Skip to main content

काही रेखाचित्रे

लेखक स्वानन्द यांनी गुरुवार, 28/10/2010 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
आज सहज जुन्या फाईली बघत असताना मी कधी तरी सहज म्हणून काढलेली रेखाचित्रे हाती लागली. ती इथे चिकटवली आहेत. आणखीही काही होती. पण सापडत नसल्याने सद्ध्या एवढीच चिकटवतो. कशी वाटली ते सांगा. काही सुधारणा सुचवाविशी वाटली तरी सांगा. ( कारण पुन्हा एकदा हा छंद चालू करावा असा विचार चालू आहे .) १. हे रेखाटन पै. मुहम्मद रफी यांच्या तरुणपणातील छायाचित्र पाहून काढले आहे. २. हा कोण हे आपण ओळखू शकाल .... अशी अपेक्षा :) ३. हे रेखाटन कोणा व्यक्तीचे असे नसून... ज्या वहीत चित्र काढत होतो त्या वहीच्या मागच्या पानावर काढलेले होते. एरव्ही मी आधी डोळे रेखाटून मग उरलेला चेहरा पूर्ण करायचो. या चित्राच्या वेळी मी शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कच्चे चौकोन काढून त्याच्या अनुषंगाने पूर्ण चित्र काढायचा प्रयत्न केला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5207
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by भाऊ पाटील

+१

In reply to by प्रियाली

+१

In reply to by सहज

+१

धन्यवाद. काही सुधारणा सुचवाव्याशा वाटल्या, टिप्स द्याव्याशा वाटल्या तर ऩक्की सांगा... प्रगतीत स्वानन्द :)

मस्तच!!! कारण पुन्हा एकदा हा छंद चालू करावा असा विचार चालू आहे विचार करू नकाच थेट सुरुच करा :)

In reply to by शिल्पा ब

हे वाचून तर फार बरं वाटलं. :) एक तर रफींचं छायाचित्र फारसं पाहण्यात नस्तं. त्यातून मी हे त्यांच्या तरूणपणातल्या फोटोवरून रेखाटलं होतं!

शेवटचा प्रयत्न खरंच चांगला झालाय. क्रॉस हॅचिंगची पहिली स्टेप नीट दिसतीये. शेडींग करण्याचा प्रयत्नही स्तुत्य. अर्थात् सुधारणेस वावही भरपूर आहे. :) रेखाटनांबद्दल चर्चा करता येईल.. पण येथे अवांतर होईलसं वाटतंय!

रफीसाहेब साफ फसले आहेत.. :( ऋतिक रोशन छान आला आहे, शेवटचं चित्र अभिनेता प्राणचं वाटतं..तो प्रयत्नही चांगला आहे.. रफीला मात्र सुधारा मालक. कैच्याबैच आहे ते चित्र..चेहेर्‍याची उजवी बाजू ठीक वाटत नाही.. दातही बरोबर नाहीत.. रफिसाहेबांच्या चेहेर्‍यावरील सात्विक भाव त्यामुळे थोडा बिघडल्यासारखा वाटतो.. शुभेच्छा.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जुने मिपासदस्य श्री ॐकार दिसले नाहीत? त्यांची रेखाटने फार छान असतात. त्यांनी चित्रकळा नामक एक मस्त कूटप्रश्न चित्रमाला देखील निर्मीली होती.

In reply to by विसोबा खेचर

धन्यवाद तात्या. ते रेखाटन ज्या चित्रावरून काढले ते आत्ता माझ्याजवळ नाही. नाही तर पुन्हा एकदा प्रय्त्न करावा म्हणत होतो.. असो दुसरं कुठलं चित्र मिळतय का ते बघतो.

In reply to by विसोबा खेचर

रफी साहेब थोडेशे धिरुभाई अंबानींच्या वळणाने गेल्यासारखे वाटतात ;)

In reply to by अविनाशकुलकर्णी

कुलकर्णी साहेब... काही तरी गडबड होते आहे आपली.... मी रेखाटनाच्या 'वर' नाव लिहीले आहे, खाली नाही ... नेम चुकला ;)

हल्ली मी एका आश्रम शाळेत मास्तर म्हणून काम करतोय.......... .........त्यामुळे अस बोलण्याची सवयच झालि आहे...... पुन्हा एकदा हा छंद चालू करा........ सुधारना आपोआप कळतील