Skip to main content

शेंगदाण्याची चटणी

गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ कांदे मध्यम आकराचे १ टोमॅटो २ चमचे आलं-लसुण पेस्ट कढिपत्ता जीरं मोहोरि तेल हगद धणेपूड लाल तिखट शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर पाणी क्रुती- कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात जीरं ,मोहोरि घालावी मोहोरी तडतड्ली कि मग त्यात कढिपत्ता घालावा.त्यानंतर कांदा लालसर परतुन घ्यावा तसेच आलं-लसुण पेस्ट घालवी त्यातच टोमॅटो घालुन परतावे नंतर त्यात धणेपूड ,हळद व लाल तिखट घालावे व परतुन घ्यावे.आता त्यातच शेंगदण्याचा जाड्सर कूट घालुन खमंग परतुन घ्यावे व त्यात गरम पाणी घालावे ,चविनुसार मीठ घालावे व चान्गली १-२ उकळी येउ द्यावी ,शेवटी कोथिंबीरिने सजवावे.Chatani

वाचने 7745
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

खल्लास फोटो . सजावट तर अशी केली आहे कि बस्स.त्या कांद्यांची "ही " ( योग्य शब्द सुचत नाही ) पाहून "ऑलिंपिक" चटणी म्हणावेसे वाटते आहे.

In reply to by मराठमोळा

मराठ्मोळा तु खान्देशी आहेस हे तुझ्या प्रतिक्रियेवरुन ओळखले आहे त्यामुळे हि चट्णी तुझ्या ओळखिचीच असनार आहे

वा वा, छान छान! अवांतर : कैरी कच्चीच असते, नाही का? मग नाव असं का म्हणे? हे म्हणजे पाण्याची वॉटरबॅग्/बॉटल असं वाटलं.

In reply to by अनामिक

कैरी पिकलेली सुद्धा असते ,पिकलेल्या कैरीला शाक असे म्हणतात्.ती आंबट -गोड असते तर कच्ची कैरी फक्त आंबट असते .

कांदे आख्खेच टाकायचे की काय?

In reply to by कुंदन

फोटोवरुनच अंदाज लावा कांदे अख्खे घालायचे की बारिक चिरुन

पदार्थांचं प्रमाण काय आहे? आमच्याकडे कमी कूट आणि जास्त टोमॅटो घालून टोमॅटोची चटणी करतात म्हणून विचारलं. दाण्याचा कूट किती घ्यायचा एक टोमॅटो आणि दोन कांद्यांसाठी?

ही चटणी मला ब्रेडटोस्ट सोबत खायला आवडते..मस्त लागते.... बाकी शेंगा चटणी म्हटल्यावर आमच्यासारख्या सोलापुरकरांच्या डोळ्यासमोर हे फोटू येत नाहीत... ;)

मस्तच...........आज पहिल्यांदाच वाचते आहे अशी चटणी.

एकदम भारी !! बघुनच जिभ वळ्वळ्ली

आज पहिल्यांदाच वाचते आहे अशी चटणी.>>>>> ही चटणी नाही. याला "झिर्क" म्हणतात. शेंगदाण्याची चटणी कोरडी असते. चुभुदेघे.