Skip to main content

मि. पा. कर माय्बाप, बालकाचा नमस्कार..

लेखक आनन्दा
रविवार, 24/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मि. पा. कर माय्बाप, सध्या "नवीन"लेखकांची बरीच चलती आहे म्हणून म्हटले की आपण पण वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत... मी पण मि. पा. वर नवीनच आहे.सदस्यत्वसाठी विनंती करून बरेच दिवस झाले, पण स्वीकॄतीचा निरोप आला नव्हता. एक दिवस अचानक कळले की आता आपण पण मि.पा वर क्रियाशील सदस्य बनू शकतो म्हणून! लिहिण्याचा तसा मला काही अनुभव नाही. मी अजुन कोठेही लिहत नाही. १०वीत निबन्धासाठी केलेल्या कविता सोडल्यास मला कवितांचा पण काही अनुभव नाही. प्रयत्न करायाचा सध्या काही विचार पण नाही. पण मि. पा. मला आवडते हे सांगण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाला लागलेला वेळ पाहता मी परत प्रयत्न करेन असे पण नाही. ;) (सध्या धरले तर चावते, सोडले तर पळते अशी अवस्था झालेय :) ) असो.. मि. पा. वर मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे मि. पा. सदस्यांचा रोकठोकपणा! आपली मते माण्डवीत.. सध्या मी शिकार होणार हे गृहीत धरूनच आहे. तेव्हा व्हा सुरु!!! आपला, आनन्दा जाता जाता -- 'माय्बाप' मुद्दाम चुकवलाय, मला असाच आवडतो!

वाचने 5346
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

सध्या चालू आसलेल्या हॅलोवीन बद्दल मि.पा. करान्चे मत आजमावयाचा प्रयत्न आहे. आजच एक यौवना (अर्थात आन्ग्लभाषीय) एका भुताच्या कवटीकडे बघून "अय्या किती गोड (!)" (अर्थात आन्ग्लभाषेत) म्हणाली, अणि मला फक्त उलटीच यायची शिल्लक होती!

In reply to by शिल्पा ब

मी अमेरीकेत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न कोणितरी पकडेलच (?) असे वाटले होते... मि पा वर लिहावयास नवीन असलो तरी वाचक म्हणून गेले ९ महिने आहे मी! इथल्या मसालेदार प्रतिसादंमुळेच मी लिहिण्यासाठी मि. पा. ची निवड केली आहे!

In reply to by आनन्दा

सध्या चालू आसलेल्या हॅलोवीन बद्दल मि.पा. करान्चे मत आजमावयाचा प्रयत्न आहे. आजच एक यौवना (अर्थात आन्ग्लभाषीय) एका भुताच्या कवटीकडे बघून "अय्या किती गोड (!)" (अर्थात आन्ग्लभाषेत) म्हणाली, अणि मला फक्त उलटीच यायची शिल्लक होती! >>>> खीक करून हसायला आल , मस्त किस्सा आनंदाचे आनंदाने स्वागत !!

In reply to by आनन्दा

म्हणजे "बाय डिफॉल्ट सहमत" याचाच अर्थ, सुहास जे काय म्हणेल त्याच्याशी मी सहमत आहे. चाय्लेंज कसलं कप्पाळाचं!

In reply to by आनन्दा

अरे व्वा नवीन सदस्य ...इतके शुद्ध लिखाण आणि मुद्दाम चुकवलेला शब्द चक्क चुचुवाणीत. हम्म..... तुमचे मागच्या जन्मीच्या आयडीचे नाव || **स || होते का हो?

आम्हा गावठी लोकांना हॅलोविनची माहिती देणारा लेख लिहा. :) कायतरी भोपळ्याचा सण असतोय असे ऐकले आहे.

In reply to by pramanik

आपणही नवीनतम असल्या कारणाने धागा काढून विचारते झाले आहात...यांनी कोणास विचारावे असे आपले म्हणणे आहे ?

In reply to by शिल्पा ब

मी मला विचारावे असे म्हटले का? ईतरांस विचारावे असे बोललो. आपले लेखक म्हणुन नाव बघितले नाही,सबब आपण स्वःता लेख न लिहता असे प्रतिसाद देणे सदा योग्य नाही.

In reply to by pramanik

आपण थोडा अजून अभ्यास केला तर कोणी काय लिहिलेय ते समजेल...आम्ही काय प्रतिसाद द्यावा ते ठरविण्यास स्वतःच समर्थ आहोत...काळजी नसावी.

In reply to by शिल्पा ब

का हो नव्या लोकांचा छळ करताय हो शिल्पाताई? नवे लोक आहेत ( म्हणजे असं वाटतंय तरी!) आपण जरा समजून घेऊ या!!!

अरे वा! मि.पा हॉस्टेलवर नवीन मेंबर्स आले वाटते.बरेच सिनिअर्स त्यांच्या रूमबाहेर घोटाळताना दिसत आहेत. - योगेश (C Block,Room No 62.मि.पा हॉस्टेल)

अमेरिकेत काय काय नव्या नव्या गोष्टी तयार होतात बुवा. आतापर्यंत माणसाच्या कवट्या असायच्या. आता तर ते भुताच्या सुध्दा कवट्या तयार करायला लागले. भारीच उद्योगी लोक अमेरिकेतले.

एक वरचा प्रतिसाद सोडला तर बाकी सर्व भुते दिसतात. ;) आम्हाला भुताची कवटी कशी दिसते तेच माहित नाही. माणसाची कवटी पाहिली आहे.

आनंदा,. खरोखरचा नविन आयडी असेल तर मनापासून स्वागत. आपल्या ह्या लेखातूनच आपण 'क्लब टवाळ'चे आजीवन सदस्य दिसता आहात. :) आणि 'नवी बाटली जुनी दारु' असाल तर....................... ये पब्लिक है बाबू....ह्यांचा काही भरवसा नाही. :)

In reply to by ईन्टरफेल

हां आता माझे पाळण्यातले नाव आनन्दा नाही, पण ते फार वेगळे नाही, "आनन्द" आहे ;) आता मि.पा. गेले ९ महिने वाचत असल्यामुळे भाषा मि.पा. करांशी पुरेपूर जुळते, पण त्यात माझा काय दोष?