चल मित्रा, साद घालतो रानवारा
कुठे अडकलास रे अतृप्त जिवा
क्षणाची ना उसंत, धावपळ चोहीकडे
शहराचा गोंगाट भावला का तुला
कि आठवतो अजून ही स्पर्श हिरवा
झुळझुळ वाहणारा तो अमृत झरा
आकाशामध्ये विसावलेला तो कडा
रमलास काय रे, मित्रा पहात इकडे
माणसांचा कारखाना अन् वाहनांचा टांडा,
विसरलास का, डोंगरमाथ्यावरची ओली हवा
वाहणारी सरिता, साथ देणारा गार वारा
गडकिल्ल्यांचा स्पर्श अन् आठवतो लढणारा शिवा
माणसांचा गरडा बाजूस, तरी पाणावलेल्या नयनकडा
कांचेच्या अद्ययावत, गडात तू राहिलास एकटा
अजून रेंगाळते का चव , आठवतो का जंगलचा मेवा
धुप-तुपाचा वास, नाहीतर मोकळा गाभारा
पुरातन मंदिरे,त्या गुंफा, तुटकी ती शिळा
हरविलास तू पाहून, जुना अल्बम जरा
मोठं मोठाले रस्ते अन् छोटी छोटी मने
अबोल झालास, गर्दीचा नाही येथे तुटवडा
चल मित्रा, साद घालतो रानवारा
बांधू सामान, मारु उंच भरारी पुन्हा एकदा
गड-डोंगरा सर करु, विसावू सह्याद्रीच्या कुशीमध्ये,
पण तोडणार कश्या रे ह्या पायातील बेड्या
बेड्या तोडण्यांची किंमत होते जास्त जरा
राहू दे, विसरु सध्या रानवारा, तो गारवा
स्वप्ने लगेच पुर्ण होतात असे तर नाही ना,
आठवणीच्या राज्यात, रममाण होऊ जरा
काढू दिवस हे देखील, जसे दुख:स्वप्न भावा
धीर धर जरा, पुन्हा गवसणी घालू त्या आकाशा एकदा
( पुर्वप्रकाशित )
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
2182
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
+१
In reply to छान by राघव
+२
In reply to +१ by पैसा
मस्त रे राजे ! झकास !!
+१
In reply to मस्त रे राजे ! झकास !! by अवलिया
छान लिहिले आहेस..
फेसबुकवर येऊन कविता टाक टाक
छान कविता.
राजे, कविता मस्त आहे. अजून
छान कविता.... मोठं मोठाले
सुंदर रानकविता.. तात्या.
:)
छान!
छान.