Skip to main content

रँडम जोक

लेखक आदिजोशी
Published on शुक्रवार, 12/11/2010
एकदा मध्यरात्री एका घरात चोर शिरतो. नवरा-बायको झोपलेले असतात. नवर्‍याच्या घोरण्यामुळे बायकोची झोप चाळवते आणि तिला कपाट उघडायचा प्रयत्न करणारा चोर दिसतो. ती आरडाओरडा करणार इतक्यात चोर तिच्या तोंडत बोळा कोंबतो, तिचे हात-पाय बांधतो आणि कामाला लागतो. खुडबुड ऐकून नवर्‍याला जाग येते. तो डोळे किलकिले करून बघतो तर बायको तोंडात बोळा आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत आहे आणि चोर कपाटातलं सामान बॅगेत भरतोय. ते बघून नवरा चोराला म्हणतो "बाबा रे, तुला काय हवं ते घेऊन जा. पण कॄपा करून हिच्या तोंडातला बोळा नको काढूस." - आदि जोशी
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 23892
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

धाग्याच्या टॅक्सोनॉमीमध्ये करुणरस असंही हवं होतं असं वाटत नाही का अ‍ॅड्या?

एकदा (बहुदा पत्निकडून वादविवादातील पुन्हा एकदा पराभवानंतर) एक पिताश्री निश्वास टाकून मुलाला म्हणाले होते, तु लग्न करशील तेव्हा कुठलीही (जात-पात, कुळ, धर्म, रंग, शिक्षण, व्यंग, ) कसलीही बायको कर पण सुखी व्हायचे असेल तर मात्र एखाद्या मुकीशीच लग्न कर.

एक पती न्यायालयात जातो..आणि म्हणतो मला घटस्फोट हवाय... न्यायाधीश विचारतो....कारण..,??? पती : माझी बायको ६ महिन्यांपासुन माझ्याशी बोलली नाहीये.. न्यायाधीश म्हणतो पुन्हा विचार कर अशी बायको पुन्हा नाही मिळणार...

एक पती न्यायालयात जातो..आणि म्हणतो मला घटस्फोट हवाय... न्यायाधीश विचारतो....कारण..,??? पती : माझी बायको ६ महिन्यांपासुन माझ्याशी बोलली नाहीये.. न्यायाधीश म्हणतो पुन्हा विचार कर अशी बायको पुन्हा नाही मिळणार...

मस्त

नवरा बायकोचे जग म्हणजेच खरे जग आणि त्यांच्यावरचे विनोद हेच खरे विनोद असं माझं अजिबात म्हणणं नाही.

आजी..तुम्हाला आठवते का?पुर्वि मी तुम्हाला लाडु भरवला कि तुम्हि माझे बोट चावायचा.. आजोबा उठतात.. कुठे निघालात? कवळी शोधतो ============================== एक परदेशात कामाला असलेला मुलगा स्थळं बघण्यासाठी भारतात आलेला असतो. कांदे-पोह्यांच्या कार्यक्रमासाठी तो आणि आई-बाबा एका मुलीच्या घरी येतात. औपचारिक गप्पा-टप्पा झाल्यावर मुलाला आणि मुलीला जरा ओळख वाढावी यासाठी बाल्कनीत एकांतात पाठवतात. मग असेच १-२ प्रश्न-उत्तरे झाल्यावर मुलगा विचारतो , "इंग्लिश जमते का ? " ...मुलगी -- हो ,पण सोड्याबरोबर ========================= आइ ऑफिस मधुन आल्यावर मुलाला.. "आज दुपारी काय खेळ खेळला??? आई आज ना मी पोस्टमन पोस्टमन खेळलो तुझ्या कपाटातल्या आतल्या कप्प्यांत जी गुलाबी पाकीट व पत्र होति ति मी सोसायटीत सगळ्यांना वाटली." ========================================== संता-बंटाला--कॉफि भराभर पी बंटा- का? संता-कॉफि गार करत प्यायला तर कोल्ड कॉफीचा रेट द्यावा लागेल =========================================== बंडोपंत रागारागाने हॉटेल मॅनेजर कडें गेले आहो तुमच्या वेटरला काहि कळत का नाहि? का काय झाल? मॅनेजर.. अहो मी दाढी साठी गरम पाणी मागीतल तर त्यान हे गटारीतल पाणी आणल.. " आपला काहीतरी गैरसमज झाला आहे...मॅनेजर म्हणाला हा तर मी आपल्यासाठी पाठवलेला चहा आहे." ================== ५० सरदार गाडिखाली चिरडुन मेले होते, फक्त बंटा वाचला होता. टी वी चॅनेल वाले त्याचा इंटरव्ह्यु घेत होते.. चॅनल रीपोर्टर= ये सब कैसा हुआ. संटा= ये सब गलत अनाउसमेंट का नतिजा है. चॅनल रीपोर्टर= मै समजी नहि.. संटा= वोह ऎसा हुआ. ५० सरदार प्लॅटफॉर्म पे गाडि कि राह देख रहे थे इतनेमे अनाउंसमेंट हो गयी कि " लुधीयाना जानेवालि गाडि प्लॅटफॉर्म नं २ पर पधार रहि है." ये सुनकर सारे सरदार डर गये और ट्राक पर कुदकर खडे हो गाये. मगर अनाउसमेंट के मुताबिक गाडि प्लॅट फॉर्म नहि आइ ट्रॅक पर आ गयी.. और ये हादसा हो गया. चॅनल रीपोर्टर= मगर आप कैसे बच गये? संटा= मै सुसाईड करनेके लिये ट्रॅक पर खडा था.. मैने जैसे हि अनाउंसमेंट सुनि वैसा मै वापस प्लॅट फॉर्म पर चढ गया और बच गया..सब उसकी लिला है.. जिनको बचना चाहिये वोह चले गये. जिनको जाना था वोह आपके सामने है.. ============================================================ गुरुजी=३ जलचर प्राण्याची नावे सांगा बंडु=बेडुक गुरुजी= बरोबर..आणखिन दोघांची नावे सांग. बंडु= बेडकाची आई व बेडकाचे बाबा ===============================

भिकारी- बाइ साहेब आज मला भीकेंत लाडु घाला. बाइ साहेब - का रे बाबा? भिकारी- आज माझा वाढ दीवस आहे.. ----------------------------------------------------- विसरभोळे. प्रोफेसर विसरभोळ्यांचा म्रुत्यु झाला. अंतयात्रेस बरेच लोक व त्यांच्या विद्यापिठांतले सहकारी व विद्यार्थी जमले होते. कसे काय गेले.. एकान विचारल..बहुतेक श्वास घ्यायला विसरले आसतिल..एक विद्यार्थी उदगारला... ----------------------------------------------------------------------------------- शस्त्र क्रीया . ओप्रेशन टेबल वरचा पेशंट खुप घाबरत होता... घाबरला काय? डोक्टरन विचारल.. हो. ना.. पहिलीच वेळ आहे... तो म्हणाला.. घाबरू नकोस.. माझी पण पहीली वेळ आहे....डोक्टर म्हणाले --------------------------------------------------------------------------------- मुल-मुली... द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले... 'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत..अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत.. या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला... ------------------------------------------------------------------ भाव.. आचार्य अत्रे सांगत होते..मराठी भाषा फार मजेदार.. शब्द बदलला की भाव बदलतो.उदा.. एक माणुस रस्त्यावरुन चालला होता. वरच्या मजल्या वरुन डोक्यावर वीट पडली अन डोक फुटल..करुण रस. एक माणुस रस्त्यावरुन चालला होता. वरच्या मजल्या वरुन डोक्यावर वीट पडली अन वीट फुटली..हास्य रस..

लग्न.. बाबा लग्नाला किती खर्च येतो..? सांगता येत नाही.. माझा अजुनही चालु आहे.. --------------------------------------------------- दारु.. दारुडा आपल्या दारुड्या मीत्राला बार मधे.. काय दोस्ता फ़ार टेन्शन मधे दिसतोय..दोस्तान विचारल. [घुट्का घेत} काय सांगु यार..जानेवरी मधे आइ वारली..जाताना माझ्या साठी १ लाख रु. ठेवुन गेली..तो म्हणाला अरेरे..दोस्त म्हणाला फ़ेब्रुवारीत बाबा गेले...जाताना माझ्या साठी २लाख रु. ठेवुन गेले..तो म्हणाला अरेरे.. दोन महीन्यात दोघे गेले.. फ़ार वाइट झाल..दोस्त म्हणाला गेल्या महीन्यात आत्या गेली.. ति ७०००० हजार ठेवुन गेली.. अरेरे..जवळ्ची माणस गेली.. ३ महीन्यात..फ़ार वाईट झाल..दोस्त म्हणाला अन ह्या महीन्यांत.. अजीबात कुणीच नाही रे..तो रडत रडत म्हणाला --------------------------------------------------------------------- ज्योतिशी.. रु ५००० हजारात.कोणतेही ३ प्रश्ण वीचारा.ज्योतिशी जाहिरात करत होता... एका माणसान विचारल... ३ प्रश्णांना ५००० रुपये म्हणजे जरा त्यास्त होतात नाही? मान्य आहे.. पुढचा प्रश्ण विचारा..ज्योतिशी म्हणाला.... ------------------------------------------------------------ पेन्सील.. डोक्टर.. माझ्या मुलांन पेन गिळल आहे. काय करु...फोन वरुन बाबा विचारत होते.. काळजी करु नका..मी येई पर्यंत पेन्सिल वापरा.. डोक्टर म्हणाले. ---------------------------------------------------------------- मराठी विनोद.. मराठी विनोद.. तो- अरे माझा कुत्रा हरवला आहे, मी अप सेट आहे. हा- एवढच ना मग तशी जाहीरात दे ना पेपरात.. तो- अरे पण कुत्र्याला वाचता येत नाही ना.. ======================================================= बाबुराव अत्यंत तीरसट होते.ते एकदा बस मधें बसले.कंडक्टर आल्यावर म्हणाले एक स्टेशन च तीकीट द्या. आहो पण बस जिमखान्यावर जाते.कंडक्टर म्हणाला.. मग मला काय सांगतोस ते त्या ड्रायव्हर ला सांग..बाबुराव तीरसट पणें कंडक्टर ला म्हणालें........ ================================================== मुलगा- बाई साहेब मी अंधळा मुलगा आहें मला मदत करा. बाई साहेबांना दया येते अन त्या त्याला १० रु. देतात. अन कुतुहलाने विचारतात. काय रे ह्या पैशांचे काय करणार? काय नाय.. मुलगा उत्तरला..मी अन माझें ४-५ आंधळे मीत्र रात्री सिनेंमा बघायला जाणार आहे.

मी धागा काढताना लिहिलेला जोक स्वतः बनवला आहे. असे नवे जोक्स वाचायला मिळाले तर जास्त मजा येईल. sms अथवा मेल मधे आलेले / इंटरनेटवर वाचलेले जोक्स टाकू नये असं मला वाटतं.

एक नवरा आपल्या बायकोला १ मोत्यांच हार भेट देतो. नंतर ती बायको नवर्‍याशी ६ महिने बोलत नाही ... का? त्यांच्यात तसा करार झालेला असतो... :)

In reply to by मी-सौरभ

तुमचा ज्योक इंग्रजीत अनुवादित होऊन गेली दोन वर्षे एसेमेस बनून फिरतो आहे...

मी माझ्या भटकंतीत सांगितल्याप्रमाणे, आम्ही अरूणाचलला गेलो होतो. तिथे एका आर्मी मेस मधे गेल्यावर तिथल्या एका अधिकार्‍याने आम्हाला एक सुंदर वाईन बॉटल कॅबीनेट दाखवली, आणि म्हणाला," ही कॅबीनेट ड्रीफ्टींग वुड (पाण्यात वाहत आलेलं लाकुड) पासुन बनवलीय." मी कौतुकाने माझ्या सोबतच्या मित्राला सांगितलं. त्याने ५-१० सेकंद तिला पाहीलं आणि म्हणाला "अरे वा !! ह्या बॉटल्स पण वाहत आल्या होत्या का सोबत?" ;-)

पुण्यात कपडे खरेदीसाठी निघालेला मित्र लक्ष्मी रोडनजिक रिक्षात बसतो. मित्रः "काका, जयहिंद.." रिक्षावाले: "हां, जयहिंद. बोला कुठे जायचं?" ; )

In reply to by ज्ञानेश...

पुण्यात कपडे खरेदीसाठी निघालेला मित्र लक्ष्मी रोडनजिक रिक्षावाल्याला विचारतो मित्रः "काका, जयहिंद जाणार का?" रिक्षावाले : "हां, जाउ कि !! मित्रः मग जा ना..................... $) $-) :cash:

In reply to by ज्ञानेश...

इथल्या एक प्राध्यापकाचं नाव जयराम. एक नवीन सिक्यूरिटी गार्ड आला होता. जयरामचा मेव्हणा नेमका तेव्हाच त्याच्याकडे येत होता. गेटपाशी या गार्डने विचारलं, "कोणाकडे जायचंय?" मेव्हणा: "जयराम" गार्ड: "हां जय सियाराम. पण निघालात कोणाकडे?"

"बाबा, सेक्स म्हणजे काय ?" गण्याच्या ८ वर्षाच्या मुलाने गण्याला विचारले. गण्याची अक्षरश: फाटली. "हल्लीची पोरे फारच पुढारलेली आहेत !" असा विचार करून त्याने मुलाला जवळ बसवून योग्य त्या भाषेत सगळे समजावून सांगितले. मुलगा - ते सर्व ठीक आहे. पण या फॉर्ममध्ये एवढे सगळे कसे काय लिहू ? M का F ते सांगा फक्त ! --गुगल बझ्झ