मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काजु कतली.. मदत पाहीजे..

पंख · · पाककृती
बर्‍याच दिवसांपासून मित्रांकडून काजु कतली या पदार्थाचे नाव ऐकत आहे.. मी तरी कधीही हा पदार्थ पाहिला नाही, खाण्याचे तर दूरच .. पण माझ्या मित्रांना हे समजल्यावर त्यांनी मला वेड्यात काढले. ते विश्वास ठेवायलाच तयार नाहीत कि मी काजु कतलीपासून ईतका अनभिज्ञ असेल. मलाही एकवेळ वाटले कि मला हा पदार्थ माहितीही असेल पण कदाचित वेगळ्या नावाने.. म्हणून मी मित्राला फोन करून काजु कतलीचे एक 'सुरेख' चित्र पाठवायला सांगितले.. पण त्या बहाद्दराने मला text message करुन चित्र पाठवले, ते साधारण असे होते : > > > > पण यामुळे माझा संभ्रम अधिकच वाढला व शेवटी मिपाचे समृद्ध पाककलादालन आठवले. पण तिकडेही शोध घेता काहीच निष्पन्न झाले नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून 'मिपाकरीणींना' शरण आलो आहे. तरी कुणीतरी पुढे येऊन काजु कतली या पदार्थाची सचित्र पाककृती येथे सादर मज पामरास ऊपकृत करावे विनंती ! (गुगलभाऊने कदाचित मदत केली असती, पण त्यात कुठे आलाय आपलेपणा ? म्हणून मिपाकरीणींनो मदत करा ! )

वाचने 4822 वाचनखूण प्रतिक्रिया 12

काय सांगताय काय ? मिपाच्या समृद्ध पाकृविभागात तुम्हाला काजु कतली सापडली नाही ? घ्या हे घ्या :- http://www.misalpav.com/node/15032 आणि शक्य झाल्यास संपादकांना सांगुन आता हा धागा उडवा :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

पंख Tue, 11/02/2010 - 12:27
खूप खूप आभार.. संपादक मंडळाला विनंती आहे कि हा धागा आता व्यर्थ असल्याने ऊडविला तरी चालेल !

In reply to by परिकथेतील राजकुमार

कौशी Tue, 11/02/2010 - 20:08
चिरोते.. पाकातले आणि बिनपाकातले... रेसिपी ची मिपावर ची लिन्क असेल तर द्या...मला शोधता येत नाही. धन्यवाद...........

५० फक्त Tue, 11/02/2010 - 13:14
मला वाटलं की काजु कतली संपवायला मदत पाहिजे आणि पत्ता हुडकायला सुरुवात केली तुमचा. परांनी वर मदत केलेलीच आहे, त्यामुळे रिपिट करीत नाही. हर्षद

५० फक्त Tue, 11/02/2010 - 13:14
मला वाटलं की काजु कतली संपवायला मदत पाहिजे आणि पत्ता हुडकायला सुरुवात केली तुमचा. परांनी वर मदत केलेलीच आहे, त्यामुळे रिपिट करीत नाही. हर्षद

आशिष सुर्वे Tue, 11/02/2010 - 14:55
मला वाटलं की काजु कतली संपवायला मदत पाहिजे आणि पत्ता हुडकायला सुरुवात केली तुमचा. >> अस्सेच म्हणतो राव.. च्यामारी आताच जेवून झाले होते.. तरी काजू-कतली साठी पाहिजे तेवढी जागा आहे हो ह्या उदरात!! नसेल तर्र खड्डा करून घालू!!