Skip to main content

पार्लेरी पाटी

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 25/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेकरानीच फक्त पाट्यांचा तोरा मिरवावा अशी मक्तेदारी उरलेली नाही. पार्ल्यात काल एक पाटी पाहिली आणि मला पार्ल्याचा जाज्वल्य अभिमान वाटून ऊर भरून आला . मल्टीपर्पज स्टेनलेस स्टील मोदकपात्र बहुगुणी उपयोग : कडधान्ये बटाटे अळूवड्यांचे रोल पालेभाज्या व अंडी उकडण्यासाठी तयारकेलेल्या अळुवड्या इडल्या कोथिंबीरवड्या ढोकळा पुलाव बिर्याणी गरम करण्यासाठी फळे ठेवण्यासाठी डिशचा वापर व फुलांची परडी म्हणूनही उपयुक्त संकष्टी अंगारकी चतुर्थी ला घरात आवर्जून उकडीचे मोदक मोदकपात्रात तेल न वापरताही लवकर उकडविण्यासाठी . हे पदार्थ ज्या गृहिणीना येतच नसतील त्यांच्यावरही एक सोल्यूशन म्हणजे सुंदर फुलदाणी म्हणूनही घरात वापरता येईल pati
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4043
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

अरे गणपती बाप्पा धाव रे बाबा नहितर हे असले लोक तुला संकष्टी ला अंड्याचे मोदक नैवेद्य म्हणुन दाखवतील... त्याच्या आधीच तु तुझ्या उंदरावर स्वार हो आनि लवलकर निघ....... मोदक??? ते ही उकडीचे???? वा....... द्याहो कोणी तरी...

स्वछ्न्दी-पाखरू यान्च्याशी पूर्णपणे सहमत.

पुणेकरानीच फक्त पाट्यांचा तोरा मिरवावा अशी मक्तेदारी उरलेली नाही. आपले आभार. आतातरी पुणेकरांववरील हल्ले कमी होतील (सं. "फक्त पुणेकर" आणि तत्सम धागे) अशी आशा करतो.

>>सुंदर फुलदाणी आयला फुल वाफवाय्ला ठेवायची का काय?

हनुमान रोड का विजुभाउ? अग्रवाल मार्केट तर नक्कीच नसणार.बहुदा राम मंदिर मार्ग?

पार्ले (पूर्व) मुंबई ५७ आणि पुणे - ३० ह्यांच्यात मला पूर्वी फार साम्य वाटायचे. आता पूर्व पार्लेदेखील गुज्जूंनी भरले आहे.

ती पार्ल्यात भरणारी.... भयंकर ग्रेट इत्यादी म्हणली जाणारी फुसकुली ग्राहक पेठ ना... तिथली आहे पाटी. काल याची देही याची डोळा दर्शन घेतले आणि फिस्कन हसू आले ग्राहक पेठेचं एवढं कौतुक करणार्‍यांचं. अवांतर: ग्राहक पेठ हे पार्ल्यात भरणारे बोरींग प्रदर्शन असून. त्यात फारसं काही नसतं.

पार्ल्यात पण पुण्याची नक्कल.... कारण ग्राहकपेठ पुण्यात आहे... विजुभाऊनां नम्र विनंती हा दुकानमालक (चालक) पुण्यातलाच (?) असा जावईशोध लावावा म्हणजे ... सगळ्यांचे पुणे "प्रेम" ऊफाळून येईल....