Skip to main content

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 28/10/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीस का त्या मंद, मृदुगंधाला पाहताच हरवलेल्या आपल्या शब्दांना बिलगलीस नकळत हरवून स्वतःला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीच असशील त्या गावाला भिजलेल्या त्या चिंब पावसाला ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? डोळ्यातून मी व्यक्त होताना, तुला आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला माझा हात तुझ्या केसांत विसावलेला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? माझी आठवण नको तुझ्या मनाला आपल्या हळूवार जपलेल्या त्या क्षणांला म्हणून विसरलीस ना आपल्या नात्याला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? हसताना हलकेच ओघळणार्‍या अश्रुला निक्षुन बजावताना, झालेल्या यातनेला माझी आठवण नको म्हणून मनाला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? नाते तोडणार्‍या भावनेच्या भराला कसे गं, गेलीस परक्या देशाला परत ये ,का अशी झुरवतेस स्वतःला मग,काय केलस या वाढदिवसाला ? जप ग, त्या जगण्याच्या द्वंद युध्दात स्वतःला, विसरू नकोस स्वताच्या निरागस हास्याला, सावरेन स्वत:ला, आठवणी असताना सोबतीला आयटीत+ ऐटीत असल्यामुळे पदोपदी,आसपास ईतक काही घडत असत,काही नवी नाती जुळत असतात आणी काही तुटत असतात अथवा विरह-अग्नीत जळत असतात.त्यांच भाव-विश्व काय असेल? काय काहुर असेल त्यांच्या मनात? याचा विचार करताना सुचलेल्या चार ओळी,गोड मानुन घेणे.
लेखनविषय:

वाचने 3369
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मस्त झालीय कविता! :) आवडली.

अप्रतिम झाली आहे कविता. मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? नाते तोडणार्‍या भावनेच्या भराला कसे गं, गेलीस परक्या देशाला परत ये ,का अशी झुरवतेस स्वतःला कड़क आहेत या ओळी.

अप्रतिम झाली आहे कविता. मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? नाते तोडणार्‍या भावनेच्या भराला कसे गं, गेलीस परक्या देशाला परत ये ,का अशी झुरवतेस स्वतःला कड़क आहेत या ओळी.

मस्त जमली आहे सुहास्,खुप आवडली मला......अगदी बरोबर मांडल्या आहेत भावना कि कुणी जवळ्च दुर नीघुन गेल्यावर....

मला कवितेतलं फारसं कळत नाही, पण भावना कळल्या. छान कविता!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

+२...

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीच असशील त्या गावाला भिजलेल्या त्या चिंब पावसाला ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला अतिशय जबरदस्त कविता .. खुप खुप आवडली २-३ दा वाचली मनभरुन ... लिहित रहा .. वाचत आहे .. (काल ह्या कवितेचे पान ओपन होत नव्हते .. आज झाले छान वाटले)

छान कविता रे..!
आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला माझा हात तुझ्या केसांत विसावलेला
हे कुठे केलंस? :) माझ्या आयुष्यात मी हे प्रथम राजमाचीच्या वाटेवर एका झाडाआड केलं.. छान पावसाळा होता.. १९८६/८७ सालची गोष्ट आहे ही..! असो.. :) (सालसप्रेमी) तात्या.

सु हा स ! _ _ /\ _ _ !! सुन्दर लिहिलय ! इतिहास आठवावा इतक सुन्दर !

>>मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीच असशील त्या गावाला भिजलेल्या त्या चिंब पावसाला ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? डोळ्यातून मी व्यक्त होताना, तुला आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला माझा हात तुझ्या केसांत विसावलेला खुप सुंदर...

कडक!!!!

अरे सुहाश्या तुला कुणाची आठवण झाली आणि तुला ही कविता स्फुरली. मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीस का त्या मंद, मृदुगंधाला पाहताच हरवलेल्या आपल्या शब्दांना बिलगलीस नकळत हरवून स्वतःला हे वाचून तर कविमनाचा वाटतो आहेस तू....