मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोती साबण

अविनाशकुलकर्णी · · काथ्याकूट
दिवाळी म्हटली कि अभ्यंग स्नान आले..कारखान्यात ला कामगार वर्ग याला पहिली अंघोळ.. दुसरी अंघोळ असे म्हणायचा तर गावाकडे पुरुषाचे नहाणे???..व बायकांचे नहाणे असे म्हणायचे.. दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबण साधारण पणे वापरला जातो....दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबणच का? हे पण एक कोडे आहे.... एक खरे....... हि परंपरा वर्षानु वर्षे चालत आली आहे व त्यात खंड नाहि ... आपल्याला मोती साबण आवडतो का?

वाचने 18935 वाचनखूण प्रतिक्रिया 40

प्रचेतस गुरुवार, 10/28/2010 - 13:49
आम्ही तर म्हैसूर सँडल चंदनी साबण वापरतो. इतर साबणांपेक्षा हे साबण महाग आणि अस्सल चंदन अर्क असल्याने ही प्रथा पडली आहे.

In reply to by शिल्पा ब

पिवळा डांबिस Fri, 10/29/2010 - 00:01
आम्ही तर रोजच म्हैसुर संदल साबण वापरतो.... तुम्ही काय ब्बाबा!! मज्जा आहे तुमची!!! :) आम्हाला बापडा तो दिवाळीतच मिळतो!!! :(

In reply to by नितिन थत्ते

शिल्पा ब Fri, 10/29/2010 - 20:59
छान...पण तो शब्द माझा नाही ... कोणाचा ते स्वतः धुंडाळावे. ;) एखाद्या काय आहे च्या धाग्यावर सापडतोय का बघा

पंख गुरुवार, 10/28/2010 - 15:53
लहानपणी गावी दिवाळिची भेट म्हणून एका पतसंस्थेतर्फे काही साखर, तूप, खोबरे ई. वस्तुंसोबतच २-३ मोती साबणही मिळत.. ईतर वेळेस मोती साबण बघायलाही भेटत नसत..फार आनंद व्हायचा. मजा यायची. कुठे गेले ते दिवस ?

In reply to by पंख

रेवती गुरुवार, 10/28/2010 - 23:41
सध्या इतरही साबण दिवाळीत वापरणारे लोक आहेत पण पूर्वी मोती हा दिवाळी स्पेश्शल असायचा आणि दिवाळीसाठीच त्याचे उत्पादन होत असे (ऐकीव माहिती). एक दोन किराणा दुकानात मला आठवतय, दुकानदार आधी विचाराय्चे कि यावर्षी तुमचा मोती 'बुक' करायचा का? ऐनवेळी म्हणे मिळत नसे.

विकास गुरुवार, 10/28/2010 - 16:33
दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबणच का? मला वाटते तसे करावे असे ऋग्वेदातील आठव्या सुक्तामधील त्रेपन्नाव्या ऋचेमधे त्याचे स्पष्ट कारण दिलेले आहे. ;) कृ. ह.घ्या. :) अभ्यंगस्नानाच्या वेळी उटणे लावण्याची प्रथा आहे. अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा हमाम/लाईफबॉय आणि गिचका होणारे लक्स वगैरेच आयताकृती साबणे होती तेंव्हा मोती साबण हा जरा गोल असल्याने तसे नाव, जाहीरात, किंमतीने पेश्शल वाटायला लागला असावा. तेच म्हैसूर सँडल सोप संदर्भात.

स्वतन्त्र गुरुवार, 10/28/2010 - 16:53
आधी दिवाळी म्हंटला कि वर्षातून एकदाच कपडे मिळायचे,त्याचच अप्रूप असायचं ...असही त्यावेळी कदाचित Lifebuoy चा जमाना असल्यामुळे मोती साबण जरा महागतला वाटायचा शिवाय सुगंधही चांगला ....म्हणून मोती साबण वापरात असावे कदाचित, आणि पुढे तीच प्रथा पडली !

पक्या गुरुवार, 10/28/2010 - 23:20
जी काय प्रथा पडली ती मस्तच. दिवाळी म्हटले की इतर अनेक गोष्टींबरोबर अभ्यंग स्नान , उटणे आणि मोती साबण हे हवेच.

अपूर्व कात्रे गुरुवार, 10/28/2010 - 23:39
दिवाळी आणि मोती साबण हे नाते अतूटच. मागच्या वर्षी दुसरा एक साबण आणला, पण अभ्यंगस्नानाला मात्र हट्टाने मोतीच आणायला लावला. बाकी मैसूर सोप वापरला नाही कधी. यावेळी वापरून बघतो.

रेवती Fri, 10/29/2010 - 00:30
मला पिअर्स आवडतो. अगदी सणासुदीलाही! मोती साबण वजनाला जड असतो तसेच तो हातातून घसरून पायावर पडल्यास इजा होइल कि काय असे लहानपणी वाटत असे.;) तसाही तो फेकून मारला तर कपाळमोक्ष होण्याची भिती. हेच मत दिवाळीतल्या बिघडलेल्या लाडवांच्या बाबतीत आहे. ;)

डावखुरा Fri, 10/29/2010 - 01:08
आमच्याकडे तीळीचे तेल..आणि वनौषधिंनी युक्त होममेड (आईने बनवलेलं) असे त्यात थोडे बेसन पीठ मिसळुन ते दुधात भिजवुन त्यात थॉडेसे मध कालवुन या पद्धतीचा उट्ण.. वापरतो.. हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम.. खरे अभ्यंग हेच.. आधी हे भिजवलेलं उटण लावुन घ्यायचे वरुन तीळीचे तेल लावुन ४-५ मिनिट तसेच राहु द्यायचे.. थोडा घाम आला कि ते रगडुन काढावे,,,(ही संकल्पना नरक काढणे अशीही ओळखली जाते...) नंतर कोम्हट पाण्यात गुलाब पाकळ्या किंवा आवडता अत्तर फ्लेव्हर टाकुन मस्त अंग शेकुन.. यानंतर बाहेर येण्याच्या आधी कण्केच्या दिवल्यांनी औक्षण.... अशी थोडी वेळ्खाउ आहे पण दिवळीतच ४ दिवस चान्स असतो अशा अंघोळीचा....दवडु नका.. ईतर वेळी फक्त उटण्याचा वापर साबणाऐवजी वापरुन अपण दुधाची तहान ताकावर भागवु शकतो... आयुर्वेदिक स्नान.. संस्कृतीलालसा....

In reply to by डावखुरा

रेवती Fri, 10/29/2010 - 20:26
इनोचं जाऊ द्याहो! एकतर तुम्ही मला काकू म्हणालात्?ऑ? चित्तरंजन वाटिकेत आपण भेटलो होतो. प्राजुच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनावेळी. तुम्हाला मी काकू वाटते का? आजकाल सगळे काकू आणि आज्जी का म्हणतात तेच कळत नाही बुवा! तुम्ही तुमचे 'लालसा' हे नाव बदलणार असल्याचे सांगितले होते तेंव्हा! हां, आता इनोबद्दल! एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नसली, जसे कि पदार्थ किंवा या केसमध्ये ही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पाण्यात घालून अंघोळ वगैरे कि जळजळ होते म्हणून इनो! पूर्वी अभ्यंगस्नानानंतर बाथरूमध्येच आम्हा लहान मुलांचे अश्या दिव्यांनी औक्षण व्हायचे. त्याची आठवण झाली.

In reply to by रेवती

डावखुरा Fri, 10/29/2010 - 20:39
लालसा नाव बदलायचं होतं पण कसं ते काही जमलं नाही.. तसं काही वाईट नाहीये.. बरीच विशेषणे पुढे लावली की ते चांगले वाटते..(असे मला वाटते..) प्राजुतै च्या सीडी प्रकाशनाला ही यायचे होते पण नाही जमले.. तुम्हाला काकु नको म्हणु चालेल पण तुम्हीच सुचवा मग काय म्हणु ते... हां, आता इनोबद्दल! एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नसली, जसे कि पदार्थ किंवा या केसमध्ये ही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पाण्यात घालून अंघोळ वगैरे कि जळजळ होते म्हणून इनो! हे मात्र अस्सल...

In reply to by डावखुरा

अनिता Fri, 10/29/2010 - 05:12
मोतीचा च्॑दन साबण्...आता मिळतो की नाही माहित नाही.. अवा॑तर : लालसाच्या प्रतिक्रियेत उटण च्या जागी मट्ण वापरले तर काहीतरी छान पदार्थ होइल असे वाटते...

In reply to by अनिता

डावखुरा Fri, 10/29/2010 - 20:46
अनिता तै मटण..अन् ते पण दिवाळीच्या शुभ्मुहुर्तावर.... नका आठवण देउ... आणि मट्नात दुध्,मध छे काहीतरीच काय... (झाडपालाहारी)..लालसा

धनंजय Fri, 10/29/2010 - 02:01
लहानपणी अभ्यंगस्नानासाठी उटणे वापरायचो ते आठवते. उटणे धुवून काढायला दुधात कालवलेले बेसन-पीठ वापरत असू, असे सुद्धा आठवते. साबणाचे काही आठवत नाही.

अडगळ Fri, 10/29/2010 - 03:16
मोती /लाइफबॉय्/जीवा/चंद्रिका/हमाम्/राम्देवबाबा -आसारामबापू आश्रमाचे साबण (१०/१२ रु. नग) बाहेर नळाखाली तिथं जो पडला असेल तो साबण लावून आंघोळ उरकतो. (त्वचेवरुन उम्र ओळखू येणारा ) अडगळ.

विसोबा खेचर Fri, 10/29/2010 - 15:05
'सासासासा रे गप पधपगरेग धधध ध मध ......' तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफ बॉय..! आम्ही नेहमी लाईफबॉय वापरतो.. स्वस्त अन् मस्त..! :) तात्या.