आजचे राजपुत्र व उद्याचे पंतप्रधान राहुलजी हे भारतीय संस्कृतीच्या गहन अभ्यासाकरता प्रसिद्ध आहेत. पंतप्रधानांसारखे वरिष्ट लोकही त्यांचे विचार ऐकून त्यातून बरेच काही शिकतात. सामान्यांची तर बातच सोडा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6788805.cms
तर ते नुकतेच असे बरळले आय मीन गरजले की महाराष्ट्र व पंजाबसारख्या राज्यांचा जो विकास झालाय तो केवळ कष्टाळू बिहारी लोकांमुळेच.
राहुलजींसारखे प्रकांड विद्वान विचार केल्याशिवाय असे म्हणणार नाहीत. पण महाराष्ट्राचा विकास झालाय ही माहिती मला नवीनच आहे. आणि तो बिहारी कष्टकर्यांच्या अथक प्रयत्नाने झालाय हे आणखी नवीन. पण त्यांनी सांगितले म्हणजे खरेच असणार. मला त्यांच्या बोलण्याच्या सत्यतेविषयी तिळमात्र शंका नाही.
महाराष्ट्रातील काही कोत्या विचारांची मंडळी आजकाल मराठी मराठी करून टुईटुई करत असतात त्यांचा महाराष्ट्राचा विकास थांबावा असा काही कावा आहे का? कष्टाळू बिहारी लोकांचा लोंढा थांबवून आपल्याच पायावर कुर्हाड का मारत आहेत हे लोक?
निदान राहुलजींसारख्या अभ्यासू, व्यासंगी नेत्याचा तरी विचार करावा?
वाचने
29195
प्रतिक्रिया
146
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोनॉपॉली
>>लोकशाहीत लोकांनी निवडलेले,
In reply to मोनॉपॉली by हुप्प्या
संताजी-धनाजी आणि न्यूनगंड
In reply to मोनॉपॉली by हुप्प्या
तसे म्हणायचे तर...
In reply to संताजी-धनाजी आणि न्यूनगंड by सुनील
काय चुकिचे आहे? सरकारी उच्च
बिहारमध्ये त्यांची कामगिरी कशी होते हे आता कळेलच.