Skip to main content

टॉमेटोच्या वड्या

लेखक ज्योति प्रकाश यांनी बुधवार, 27/10/2010 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१) १ खवलेला नारळ. २)अर्धा किलो टॉमेटो अथवा २ वाट्या टॉमेटोचा रस. ३)३ वाट्या साखर. ४)५-६ वेलदोड्याची पूड. कॄती:- प्रथम टॉमेटो वाफवून घ्या.मिक्सर मधुन रस काढा. खवलेला नारळ, साखर, टॉमेटोचा रस एकत्र करून शिजवा. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पूड घाला. नरम गोळी होइपर्यन्त शिजवा. नन्तर तूप लावलेल्या थाळीत थापा.थन्ड झाल्यावर वड्या कापा. फोटू टाकता येत नाहीत तरी कॄपया त्याची रेसिपी मला द्यावी हि विनैती.

वाचने 4138
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

ह्म्म्म...वेगळीच पाकृ आहे बाकी फोटू मलापण टाकायला जमत नाही त्यामुळे आपल्या विनैतीचा स्वीकार करता येत नाही...खेद आहे.

फ्लिकर किंवा पिकासावर चढवून त्याचा दुवा येथे देता येईल. फ्लिकर - http://www.flickr.com फ्लिकरचे खाते नसले तयार करू शकता. तुमच्या काँप्युटरवरून फोटो फ्लिकरवर चढवा. चढवलेला फोटो " Share this photo" येथे क्लिक करून Grab the HTML/BBCode खालील कोड कॉपी करून इथे चित्र म्हणून चढवा. न जमल्यास मला फोटोंचा दुवा खरडीतून पाठवा. मदत करू शकेन.