✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लग्न

आ — आनंदयात्री, Wed, 05/21/2008 - 14:25

प्रतिक्रिया द्या
7900 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
पद्मश्री चित्रे Wed, 05/21/2008 - 14:35 नवीन

!

झोकून देऊ हे शरीर मग उंच कड्यावरुन एखाद्या सोपवून देऊ सगळे काही चिरंतन अविनाशी मृत्यूला- हे कशासाठी बुवा? छे .. छे. शेवट असा दु:खांत नको हो..
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 05/21/2008 - 14:42 नवीन

गोठलेले असतील शब्द

असच एखाद्या दिवशी असेल धो धो पाउस आणी तू न मी असुत सिंहगडावर भिजलेले असुत चिंब आपण आणी गोठलेले असतील शब्द सुद्धा मग वारा धरेल अंतरपाट आपला अन आकाश करेल तुझे कन्यादान तिथेच होईल सप्तपदी आपली अन गारांच्या असतील अक्षता
मस्त... पहिली २ कडवी खूपच छान.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 05/21/2008 - 14:44 नवीन

>>छे .. छे.

>>छे .. छे. शेवट असा दु:खांत नको हो.. सहमत बाकी छान
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 05/21/2008 - 14:45 नवीन

आवडली!

मग वारा धरेल अंतरपाट आपला अन आकाश करेल तुझे कन्यादान तिथेच होईल सप्तपदी आपली अन गारांच्या असतील अक्षता
छानच कल्पना आहे!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/21/2008 - 14:53 नवीन

मग वारा

मग वारा धरेल अंतरपाट आपला अन आकाश करेल तुझे कन्यादान तिथेच होईल सप्तपदी आपली अन गारांच्या असतील अक्षता
वा! काय मस्त कल्पना रे!!!!! पण
झोकून देऊ हे शरीर मग उंच कड्यावरुन एखाद्या सोपवून देऊ सगळे काही चिरंतन अविनाशी मृत्यूला
हे असं का रे बाबा? अरे...लढ ना बिन्धास्त! साला जीव बीव देऊन का कुठं प्रेमं सफल होतात? वेळ पडली तर साला आडवं येणार्‍यांची डोकी सुध्दा फोडायची तयारी हवी.... क्काय? दे धडक बेधडक...कसें ? बाकी, ही कविता वाचून सुखविंदरसिंगच्या "नशा ही नशा है" गाण्याच्या व्हीडिओची आठवण झाली :) बहुतेक आरती छाब्रिया असावी त्यात.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 15:06 नवीन

स्वर्ग....

मग वारा धरेल अंतरपाट आपला अन आकाश करेल तुझे कन्यादान तिथेच होईल सप्तपदी आपली अन गारांच्या असतील अक्षता ह्या नंतर तर खर्राखुर्रा स्वर्ग असतो रे राजा....! झोकून देऊ हे शरीर मग उंच कड्यावरुन एखाद्या सोपवून देऊ सगळे काही चिरंतन अविनाशी मृत्यूला भद्र कार्यात ही अभद्र भाषा का? नवीन सृष्टी निर्माण करण्याची ताकद असताना 'अविनाशी मृत्यूला' कवटाळण्याचा विनाशकारी अविचार, मनाचा दुबळेपणा दर्शवतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/21/2008 - 15:39 नवीन

छान कविता !!!

सुरुवातीचे दोन्ही कडवे चांगले आहेत त्यातील कल्पना एकदम जबरदस्त आहेत. फक्त, शेवटच्या चार ओळी नै आवडल्या राव !!! झोकून देऊ हे शरीर मग उंच कड्यावरुन एखाद्या सोपवून देऊ सगळे काही चिरंतन अविनाशी मृत्यूला च्या ऐवजी.... ढकलून देईन तुझे शरीर मग उंच कड्यावरुन एखाद्या सोपवून देईन सगळे काही चिरंतन अविनाशी मृत्यूला. असे करता येईल का ;) पण प्रेमात असे नाही करता येत, बरोबर ना ?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 16:19 नवीन

ढकलून देईन तुझे शरीर मग

अर्‍या बाप :O .. काय बेकार जोक करता राव .. कंदिल्या चावला की काय तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/22/2008 - 08:13 नवीन

आमची कल्पना

अर्‍या बाप .. काय बेकार जोक करता राव .. कंदिल्या चावला की काय तुम्हाला ? अशा कल्पना सुचायला 'कंदिल्याच' चावायला पाहिजे असं काही नाही. शेवटच्या चार ओळी वाचून कोणत्याही 'मठ्ठ' माणसाच्या प्रतिभेला असे धुमारे फुटू शकतात. वार्‍याचा अंतरपाट, आकाशाने कन्यादान करणे, गारांच्या अक्षता आणि तेव्हाच आमच्या मनात अशी कल्पना आली की या वधूने लग्नापूर्वी तिच्या अन्य एका प्रियकराचा चहात विषारी शंकरपाळे टाकून खून केलेला असतो. त्याचा बदला म्हणुन सिंहगडावरुन तिला एकटीला ढकलून द्यायच्या चार ओळी आम्हाला सुचल्या,सुचवाव्या वाटल्या. असो, कविता छान आहे. असे म्हणुन आम्ही थांबायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 17:08 नवीन

लै भारी!

मग वारा धरेल अंतरपाट आपला अन आकाश करेल तुझे कन्यादान तिथेच होईल सप्तपदी आपली अन गारांच्या असतील अक्षता ह्या ओळी लै भारी! तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 05/21/2008 - 17:18 नवीन

क्लास

पण दु:खांतासाठी काही वेगळे रूपक आवडले असते. कड्याचा उंबरठा ओलांडून आयुष्याचे माप सांडू वगैरे असे काही...
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/21/2008 - 17:33 नवीन

छान

मस्त कल्पना, पण शेवट थोडासा जीवा लागे.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/21/2008 - 17:42 नवीन

छ्या

मी विषय वाचून काहीतरी झक्कास असणार म्हणून वाचलं पहिली दोन कडवी एकदम सुंदर्..मग काय झालं एकदम? मधेच आंबोळीची मयताची गोष्ट वगैरे वाचलीत का तिसरं कडवं लिहीण्याआधी?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 05/21/2008 - 20:20 नवीन

वावा!

वार्‍याचा अंतरपाट, आकाशाने कन्यादान करणे, अक्षता - सगळ्या कल्पना आवडल्या. धनंजयरावांच्या सूचनेचा नक्की विचार करा. कविता छान वाटली. आवडली. कवितेत गती नाही, असे वाटत नाही :) (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अनिता गुरुवार, 05/22/2008 - 04:56 नवीन

पहिली दोन कडवी एकदम सुंदर्

<झोकून देऊ हे शरीर मग <उंच कड्यावरुन एखाद्या <सोपवून देऊ सगळे काही <चिरंतन अविनाशी मृत्यूला- हे काही आवडले नाही तेवधे. (अवातरः उच्च बिदुवर असताना असे का वाटावे? अती अवातरः म्हणुन मराथि माणूस मागे पडतो आहे काय? ह. घ्या.) हा लेकाचा " ढ " कसा लिहावा कोणी सागेल का? <पहिली दोन कडवी एकदम सुंदर् असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/22/2008 - 07:32 नवीन

झोकून देऊ

झोकून देऊ हे शरीर मग उंच कड्यावरुन एखाद्या सोपवून देऊ सगळे काही चिरंतन अविनाशी मृत्यूला का बरं?? :( पहिली २ कडवी आवडली...
  • Log in or register to post comments
फ
फटू गुरुवार, 05/22/2008 - 08:48 नवीन

काय राव...

तुमच्या कवितेच्या नायकाला मानलं पाहिजे... चांगला लग्नानंतर सुखानं संसार करायचा सोडून जीव देण्याची अवदसा सुचली त्याला... मग वारा धरेल अंतरपाट आपला अन आकाश करेल तुझे कन्यादान तिथेच होईल सप्तपदी आपली अन गारांच्या असतील अक्षता हे बाकी अगदी छान आहे... कल्पना आवडली... सालं कुणी पोरगी आपल्या प्रेमात बिमात पडली तर आपल्याला तिच्याशी या पद्धतीने लग्न करायला आवडेल... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 05/22/2008 - 09:45 नवीन

सहमत

सर्वच वाचकांना निराशावादी शेवट आवडलेला नाही. विषेशतः येवढ्या प्रबळ दोन कड्व्यांनंतर लगेच अमंगळ भाषा कशाला? वाचकंशी मी पूर्णपणे सहमत. आनंदयात्री आपल्या नावाला जागून आनंद यात्रेने शेवट करतील काय? ------ आनंदाचे डोही आनंद तरंग--------
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/22/2008 - 17:47 नवीन

सर्वांनी

दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. बाकी बर्‍याच सुहृदांनी शेवट न आवडल्याचे कळवले आहे, त्यात कुठेतरी आपुलकीची भावना जाणवली, धन्यवाद. धनुदादा अन बेला ने लग्नाचे विधी अन निसर्गाचे रुपक याची सांगड शेवटच्या कडव्यात अजुन छान जमु शकते असे सुचवले आहे, नंतर कधी परत प्रयत्न केला तर या गोष्टींचा नक्की विचार करिन. -आनंदयात्री.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा