Skip to main content

महाराष्ट्राचा विकास कष्टाळू बिहारी लोकांमुळेच : राजपुत्र राहुलजी

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 21/10/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे राजपुत्र व उद्याचे पंतप्रधान राहुलजी हे भारतीय संस्कृतीच्या गहन अभ्यासाकरता प्रसिद्ध आहेत. पंतप्रधानांसारखे वरिष्ट लोकही त्यांचे विचार ऐकून त्यातून बरेच काही शिकतात. सामान्यांची तर बातच सोडा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6788805.cms तर ते नुकतेच असे बरळले आय मीन गरजले की महाराष्ट्र व पंजाबसारख्या राज्यांचा जो विकास झालाय तो केवळ कष्टाळू बिहारी लोकांमुळेच. राहुलजींसारखे प्रकांड विद्वान विचार केल्याशिवाय असे म्हणणार नाहीत. पण महाराष्ट्राचा विकास झालाय ही माहिती मला नवीनच आहे. आणि तो बिहारी कष्टकर्‍यांच्या अथक प्रयत्नाने झालाय हे आणखी नवीन. पण त्यांनी सांगितले म्हणजे खरेच असणार. मला त्यांच्या बोलण्याच्या सत्यतेविषयी तिळमात्र शंका नाही. महाराष्ट्रातील काही कोत्या विचारांची मंडळी आजकाल मराठी मराठी करून टुईटुई करत असतात त्यांचा महाराष्ट्राचा विकास थांबावा असा काही कावा आहे का? कष्टाळू बिहारी लोकांचा लोंढा थांबवून आपल्याच पायावर कुर्‍हाड का मारत आहेत हे लोक? निदान राहुलजींसारख्या अभ्यासू, व्यासंगी नेत्याचा तरी विचार करावा?

वाचने 29195
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

अगदी अमेरिकेसारख्या देशात ज्याला भांडवलशाहीचे प्रतीक मानतात, तिथेही जेव्हा कुठल्या क्षेत्रात मोनॉपोली असते तेव्हा तिथे सरकार हस्तक्षेप करून अशा कंपन्यांवर जास्त क्ठोर बंधने घालते. एटी अ‍ॅंड टी, मायक्रोसॉफ्ट ही काही उदाहरणे. भारतात मोठ्या पक्षांची अशी मोनॉपॉली तयार झाली आहे. जे पक्ष सत्तेवर आहेत ते अमाप पैसा मिळवून पुढच्या निवडणूकीत भक्कम पैसा ओतून पुन्हा निवडून येतात. पक्षातले मातब्बर गब्बर होतात आणि त्या पैशाच्या जोरावर आपल्याच अवलादी पुढे येतील असे बघतात. कागदोपत्री हे पक्ष आपल्या परीने स्वतंत्र असले पाहिजेत. पण सत्तेचा मलिदा खाऊन माजलेले हे दिग्गज पक्ष इतर कोणाला पुढे येऊ देत नाहीत. लोकशाहीत लोकांनी निवडलेले, लोकांचे बनलेले, लोकांसाठी असलेले सरकार अभिप्रेत आहे. त्यातले लोकांनी निवडलेले आता उरले आहे पण ह्या मोनॉपॉलीमुळे उरलेले दोन नियम भंग होताना दिसतत आहेत. निव्वळ कायद्यावर बोट ठेऊन ह्याला शिरोधार्य मानणे हा बावळटपणा आहे. कायदा म्हणजे दगडावरची कोरलेली रेष नव्हे. विचारवंतानी परिस्थितीचा आढावा घेऊन ती वेळोवेळी सुधारणे अपेक्षित आहे. सत्तेवरील पक्षाला, ज्यांचे जवळचे नातेवाईक पक्षात आहेत त्यांना नव्याने नवी पदे देताना जास्त कठोर नियम लावलेच पाहिजेत. अशानेच सामान्यांचे हित बघितले जाईल. रिलायन्सचे वारस निवडताना धीरुभाईने आपली पोरे निवडली. त्यांना ते स्वातंत्र्य आहेच. पण देश चालवताना तितकेच स्वातंत्र्य देणे उचित नाही. आपल्याला रिलायन्सची उत्पादने विकत न घ्यायचे स्वातंत्र्य आहे. आजचे राजपुत्र उद्या पंतप्रधान झाल्यास त्यांना पर्याय नाही. त्यांनी बनवलेल्या कायद्यांना न मानायचे स्वातंत्र्य नाही.

In reply to by हुप्प्या

>>लोकशाहीत लोकांनी निवडलेले, लोकांचे बनलेले, लोकांसाठी असलेले सरकार अभिप्रेत आहे. त्यातले लोकांनी निवडलेले आता उरले आहे पण ह्या मोनॉपॉलीमुळे उरलेले दोन नियम भंग होताना दिसतत आहेत. नागरिकशास्त्राच्या पुस्तकाप्रमाणे मात्र नियम भंग होत नाही. >>निव्वळ कायद्यावर बोट ठेऊन ह्याला शिरोधार्य मानणे हा बावळटपणा आहे. कायदा म्हणजे दगडावरची कोरलेली रेष नव्हे. विचारवंतानी परिस्थितीचा आढावा घेऊन ती वेळोवेळी सुधारणे अपेक्षित आहे. कोण, कधी, केव्हा, कुठे, कोणते बलिदान देऊन ? परिस्थिती सुधारणे हे तुम्हा-आम्हाला अपेक्षित आहे, जे तिथे गादीवर बसलेले आहेत, ते दिवसागणिक खोलवर विचार करून ह्या निर्जीव कायद्यातून कशा पळवाटा काढता येतील ह्याचा विचार करतात. त्यांना कोण शह देणार ? >>सत्तेवरील पक्षाला, ज्यांचे जवळचे नातेवाईक पक्षात आहेत त्यांना नव्याने नवी पदे देताना जास्त कठोर नियम लावलेच पाहिजेत. पुन्हा तोच प्रश्न. कोण, कधी, केव्हा, कुठे ?

In reply to by हुप्प्या

घोडा पाणी पीत नसल्यास मुघल त्याला विचारायचे, "का रे बाबा, तुला पाण्यात संताजी-धनाजी दिसताहेत का?" गेली २१ वर्षे नेहेरू-गांधी घराण्याची एकही व्यक्ती पंतप्रधान पदावर नाही. तरीही ज्यांना नेहेरू-गांधी घराण्याची एवढी "दहशत" वाटते, ते केवळ आणि केवळ न्यूनगंडाने पछाडलेले अहेत, हेच सिद्ध करते. अशा न्यूनगंडाने पछाडलेल्या व्यक्ती/पक्ष्/संघटना देशाला सक्षम आणि बलवान बनवू शकतील असे लोकांना वाटले नाही तरच नवल! बाकी मळ्मळ चालू ध्या......

In reply to by सुनील

तसेच जर म्हणायचे असेल तर ज्या गांधीजींना मारण्यात संघाचा संबंध नव्हता असे कोर्टात पण सिद्ध झाल्यावर, त्या संघालाच काय, त्यावेळेस जन्माला देखील न आलेल्या पिढ्यांना गांधीहत्येनंतर ६० वर्षांनी देखील गांधींचे मारेकरी म्हणवले जाते तेंव्हा काँग्रेसजन आणि सुडोसेक्यूलर्सना संताजी-धनाजी दिसतात का कल्पनेची भुते? तात्पर्यः आपला मुद्दा तत्वतः मान्य आहे. पण तो केवळ गांधीघराण्याविरुद्धच वापरला जातो हे मात्र मान्य नाही. असो.

काय चुकिचे आहे? सरकारी उच्च पदस्थ..यु.पी बिहारी.. कारखाने..पम्जाबी सिंधी,मारवाडी जैन.. कामगार..ओरिसा..बिहार..यु.पी.. औषध दुकाने...जैन होटेल्स..पंजाबी..शेट्टी.. वाचमन..यु.पी..बिहारी..ओरिसा.. किराणा माल..मारवादी..जैन..\ सिनेमा व्यवसाय..मराठी अभावानेच. मोटार..स्कूटर रिपेअर...शेट्टी..बिहारी यु.पी मुसलमान.. पानवाले.पाणीपुरी...यु.पी भैया. हजामत...यु.पी बिहारी. कारागीर.. फर्निचर..राजस्थानी कारागीर.. मराठी माणुस काय करतो? वादा वादी..मिसळ पाव..तु.तु.मै.मै..

राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी मी भारतात होतो व बर्‍याचदा दूरचित्रवाणीवर त्यांच्याबद्दलच्या बातम्या पहायला मिळाल्या. त्यातील एक गोष्ट कांहींशी खटकली, ती,म्हणजे अजून तसे फारसे कर्तृत्व दाखविले नसतानासुद्धा त्यांचा काँग्रेस पक्षात जोरदार उदो-उदो सुरू झाला होता! सोनिया गांधींना खुष करण्यासाठीच ते असावे. भारतातून बाहेर पडल्यावर मात्र त्यांची राजकीय वाटचाल पहायची तितकी संधी मिळालेली नाहीं. 'उत्तर प्रदेश' राज्यातील निवडणुकांत त्यांची कामगिरी कशी होती? कांहीं वृत्तात त्यांनी काँग्रेसची 'लाट' आणली असे वाचले पण नक्की आकडे काय दाखवितात ते वाचायला आवडेल. बिहारमध्ये त्यांची कामगिरी कशी होते हे आता कळेलच.