मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा फराळ - १ बेसन लाडु

स्पंदना · · पाककृती
मंडळी चार दिवसावर दिवाळी ! निदान चार पाच पदार्थ तरी घरचे हवेतच नाही का? हे बेसन लाडू माझ्या पद्धतीचे. अर्थात हा उपद्व्याप नवख्या लोकांकरिता. तर सामान हा तेच सामग्री :- ५ वाट्या बेसन १ ते ११/२ वाटी तूप ३ वाट्या पिठी साखर १०- १२ वेलदोडे ( पावडर करून) बेदाणे वां मनुके जे आवडेल ते. थोडे बदाम काप. अन लास्ट अन बेस्ट इनग्रेडियंट 'नवरा' तो हीं जिम वगैरे करणारा असेल तर उत्तम !! कृती :-' बेसन कढईत घालून आच कमीजास्त करत भाजायला सुरु करणे. मी आपल नेहमीचच बारीक दळलेल (फाईन ) बेसन वापरते. बेसनाची सुरुवातीची वाफ गेली की तूप घालायला सुरु करणे. आता इथून पुढे हात जरा हीं थांबता कामा नये. मग' ए आजच जिम इथच कर ना !' असं लाडिक पणे म्हणून नवऱ्याला तिथे बसवणे. पीठ भाजून होई पर्यंत नाही 'मसल' तयार झाले तर बोला.
From Drop Box
बराचसा हा पदार्थ मी माझ्या नाकावर विसंबून करते कारण पूर्वी खाल्लेलं कस होत ते फक्त ' हे घ्राणेंद्रिय ' च मला सांगू शकत. साधारण अर्धा एक तास एक सारख भाजत राहिला की पाहिला तूप घातल्यावर पिठात एकदम गाठी तयार होतात मग एकदम सार तूप वितळून पीठ पातळ झालं की काय असं वाटू लागत, अन परत तूप घट्ट होऊन पीठ जवळ जवळ तयार व्हायला येत. बस एक सारखा जवळ वाकून वास घेत रहा! साधारण याच वेळी मी बदामाचे काप या बेसनात मिसळते . छान भाजून निघतात. आता आच बंद करून. हे पीठ अगदी थंड गार होऊ दया.
From Drop Box
पूर्ण थंड झालेल्या बेसनात मग पिठी साखर, अन वेलदोडे पूड मिसळा अन लाडू वळून वर एक वां दोन बेदाणे लावा. बेसन लाडू तय्यार . माझ पिठ भाजुन झालय पण लाडु नाही बांधले अजुन, म्हणुन तो फोटो नाही !! [काही जण पीठ भाजून होत आल की त्यामध्ये दुध घालतात पण त्यामुळे लाडू ;थोड्याच दिवसात त्यातला खवा खराब होऊन, 'वाशेल' होतात.]

वाचने 10361 वाचनखूण प्रतिक्रिया 20

मराठमोळा 01/11/2010 - 10:37
अरे.. या धाग्यावर खुद्द बेसनलाडवाचा प्रतिसाद कसा काय नाही आला ब्वॉ. ;) असो, मला गोडधोड तेवढं आवडत नाही पण एखादा गरमागरम लाडु खाण्यास काही हरकत नाही. :) पाकृ छान, लाडु वळा आता तरी.

आशिष सुर्वे 01/11/2010 - 13:11
बेसन लाडू.. मरताना कोणता गोड पदार्थ खायची इच्छा असेल असे कोणी विचारले तर म्हणेन.. १. बेसन लाडू २. पुरणपोळी.. अप्रतिम पदार्थ अन दर्जेदार पाकृ.. अहो तेवढा फायनल लाडवाचा फोटू टाका हो.. आम्ही हात अन् तोंड बांधूनशान बसतो हवं तर्र!!

स्पंदना 01/11/2010 - 17:26
From Drop Box" alt="" /> धरा बाबांनो ! जरा दम म्हणुन काय न्हाइ बघा तुम्हाला. ऑ ? आता काय एव्हढा एकच पदार्थ आहे होय? मी तर बेसन भाजुन झाल की दिवाळी भर लागतील तसे लाडु बांधत असते , तुमच्या हट्टापाई यावेळी सगळ बाजुला ठेवुन पहिला लाडु बांधावे लागले . तुम्हा सर्वांचे आभार. मितान लाडु वळण सोप असत पण प्रमाण अन कसे भाजावे ते दिवाळी आधी कुणी कन्फ्युज असेल तर कळाव म्हणुन गडबड केली . आता निवांत खा अन पाणी पी. झाडावर बसुन झोके घे!!

In reply to by स्पंदना

मितान 01/11/2010 - 17:37
अपर्णा, मस्तं !!! काय सुंदर दिसतायत गं !! बघुनच पोट भरलं.. :) आणि अगं मला गोल लाडू वळता येत नाहीत. भाजणे वगेरे जमते पण लाडू मात्र चपटे !!! :( तो सगळ्यात वरचा लाडू मोदकाच्या साच्यात केलाय का लाडूसाठी असा साचा असतो ?

चिगो 02/11/2010 - 00:22
मिळतं का हो मोठ्या लोकांसाठी..?? तोंडाला पाणी सुटून पूर येईल असं वाटतयं.. सह्हीच.. पता पाठवतो, लाडू पार्सल पाठवा प्लिज...

मिसळभोक्ता 03/11/2010 - 01:39
तिकडे "स्त्रियांना कसे पुरुष आवडतात" ? आणि इकडे "माझा फराळः बेसनलाडू" ! दचकलोच. बे ला, नाही तर आज तुझी धडगत नव्हती !