अमेरीकेत आल्यावर मला खटकलेली एक गोष्ट म्हणजे भारताचा "इण्डिया" म्हणून होणारा उल्लेख. अस्खलित मराठी बोलणार्या मराठी बान्धवान्कडून भारताचा "इण्डिया" असा होणारा उल्लेख पाहून थोडे दु:ख व्हायचे!. आता जरा सवय झालेय, पण या कौलाच्या निमित्ताने मि.पा. करान्चे मत आजमावण्याचा प्रयत्न!
बाकी माकडाच्या हाती "कौल" असे म्हणायला हरकत नाही!
हॅ हॅ हॅ
म्हणजे कोण कोण अमेरिकेत आहेत हे ह्या धाग्यावरुन कळणार तर.. ;)
असो,
भारतात सुद्धा बरेच भारतीय ईंडीया म्हणतात, काही मराठी लोकांना तर तर पब्लीक मधे मराठी बोलायची सुद्धा लाज वाटते. विंग्रजी किंवा हिंदी मधे बोलतात.
अवांतरः यावर मी हा धागा टाकला होता.
१०० नक्की.. अभिनंदन :)
त्यांनी काहीही म्हणायचे नाही. त्यांनी फेअर and लव्हली विकत घ्यायचे आणि आपला रंग उजळतो का ते पाहायचे. उजळला तर काही आर्य निदान आपल्याला हिणवायला काळून्द्रा/द्री/द्रे नाही म्हणणार अशी अपेक्षा करायची.
(ह.घ्या. जड घेतलेत तरी काय करणार म्हणा मी)
इंग्रजीत बोलत असाल तर इंडिया म्हटल तर त्यात वावग काय ते कळल नाही.
I am going to Bharat next monnth on vacation.
हे म्हणजे दाताखाली खडा आल्या सारख नाही वाटत का?
मेहेंदळेकाका मी कुठेच म्हटल नाही की 'भारत' वापरु नका. मराठी वा इतर भारतीय भाषांतुन जर संवाद साधला जात असेल तर खुशाल वापराव भारत.
फक्त नको तिथे नको तो अट्टाहास नको एवढच म्हणण आहे :)
पण तुम्ही जे उदाहरण दिल आहेत ते सर्रास वापरल जात.
ईतर म्हणजे अनेक जण येतात जसे-
अमेरिकेतल्या मैत्रिणींशी बोलताना- इंडिया
कचरेवाला,पोस्टमन् वगैरे आय मीन जरा वेगळा क्लास असेल तर भारत.
समोरचा जरा जास्तच नॅशनॅलिस्टिक असेल तर हिंदुस्तान म्हणते.
आम्हाला शाळेत शिकवणर्या बाई भेटल्या तर भारतवर्ष.
(बदलती) प्रिया
>>ईतर म्हणजे अनेक जण येतात जसे-
अच्छा. म्हणजे मुंबई साठी असे का?
मुंबईतल्या मैत्रिणींशी बोलताना -बाँबे.
कामवाली, भाजीवले वगैरे आय मीन जरा वेगळा क्लास असेल तर मुंबई.
समोरचा मुळचा मुंबईचा असेल तर बंबई.
आणि मुंबईस्टीक बाई भेटल्या तर मुंबापुरी.
भारतियांशी भारत असेच संबोधतो. बाकी मिभो म्हणत असल्याप्रमाणे मुंबईच्या बाबतीत मी करतो. अमेरिकन्सना "मुंबई दॅट वॉज कॉल्ड अॅज बाँबे" असे म्हणतो खरे पण हल्ली बहुतेकांना "मुंबई" माहीत असल्याचे सुखद अनुभव येतात...
मी कोणत्या भाषेत बोलतो त्यावर ते अवलंबून आहे...
मराठीत संभाषण करत असेन तर "भारत" म्हणतो...
इंग्रजीत संभाषण करत असेन तर "इंडिया" म्हणतो...
(मिभो /विकास, खाली स्वतंत्र अभिप्राय द्यायची सोय उरली नसल्याने रांग मोडली, क्षमस्व!)
ह्यांच्या ह्या अरबस्तानात आम्हाला काय काय ऐकाव लागत
टॅक्सी वाल्याने विचारल कि "आप क्या हिंदुस्थान मुलूक से हो?" म्हणजे हा पाकिस्तानी आहे हे नक्कीए.
पण आपण लै भारीये आपण "हिंदुस्थान"च म्हणतो.
एकदा भारत म्हणुन पचतावलो हो..... (अर्थात नवा नवाच भरताच्या बाहेर पडलो होतो)
मी: "Angelina I am going home back to Bharat for a week"
(Jolie नव्हे. नाहीतर मला माहिति आहे तुमच्या डोळ्यांसमोर तीच दिसलि ना??)
Angelinaचे डोळे almost पांढरे झालेले आनि तीने असा प्रश्न विचारला,
Angelina : Prasad why you wanna live/Stay with Bharat ???? when you have your own home?
हे ऐकलल्यावर आता माझे डोळे पांढरे पडायचि वे आलि होती
जय हिन्द
जयमहाराष्त्र
मी सर्रास इंडीया म्हणते.
तेवढच नाही तर बाहेर कुठे माझ्या नवर्याचे नाव जर मराठीत सांगत बसले तर त्यांच्या जिभेला गाठी पडतील.
नाव आणि आडनाव इथे जसे त्यांना कळेल तसेच सांगते. माझं खरं नाव तर ते कधीच म्हणू शकणार नाहीत.
मुलं बाहेर (प्लेग्राऊंडवर) खेळत असताना त्यांना राजा, सोन्या असलं काही चालत नाही.
म्हटलं तर येउन कानात सांगतात, "तू असं नको म्हणूस. एक तर सरळ नावानं हाक मार नाहितर हनी, स्वीटी, पम्पकिन असं काहीतरी म्हण!" मला त्यात काही वावगं वाटत नाही. वाईटही वाटत नाही. जोपर्यंत शिव्या नाहीत तोपर्यंत ठिक आहे. अर्थात त्याही दिल्या तरच मर्दुमकी गाजवल्यासारखी वाटते काही लोकांना ती गोष्ट ज्याच्या त्याच्यावर असलेल्या संस्कारांची!
ह्या संदर्भात देश हा शब्द वापरलेला ऐकला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीतही. खालील उदाहरणे
मी "समर"मधे देशात चाललोय.
मै अभी अभी देस जाके आया.
आय अॅम गोइंग टू "देस" फॉर अ वीक. कम्पनी वर्क.
अमेरिकेतील भारतीय लोक स्वत:ला देशी/देसी म्हणताना ऐकले आहे. एकदोन पाकिस्तानीही स्वतःला देशी म्हणवतात असे आढळले. एकंदरीत अनौपचारिक बोलण्यात हा शब्द रूळला आहे असे वाटते.
ओळखीच्या मित्रांत, भारतिय संगतीत असतांना, भारत म्हणून उल्लेख करतो.
इतर संगतीत इंडिया म्हणतो.
पण शब्दांचे काय - भावना पोचल्या म्हणजे झाले.
हां .. पण पुणेकरांशी बोलतांना लकडी पुलाच्या अलिकडे की पलिकडे ते सांगावे लागते.
प्रतिक्रिया
भूमिका
हॅ हॅ हॅम्हणजे कोण कोण
In reply to भूमिका by आनन्दा
हाहाहा.. मला आपलं भारत असंच
In reply to हॅ हॅ हॅम्हणजे कोण कोण by मराठमोळा
आर्य वर्त
In reply to हाहाहा.. मला आपलं भारत असंच by राघव
मग द्रविड लोकांनी काय
In reply to आर्य वर्त by अविनाशकुलकर्णी
त्यांनी काहीही म्हणायचे नाही.
In reply to मग द्रविड लोकांनी काय by शिल्पा ब
इंग्रजीत बोलत असाल तर इंडिया
In reply to भूमिका by आनन्दा
माझे बॉ असे मत आहे की
In reply to इंग्रजीत बोलत असाल तर इंडिया by गणपा
"मी पुढच्या महिन्यात इंडियाला
In reply to इंग्रजीत बोलत असाल तर इंडिया by गणपा
मेहेंदळेकाका मी कुठेच म्हटल
In reply to "मी पुढच्या महिन्यात इंडियाला by विश्वनाथ मेहेंदळे
तेच तर
In reply to मेहेंदळेकाका मी कुठेच म्हटल by गणपा
बरं मगं? कौलं काढुन काय
In reply to तेच तर by आनन्दा
मी
>>ईतर म्हणजे अनेक जण येतात
In reply to मी by प्रिया देशपांडे
भारतीयांशी बोलताना भारत
इंडिया दॅट इज भारत
In reply to भारतीयांशी बोलताना भारत by नगरीनिरंजन
असेच
In reply to इंडिया दॅट इज भारत by मिसळभोक्ता
इतर भारतीयांशी
In reply to इंडिया दॅट इज भारत by मिसळभोक्ता
"हिंदुस्थान"
मी सर्रास इंडीया
इतर भारतीयांशी भारताबद्दल बोलताना...
In reply to मी सर्रास इंडीया by रेवती
मला आपले "महा(ग)सत्ता"
देश
सापेक्ष आहे
भारताला - भारत पुण्याला -
थोडी मला पण
चुकीची जागा
In reply to थोडी मला पण by आनन्दा