गुजरातच्या प्रगतीची ही बातमी वाचून आनंद झाला
अशी प्रगती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते का
वाचने
2967
प्रतिक्रिया
16
गुजरातच्या प्रगतीची ही बातमी वाचून आनंद झाला
अशी प्रगती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते का
प्रतिक्रिया
हो
डोके ताळ्यावर ठेवून जात्,धर्म,भाषा,पैसा ह्यांच्या पलिकडे लोकांनी आणि पुढार्यांनी विचार केला तर शक्य आहे.नाहीतर तर युपी/बिहारपेक्षा आपण बरे ह्यात सामाधान मानुया.
कामगार कल्याण
कामगार कल्याण क्षेत्रात सुद्धा भरीव कामगिरी केली आहे. एंप्लॉयमेंट एक्सचेंज मधुन नोक-या देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे राज्य
नितीन थत्ते काय म्हणतात?
नितीन थत्ते काय म्हणतात?
प्रगती
In reply to नितीन थत्ते काय म्हणतात? by अवलिया
ऐहिक प्रगती काही खरी नाही असे माझे मत सध्या झाले आहे. ;)
शिवाय ठेविले अनंते तैसेची रहावे असे आमचे थोर्थोर संत सांगून गेलेच आहेत. :)
का
In reply to प्रगती by नितिन थत्ते
शिवाय ठेविले अनंते तैसेची रहावे असे आमचे थोर्थोर संत सांगून गेलेच आहेत.
का ठेविले नरेन्द्रे तैसेची रहावे असे म्हणायचे आहे? ;)
बाकी महाराष्ट् ही संतांची भूमी आहे का संथांची? :(
बर्कली
In reply to का by विकास
बिट्स पिलानी + बर्कली वाले आता आले आहेत. महाराष्ट्र लवकरच टेक्नोभूमी म्हणून ओळखली जाईल.
एकच वादा, एकच वादा | अजितदादा
In reply to बर्कली by चिरोटा
एकच वादा, एकच वादा |
अजितदादा अजितदादा ||
जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रीत
जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रीत होत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही.
आज प्रत्येक नेत्याला हे माहित असून सुद्धा कोणी त्या साठी कायदा करण्याचा ठोस विचार करताना दिसून येत नाही.
आजकालचे राजकारण पाहता कोणालाही दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात रस नाही असेच दिसते, कोणत्याही समस्येला तात्पुरती मलमपट्टी करून पुढचे पुढे बघु हेच कामचलाऊ धोरण अवलंबून वेळ मारून नेली जाते.
इथे एक बाब नमूद करुशी वाटते कि महाकाय चीनने सुद्धा हा धोका ओळखून लागलीच 'एक कुटुंब, एक मुल' हा कायदा सुरु केला आहे. (शेतकरी आणि ज्या जोडप्याच्या आईवडिलांना ते एकच अपत्य आहेत अश्या जोडप्यांना ह्यातून वगळलेले आहे, असे काहीतरी आहे.)
हॅ हॅ हॅ
In reply to जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रीत by गांधीवादी
हॅ हॅ हॅ
महाकाय चीनने सुद्धा हा धोका ओळखून लागलीच 'एक कुटुंब, एक मुल' हा कायदा सुरु केला आहे. (शेतकरी आणि ज्या जोडप्याच्या आईवडिलांना ते एकच अपत्य आहेत अश्या जोडप्यांना ह्यातून वगळलेले आहे, असे काहीतरी आहे.)
फक्त शेतकरी नव्हेत तर अल्पसंख्यांकानादेखिल वगळले आहे!
आता, आहे तयारी (अल्पसंख्यांकाना वगळून) ही पॉलिसी भारतात राबवण्याची???
असो, ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम, जे नंतर दिसणारच होते, दिसू लागले आहेतच!
अगदी अगदी . करावीच पॉलिसी
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
अगदी अगदी . करावीच पॉलिसी इंप्लिमेंट. आणि त्याआधी अप्लसंख्यांकांची व्याख्या पण बदलावी. म्हणजे एकदम बॅलन्स होईल.
>>ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम,
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
>>ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम, जे नंतर दिसणारच होते, दिसू लागले आहेतच!
ह्या बद्दल जास्त काही माहित नाही, माहिती दिल्यास आभारी राहील.
मला केवळ 'आपली लोकसंख्या नियंत्रित ठेवावी' एवढेच म्हणायचे होते.
संख्या
In reply to >>ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम, by गांधीवादी
सुदर्शन साहेबांनी तर संख्या वाढवायला सांगितली आहे.
आणि
In reply to संख्या by नितिन थत्ते
आणि सोनिया गांधींवर खालच्या पातळीवर जाऊन आचरट आरोप केले आहेत.
आहे त्यांनाच पुरेस अन्न,
In reply to संख्या by नितिन थत्ते
आहे त्यांनाच पुरेस अन्न, वस्त्र, निवारा नाही, अजून खाणारी तोंडे आणून काय करायचं. :-(
'हम दो, हमारा एक' हेच यशस्वी भारताचे सूत्र होईल.
महाराष्ट्रालाही एका नरेंद्र
महाराष्ट्रालाही एका नरेंद्र मोदींची गरज आहे.. काँग्रेसेतर पक्षातच नरेंद्र मोदी तयार होऊ शकतो, पक्षश्रेष्ठींच्या आज्ञेशिवाय हे कोंग्रेसवाले आंघोळही करीत नाहीत, हे काय महाराष्ट्राला तारणार ?
म्हणजे
In reply to महाराष्ट्रालाही एका नरेंद्र by पंख
म्हणजे आतापर्यंत 'सदा अग्रेसर' राज्याची जी प्रगती झाली ती पक्षश्रेष्ठींमुळेच ना?