फक्त अंदमानला यायची ऐपत झाली, म्हणून स्वातंत्र्यवीरांच्या जागेवर, क्षणभराचा का होईना, हक्क सांगायची आपली लायकी नाही, हीच एक भावना मनात होती त्याक्षणी...
".....बास भौ! जिंकलंस मित्रा..जिंकलंस.!!!...."
~~ श्री.धमु यानी आमच्या भावना नेमक्या शब्दबद्ध केल्या आहेत या विषयाबाबत.
श्री.चिगो.....खूपच सुंदर वर्णन केले आहे, तुम्ही....त्याचबरोबर ते फोटोही. मी आणि माझ्या चार मित्रांनी काही वर्षापूर्वी चेन्नईहून बोटीने अंदमान (व निकोबारचाही...) प्रवास केला आहे. आमची कंडक्टेड टूर नसल्याने व त्यावेळी वेळेचेही काही बंधन नसल्याने आम्ही मनसोक्त सेल्युलर जेल परिसरातच जास्त वेळ काढला होता.....पाऊसही भरपूर असल्याने फिरण्यावरही साहजिकच बंधन आले होते (निकोबारवर तर उतरूही शकलो नव्हतो). तेथील स्थानिकांनी सांगितले की पाऊस असा धो-धो पडतोच. तुम्ही म्हणता तशी भावुक स्थिती 'त्या' कोठडीजवळ आले की नक्कीच होते. आमच्यातील एका मित्राला (गांधीभक्त असल्याने...) हिंदु महासभेची मते पटत नसत. पण प्रत्यक्ष तात्यांच्या सेलमध्ये पाय टाकण्यापूर्वी सर्वप्रथम त्याने तिथे डोके ठेवले.....! मी तर 'सावरकर प्रेमी".... अक्षरशः थरथरत होतो....रडू फुटते की काय, असे वाटू लागले होते.
डोळ्यात आपोआप पाणी येते....त्या ठिकाणी वावरताना. पाचसहा वर्षापूर्वी साध्या कॅमेर्याने आम्ही काढलेले फोटों व तुमचे आत्ताचे इथले फोटो पाहिल्यावर कळते की, अशा आठवणी फोटोनी नव्हे तर त्यावर केलेल्या चर्चेमुळे दीर्घकाळ लक्षात राहतील.
लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
इन्द्रा
मनाची तशी अवस्था होते हे अगदी खरे... माझ्या मित्राला कळेचना, मी असा बावचाळल्यागत का करतोय ते? तो मला म्हणत राहीला की काढून घे फोटो.. मी नाही म्हणालो त्याला. त्या दाराच्या बाहेर (वीर सावरकर कोठडीची पाटी असलेला) आल्यावरच मी फोटो काढून घेऊ शकलो.. मी तुमच्या भावना समजूही शकतो, आणि त्यांचा आदरही करतो.. प्रतिसादासाठी धन्यवाद..
>>पण प्रत्यक्ष तात्यांच्या सेलमध्ये पाय टाकण्यापूर्वी सर्वप्रथम त्याने तिथे डोके ठेवले.....! मी तर 'सावरकर प्रेमी".... अक्षरशः थरथरत होतो....रडू फुटते की काय, असे वाटू लागले होते.
डोळ्यात आपोआप पाणी येते...
इंद्रदेवा.. काय सांगू देवा.. अगदी अगदी अगदी असंच होतं... हुंदका आवरत नव्हता.. भाईकाकांचे शब्द आठवतात.. कोठडीत तेज वसतीला आलं की कोठडीचा गाभारा होतो..
मी असाच निशब्द बसलो होतो खूप वेळ त्या गाभार्यात.. नंतर चार-पाचजणांनी मिळून 'ने मजसी ने' म्हणलं होतं बाबुजींच्या चालीत.. शेवडचं कडवं म्हणताच येइना दाटलेल्या गळ्यानं..
वेळ मिळाला तर लिहितो कधीतरी फोटोसकट..
मी अजुन तिथे गेलो नाहीये, पण समजू शकतो भावना.
हे केवळ वाचतानाच डोळे कधी ओलावले ते कळलं नाही!
शब्दातीत अनुभव असणार हे सांगायला कोणी ढुढ्ढाचार्याची गरजच नाही.
चेन्नई की कोलकात्याला जायचं ते ठरवा. माझ्या माहितीप्रमाणे चेन्नई वरुन कमी नोटा लागतात. ट्रॅव्हलवाल्यांना विचारुन बघा. थोडं योग्य प्लानिंग केलं तर रिटर्न टिकीट १६-१७ हजारापर्यंत पडेल. काय करता, फ्लाईट्स कमी आहेत तिथल्यासाठी.. तिथे काही लोकांनी सांगितल्याप्रमाणे, समुद्रमार्गेही जाता येतं. दोन-अडीच दिवस लागतात, म्हणे..
क्या बात..क्या बात..क्या बात..
डीटेल मधे लिहिलं आहेत. फोटो सुंदर..
त्या स्वा. सावरकरांच्या कोठडीत मीही गेलो होतो. वीस वर्षांपूर्वी. तेव्हा मी साष्टांग नमस्कार घातला होता. आणि आजुबाजूचे व्हाईट कॉलर्ड महाराष्ट्रीय भारतीय मित्र एकजात हसले होते. "काय बावळट आहे" म्हणून.
त्यावेळी हे इतक्या वाईट कंडिशन मधे होतं की माझे कपडे त्या "साष्टांग नमस्कारा"नंतर धुळीने रंगले होते.
लेख मस्त..
तिथे एक फाशीगेट बघितलं. त्याच्या फासात मान ठेवून बघितली होती. भयंकर काटा अंगावर.
दुसरा मित्र खटक्याच्या लिव्हरवर हात ठेवून उभा आहे हे बघून झटकन दोर गळ्यातून काढला.
असे मित्र असले की वेगळे शत्रू कशाला हवे?
असो. जुन्या आठवणी जागवल्यात. धन्यवाद.
माननीय चिगो यांचे लक्ष लक्ष आभार.
माझे वडील सावरकर भक्त, 'सावरकर' हा नुसता शब्द देखील उच्चारला कि अंगात एक वीज संचारते, तर हा लेख आणि श्री. इंद्रा यांचा प्रतिसाद वाचून काय झाले असेल, हे सांगू शकत नाही.
श्री. इंद्रा यांना व श्री. गगनविहारी यांना नम्र विनंती, त्यांचेहि सविस्तर अनुभव आणि फोटो येउद्यात.
गगनविहारी यांना जसा कोठडीतील धुळीचा आस्वाद मिळाला तशी तिथली काही धूळ आमच्याहि माथी लागावी म्हणून तळमळ वाटत आहे.
सुप्रसिद्ध अविनाश धर्माधिकारी यांनी सावरकरांचे केलेले वर्णन. :
१) http://www.esnips.com/doc/cf0d7370-01a6-44f1-8e3a-dc68773d60e3/Veer-Savarkar---1-of-2
२) http://www.esnips.com/doc/9f7be2e2-6da1-4488-9cb7-c4857768cead/Veer-Savarkar---Part-2-of-2
चिगो शेवटच वाक्य खासच........
तुम्ही लकी आहात.....तात्यारावांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या कोठडीच दर्शन तुम्ही घेतलत.....
हे लिहीताना माझ्या अंगावर काटा उठलाय.......
प्रतिक्रिया
जबरदस्त फोटो!!!!!!
पुन्हा अप्रतिम!
+१ हेच म्हणते.. अफ्फाट आलेत
आयला...
हेच म्हणतो
असेच म्हणते..
सावरकर....
एव्हाना कळायला हवे होते...
कधी कळणार ह्या देशाला 'ह्या' माणसाचे मोठेपण...
+१ मुर्खांचा बाजार आहे
हा भागही झकास. मागे 'ऋ'ने
अहो...
सुरेख फोटो आणि लेख!
असेच म्हणते
+१
मस्तच रे!
डोळ्यात पाणी....!!
इन्द्रा...
>>पण प्रत्यक्ष तात्यांच्या
खरंय दोस्तांनो!
झकास वर्णन आणि फोटो. अजुन
स्वातंत्रवीरांच्या कोठीचा
वर्णन आणि फोटो दोन्ही खासच !
हेच म्हणतो
छान
सही...
मला पण जायचं आहे
पुण्याहुन...
मस्तच.
चिगो, सुरेख! पोहर्यात बरंच
हॅ हॅ..
छान. आवडेश.
सलाम..!
धन्यवाद...
फार छान.
फास..
थँक्स...
धन्यवाद...
सागरा प्राण तळमळला...
__/\__ धन्यवाद. अंदमान सफारी
धन्स...
माननीय चिगो यांचे लक्ष लक्ष
चौकशी
ते माफीपत्र नव्हते.. आपण तसा
चिगो शेवटच वाक्य