Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by लिखाळ on Tue, 10/26/2010 - 17:14
परवाचाच अनुभव आहे. म्हणावे तर साधासाच. पण खूप काही शिकवून जाणारा. असे अनुभवच आपले जीवन खुलवत असतात, फुलवत असतात. आयुष्याचे निराळेच पैलू अवचित आपल्या समोर आणून आपले भावविश्व कुठेतरी समृद्ध करत असतात. झालं असं की मी बस मधून एके ठिकाणी निघालो होतो. आत गेल्यावर बसायला जागा मिळाल्याने स्वारी थोडी खुष होती. एक दोन स्टॉप गेल्यावर अचानक एक मध्यम वयीन काकू आल्या आणि ओरडूनच म्हणाल्या की मला बसू द्या..स्त्रीयांचा काही मान ठेवत नाहीत.. नियम पाळत नाहीत वगैरे वगैरे.. मी खरेतर स्त्रीयांसाठी राखीव जागेवर बसलो नव्हतो. माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला. अपमान गिळून मी कसाबसा चेहरा लपवत जागेवरून उठलो तरी त्या बाईंचे शिव्याशाप चालूच होते. लग्गेच बसमधून उतरावे असे मनात येत होते पण काय करणार.. इलाजच नव्हता. पुढल्या एका बाकावर एक आज्जी बसल्या होत्या. त्या सर्व प्रकार पाहत होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहून एक हलकेसे स्मितहास्य केले आणि म्हणाल्या 'जाऊदे ! मनाला नको लाऊन घेऊ.' त्यांच्या त्या दिलासा देणार्‍या हास्याने मला फार फार बरे वाटले. फार गोड आज्जी होत्या. पुढचा प्रवास माझा एकदम हलक्या मनाने झाला. स्मितहास्याची जादू होती. उतरताना मी त्या रागावणार्‍या काकूंकडे हसून बघितले. त्यांना माझे वागणे एकदम आश्चर्याचेच वाटले. त्या खजिल झाल्या. बाकावरल्या आज्जी हे पाहत होत्या. उतरताना नुसती आमची नजरानजर झाली. आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे ते स्मित मी पुन्हा एकदा जपून ठेवले माझ्या मनाच्या कुपीत. कुणीतरी हवं असतं स्मितहास्य करणारं हलकेच हसून आपले आसू पुसणारं. --लिखाळ तेच ते तेच ते !!
  • Log in or register to post comments
  • 8043 views

प्रतिक्रिया

Submitted by गणपा on Tue, 10/26/2010 - 17:16

Permalink

(विषय दिलेला नाही)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by असुर on Tue, 10/26/2010 - 18:56

In reply to (विषय दिलेला नाही) by गणपा

Permalink

+

+ :-) --असुर
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 10/26/2010 - 17:17

Permalink

ऐला हे काय आहे?

ऐला हे काय आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 10/26/2010 - 17:20

Permalink

हा हा हा!

प्रोफेसर धनुष्कोडींच्या यावर काय मतं आहेत हे पराकुमार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून वाचायला आवडतील. लिखाळा, तुझी शब्दांची वही सापडली काय रे?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 10/26/2010 - 17:41

Permalink

काय 'श्रीसां'चा अनुग्रह वगैरे

काय 'श्रीसां'चा अनुग्रह वगैरे मिळाला का काय लिखाळभावजींना ? आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.अलीकडे प्रो.देसायांना बरं नसतं म्हणून ते घरीच असतात.मी वैद्यांना म्हणालो आपण दोघे बोलत बोलत तळ्यावर फिरायला जाऊंया.माझी कल्पना त्यांना आवडली. मी वैद्यांना म्हणालो, "प्रिन्सिपल साहेब,बरेच वेळा मी पाहलंय की काही माणसं सहजपणे खास स्मितहास्य करतात.ही ह्या लोकांची वृत्ती कशी निर्माण होते.?" माझा प्रश्न ऐकून प्रि.वैद्य हंसत हंसत मला म्हणाले, हंसणं- खिदळणं नुसतंच प्रेम जारी ठेवत नाही तर मैत्री आणि कुटूंब पण,आणि हा विपत्तीत सुद्धा मार्ग काढण्याचा नक्की आणि सोयीस्कर उपाय आहे.हसणं हे एक कामावरच्या सदाचाराचं निर्देशक आहे.कदाचीत ह्यामुळेच कामाचा बोजा सहजगत्या उतरता येत असावा.ज्या ठिकाणी हंसण्यात वाटेकरी होतात त्या ठिकाणी सख्य, ईमानदारी, प्रामाणिकपणा, आणि आत्म बोध-ह्या सर्व चांगल्या गोष्टी जीवन उभारायला उपयोगी पडतात.म्हणून मी माझ्या सुहॄदांन नेहमी म्हणतो, "तुमच्या आणि इतरांच्या हंसण्या-खिदळण्यात भाग घ्या आणि ऐका.ज्यावर तुम्ही प्रेम करता-लोक,स्थान आणि तुमचा पेशा ह्या गोष्टींच्या जवळ तुम्हाला नेण्याच्या प्रयत्नात ही संवय उपयोगी होईल. " हे ऐकून मी वैद्यांना म्हणालो, "जरा विस्ताराने सांगितलंत तर बरं होईल." मला म्हणाले, "असं बघा,एका स्थरावर प्रत्येकाला मृत्यु येणार,कुणाचं प्रेमभंग होणार,कुणाला जीवनात अपयश येणार हे माहित असतं कळतही असतं.प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला येत असणार,कुणी कधी चकित होऊन आनंदी होत असणार, अचानक जवळच्याची भेट होऊन कधी कुणी प्रसन्नही होत असणार. पण ह्या बाबी सामान्यपणे प्रस्थापित झालेल्या असतात." असं म्हणत वैद्य पुढे म्हणाले, ह्यातून एकमेकाची सहायता करण्याची वृत्ती आपण आणूं शकतो. या विविधतापूर्ण समाजातल्या उणीवां ज्या समानतेचा वाटेकरी होण्यास आणि भेदभावांना सामावून घेण्यात अडथळे आणतात त्या उणीवामधून निर्माण झालेली पोकळी भरायला आपण सुरवात करू शकतो..ह्यावरून एकमेकाशी संबंध प्रस्थापित कसे करायचे हे तुम्हाला माहित होऊ शकतं."
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 10/26/2010 - 17:50

In reply to काय 'श्रीसां'चा अनुग्रह वगैरे by परिकथेतील राजकुमार

Permalink

जबरदस्त ! प्रिं वैद्य भारीच

जबरदस्त ! प्रिं वैद्य भारीच आहेत. त्यांना आणि आपल्याला दंडवत!! अजून शोधा, फुलपाखरी, मुक्तपीठी लेखन भरपूर सापडेल. माझा आपला खारीचा वाटा :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 10/26/2010 - 21:52

In reply to काय 'श्रीसां'चा अनुग्रह वगैरे by परिकथेतील राजकुमार

Permalink

पर्‍या.. अशक्य आहेस!!

पर्‍या.. अशक्य आहेस!! ___/\___
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Wed, 10/27/2010 - 03:46

In reply to पर्‍या.. अशक्य आहेस!! by प्राजु

Permalink

पर्‍या

जाहीरः एका वयोवृद्ध व्यक्तीच्या लेखनशैलीचे असे विडंबन वाचून, एक सर्वसामान्य मिपाकर म्हणून शरम वाटली. खाजगी: जियो पर्‍या !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Tue, 10/26/2010 - 17:26

Permalink

आजी आणि काकूंचे

आजी आणि काकूंचे संगनमत असावे असा आमचा अंदाज आहे. काकू प्रवाशांना करवादून बोलणार, जागा पटकवणार, आजी स्मितहास्य करणार, वैतागलेला प्रवासी खूष होणार. सगळेच हॅप्पी!! तुम्हाला हॅप्पी बड्डे!
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 10/26/2010 - 17:37

In reply to आजी आणि काकूंचे by प्रियाली

Permalink

ही ही .. पण त्यामुळे मला

ही ही .. पण त्यामुळे मला केवढा मोठा अनुभव मिळाला. :) शुभेच्छां बद्दल आभारी आहे. (एक छोटेसे स्मितहास्य :) )
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 10/26/2010 - 17:53

In reply to ही ही .. पण त्यामुळे मला by लिखाळ

Permalink

लिखाळ, तुम्ही असेच छोटे छोटे

लिखाळ, तुम्ही असेच छोटे छोटे अनुभव सातत्याने सगळ्यांसमोर मांडत रहा ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Tue, 10/26/2010 - 22:16

In reply to आजी आणि काकूंचे by प्रियाली

Permalink

प्रियालीशी सहमत!

सहमत! काकू कर्कश बोलणार| लिखाळ घाबरून उठणार|| आज्जी खुद्कन हसणार| गंमत होणार निश्चित || :)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Wed, 10/27/2010 - 03:47

In reply to आजी आणि काकूंचे by प्रियाली

Permalink

हॅ हॅ हॅ

काकू प्रवाशांना करवादून बोलणार, जागा पटकवणार, आजी स्मितहास्य करणार, वैतागलेला प्रवासी खूष होणार. हे जरा "युद्ध माझा राम करणार.." च्या चालीवर गाऊन बघितले. मस्त जमलेय ! जय बापू !
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 10/28/2010 - 08:27

In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता

Permalink

हॅ हॅ हॅ

लिखाळ भाओजी अनुभव लिहिणार | पिंडाकाका महावाक्य टाकणार| मिभोकाका ते चालीत गाणार| विरजण लागणार निश्चित||
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 10/28/2010 - 23:18

In reply to हॅ हॅ हॅ by केशवसुमार

Permalink

पिंडाकाका नाही हो

पिंडाकाका नाही हो पिडांकाका...
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Tue, 10/26/2010 - 17:56

Permalink

लिखाळ भावोजी.. छान अनुभव, असे

लिखाळ भावोजी.. छान अनुभव, असे छोटे छोटे अनुभव जीवन समृद्ध करतात हो.. असेच वेगवेगळे अनुभव मिपावर वाचायला मिळतात आणि त्यातुनच आम्ही पण अनुभव समृद्ध होत जातो. एका स्मिताचे गणित तुम्ही फार चांगल्या पद्धतीन उकलुन सांगीतले आहे. पहायला गेलो तर फार साधी गोष्ट आहे पण जसे मास्टर कार्ड च्या जाहिरातीत काही गोष्टी प्राईसलेस असतात तसेच हे स्मित. तुमचे असेच अनुभव येउद्या
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 10/26/2010 - 18:46

Permalink

मस्त!

खरंय! खूप छान.. स्मितहास्य! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 10/26/2010 - 19:10

Permalink

मस्तच!

छोटासा पण बरेच काही सांगणारा हा लेख एकदम आवडला! अजून सातत्याने लिहीत रहा ही विनंती!
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 10/26/2010 - 22:16

In reply to मस्तच! by विकास

Permalink

अजून सातत्याने लिहीत रहा ही विनंती!

अजून सातत्याने लिहीत रहा ही विनंती! हेच म्हणतो. (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/26/2010 - 19:13

Permalink

मस्त.

स्मित ही अशी एक वक्ररेषा आहे, की जी बर्‍याच गोष्टी सरळ करते!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 10/26/2010 - 19:15

In reply to मस्त. by पैसा

Permalink

छान!

स्मित ही अशी एक वक्ररेषा आहे, की जी बर्‍याच गोष्टी सरळ करते! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 10/26/2010 - 23:59

In reply to मस्त. by पैसा

Permalink

+ १ आवडले

+ १ आवडले
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Wed, 10/27/2010 - 03:49

In reply to मस्त. by पैसा

Permalink

ह्म्म्म

स्मित ही अशी एक वक्ररेषा आहे, की जी बर्‍याच गोष्टी सरळ करते! मी चुकून "स्मिता" असे वाचले. आणि सगळ्या वक्ररेषा डोळ्यासमोर तरळल्या...
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 10/28/2010 - 08:32

In reply to ह्म्म्म by मिसळभोक्ता

Permalink

हॅ हॅ हॅ

पैसातै 'स्मित' लिहिणार | मिभोकाका 'स्मिता' वाचणार| सगळ्या वक्ररेषा डोळ्यासमोर तरळणार| विरजण लागणार निश्चित||
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Tue, 10/26/2010 - 19:33

Permalink

मुग्ध करणारी रूपे

मन प्रसन्न करणारा अनुभव वाटला. भाषेची अनेकविध आणि मुग्ध करणारी रूपे आहेत जी आपण सहजगत्या वापरू शकतो. श्री.लिखाळ याना त्या प्रवासी महिलेने सौम्य भाषेत "ती जागा महिला आरक्षित आहे..." इतके जरी म्हटले असते तर त्यांनी ती विनंती चटकन मानली तर असतीच शिवाय त्यांच्याही तोंडून 'सॉरी' गेले असते. विषयच संपला असता व उरलेला प्रवासही गारव्यात झाला असता. पण असे होणार नसते. भाषेची नको ती रूपे आदळण्याचा काही व्यक्तीना (स्त्री/पुरुष दोन्ही घटक) इतका सोस असतो की त्याच्या परिणामाची क्षीती न बाळगता ते तिचा बिनदक्कत वापर करीत असतात. त्यातून मने दुभंगण्याशिवाय हाती काही येत नाही. अशावेळी 'स्मितहास्याचे' कमालीचे महत्व पटते. वादाच्या प्रसंगी कुठल्याही पट्टीत माणसे काहीही बोलत असली, तरी त्याला प्रत्युत्तर द्यायचेच असेल तर एक स्मितहास्य विलक्षण पारदर्शी आणि परिणाकारक प्रभाव दाखविण्यास समर्थ असते.....जे त्या दुसर्‍या बाकावरील आजीच्या स्मिताने श्री.लिखाळ याना शिकविले. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 10/27/2010 - 00:01

In reply to मुग्ध करणारी रूपे by इन्द्र्राज पवार

Permalink

बाकी ठीक आहे हो , पण लिखाळ

बाकी ठीक आहे हो , पण लिखाळ आरक्षित सीटवर बसलेले नव्हते असं लिहिलंय त्यांनी...अंमळ घाईत प्रतिसाद दिला का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 10/26/2010 - 20:44

Permalink

लिखाळसाहेबांचे

लिखाळसाहेबांचे अभिनंदन! बसमध्ये जागा मिळाल्याबद्दल हो!;) थोडावेळ का होइना जागा मिळाली ना?;) तुमच्या अनुभवावरून मलाही जागा पटकावण्याचा उपाय सापडला. असे अनुभव लिहिल्याने तुमच्याबरोबर वाचकही अनुभवसमृद्ध होतात. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by ईन्टरफेल on Tue, 10/26/2010 - 20:55

In reply to लिखाळसाहेबांचे by रेवती

Permalink

कंपुत जागा

कंपुत जागा सापडलि का? ता...ई ............... धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 10/26/2010 - 20:57

In reply to कंपुत जागा by ईन्टरफेल

Permalink

छे हो! इतक्या सहजपणे येउ

छे हो! इतक्या सहजपणे येउ देतात होय ते कंपूवाले!;) तुम्ही काळजी करू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 10/26/2010 - 20:48

Permalink

प्रतिसाद

लिखाणाच्या प्रकारामधेच त्यातली गोम दडवलेली आहे : * बालकथा * मौजमजा * आस्वाद (आस्वाद कसला डोंबलाचा माहिती नाही !) अहाहा. इतक्या अलगदपणे , मोरपीसासारखे येऊन मिशी कापून नेणारे सटायर लिहायला माणूस पाताळयंत्री पाह्यजे राव ! विडंबन लिहिण्याकरता ते बटबटीत आणि ठसठशीत असले पाह्यजे या गैरसमजाला चारीमुंड्या चीत करणारे लिखाण. लय भारी. एक नम्र विनंती : या उत्कृष्ट सटायरचे शीर्षक जरा अंमळ अजून मार्मिक हवे होते. प्रस्तुत शीर्षक "काईंडा गिव्ह्ज इट अवे." ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 10/26/2010 - 22:09

In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत

Permalink

विडंबन लिहिण्याकरता ते बटबटीत

विडंबन लिहिण्याकरता ते बटबटीत आणि ठसठशीत असले पाह्यजे या गैरसमजाला चारीमुंड्या चीत करणारे लिखाण.
१० पैकी १०! पण तरीही तळ्याकाठचे प्रि. वैद्यच जास्त आवडले ब्वॉ! प्रि. वैद्यांना माझा शिर साष्टांग नमस्कार. अवांतरः पुढचा फुलपाखरी लेख कौटुंबिक साहित्यकलहावर का? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 10/28/2010 - 06:04

In reply to विडंबन लिहिण्याकरता ते बटबटीत by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

प्रि. वैद्यांना माझा पद्धत

प्रि. वैद्यांना माझा पद्धत शीर साष्टांग नमस्कार. असो. लेख आवडला बरका लिखाल दवणेजी. अर्र लिखाळ भावोजी. हा लेख युयुत्सुजी नी लिहिला असता तर?
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 10/26/2010 - 23:31

In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत

Permalink

धन्यवाद मुसु योग्य शब्दांत

धन्यवाद मुसु :) योग्य शब्दांत आपण माझ्या लेखनाचे मर्म वाचकांसमोर आणलेत. चाणाक्ष वाचकांनी ते आता (तरी) ओळखले असेलच :) अदिती म्हणते त्या प्रमाणे कौटुंबिक नातेसंबंधांबाबत मुक्तपीठी लेख लवकरच पाडतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 10/27/2010 - 00:11

In reply to धन्यवाद मुसु योग्य शब्दांत by लिखाळ

Permalink

म्हणून तर

चाणाक्ष वाचकांनी ते आता (तरी) ओळखले असेलच अहो तसे जास्त होऊ नये म्हणूनच आपली (बस)गाडी रूळावर ठेवायचा प्रयत्न केला ;)
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 10/27/2010 - 17:36

In reply to म्हणून तर by विकास

Permalink

अहो तसे जास्त होऊ नये म्हणूनच

अहो तसे जास्त होऊ नये म्हणूनच आपली (बस)गाडी रूळावर ठेवायचा प्रयत्न केला
जूने जाणते लोक गाडी 'योग्य' रुळावर ठेवणार याची खात्री होतीच. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 10/26/2010 - 22:17

Permalink

मि.लिखाळ, स्माईल प्लिज, क्लिक

मि.लिखाळ, स्माईल प्लिज, क्लिक !!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 10/26/2010 - 22:33

Permalink

हा हा

हा हा (क्षमस्व... हाहा असे नादहास्य नाही, तर स्मितहास्य) (आम्हाला फसवलेत बरे. हाहा हास्याच्या आधी "हाहंतहंत लिखाळं श्रीसा उज्जहार" असे क्षणभर वाटले होते.)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 10/26/2010 - 22:52

Permalink

मला तर बै हे लेखन वाचून

मला तर बै हे लेखन वाचून आमच्या दुसरीतल्या कवितेची आठवण झाली फुलपाखरू, छान किती दिसते, फुलपाखरू. या वेलींवर फुलांबरोबर नननन उडते, फुलपाखरू नननन म्हणजे आठवत नाहीये, गुणगुणतोय. पण त्या गुणगुणण्यात, शब्द न गवसण्यात बालपणाचं हरवणंच प्रतीत होतं नै?रम्य ते बालपण. ते दुसरीतलं बालपण संपून थोडं मोठं बालपण सुरू झालं तेव्हा सुद्धा अशा अनेक जादू करणाऱ्या स्मितांना मी हृदयाच्या कुपीत जपून ठेवलेलं आहे. कितीतरी स्मिता कितीतरी अस्मिता कितीतरी पल्लव्या कितीतरी अपर्णा कुपीत दाटीवाटी झाली....
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 10/26/2010 - 22:59

In reply to मला तर बै हे लेखन वाचून by राजेश घासकडवी

Permalink

मला तर बै !!??

अरे ! कांय चांल्लाय काय ! बाकी फुलपाखरी कवितेपेक्षा त्याचे विडंबनच आठवतेय.. "पंतचि मु... निळेजांभळे" असो असो.
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 10/28/2010 - 08:41

In reply to मला तर बै !!?? by मुक्तसुनीत

Permalink

हॅ हॅ हॅ

लिखाळभाओजी अनुभव लिहिणार|गुर्जीना भलतीच 'फुलपाखरं' आठवणार| भो चा बै होणार| मुसुंना धक्का बसणार निश्चित||
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 10/28/2010 - 10:55

In reply to हॅ हॅ हॅ by केशवसुमार

Permalink

_/\_

आज तुझा नुसताच बापू नाही तर महाबापू (महागुरु सारखा) झालाय रे अनिरुद्धा! (भक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 10/26/2010 - 23:27

In reply to मला तर बै हे लेखन वाचून by राजेश घासकडवी

Permalink

हा हा हा .... >>कुपीत

हा हा हा .... >>कुपीत दाटीवाटी झाली..<< आणि संप्रेरकांना उधाण आले .. ही ही
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 10/27/2010 - 00:05

Permalink

आमचे पण एक स्मितहास्य... लेख

आमचे पण एक स्मितहास्य... लेख वाचताना आधी मला असं वाटलं कि त्या आजींनी तुम्हाला त्यांची सीट दिली कि काय.. ;) म्हणून मग कित्ती कित्ती छान ( आजी ) ! असं शीर्षक ;)
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Wed, 10/27/2010 - 00:24

Permalink

चूक झाली.

कानाला खडा लावला. आजपासून इथले सर्वच लिखाण भावुक होऊन वाचायचे नाही. मी श्री.लिखाळ यांच्या अनुभवातील 'आज्जी' शब्दामुळे असे समजलो की त्यांचा हा अनुभव सत्य आहे. पण एखादी व्यक्ती आजीसारख्या प्रेमळ नातेसंबंधाचा 'सटायर' म्हणून वापर करून इतरांच्या भावनांशी खेळ करेल हे स्वप्नीही आले नाही. आणि मी तिथे माझ्या आज्जीला कल्पून ते लिखाण वाचले, कारण तीदेखील न चिडता कार्य कसे करावे याचेच धडे आम्हास देत असे...... म्हणून तो प्रतिसाद दिला. पण आता वाईट वाटत आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 10/27/2010 - 00:31

In reply to चूक झाली. by इन्द्र्राज पवार

Permalink

पण आता वाईट वाटत आहे. 'जाऊदे

पण आता वाईट वाटत आहे. 'जाऊदे ! मनाला नको लाऊन घेऊ.' :-) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 10/27/2010 - 17:28

In reply to चूक झाली. by इन्द्र्राज पवार

Permalink

मी श्री.लिखाळ यांच्या

मी श्री.लिखाळ यांच्या अनुभवातील 'आज्जी' शब्दामुळे असे समजलो की त्यांचा हा अनुभव सत्य आहे. पण एखादी व्यक्ती आजीसारख्या प्रेमळ नातेसंबंधाचा 'सटायर' म्हणून वापर करून इतरांच्या भावनांशी खेळ करेल हे स्वप्नीही आले नाही.
इतके मनाला नका लाऊन घेऊ हो.. अनेक लोक अश्या तर्‍हेचे लिखाण करुन सारखे काहितरी 'मेसेज' देत-घेत असतात आणि आपापली जीवने समृद्ध करुन घेत असतात.. मला यातल्या अनेक गोष्टी बालकथेप्रमाणे वाटतात.. म्हणून मी असा लेख लिहिला. त्यात 'कुठेतरी', लेग्गेच, जीवन फुलणे, उलगडणे असले अशब्द जे नेमके या तर्‍हेच्या लेखनात चपखल बसतात ते बसवले. असो. तुमच्या पहिल्या प्रतिसादात तुम्ही लेख आवडला लिहिले तीच पावती. इतर अनेकांनाही लेख आवडला हे कळाले. दृष्टीकोन वेगळे असले तरी मजा आली ना? लेख मौजमजा, आस्वाद याच सदरांत होता .. हेतू सफळ :)
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Wed, 10/27/2010 - 20:40

In reply to मी श्री.लिखाळ यांच्या by लिखाळ

Permalink

हेतू सफळ !

मान गये | थॅन्क्स !! स्काय इज क्लीअर इन्द्रा
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 10/27/2010 - 03:25

Permalink

आठवण आली.

लिखाळ गुरुजी परत लिहू लागले, आता सामंत काकाही येऊ देत.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 10/27/2010 - 08:01

Permalink

लै भारी

इतक छान छान लिहायला कसं सुचतं हो तुम्हाला! प्रो. पराई यांचा प्रतिसाद तर अमूल्य आहे अमूल्य! (स्वगतः हा इसम पण च्यायला लेडीज स्पेशल बस मधे चढलाच कशाला? )
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 10/27/2010 - 08:10

Permalink

अगायाया

_/\_ परा आणि गुर्जींचे प्रतिसादही खतरनाक! बाकी लिखाळराव यांनी लौकरच 'आवर रे!' नावाने अशा लेखांचा संग्रह काढावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com