Skip to main content

बैल

लेखक जयदेव यांनी सोमवार, 01/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दोन जिवाची घालमेल निस्तेज सन्साराची तीन दगडी चुल मान्डण्यासाठी १० बाय १० चे खुराडे जगण्या मरण्याच्या आणाभाका खान्यासाठी पालिकेच्या नळाची थेम्ब थेम्ब धार सारा सन्सार धूवून जिवाची तहान भागविण्यासाठी सरकारचे अधीक्रुत दुकान उच्चत्तम निक्रुष्ट दर्जाच्या धान्यासाठी जिवाच्या करमणुकीची प्रसारमाध्यमे ऐकुन किटतात कान अन धिजतात डोळे कारण त्यात जाहिराती असतात बैलान्च्या अन बातम्या असतात महाबैलान्च्या महाबैल रवन्थ न करता पचवतो कोटीकोटी अन त्याच सत्यकथ्येची रवन्थ करत आपण जळतो घडोघडी महाबैलान्नी गिळ्लेल्या पेन्डीचा एक दिवस जनता करेल हिशोब कारण सामान्य जनता ही गाय आहे ह्या सार्‍या बैला-महाबैलान्ची माय आहे तिच्या अन्तर्गभातील २५० कोटी करकमले ह्या सार्‍यान्ना वेसन घालुन एक दिवस अस्वलासारखे नाचवतील त्यावेळी नसलेले देवही स्वर्गातुन पुष्प् व्रुष्टी करतील....
लेखनविषय:

वाचने 1778
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कवितेची संकल्पना आवडली. कवितेमागील तळमळही समजण्यासारखीच आहे. (समजूतदार)बेसनलाडू गाय-बैल वगैरे निरुपद्रवी, शांत प्राणीमात्रांची रूपके अशा नकारात्मक, अन्याय्य परिस्थितीचे चित्रण करण्यासाठी योजली जाणे हे मात्र त्या प्राण्यांच्या दृष्टीने अन्यायकारक वाटते. अशी रूपके कवितेत योजली जाणे यालाही प्राणीहिंसा मानले जावे की काय, याबद्दल (नि त्याविरोधातील आंदोलने, संघटना इ. बद्दल) विचार करावासा वाटतो (ह. घ्या) (अहिंसावादी)बेसनलाडू वसुबारस उद्यापरवाच कडे आहे ना? बैलपोळा नसला तरी वसुबारस असल्याने कविता प्रासंगिक, समयोचित वाटायलाही हरकत नाही. (प्रासंगिक)बेसनलाडू

हो चुकलेच माझे थोडे.( समस्त प्राणीमात्रान्ची क्षमा मागुन ) असे शेवटी वाचावे क्रुपा करुन आपल्या सुन्दर प्रतिसदाबद्द्ल आपला मी ऋणी आहे.

In reply to by जयदेव

जयदेव, अहो मी प्रतिसादात 'हलकेच घ्या' म्हटले आहे. क्षमा, ऋणी वगैरे अवजड सोपस्कार नकोत. कवितेबद्दलचा प्रतिसाद आधीच दिला आहे. बाकीचा अवांतर प्रतिसाद मजेखातर आहे. असो. (अवांतर)बेसनलाडू

कविता छान. 'राजकारण्यांच्या नावानी खडे फोडताना कविता करण्याची सध्या फॅशन आहे' असे कोणाला वाटत नसेल ना ? >>महाबैलान्नी गिळ्लेल्या पेन्डीचा एक दिवस जनता करेल हिशोब जनता म्हणजे नक्की कोण ? आणि हिशोब वगेरे करण्याचा हक्क जनतेला कधी पासून मिळाला ? असो, स्वप्न बघायला काय हरकत आहे. स्वप्नाळूवादी.

कविता छान ... मनातील राग स्पष्ट दाखवतायेत शब्द .. सरळ सरळ शब्द आवडले तरीही थोडे कमी शब्दात जास्त भाव दाखवता येतील असे वाटते .. अवांतर : "ह. घ्या" म्हणजे 'हलकेच घ्या' हे पहिल्यांदाच कळाले .. इतक्या दिवस मिपा वर मी त्याचा अर्थ ' हसुन घ्या' असाच घेत होतो ... नला वाटायचे येव्हदे बोलतात लोक अआणि मग म्हणतात हसुन घ्या .. बरे झाले आता कळाले ते ..