Skip to main content

-आह..हिअर वुई गो....!!

लेखक गवि यांनी मंगळवार, 09/11/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
-वॉच इट.. -वुई आर फिनिश्ड.. - पीट..सॉरी.. -हे व्हॉटस हॅपनिंग हियर? -देअर ही इज..लूक एट हिम...गॉडडॅम्ड दॅट सन ऑफ बिच इज कमिंग. गेट ऑफ.. -मा आय लव्ह यू.. -हिट द वॉटर..हिट द वॉटर...हिट द वॉटर...!!! - ओह फक. धिस कान्ट बी..!!! -दॅट्स इट..आय एम डेड.. -देअर इट गोज..देअर इट गोज..ओह नो..!! -एमी, आय लव्ह यू..!! -माउंटन्स ..!!!!! - आआआ ..अल्लाह अकबर.. -ओह माय गॉड ! ओह माय गॉड ! - ओके..वुई आर डिचिंग..!! -आह..हिअर वुई गो....!! -दॅट्स ऑल गाईज..फक.. ही सगळी वाक्यं वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या लोकांनी म्हटली आहेत. ती काही फारशी खास वाटत नाहीत. आता त्यातला कॉमन पॉईन्ट बघू. सर्व वाक्य एकाच ठिकाणी म्हटली गेली आहेत. विमानाचं कॉकपिट.. आणि वेगवेगळ्या लोकांनी म्हटली आहेत अशासाठी की प्रत्येक वाक्य हे त्या बोलत्या जिवाचं शेवटचं वाक्य आहे. विमान क्रॅश होण्यापूर्वी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवर रेकॉर्ड झालेलं. शेवटचं वाक्य..पायलटचं..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6456
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

कुठचा अपघात? डीटेल्स येवू द्यात जरा.

In reply to by चिरोटा

चिरोटा.. वेगवेगळे क्रॅश..तपशिलात जायला हरकत नाही पण सेन्सेटिव्हिटी जाईल.. उदा. डायरेक्शनल जायरोमधे बिघाड होऊन तैवानमधे डोंगरावर क्रॅश झालेल्या विमानात पायलट मरताना 'अमुक अमुक' म्हणाला..वगैरे.कॉमेंटबद्दल Thanks. Will try to post separately about crashes.

छोटेखानी लेख सही आहे असे तरी कसे म्हणावे. रोचक!

अरे रे ! काय हि अधोगती ? ह्यात एकही मनुष्य 'हे राम' म्हणणारा नसावा ?

सह्ही! पण वाचून वाईट वाटले. मा आय लव्ह यु आणि एमी आय लव्ह यु नी डोळ्यात पाणी आलं. ( यावेळी विमानात बसताना कधी नव्हे ते भीती वाटणार आहे :()

हे सगळे उच्चार बहुदा कॉकपीट या एकाच जागेतले नसावे. विमानात लोक बसतात, त्या ठिकाणी सुध्दा उच्चारले गेले असावेत. कॉकपीट मध्ये एवढी माणस मावणं, जरा पटत नाही. मात्र तीन चार लोकांचेच उच्चारलेले हे सगळे शब्द असतील, तर मात्र शक्य आहे.

In reply to by chipatakhdumdum

आहो chipatakhdumdum जागा एक जरी असली तरी वेगवेगळ्या अपघाताच्या वेळी रेकॉर्ड झालेली ही वाक्य आहेत. एकाच अपघातातली नव्हे.

आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहणे कठिण असावे, पण ते झटक्यात येते हा मोठा दिलासा असावा.

In reply to by प्रियाली

हेच म्हणते.. हे वाचून .. फार काही चांगलं नाही वाटलं. मरणाच्या दारात कोणाला काय कसे विचार येतात.. !! चांगले कसे म्हणावेत?

लेख अम्मळ इंग्रजाळलेला वाटला.

काय सांगायचं (म्हणजे सांगण्यासारखं काय आहे), आणि ते उत्तम प्रकारे कसं सांगायचं याची उदाहरणं आहेत तुमचे लेख.

देव सर्वांना शांती देवो, ही प्रार्थना.. माझ्या मनात आता हा विचार डोकावतोय की, माझ्यावर जर ही वेळ आली तर मी काय करणार / बोलणार... :-(

माणसं नक्की केव्हा अंतर्मुख होत असावीत बरं? मरणापूर्वी आयुष्याचा सगळा पट नजरेसमोरून सरकतो म्हणतात. खरं खोटं मरणाराच जाणे.