अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम
मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला विरोधी लोकमताचा जबरदस्त फटका बसला, त्या पक्षाचे अगदी 'पानीपत'च झाले असे म्हणायला हरकत नाहीं. त्या पक्षाचे प्रतिनिधीगृहातील बहुमत तर संपुष्टातच आले व सिनेटमधे जवळ-जवळ ६० टक्के जागा ज्या पक्षाकडे होत्या त्यांची संख्या ५३-५४ टक्क्यावर आली. नवनिर्वाचित राज्यपालांच्या संख्येतही डेमोक्रॅटिक पक्षाला कमी जागा मिळाल्या. हे सर्व कां झाले हे मला कळत नाहीं आणि ते समजून घेण्याचा हा प्रयत्न.
ओबामा यांच्या निवडीनंतर मला तरी बर्याच अपेक्षा होत्या व त्यांच्या पहिल्या ४ वर्षांच्या कालावधीचा अर्धा भाग संपल्यावर भारतीय दृष्टिकोनातून तरी अपेक्षाभंग झाला यात शंका नाहीं. Bringing a change in Washington या घोषणेद्वारा राष्ट्रपतीपदावर आलेल्या व सिनेटमध्ये पहिल्यांदाच पदार्पण केलेल्या अननुभवी ओबामांना याच आशेवर अमेरिकन जनतेने ते कृष्णवर्णीय असूनही निवडून दिले होते. त्यावेळी मला वाटले होते कीं अमेरिकन मतदार आता प्रौढ, समजूतदार झाला! पण ओबामांनाच वॉशिंग्टनने बदलले असे मला वाटू लागले आहे.
कदाचित् सगळ्या लोकशाही पद्धतीच्या राज्यांत चालते तसे अमेरिकेतही 'बाबू' लोकच (bureaucrats) राज्य चालवतात कीं काय असेही वाटू लागते!
बुश-४३ यांनी त्यांच्या आठवणींवर आधारित लिहिलेल्या "Decision Points" या पुस्तकाच्या पुरस्कारार्थ/प्रचारार्थ (promotionसाठी) NBC या चित्रवाहिनीला दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत ते म्हणतात कीं ज्या आर्थिक परिस्थितीत त्यांनी व्हाईट हाऊस सोडताना आपल्यानंतर सत्तेवर येणार्याकडे सत्ता सोपविली ती परिस्थिती घृणास्पदच होती.(Mr Bush admits the economic woes he left to his successor, Barack Obama, were "one ugly way to end a presidency) (पूर्ण मुलाखत http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-11715774 या दुव्यावर वाचता येईल)
म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत क्लिंटनकडून मिळालेली सुदृढ आर्थिक परिस्थिती पार अधोगतीला गेली. (बुश-४३ हे अमान्य करत असले तरी ते खरेच आहे.) ओबामांचे पाकिस्तान व भारत यांच्यामधील तणावाबद्दलचे धोरण भारतीयांना न पटणारे/ न आवडणारे असो. पण अमेरिकेसाठी त्यांनी Healthcare Reforms आणले. त्यातले खूप मुद्दे मला पटणारे होते उदा. Existing pre-condition असतानाही विमा हा उतरविलाच पाहिजे ही सक्ती व कुणाचाही विम्याचा आधार (असाध्य आजार झाल्यास) काढून घेण्यास बंदी हे मुद्दे गरीबांच्या हिताचे होते. जर प्रस्थापित विमा कंपन्यांनी असे करण्यात कुचराई केली तर सरकारतर्फे असा विमा देण्याचीही व्यवस्था केली!
बेलगाम अशा मार्गांचा अवलंब करून बॅंकांनी आणि वित्तीय संस्थांनी जे आर्थिक महासंकट अमेरिकेवर व पाठोपाठ सार्या जगावर आणले त्यावर निर्बंध घालणारे कायदेही (Wall Street Reforms) त्यांनी केले/ते करत होते. घरांच्या निर्मितीवर आयकरात सूट देऊन घरे बांधण्यासाठी उत्तेजनही त्यांनी दिले त्यात अनेकांनी घरे घेतलीही! शिवाय infrastructureबद्दलची अनेक कामें (आपल्याकडील 'दुष्काळी कामे' काढतात त्याच धर्तीवर) काढून नोकर्या निर्माण करण्यासाठी पैसे खर्च करण्याचे ठरवून तसा खर्चही सुरू केला, मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांचा आयकर कमी करून कुबेरासारखे श्रीमंत असलेल्या लोकांवरील आयकराचे प्रमाण वाढविले असे प्रथमदर्शनी बरोबर वाटणारे अनेक निर्णय ओबामांनी घेतले असे माझ्यासारख्या अमेरिकन नसलेल्या भारतीयालाही वाटत होते. असे असताना ज्या रिपब्लिकन पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकन वित्तसंस्थेची पार अधोगती झाली त्याच पक्षाकडे पुन्हा सत्ता देणार्या अमेरिकन मतदाराला काय म्हणावे?
बुश-४३ यांना पहिल्यावेळीच निवडून दिले ते चुकले होते, पण कुणीही एक चूक करू शकतो म्हणून सोडून दिले तर त्यांनाच पुन्हा निवडून दिल्यावर मला अमेरिकन मतदाराच्या maturity बद्दल शंका वाटू लागलीच होती. पण दोन वर्षांत पुन्हा त्याच रिपब्लिकन पक्षाला निवडून देण्यात अमेरिकन मतदारांतील अपरिपक्वतेचा/समजूतदारपणाचा अभाव हेच मूळ कारण आहे काय?
त्यात एक नवे समीकरण आले आहे Tea Party या नावाने वावरणार्या नव-रिपब्लिकनांचे. या चळवळीत सामील झालेले उमेदवार Primaries मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या ढुढ्ढाचार्यांचा पराभव करून त्या पक्षाचे तिकीट मिळविते झाले व बर्याच ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराचा पराजय करून पहिल्यांदाच प्रतिनिधीग्रूहात व सिनेटमध्ये प्रवेश करते झाले आहेत. हे आपले वेगळेपण राखून प्रत्येक बिलावर त्या बिलाच्या योग्यतेनुसार स्वतंत्रबुद्धीने मतदान करणार कीं 'व्हिप'च्या आदेशाने "जो हुकम" पद्धतीने मतदान करणार तेही स्पष्ट नाहीं.
"अमेरिकेच्या प्रश्नांमध्ये आपल्याला काय देणे-घेणे आहे" असेही कांहीं 'मिपाकरां'चे मत पडेल, पण अमेरिका घेत असलेल्या अशा सर्व निर्णयांमध्ये भारताचे हित-अहित प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतलेले आहे असे मला वाटते म्हणून मी हा विषय इथे मांडला आहे.
'मिपांकरां'कडून-खास करून अमेरिकास्थित 'मिपाकरां'कडून या मुद्द्यावरील विश्लेषणाची अपेक्षा आहे. धन्यवाद
वाचने
4541
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी लोकलनी प्रवास करताना
:)
In reply to मी लोकलनी प्रवास करताना by रामदास
केविलवाणा प्रयत्न
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
अमेरीकेत काही झाले तरी आपला
हम्म....! यानिमित्तानं
यानिमित्तानं आम्हाला डेमोक्रॅटिक पक्षा्चे भारतीयांच्या बाबतीत कसे आणि काय धोरण होते. आणि रिपब्लिकन पक्षाची आता काय धोरणे आहेत हेही समजून सांगा. आम्ही लोकसत्तेत लेख वाचला पण हे परिवर्तन कशामुळे होत आहे ते काही कळले नाही. अमेरिकेतील मिपाकरांनी काही समजून सांगितले तर आनंद वाटेल.
बाकी, भारतीय वंशाच्या निकी रंधवा-हॅले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल एक भारतीय म्हणून आनंद झाला. अभिनंदन....! :) -दिलीप बिरुटे
निकी रंधवा-हॅले! सहमत!!
In reply to हम्म....! यानिमित्तानं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निकी हेले, बॉबी जिंदाल आणि
In reply to निकी रंधवा-हॅले! सहमत!! by सुधीर काळे
एखादा भारतीय वंशाचा
In reply to निकी रंधवा-हॅले! सहमत!! by सुधीर काळे
अमेरिकन नेते सार्या जगावर आर्थिक संकट पुन्हा आणू शकतात!
शुभेच्छा थोड्या उशीराने आल्यामुळे
अमेरिकन राजकारण आणि भारत
सहमत..
In reply to अमेरिकन राजकारण आणि भारत by विकास
+१
In reply to सहमत.. by प्रशु
बुकमार्क
In reply to अमेरिकन राजकारण आणि भारत by विकास
लेखाइतकीच अतिशय विचार करून
In reply to अमेरिकन राजकारण आणि भारत by विकास
'अमेरिकेच्या आगगाडीत बसून चाललेला भारतीयांचा प्रवास'
In reply to अमेरिकन राजकारण आणि भारत by विकास
डेमॉक्रॅटिक पक्षाचा पराभव का झाला? माझे मत
चांगला लेख
बुश-४३ हे एक मुखवटा होते?
In reply to चांगला लेख by फारएन्ड
निवडणुकीचे डावपेच
In reply to चांगला लेख by फारएन्ड
छान चर्चा
बुश-४३ यांनी खणलेला खड्डाच इतका खोल आहे कीं.....
अवांतर
In reply to बुश-४३ यांनी खणलेला खड्डाच इतका खोल आहे कीं..... by सुधीर काळे
एका मिपाच्या सभासदाने हा दुवा मला खासगीत पाठविला
छान माहितीपुर्ण चर्चा.
अमेरिकेत ४.६ कोटी लोक विमाविरहित आहेत
विमारहित अमेरिकन लोकसंखेच्या
In reply to अमेरिकेत ४.६ कोटी लोक विमाविरहित आहेत by सुधीर काळे
priority कां दिली
In reply to विमारहित अमेरिकन लोकसंखेच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चुकून दोनदा पोस्ट झाल्यामुळे एक उडवला!
भारतासंदर्भात धोरण...
नेहमीप्रमाणेच उत्तम आणि
In reply to भारतासंदर्भात धोरण... by विकास
काही विचार
सहमत
In reply to काही विचार by प्रदीप
अवांतर
In reply to सहमत by विकास
अवांतर
In reply to सहमत by विकास
माहिती अमेरिकेच्या गेल्या भेटीतील कांहीं प्रसंगांवर आधारित आहे
In reply to अवांतर by प्रदीप