Skip to main content

तिचं स्वप्न

तिचं स्वप्न

Published on 23/10/2010 - 10:43 प्रकाशित मुखपृष्ठ
सुझान बॉईल ह्या गायिकेचा हा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षांसमोर गाण्याचा हा पहिलाच प्रसंग. रीयॅलटी शोमध्ये जिथं ग्लॅमर हा सर्वात मोठा भाग असतो तिथ ही खेडवळ दिसणारी स्त्री ऑडिशनसाठी आली तेंव्हा तिच हसू झाला. पण ज्याक्षणी तीने गायला सुरुवात केली तेंव्हा तो कुस्चितपणा कौतुकात बदलल. आपल्या स्वप्नांना कधी ही सोडू नये अशी प्रेरणा देनारी ही विडिओ क्लिप ( चित्र फीत अस लिहिनार होतो पण परा भाऊ.ची ईग्रचीशी नाळ तुटू नये म्हणून ही खट्पट्! ;) )
लेखनप्रकार

याद्या 3175
प्रतिक्रिया 14

In reply to by रन्गराव

पाहिली, पाहिली!!! मस्त, मस्त, फॅन्टॅस्टिक!!! जबाब नही, सूपर्ब!!!! थोडं अवांतर होईल कदाचित पण एक आठवण सांगतो..... आम्ही इथे युनिव्हर्सिटीत शिकत असतांना एक गायनाचा जलसा झाला होता, त्याला गेलो होतो... तिथे एक तैवानी गायक पुढे आला... तो ऑपरा गाणार म्हणुन अनाउन्स केलं गेलं... आता हा फाटक्या अंगाचा चिनी काय ऑपरा गाणार म्हणून सगळं सभाग्रूह माफक हसलं.... पण त्याने स्वर लावला मात्र.... त्याचा वादळासारखा तो खर्ज... अजूनही आठवला की अंगावर काटा उभा राहतो माझ्या... या सुझनच्या गाण्याने तीच आठवण करून दिली... चित्रफितीबद्दल अनेक धन्यवाद!!!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

अगदी हेच म्हणायच आहे. बाकी सार्‍यांपेक्षा मला सायमन च्या डोळ्यातली चमक आवडली. आय लव्ह हीम.

गाण कळल नाहि पण आवाज मात्र फर आवडला

रन्गराव.....तुम्हाला माझ्याकडून एक फुल्ल मग नेसकॉफी !!! superb, fantastic, incredible, amazing.....!!!!!!!| सर्व विशेषणे फिकी पाडली सुझानबाईंनी. "दिसते तसे नसे...." याचा अर्थ कुणीतरी सोदाहरण द्या असे सांगितले तर त्याला ही चित्रफित दाखवावी. तेथील परीक्षक आणि ऑडियन्स तर मॅड झालाच....पण मी पागल झाल्यावर घरातील लोकांना एकत्र बोलावून हे सुझानचा परफॉर्मन्स दाखविल्यानंतर अभावितपणे सर्वांनी, जणू काय त्या थिएटरमध्येच असल्यासारखे, जोरदार टाळ्या वाजविल्या. खूप खूप धन्यवाद हा आनंद दिल्याबद्दल ! इन्द्रा