बक-यांना मारण्यापूर्वी स्टन करतात. म्हणजे करायला हवं. तसा अमेरिकन कायदाच आहे मुळी.
बकरेच नहीं, इतर सर्वच प्राण्यांच्या बाबतीत असा नियम आहे. एथिकल ट्रीटमेंट द्यायची असते प्राण्यांना.
स्टन म्हणजे तात्पुरता बेशुद्ध.. रादर लाथा मारू न शकण्याइतका गलितगात्र.. . त्यासाठी त्याच्या डोक्यात कॅप्टिव बोल्ट गन या हत्यारानं खाडकन प्रहार करायचा.
हातोड्यासारखा बोल्ट गन पावडरनं दणकवलेला असतो. दोन डोळ्याच्या मध्यभागी टेकवून उडवतात. यात दोन प्रकार आहेत. एक पेनीट्रेटिंग बोल्ट. हा डोक्यात घुसून मेंदूचा बराच भाग नष्ट करतो. याच्यावर बंदी आली आहे. कारण मेंदू फुटल्यामुळे त्याचे टिश्यूज रक्तप्रवाहात मिसळून ते मांस खाणा-या माणसांत मॅड काउ डिसीज फैलावू शकतो. म्हणून आता आत न घुसणारा बाहेरून ठोका मारणारा बोल्ट वापरतात.
इलेक्ट्रिक शॉक आणि कार्बन मोनॉक्साईडमध्ये गुदमरवणं हे स्टन करण्याचे इतर काही मार्ग. एका चेंबरमध्ये प्राण्याला ठेवून अचानक चेंबरमध्ये व्हॅकयूम करायचा आणि ऑक्सिजन अभावी प्राणी स्टन करायचा असाही नवीन शोध आहे.
या सर्वाचा उद्देश प्राण्याला मारताना वेदना होऊ नयेत असा आहे असं जरी म्हटलं जात असलं तरी त्याहून महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे मान चिरल्यावर सर्व रक्त वाहून जाईपर्यंत प्राण्याचं हृदय चालू राहिलं पाहिजे. प्राणी आधीच मरून चालणार नाही. रक्त आतच राहिलं तर प्राणी खराब होईल आणि विकण्यायोग्य राहणार नाही.
हे झाल्यावर प्राण्याला मागच्या पायांनी उलटं टांगून मग गळा चिरायचा. उरल्या सुरल्या हृदयाच्या धडधडीनं आणि गुरुत्वाकर्षणानं जास्तीत जास्त रक्त बाहेर सांडून जातं.
आता हे सर्व इतक्या तपशीलवार सांगून मी काय करू पाहतोय ? मी व्हेज क्लबचा कार्यकर्ता आहे का ? नाही..
मटण रस्सा, सुकं मटण हे माझा जीव की प्राण आहेत. ते ओरिजिनल मिळावं म्हणून मी पाय ओढत दूर दूर फिरतो. कोल्हापूरला गेलो की हावरटासारखा खातो.
परवा मी मटण आणायला गेलो असताना ताजं मटण मिळालं. म्हणजे बकरा कापला जातच होता. पण स्टन वगैरे काही करण्याची पद्धत दिसली नाही. डायरेक्ट धर गळा की चीर. पुन्हा बाकीच्या शेळ्या आणि बकरे पाच बाय सहाच्या जागेत तिथेच दाबलेले. ते सर्व बघत होते. आणि टरकून ओरडत होते. तेव्हा खाटिकदादा "अब्बे मार डाल उस मादार्चोद को.. " असे त्या बक-यांवर उखडून त्यांना गप्प करण्यासाठी बडवत होते.
रक्तानं जमीन लथपथून निसरडी झाली होती. जनावरं त्यात पाय सटपटून पडत होती.
अधिक माहिती काढली असता कळलं की भारतात मोठ्या कत्तलखान्यांत स्टन बिन करत बसायला वेळच नसतो. त्यात वेळ जातो आणि दर ताशी कमी प्राणी मारले जातात. उत्पादन घटतं. उत्पन्न घटतं.
लहान कत्तलखाने आणि दुकानांत जास्तीत जास्त हलाल पद्धतच चालते. हलाल मधे गळ्याला चीर देऊन सर्व रक्त वाहून जाईपर्यंत प्राणी जिवंतच ठेवावा लागतो.
लहानपणापासून मटण खातो..म्हणून खातो.
मटण खायचं नाही असं खूप जणांनी ठरवलं तर अन्नधान्य सगळ्यांना पुरणार नाही.
जीवो जीवस्य जीवनम हे मनात ठेवायलाच पाहिजे. ठार मारायचं म्हणजे प्राण्याला वेदना होणारच. सगळं कबूल.
हा आहे नुकत्याच खाल्लेल्या उत्कृष्ट मटनाचा नमुना..कोल्हापूरला..
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला त्या वाटीतला लालसर रंग
का हो तुमी सॅडिस्तिक आहात का
विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
In reply to का हो तुमी सॅडिस्तिक आहात का by पुण्याचे वटवाघूळ
Non-veg बंद कराव लागल
प्रिय संपादक मंडळ, माझ्या
गगनविहारी, तुम्ही वाईट वाटून
उद्या रविवार आहे हे कित्ती
In reply to गगनविहारी, तुम्ही वाईट वाटून by नगरीनिरंजन
मी नाही गेलो तरी बळी जाणारच
In reply to उद्या रविवार आहे हे कित्ती by मृत्युन्जय
_/\_ जय हो निरंजन देवा.
In reply to मी नाही गेलो तरी बळी जाणारच by नगरीनिरंजन
गिल्ट
alshyancha raja. Thanks for
In reply to गिल्ट by आळश्यांचा राजा
हं. (परफेक्टली इम्परफेक्ट)
In reply to alshyancha raja. Thanks for by गवि
स्वतः ला सॅडिस्ट समजू नका. लेख उत्तम जमला आहे.
In reply to alshyancha raja. Thanks for by गवि
दिल तरसता है