Skip to main content

कोलाज.... पुन:प्रयत्न..

लेखक चिगो यांनी रविवार, 31/10/2010 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
हातात कॅमेरा घेतल्यावर काही ना काही टिपल्या जातंच.. त्यातल्या त्यात डिजीटल कॅमेरा, म्हणजे तर "क्लिकक्लिकाट"च.. एवढ्यात भरपूर भटकंती झाली. त्यावेळी टिपलेली ही काही दृष्ये... हे मसुरीत उमललेले फुल... ट्रेकींगला गेलो असतांना समोर हे दिसलं, आणि भरुन पावलो... हा चीनचा भाग (तिबेट), अरुणाचलमधील सैन्याच्या पोस्टमधून दिसलेला... अंदमानच्या जंगलातील प्रकाशाचा खेळ... स्वतःचे नाव सार्थक करणारे मेघालय... निसर्गाचे "अ‍ॅब्स्ट्रॅक्ट" चित्र... ही छायाचित्रे आवडली तर आणखी काही डकवावी म्हणतो... मिपाकरांनो, प्रयत्न गोड मानून घ्यावा, ही विनंती !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2909
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

जमलं एकदाचं... ह्हूश्श...

आणखी येऊ द्या. तुम्ही इतक्या ठिकाणी फिरला आहात तर, मग एकेका परीसरावर एकेक धागा टाका. म्हणजे एकसंधता येईल आणि शिवाय त्याबरोबर तिथले अनुभव पण कधन केलेत तर आणखी बहार येईल :)

In reply to by स्वानन्द

एक विचारायचं राहिलंच... यात कोलाज कुठे आहे?
हेच अगदी मनात आले. बाकी फोटु मस्तच ! त्यातल्या त्यात रेनबो वाला फोटु आवडला. (वाह एक इंग्रजी शब्द आला बॉ प्रतिक्रीयेत)

In reply to by स्वानन्द

वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो एकत्र करुन टाकलेत म्हणून "कोलाज" असं नाव दिलंय.. चुभुद्याघ्या..

दादानू, लै दिवसांनी बोर्डावर तुपलं नाव दिसलं बा. :) आता फोटूसोबत काही झकाऽऽस लेखही टाका देवा. अवांतरः 'मेघालय' एकदम अप्रतिम! आणि तिबेट, डोंगरातलं इंद्रधनु....सुंदरच!!!