(मी कुठल्याही पक्षाचा समर्थक, कर्यकर्ता अथवा संबंधित नसून केवळ जे वाटतेय तेच लिहित आहे.. मिपाच्या धोरणाबाहेर असल्यास लेखनास पंख देऊन ऊडवले तरी चालेल..)
कडोंमपा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी काल केलेले भाषण टिव्हीवर लाईव्ह बघितले.. काय बोलतो तो माणूस.. गेल्या दोनेक वर्षांत त्यांनी जी मजल गाठली आहे ती कौतुकास्पद आहे. अगदी मनापासून बोलायचं झाल्यास सध्या महाराष्ट्रात निश्चित दिशा असलेला एकमेव नेता म्हणून राज ठाकरेंचेच नाव घ्यावे लागेल. कालच्या त्यांच्या भाषणातील एक मुद्दा मात्र खरोखर विचार करायला लावणारा होता..
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात टाईम्स ऑफ ईंडीयातील एका लेखाचा संदर्भ दिला. कुणीतरी बुकर पुरस्कार विजेते लेखक, अरविंद अड्रीगा (चु.भू.दे.घे.) यांनी तो लेख लिहिला आहे. त्या लेखात अरविंद लिहितात कि सध्या कर्नाटकात युपी-बिहारींची संख्या हळुहळू वाढत आहे. मोठ्या शहरांत अगदी अनोळखी कानडी लोकही आपसांत संभाषण हिंदीतून सुरू करु लागले आहेत. (मुंबई - पुण्यात ओळखीचे मराठी बांधवही आजकाल हिंदीतूनच बोलण्यात धन्यता मानतात..) अरविंद त्यांच्या कानडी बांधवांना वेळीच सावध होण्याचा ईशारा देताना म्हणतात कि हे (युपी - बिहारी) लोक "कायदा पा॑ळला जात नसलेल्या" राज्यांतून ईकडे स्थलांतरीत होत आहेत, त्यांची संख्या अशीच वाढत राहिल्यास भविष्यात कायदा सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण होतील हे नक्की तेंव्हा म्हणू नका कि आम्हाला कुणी सावध केले नाही..
हा लेख टाईम्स ऑफ ईंडीया सारख्या राष्ट्रीय वृत्तपत्रात (जरी दर्जा 'भिकार' असला तरी) छापून आला हिच मोठी गोष्ट आहे. त्यावर कुणीच कसे काहूर माजवले नाही हेही आश्चर्यच. पण बुकर पुरस्कार विजेता लेखक असे काही लिहितो म्हणजे तो नक्कीच बिनबुडाचे लिहिणार नाही. बिहार निवडणूकांच्या निमित्ताने दै. सकाळमधील बिहारमधल्या सद्यस्थितीचे वर्णन करणारी लेखमाला वाचून तर मन विषन्न होत आहे.. आता युपी-बिहारींनी खरोखर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. ऊर्वरीत भारतापेक्षा ही राज्ये ३-४ दशके मागे आहेत व त्याहून लाजीरवाणी गोष्ट म्हणजे तिथले राजकारणी त्यांना अजून मागे नेत आहेत..
युपी-बिहारी लोकही भारतीयच आहेत, भारतात त्यांना कुठीही राहण्याचा हक्क घटनेने दिला आहे. पण आपली जमीन कसायची नाही अन दुसर्याच्या कसलेल्या जमीनीत घटनेने हक्क दिलाय म्हणून लोंढ्याने जावून वाटा मागायचा हि कुठली रित ?
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास वेळीच सावध (थोडा ऊशीर झालाय खरा )होऊन आता हे लोंढे थोपवलेच पाहिजेत.. ऊत्तरेतील नालायक नेते अन मुर्खापेक्षाही मुर्ख हिंदी न्यूज चॅनेल्स यांच्या दबावाला न जुमानता.. नाहीतर एक वेळ अशी येईल कि मराठी सण साजरे करण्यासाठी मुंबई - पूण्यात मराठी लोकांना आंदोलने करावी लागतील.. अबु आझमी सारखे तडीपार गुंड मुंबईत येऊन नेते बनु लागले तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही...
वाचने
6864
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
सविस्तर प्रतिक्रिया देत आहे.
गांधीवादी, लोक जरी
In reply to सविस्तर प्रतिक्रिया देत आहे. by गांधीवादी
+१
In reply to गांधीवादी, लोक जरी by शिल्पा ब
+१ शिल्पातै.
In reply to गांधीवादी, लोक जरी by शिल्पा ब
बाकी युपी आणि बिहार मधील
In reply to गांधीवादी, लोक जरी by शिल्पा ब
भाषण
अडिगांचा लेख इथे वाचता
त्या पुस्तकाला बुकर
In reply to अडिगांचा लेख इथे वाचता by परिकथेतील राजकुमार
अडिगा, राज ठाकरे आणि पंख
:)
यात बिहार हे आत्ताचे India's
In reply to :) by रानी १३
>>या वाक्यातच बरच काहि आहे
In reply to :) by रानी १३
ईतके
मग
In reply to ईतके by प्रिया देशपांडे
हे त्यांनी मराठितून विचारले
In reply to मग by प्रशु
लेख वाचला...
मराठी शेतकरी.
शेती सोडून राजकारणात पडावे
In reply to मराठी शेतकरी. by तर्री
कानडीचा अभिमान
In reply to मराठी शेतकरी. by तर्री
+१
In reply to मराठी शेतकरी. by तर्री
मला मराठीचा "जाज्वल्य " अभिमान आहे.
आठवणीप्रमाणे
In reply to मला मराठीचा "जाज्वल्य " अभिमान आहे. by तर्री
जमले, परवडले तर यंत्राद्वारे
In reply to मला मराठीचा "जाज्वल्य " अभिमान आहे. by तर्री
राज ठाकरेंचे विचार हे कालातीत
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार..
पण आपली जमीन कसायची नाही अन
अर्थ...
कर
In reply to अर्थ... by भारी समर्थ
अंशतः सहमत
In reply to अर्थ... by भारी समर्थ
वळविले...तशा अर्थाने नाही....
In reply to अर्थ... by भारी समर्थ
हिशेब
In reply to वळविले...तशा अर्थाने नाही.... by भारी समर्थ
सार
In reply to वळविले...तशा अर्थाने नाही.... by भारी समर्थ
थोड्याफार प्रमाणात हे मुंबई
In reply to अर्थ... by भारी समर्थ
जय महाराष्ट्र !
असेच विषय घेउन मिपावर मुक्त पंखाने संचारा....
राज ठाकरेंचा वचकनामा....
अरे वा.. निवेदन चाम्गले
जागो मोहन प्यारे..
In reply to अरे वा.. निवेदन चाम्गले by JAGOMOHANPYARE
कुणीही परप्रांतीय नाही !