कुठेच खाण्याचा विचार करत नाही... हा पदार्थ नक्कि आवडेल करुन पहा मग सांगा..प्रतिक्षेत..

ते चेतना कुठे आहे प्लीज सांगा हो.धुळे म्हणजे एरव्ही खाण्याची मारामार आहे.आजीच्या हातच्या मेजवान्या तिथेच झोडल्या. आता आजी गेली. कोणीच राहिले नाही. घर उघडतच नाही. लॉजवर राहतो. एकटेच शेतजमिनीच्या कामासाठी जाणे इतकेच हल्ली होते. उभ्या उभ्या गरम कचोरी खाऊन घेतो.रात्री रस्त्याकडेला शेवभाजी चपात्या खातो. चांगली ठिकाणे सांगितल्यास उपकृत. Will surely try this reipe.

च्य मारि आज नेमका उपवास बाकि डिश एकदम भारी

@शीव(सायन)ला एस.आय.इ.एस. कॉलेजजवळ गुरूकृपा नावाचे एक हॉटेल यासाठीच प्रसिद्ध आहे. फक्त सकाळी ९-१० वाजेपर्यंत गेलं तरच दाल पकवान मिळतं नाहीतर मग ती तहान दाल-समोशावर भागवावी लागते. चेंबूरला दोन 'झामा स्वीटस' ची दुकानं आहेत. तिथेही हा पदार्थ मिळतोच मिळतो. स्वामी विवेकानंद चेंबूर हे आमचे १२ पर्यत कॉलेज सगळा जमावडा सिंधी नि पंजाबी .कुर्ल्याव्रून रिक्षा केवळ १५ मिनिटे माझ्या मते जामाची गोड बिर्याणी फेमस आहे व बाजूच्या दुकानात दल पकवान व ताक लस्सी अप्रतिम बाकी बाजूचे राज माहितच असेल मुंबई कसब असो नाही तर पूर २४ तास हि मधुशाला उघडी . त्याची बिर्याणी म्हणजे याव रे याव समोरच एका धाब्यावर पराठे अप्रतिम राज मधून सकाळी सात वाजता अपेय पानाचा काम संपले कि (शिंचे कोबडे अमळ जास्तच लवकर ओरडले असे मनाशी संवाद साधून दाल पकवान ख्यायाचे किंवा चेंबूर नाक्यावरची भटाची झणझणीत मिसळ .