Skip to main content

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण? (श्री. अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारला जाईल असे गृहीत मानुन.)

Published on शनीवार, 30/10/2010

वाचन संख्या 1692
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

जर कल्याण - डोंबिवलीत काँग्रेस ची सत्ता आली. तर नारायण राणे १०० % मु़ख्यमंत्री . नाहीतर अशोकराव चव्हाणच. ता.क. - हा अंदाज आहे , हे सर्व खरं ठरेल हे कोणी गृहित धरु नये.

अन्य कोणीला मत दिले आहे. थत्ते चाच व्हावेत अशी सदिच्छा आहे.

In reply to by कुंदन

>>>>फोडाफोडीसाठी काय लागेल तो फायनान्स आपण करु. ओव्हरटाइमाचे जास्त पैसे मिळू लागले वाटतं. ;) -दिलीप बिरुटे [पैशासाठी राबराब राबणा-या कुंदनचा फॅन]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किंवा पगारवाढीचा संप यशस्वी झाला असेल. --अवलिया [संप करणार्‍या प्राध्यापकांचा फॅन]

In reply to by परिकथेतील राजकुमार

गुंतवणूकीचा परतावा मिळू लागला असेल अशीही एक शक्यता मनात येऊन गेली.

In reply to by कुंदन

फोडाफोडीसाठी काय लागेल तो फायनान्स आपण करु.
पण फोडाफोडीच्या राजकारणाला प्रा.डॉ. सारखे सुसंस्कृत लोक मान्यता देतील असे वाटत नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

रोचक विधान या विधानातुन समजलेले मुद्दे १) प्रा डॉ सुसंस्कृत आहेत २) सुसंस्कृत लोक फोडाफोडी करत नाहीत ३)फोडाफोडी विरहीत राजकारण असु शकते ४)प्रा डॉ राजकारणी आहेत पण फोडाफोडी करत नाहीत वगैरे वगैरे प्रा डाँ चे यावर मत वाचायला आवडेल.

In reply to by अवलिया

फक्त १४४ आमदार कमी पडतायत. :( काहीतरी करा नाना. :) तुम्हाला द्यायच्या मंत्रीपदाबद्दल व्यनितून चर्चा करू (व्य नि वाचता येतात का संपादकांना?). आणि पराला पण महामंडळाच्या अध्यक्षपदावर कटवा पटवा बुवा. ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

देऊ की. ते तुम्ही किती आमदार आणणार त्यावर ठरेल. खालीलप्रमाणे रेट आहेत. ३-५ आमदार - महामंडळाचे अध्यक्षपद >१० आमदार- राज्यमंत्रीपद >२५ आमदार - क्याबिनेट मंत्रीपद. मुख्यमंत्रीपद माझ्याचकडे. :) आमदारांच्या संख्येसह व्यनितून संपर्क साधावा.

आदर्श अशा घोटाळ्याचे निमित्त करुन मुख्यमंत्री बदलण्याचे डाव दिसत आहे. करायचा मुख्यमंत्री तर आमची पसंत मा. श्री नारायण राणे. :) -दिलीप बिरुटे

च्यायला, ओबामाच्या दौऱ्याच्या फक्त २ आठवडे आधी मुख्यमंत्री बदलणार काय ? आणि मग नवीन आणणारच असतील तर असा आणा कि ज्याला ओबामाबरोबर ४ तरी इंग्लिश वाक्यं बोलता येतील. म्हणजे कोणती नावं गाळली जायला पाहिजे ते समजून घ्या.

In reply to by प्रिया देशपांडे

नमस्कार, मिसळपाव सदस्य अवलिया (पूर्वीचे नाव नाना) यांनी आपण त्यांच्या नावाचा सातत्याने वापर करता असे दर्शवून, त्यांच्या नावाचा वापर करू नये अशी मागणी केली आहे. संपादक मंडळातर्फे आपल्यास विनंती आहे की आपण वरीलप्रमाणे प्रतिसाद देणे टाळावे. भविष्यात असे प्रतिसाद कोणतेही कारण न देता संपादित केले जातील. धन्यवाद, संपादक मंडळ.

सदाहरित आणि कुठेही कधीही फिट्ट होणारे सुशीलकुमार शिंदे. मुख्य म्हणजे इशारा केल्याबरोबर ते खुर्ची सोडतात, पण दुसरी एकादी तयारच असते त्यांच्यासाठी! कुणीही चालेल पण नारायणराव आणि विलासराव नकोत!

In reply to by वेताळ

ओबामा निघाले आणि अशोक चव्हाण ह्यांनी राजीनामा दिला. बहुतेक पृथ्विराज चव्हाण मुख्यमंत्री होतील. निवडणूकीला अजून अवकाश आहे तरीही कुठलाही घोटाळेबहाद्दूराला मुख्यमंत्री नेमणे काँग्रेसवाल्यांना महागात पडेल. पृथ्विराज चव्हाण 'साहेब' विरोधी आहेत्.शिवाय चव्हाण ह्यांची मंत्रीपदाची इमेज गेल्या ६.५ वर्षात चांगली आहे.शिवाय नेहरु-गांधी निष्ठावंत आहेत. आणी काय पाहिजे मुख्यमंत्री व्हायला?

म.टा. मधील बातमी प्रमाणे, "आज दुपारी काँग्रेसची समिती महाराष्ट्रात येणार आहे. ही समिती सर्व आमदारांचा कल जाणून घेईल त्यानंतर काँग्रेसच्या परंपरेला अनुसरुन लोकशाही पद्धतीने महाराष्ट्रासाठी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात येणार आहे. " तेंव्हा काळजी नसावी. :-)

In reply to by विकास

>>>काँग्रेसच्या परंपरेला अनुसरुन लोकशाही पद्धतीने हे मात्र भारी. :) मुख्यमंत्री कोण हे समितीला सांगून झाले आहे, आता केवळ औपचारिकता पूर्ण करायची आहे पण नाटक व्यवस्थित रंगवलं पाहिजे आणि यात काँग्रेसचा हातखंडा आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या 'स्वच्छ'माणसांना सत्तेवर आणायची फॅशन आहे कॉंग्रेसमध्ये. तेव्हा- इलासराव्/नारायणराव्/सुशिलकुमार आउट. बाळासाहेब थोरात यांचे नाव आहे पण विकिपिडियावर त्यांची काहीच माहिती नाही. मुकुल वासनिक ह्यांचेही नाव आहे.मिडियावाले म्हणतात हा माणूस स्वच्छ आहे पण माझ्या आठवणीप्रमाणे हा माणूस ९६साली एका स्त्री घोटाळ्यात अडकला होता.(काँग्रेसवाल्यांना हे लक्षात असणारच) पृथ्वीराज चव्हाण हे एकच नाव उरते.

In reply to by चिरोटा

सकाळ मधील बातमी प्रमाणे, "आदर्श'ने तोंड पोळल्याने नवीन मुख्यमंत्री कार्यक्षम, निर्णयक्षमता असणारा आणि स्वच्छ प्रतिमेचा असावा, अशी त्रिसूत्री कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मांडली आहे. " यातील कार्यक्षम आणि निर्णयक्षमता या दोन गोष्टींबाबत मा. अशोकरावजी चव्हाणसाहेब कमी नव्हते हे आदर्शचे निर्णय कसे कार्यक्षमतेने घेतले या एका उदाहरणातच स्वच्छ दिसून येते. तरी देखील प्रश्न पडतो की आधी काँग्रेसने कधी "स्वच्छ" मुख्यमंत्री असावा असे धोरण ठेवले नव्हते असे तर श्री. राहूलजींना म्हणायचे नसेल? msn smileys

In reply to by विकास

'आदर्श'चे निर्णय कसे कार्यक्षमतेने घेतले या एका उदाहरणातच स्वच्छ दिसून येते! हाहाहा! मस्त!! कांहींही म्हणा पण या प्रकल्पाला "आदर्श" हे नांव दिल्याने लई पंचाईत होते बॉ! पण राहुलच्या मताला कुणीही कशाला किंमत द्यावी? तो पंतप्रधान झाला तर ठीक, पण तोपर्यंत झाकली मूठ त्याने झाकलीच ठेवावी हे बरे.

पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार आहेत्.अगदी निस्वार्थी व हाडाचा कार्यकर्ता आहे. कॉग्रेसचे सच्चे समर्थक व कार्यकर्ते आहेत.

मेरा नंबर कब आयेगा?

In reply to by नितिन थत्ते

चिच्चा, आडनाव बदला!

In reply to by नितिन थत्ते

अपेक्षेप्रमाणे पृथ्विराज चव्हाण शी एम झाले आहेत. टेक्नोक्रॅट असल्याने महाराष्ट्रात आय टी पार्क्स/बायो टेक पार्क्सची संख्या वाढेल ही माफक अपेक्षा.

In reply to by नितिन थत्ते

अदितीशी सहमत :-) तसेच आपले नेते राहूलजी यांनी स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती हवी असे म्हणले होते, व्यवहारात स्वच्छ हवी असे म्हणलेले नाही. दोन्ही अर्थाने स्वच्छ असलेल्या व्यक्ती या पदासाठी disqualified ठरतात. :(

In reply to by विकास

>>तसेच आपले नेते राहूलजी यांनी स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती हवी असे म्हणले होते, आता रोज तीन वेळा तोंड धुणार आहे. कोणता फेसवॉश वापरावा ते सुचवावे. (स्वगत: म्हणजे दाढी पण रोज करायची की काय?)

In reply to by विकास

आता रोज तीन वेळा तोंड धुणार आहे. कोणता फेसवॉश वापरावा ते सुचवावे
उशीर झाला. तिकडे परीक्षेचा निकाल लागला आणि आपण सराव करताय्.उद्या अ‍ॅडमिशन आहे, मंत्रालय इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये.असेल तसे या.काही जमतय का बघुया.

ह्म्म्म... असो. सर्व प्रतिसादकांचे आणि मतदारांचे मनापासुन आभार. - इंट्या शेषन.