लेखकफ्रॅक्चर बंड्यायांनी मंगळवार, 02/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वहीवरल्या
अर्ध्यातच वाट हरवलेल्या काही कविता,
कधी कधी भांडण उकरून काढतात माझ्याशी ...
तुझ्यामुळेच आम्ही हरवलो,
आता कळत नाहीये...
जायचे कुठे ? अन थांबायचे कुठे ?
त्यांची समजूत घालण्याकरता मग
मी शोधतो अजून एखादी ओळ ..
अन त्यांना मुक्कामाला पोहोचावायाच्या नादात मात्र ..
मी स्वतःच हरवतो ...
शब्दांची बोटे धरुन बर्याचदा कविता मुक्कामी पोहोचते, परंतु या प्रक्रियेमधे लिहीता लिहीता आपणच कुठेतरी हरवून जातो कधी कधी. कविता खूप आवडली आणि भावनाही समजल्या !
प्रतिक्रिया
थोडक्यात कवीचय भावना स्पष्ट
कविता
असेच म्हणतो
In reply to कविता by मुक्तसुनीत
येस्स! अगदी हेच!
In reply to कविता by मुक्तसुनीत
खरं आहे..
धन्यवाद मित्रांनो...