Skip to main content

महाराष्ट्राचा विकास कष्टाळू बिहारी लोकांमुळेच : राजपुत्र राहुलजी

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 21/10/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे राजपुत्र व उद्याचे पंतप्रधान राहुलजी हे भारतीय संस्कृतीच्या गहन अभ्यासाकरता प्रसिद्ध आहेत. पंतप्रधानांसारखे वरिष्ट लोकही त्यांचे विचार ऐकून त्यातून बरेच काही शिकतात. सामान्यांची तर बातच सोडा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6788805.cms तर ते नुकतेच असे बरळले आय मीन गरजले की महाराष्ट्र व पंजाबसारख्या राज्यांचा जो विकास झालाय तो केवळ कष्टाळू बिहारी लोकांमुळेच. राहुलजींसारखे प्रकांड विद्वान विचार केल्याशिवाय असे म्हणणार नाहीत. पण महाराष्ट्राचा विकास झालाय ही माहिती मला नवीनच आहे. आणि तो बिहारी कष्टकर्‍यांच्या अथक प्रयत्नाने झालाय हे आणखी नवीन. पण त्यांनी सांगितले म्हणजे खरेच असणार. मला त्यांच्या बोलण्याच्या सत्यतेविषयी तिळमात्र शंका नाही. महाराष्ट्रातील काही कोत्या विचारांची मंडळी आजकाल मराठी मराठी करून टुईटुई करत असतात त्यांचा महाराष्ट्राचा विकास थांबावा असा काही कावा आहे का? कष्टाळू बिहारी लोकांचा लोंढा थांबवून आपल्याच पायावर कुर्‍हाड का मारत आहेत हे लोक? निदान राहुलजींसारख्या अभ्यासू, व्यासंगी नेत्याचा तरी विचार करावा?

वाचने 29195
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हुप्प्या यांच्याशी पूर्ण आणि पुपे यांच्याशी अंशतः सहमत. उपक्रमावरील thanthanpal तुम्हीच का अशी शंका येऊ लागली आहे. http://mr.upakram.org/node/2622 माननीय उपक्रम सदस्य thanthanpal यांचे लेखन : http://mr.upakram.org/tracker/2347

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>एखादे एतद्देशीय घराणे चालले असते काश्मीर हा परदेश आहे असे पुपे यांचे मत वाचून काळेकाकांना काय वाटेल हे आठवून डोळे पाणावले. :( @गांधीवादी - ठणठणपाळ हे हुप्प्या नसणार. भाषेची अशुद्धता नाही. ठणठणपाळ यांचे भारत वि इंडिया हे गाणे हुप्प्याजींच्या लेखनात कधी दिसले नाही.

In reply to by नितिन थत्ते

भाषेची अशुद्धता काय, मुद्द्मून सुधा तयार कर्ता येती. प्रत्येक प्लॅटफॉर्म वर वेगवेगळेच गाणे गावे लागते, तरच बिझनेस होतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हे सगळे नतद्र्ष्ट नेहरूंचेच प्रताप आहेत
पु पे सर तुम्ही नेहरूंच्या एडविना प्रतापबाद्दल बोलताय का ? नेहरूंनि शिवरायांबद्दल गरळ ओकल्यापासून मला तर त्यांचा किंचितही आदर वाटत नाही !

In reply to by हुप्प्या

हुप्प्याजी तुम्ही इथे धाग्यांवर धागे काढून काही होणार आहे का? त्यापेक्षा दुर्लक्ष करावे. आता राजपुत्रांचे म्हणाल तर मातोश्रीवरचे युवराज सुद्धा असेच तारे तोडत असतात. त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो की नाही? पुढे नवे तलवारधारी राजपुत्र सुद्धा तारे तोडतील तेव्हापण आपण दुर्लक्ष करू. हो की नाही? "परमपूज्य राहुलजी हे निव्वळ आपल्या कर्तृत्वाने पुढे आले आहेत. अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे तळागाळातून आपली कारकीर्द सुरु करुन निव्वळ कर्तबगारीवर भावी पंतप्रधान या पदी पोचले आहेत" असे मिसळपाववर तरी कोणाच्या स्वप्नात आले असेल असे मला वाटत नाही. तसे मिपाकरांना वाटते अशी स्वतःचीच कल्पना करून घेऊन आपण त्रागा कशाला करून घेता ? भारतात सुद्धा ते कर्तृत्वाने पुढे आले आहेत असे कोणाला वाटत नसेल. आणीबाणीनंतरच्या जनता सरकारच्या काळात इंदिरा गांधीना नामोहरम करण्यासाठी चौकशी आयोग, खटले वगैरे चालू झाले. पण "त्यामुळे इंदिरा गांधींनाच प्रसिद्धी मिळाली" असे तेव्हाच्या वृत्तपत्रांचे म्हणणे होते. तसे काही तुमच्या सततच्या धाग्यांमुळे मिपावर राहुल गांधीबाबत व्हायला नको. ;) तुम्ही "परमपूज्य राहुलजी" हे उपरोधाने लिहिले आहे असे अज्ञ मिपाकरांना कदाचित कळणार नाही. :)

In reply to by नितिन थत्ते

मातोश्रीवरचे थोरले आणि धाकले युवराज हेही भारतीय जनमानसातील राजेशाहीचेच प्रतीक आहे. पण हे संस्थान आता मोडकळीला आलेले आहे. थोरल्या राजांच्या माघारी ह्या संस्थानाची रया पार जाणार आहे हे सांगायला फार जाण असायची गरज नाही. त्यामुळे त्याविषयी राग असला तरी धोका कमी. ह्या घराण्याला सत्ता मिळायची शक्यता नगण्य. फारतर दोनचार शहरे, डझनभर गावे इतकेच. गांधी घराण्याचे तसे नाही. आजचे पंतप्रधानही जाहीरपणे म्हणतात की मी महाराणींचा आदेश असेपर्यंतच ह्या पदावर राहीन. हे काय स्वाभिमानाचे, लोकशाहीचे लक्षण आहे का? आपले हे पंतप्रधान म्हणे बुद्धीवादी, अफाट अभ्यास, अर्थशास्त्र तज्ञ आहेत. असे लोक जर इतके लीनदीन असतील तर सामान्यांची काय कथा? इथे जे राहुलजींचे भक्त आहेत त्यांचे जाऊ द्या. पण निदान कुंपणावरच्या काही लोकांना ते मत देतील तेव्हा राहुलजींचे गहन विचार माहित असावेत, आठवावेत अशी इच्छा आहे. माझ्या काथ्याकूटामुळे राहुलजींना मी जास्त प्रसिद्ध करेन असा म्या पामराचा समज नाही, माझी तितकी कुवतही नाही.

In reply to by हुप्प्या

पूर्वी राष्ट्रपती पद हे खेळणे म्हणून जाहीर झाले, आता पंतप्रधान. मग राजकारभार कोण चालविते , पक्षाध्यक्ष.

In reply to by हुप्प्या

मी माझ्या ब्लॉगवर ’राजीव गांधींविषयी’ या चर्चेत एक मुद्दा मांडला आहे. तोच राहुल गांधींनाही लागू पडतो.तेव्हा तो मुद्दा इथे लिहित आहे. प्रत्येकाला अभिनेता आवडण्यामागे/नावडण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. कोणाला अभिनेत्याच्या आवाजातील चढउतार आवडतात तर कोणाला देहबोली. कोणाला चेहऱ्यावरील हावभाव आवडतात तर कोणाला अजून काही.प्रत्येकाला अभिनेत्याची कोणती गोष्ट भावेल याचे काही गणिती सूत्र नक्कीच नाही.त्यामुळेच कोणाला तीन खानांमधला एक आवडतो तर कोणाला हृतिक. आता समजा एखाद्याला आमिर खान आवडत असेल त्याने शाहरूख समर्थकाला चुकीचे म्हटले तर तो त्याच्या बाजूने बरोबरच असतो. पण असे चुकीचे म्हणणे योग्य आहे का? कारण त्याच न्यायाने इतर अभिनेत्यांचे समर्थक आमिर समर्थकाला चुकीचे म्हणतील. तेव्हा चित्रपट क्षेत्रातल्या दोन दर्दी आणि माहिती असलेल्या व्यक्तींचे कोणता अभिनेता चांगला यावर एकमत होणे कठिण आहे. आता वळू या लोकशाहीकडे.आपण शिकले-सवरलेले, चांगल्यापैकी नोकरी/व्यवसाय असलेले आणि आज दोन वेळेला जेवायला मिळाले तरी उद्या मिळेल का असा प्रश्न न पडणारे लोक आहोत. आपल्या सारख्यांना कदाचित राष्ट्राचा अभिमान (म्हणून राम मंदिर, अणुचाचण्या, भारताच्या पंतप्रधानपदी परदेशात जन्मलेली व्यक्ती नको, स्वीस बॅंकेतून पैसे परत आणणे वगैरे) मुद्दे भावतील कारण आपण हातावर पोट असलेल्यांना हे मुद्दे भावतील का? काही काळ प्रचारतंत्र जोरात वापरून त्यांना या मुद्द्यांचे महत्व जरूर पटवून देता येईल पण ते फार काळ चालणार नाही. १९९० मध्ये लालूप्रसाद यादवांनी बिहारच्या मागासवर्गीय जनतेला सांगितले--’मै आपको स्वर्ग तो दे नही सकता लेकिन स्वर तो जरूर दुंगा’. पिढ्यानपिढ्या जातीव्यवस्थेच्या ओझ्याखाली दबलेल्या त्या मतदारांना या गोष्टीचे आकर्षण वाटले नसेल तर नवलच. तसेच ’कॉंग्रेस का हाथ आम आदमी के साथ’ ही कॉंग्रेस पक्षाची घोषणा अशा हातावर पोट असलेल्यांना आपल्यासाठी वाटली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आता आपण आपल्या बाजूने विचार केला तर अशा लोकांचे मत जरूर चुकीचे वाटेल पण आपण स्वत: त्यांना आयुष्यात येत असलेल्या हालअपेष्टांना सामोरे गेलेलो नसल्यामुळे ते नक्की कसा विचार करतात आणि त्यांना काय भावते हे आपल्याला सांगता येणे कठिण आहे. यात अनेकदा होते असे की राजकारणी मंडळी भूलथापा देऊन या सामान्य जनतेला हातोहात फसवतात. असे म्हणतात की Public memory is short. त्यामुळे राजकारणी मंडळी आपला स्वार्थासाठी वापर करत आहेत हे त्यांना समजायला उशीर होतो. हे सर्व बाजूंसाठी तितकेच लागू होते. आपल्यासारखे लोक बिहारच्या जनतेने लालू यादवांना आणि राबडीदेवींना वर्षानुवर्षे निवडून कसे दिले, कॉंग्रेसने ’फारसे काही न करता’ त्यांचा पक्ष एकामागून एक निवडणुका कशा जिंकतो किंवा पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट वर्षानुवर्षे निवडून कसे येतात हा प्रश्न जरूर विचारू. पण त्याचवेळी कॉंग्रेस समर्थक मुंबई महापालिकेत काहीही न करता शिवसेना कशी निवडून येते किंवा गुजरात दंगलींमध्ये हात असूनही (खरा-खोटा भगवंतालाच माहित) नरेंद्र मोदी निवडून कसे येतात असे प्रश्न विचारतील. आता असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या आमीर खान समर्थकाने ’काय तो इतरांना सलमान खान आवडतो समजत नाही. आमचा आमीर किती चांगला अभिनय करतो’ असे म्हटल्यासारखे आहे. असा प्रश्न विचारून उपयोग नाही कारण दोन अभिनेत्यांचे समर्थक वेगळ्या मापदंडांवर दोन अभिनेत्यांना मोजतात. त्यामुळे निर्णयात थोडी तरी subjectivity येतेच. तेव्हा तुम्हाला राहुल गांधी पंतप्रधान म्हणून आवडणार नसतील तर कॉंग्रेसविरोधी मत द्यायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो तुम्ही वापरणार यात कोणतीही शंका नाही.पण लोकशाही ही आकड्यांचा खेळ असतो.जर लोकांनी राहुल गांधींनाच पंतप्रधान व्हायचा जनादेश दिला तर ते पंतप्रधान होतील आणि तसा जनादेश दिला नाही तर होणार नाहीत.
भारतात पुरेसे मूर्ख लोक आहेत आणि पुरेसे संधीसाधू, हलकट नेते आहेत जे कुठलीही लायकी नसलेल्या, निव्वळ अमक्या एका घराण्याचा कुलदीपक आहे म्हणून एखाद्याला डोक्यावर घेतील आणि त्याच्या हातात आपल्या देशाच्या नाड्या देतील
भारतात लोक मूर्ख आहेत असे तुम्हाला वाटते. पण त्याचबरोबर कॉंग्रेसविरोधी मत देणाऱ्यांना कॉंग्रेस समर्थकही मूर्खच म्हणतील हे पण ध्यानात घ्यायला हवे. आणि आपले लोक परत परत गांधी घराण्याला डोक्यावर का घेतात याचे कारण मी वर स्पष्ट केले आहेच.
कागदोपत्रीच्या लायकीला काही अर्थ नाही. अमके वय, दिवाळखोर नाही असल्या पात्रतेवर कोट्यावधी लोक लायक ठरतील.
अर्थ कसा नाही?तुम्ही या पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हीही लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहायला पात्र आहात. निवडून आलात आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळवलात तर श्री. हुप्प्या हे भारताचे पुढील पंतप्रधान असतील. तसे झाले तर निवडून देणारी जनता चांगली आणि राहुल गांधींना निवडून दिले तर असे निवडून देणारी जनता मूर्ख या बोलण्याला काही अर्थ नाही.
भारतात कागदोपत्री लोकशाही असली तर जनमानसात राजेशाहीच आहे.
या बोलण्याला काय आधार आहे?मग शास्त्री, देसाई, चरण सिंह, वि.प्र.सिंह, चंद्रशेखर, नरसिंह राव, वाजपेयी, देवेगौडा, गुजराल, मनमोहन सिंह हे पंतप्रधान झालेच कसे? तुम्हाला निवडणुकीत लागणारा निकाल आवडत नसेल तर तसे वाटायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण आपल्याला न आवडणारा निकाल लागला म्हणून जनता मूर्ख आहे, जनमानसात राजेशाहीच आहे अशा विधानांना मात्र काहीच आधार नाही.
हे महारथी उद्या पंतप्रधान होऊन देशाचा गाडा हाकू लागतील ह्याविषयी मलातरी शंका नाही.
आणि जर लोकांनाही ते गाडा हाकण्यास योग्य नाहीत असे वाटले तर लोक त्यांना लोकसभेत बहुमत देणार नाहीत आणि त्या परिस्थितीत ते पंतप्रधान बनू शकणार नाहीत. बाकी चालू द्या. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

वा! मस्त प्रतिसाद यानंतर काहि बोलणे.. कसली उत्तरे देणे शिल्लकच राहिलेले नाहि.. माझे टंकायचे कष्ट वाचवल्या बद्दल आभार आणि प्रतिक्रीयेला अर्थातच +१

In reply to by क्लिंटन

>>तुम्ही या पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हीही लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहायला पात्र आहात. निवडून आलात आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळवलात तर श्री. हुप्प्या हे भारताचे पुढील पंतप्रधान असतील. आपली अगोदरच्या खूप चर्चा वाचल्या आहेत, नक्कीच तुमचे विचार बर्यान्चदा पटतात. पण ह्यावेळेस असहमत आहे. आपण कोणत्या विश्वात राहता हे पहिले नमूद करणे. इथे नगर सेवकाला एखादे काही विचारायला जरी गेले तरी त्याच्या आजूबाजूची(गँग) मंडळी अंगावर धावायला येते (अनुभव घेऊन बघा). सध्या नगरसेवकाच्या निवडणुकीला देखील हाणामार्या / खुना-पाडी होते, तिथे श्री. हुप्प्या यांना लोकसभेत जाण्यासाठी कोणत्या थराला जावे लागेल हे देवालाच माहित. सध्या इथे नेत्यांचे कमी आणि गुंडांचे राज्य आहे. आम्ही ते अनुभवतो. (यांना घाबरून आहे, त्यामुळेच तर इथे बरेच जण खरे नाव घेऊन लिहित नाही) सगळा कारभार यांच्याच हातात आहे, गल्ली-बोळात वावरताना, राजकारण करताना नागरिकशास्त्राचे पुस्तक फेकून द्यावे लागते आणि एक नवीन पुस्तक विकत घ्यावे लागते, त्याची किंमत कित्येक हजारो करोड आणि हजारो निष्पाप लोकांचे प्राण देऊन चुकवावी लागते. श्री. हुप्प्या/कोणीही आजच्या घडीला ठरलेली हि किंमत देऊन त्या खुर्चीवर बसण्याचे धाडस करतील, असे वाटत नाही. (त्यापेक्षा शिका, थोडे पैसा गाठीला बांधा, संधी मिळाली कि फुर्रर्र व्हा. हा साधा सोपा मार्ग जनता स्वीकारू इच्छिते.) बर, एखाद्याने जीव धोक्यात घालून देखील ह्या गुंडांच्या (हो गुंडच, राजकारणी नव्हे) विरोधात कोणी उभा राहिला तर हे गुंड त्याचा जीवच घेणार नाही हे कशावरून. तुम्ही येणार का श्री. हुप्प्या यांना वाचवायला ? सतीश शेट्टी गेले, असे अजून जातील, किती जण जातात त्यांना वाचवायला ?

In reply to by गांधीवादी

तुमचा मुद्दा पूर्णपणे योग्य आहे पण तो या चर्चेशी संबंधित नाही.जर का चर्चेचा मुद्दा असता की कॉंग्रेसचे नेते गुंडगिरी करून, लोकांना धमकावून निवडून येतात तर त्या चर्चेत हा मुद्दा अगदी फिट होता.आणि मग तीच गोष्ट सगळ्या पक्षांबाबत थोड्याबहुत प्रमाणात लागू झाली असती. तेव्हा पंतप्रधान बनायला गुंडगिरी करता यायला हवी असा या चर्चेचा मुद्दाच नाही. तर या चर्चेच्या प्रस्तावातील एकूण रोखावरून असे भासवायचा प्रयत्न होत आहे की केवळ गांधी घराण्यात जन्माला आले म्हणून पंतप्रधानपद आपसूकपणे त्या व्यक्तीला मिळते! म्हणजे गांधी घराण्यातील जन्म हे पंतप्रधानपदाचे क्वालिफिकेशन आहे असे भासविण्याचा वारंवार प्रयत्न होतो. आणि ते तसे नाही हे उदाहरणांसह स्पष्ट केलेच आहे.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन साहेब, (कधीतरी) नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून बाहेर या. >>म्हणजे गांधी घराण्यातील जन्म हे पंतप्रधानपदाचे क्वालिफिकेशन आहे असे भासविण्याचा वारंवार प्रयत्न होतो. क्वालिफिकेशन नाही, गांधी घराण्यातील जन्म मस्ट आहे. मला तर माननीय युवराज राहुल बाबा यांच्यापेक्षा तुम्हीच जास्त क्वालिफाईड वाटता. पण काय देशाचे दुर्दैव बघाना, तुम्ही त्या घराण्यात जन्म घेतला नाही.

In reply to by गांधीवादी

क्लिंटन साहेब, (कधीतरी) नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून बाहेर या
सल्ल्याबद्दल धन्यवाद.
क्वालिफिकेशन नाही, गांधी घराण्यातील जन्म मस्ट आहे
अच्छा म्हणजे लालबहादूर गांधी,मोरारजी गांधी, चरण गांधी,विश्वनाथ प्रताप गांधी,चंद्रशेखर गांधी,पी.व्ही.नरसिंह गांधी,अटलबिहारी गांधी, एच.डी.गांधी, इंदरकुमार गांधी आणि मनमोहन गांधी ही आपल्या पंतप्रधानांची नावे आहेत हे मला माहितच नव्हते की. मला वाटत होते की त्यांची नावे लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, चरण सिंह, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी.व्ही.नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, एच.डी.देवेगौडा, इंदरकुमार गुजराल आणि मनमोहन सिंह अशी आहेत अशा भ्रमात मी होतो. माझा भ्रम दूर केल्याबद्दल आपले आभार कोणत्या शब्दात मानू तेच कळत नाही.
मला तर माननीय युवराज राहुल बाबा यांच्यापेक्षा तुम्हीच जास्त क्वालिफाईड वाटता.
काय सांगता?याच प्रतिसादात तिसऱ्यांदा धन्यवाद.

In reply to by क्लिंटन

मला क्लिंटनसाहेबांचे प्रतिसाद खूप आवडतात. वरील प्रतिसादाची, त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीतला सर्वोच्च प्रतिसाद, अशी नोंद करण्यात यावी. धन्यवाद.

In reply to by क्लिंटन

तुझे आडनाव गांधी (तेच घराणे बर का ?) तर तू ईथे ईतके प्रतिसाद टंकत बसला असतास का ? ईथे मिपाकर युवराज "क्लींटन गांधी " या विषयावर एकमेकाना बडवत बसले असते ! बाळा पुस्तकातून बाहेर ये अन "गांधी " नाममहात्म्य मान्य कर ! काँग्रेसचे अस्तित्त्व केवळ "गांधी " या शब्दामुळेच आहे.. ज्या ज्या काळात काँग्रेसमधे गांधी नव्हते त्या काळात हा पक्ष रसातळाला होता.. (आता ईंदीराबाईच्या आणीबाणीचे ऊदा. देऊ नकोस, तो अपवाद होता ) "गांधी" या नावाची बाय डीफॉल्ट एक जादू आहे त्यामुळे कुणी शेंबडं पोरगही गांधी असल्यामुळे लोकमान्य होतं त्यात त्याचं कर्तुत्त्व काय असते ?

In reply to by पंख

बाळा पुस्तकातून बाहेर ये अन "गांधी " नाममहात्म्य मान्य कर
सुचनेबद्दल धन्यवाद.
ज्या ज्या काळात काँग्रेसमधे गांधी नव्हते त्या काळात हा पक्ष रसातळाला होता.. (आता ईंदीराबाईच्या आणीबाणीचे ऊदा. देऊ नकोस, तो अपवाद होता )
असे एकच उदाहरण सिलेक्टिव्हली वगळायचे कारण काय?आणि आणीबाणी इंदिरा गांधींनी का लादली? त्यात १९७२ च्या दुष्काळामुळे लोकांमध्ये वाढलेला असंतोष, १९७३ च्या आखाती युद्धामुळे तेल महागल्यामुळे भडकलेली महागाई, बिहारमधील नवनिर्माण आंदोलन आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन याचा काहीच वाटा नाही का?देशातील वातावरण १९७४ पर्यंत कॉंग्रेसविरोधी बनत होतेच आणि किंबहुना इंदिरा गांधींनी म्हणूनच आणीबाणी लादली असे म्हटले तरी चालेल. आणीबाणी आली नसती तरीही कॉंग्रेसचा पराभवच झाला असता असे मानायला नक्कीच जागा आहे. याचे कारण जून १९७५ मध्ये गुजरातमध्ये कॉंग्रेसचा प्रथमच झालेला पराभव, विविध पोटनिवडणुकांमध्ये हक्काच्या जागी कॉंग्रेसचे पराभव (उदा. शरद यादव जबलपूरमधून पोटनिवडणुक जिंकून लोकसभेवर जाणे) यासारख्या घटनांवरून म्हणायला नक्कीच जागा आहे.आणीबाणी आल्यामुळे उत्तर भारतात कॉंग्रेसचा धुव्वा उडाला तसा कदाचित उडाला नसता.पण पराभव झाला असता हे म्हणायला नक्कीच जागा आहे. काही मुद्दे १. नेहरूंच्या काळात कॉंग्रेसचा एक केरळ विधानसभा निवडणुक वगळली तर सर्वत्र विजयच झाला होता. पण २. इंदिरा गांधींच्या काळात १९६७ मध्ये कॉंग्रेसने प्रथमच लोकसभेतील २/३ बहुमत गमावले.बंगालपासून उत्तर प्रदेशापर्यंत सर्वत्र कॉंग्रेसविरोधी पक्षांची राज्य सरकारे आली. तेव्हा दिल्लीपासून कलकत्त्यापर्यंत जाताना एकही कॉंग्रेसशासीत राज्य दिसणार नाही असे म्हटले जायचे. तसेच १९६७ मध्ये कॉंग्रेस पक्षाचा तामिळनाडूत पराभव झाला आणि त्यानंतर आजपर्यंत राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकलेले नाही. ३. १९७१ च्या लोकसभा आणि १९७२ च्या राज्य विधानसभा निवडणुकांमधील यशानंतर कॉंग्रेसची बाजू पडती होती याचा परामर्श वर केला आहेच. १९७७ च्या निवडणुकांविषयी वेगळे बोलायलाच नको. ४. १९८० मध्ये इंदिरा गांधींचे पुनरागमन झाल्यानंतर १९८३ मध्ये आंध्र प्रदेशात रामारावांनी तर कर्नाटकात हेगडेंनी कॉंग्रेसला चोप दिला. ही दोन राज्ये १९७७ साली सुध्दा कॉंग्रेसच्याच पाठिशी होती हे ध्यानात घ्यायला हवे. तसेच राजीव गांधींच्या कारकिर्दीत १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमधील झंझावातानंतर मार्च १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यात जिंकला.पण प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे बळ डिसेंबर १९८४ पेक्षा कमी झाले होते. उदाहरणार्थ डिसेंबर १९८४ मध्ये कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशात ८५ पैकी ८३ लोकसभेच्या जागा जिंकल्या.त्याच न्यायाने पक्षाने विधानसभेत विधानसभेत ४२५ पैकी किमान सव्वा तीनशे जागा जिंकायला हव्या होत्या. जिंकल्या किती? २६८! महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ लोकसभा जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष विधानसभेत मात्र २८८ पैकी १६७ जागाच जिंकू शकला. कर्नाटक आणि आंध्रमध्ये १९८५ मध्ये परत विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तर कॉंग्रेस पक्षाचा पराभवच झाला आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले.याच कर्नाटकात १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये कॉंग्रेसने मोठा विजय मिळवला होता. आंध्र प्रदेशात रामारावांनी परत एकदा कॉंग्रेस पक्षाला दणकून चोप आंध्र प्रदेशात दिला. पुढे कॉंग्रेस पक्षाचा सप्टेंबर १९८५ मध्ये पंजाबमध्ये तर नोव्हेंबर १९८५ मध्ये आसाममध्ये पराभव झाला.या राज्यांमधील पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे या राज्यांचा मुद्दा थोडा बाजूला ठेऊ या. पुढे मार्च १९८७ मध्ये केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी असाच जोरदार चोप कॉंग्रेसला दिला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. खुद्द सोमनाथ चॅटर्जींचा पराभव झाला.या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांनी विधानसभेच्या २९४ पैकी २५०+ जागा जिंकणे म्हणजे कॉंग्रेसने खाल्लेली मोठीच आपटी नाही का?त्यानंतर राजीव गांधींना खरा धक्का बसला जून १९८७ मध्ये हरियाणामध्ये.९० पैकी अवघ्या चार जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या. खुद्द मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी १९८९ मध्ये तामिळनाडूतील विधानसभा निवडणुका राजीव गांधींनी प्रतिष्ठेच्या केल्या आणि अण्णा द्रमुकशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. निकाल काय लागला? २३४ पैकी २६ जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या! वि.प्र.सिंह राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातून आणि कॉंग्रेस पक्षातूनही बाहेर पडले आणि त्यांनी लोकसभेची पोटनिवडणुक कॉंग्रेसविरूध्द अलाहाबादेतून लढवली.त्या पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये परत कॉंग्रेसचा पराभव झाला. पुढे सोनिया कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर कॉंग्रेसने अनेक ठिकाणी विजय मिळवले पण १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केली (११३ जागा). आजही कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात राष्ट्रवादीशिवाय सत्तेवर येऊ शकणार नाही.ओरिसामध्ये नवीन पटनाईकांनी कॉंग्रेसला असाच चोप वेळोवेळी दिला आहे.बंगालमध्ये कॉंग्रेसपेक्षा तृणमूल नक्कीच पुढे आहे. तेव्हा गांधींच्या नेतृत्वाखालीसुध्दा कॉंग्रेसचा आलेख उच्चीचा होता तसा निच्चीचाही होताच. तरीही कॉंग्रेसला केवळ मिळालेल्या विजयांचा परामर्श करायचा आणि गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या पराभवांकडे दुर्लक्ष करायचे आणि म्हणायचे "गांधी या नावात बाय डिफॉल्ट जादू आहे" याला काही अर्थ नाही.

In reply to by क्लिंटन

क्लींटनसाहेब माझा प्रतिसाद हलकेच घेउन त्याला ईतके विवेचनपूर्ण ऊत्तर दिल्याबद्दल धन्यवाद ! प्रतिसादांतून कळतेच आहे कि तुमचा याविषयीचा अभ्यास नक्किच अफाट आहे . पण मूळ प्रश्न वेगळाच असून तुम्ही त्यास जाणून बुजून बगल देत आहात कि काय अशी शंका येते... राहूल गांधीचे कर्तुत्त्व काय कि म्हणून तो भावी पंतप्रधान आहे ? ईतकाच हा प्रश्न आहे.. तसेच सोनिया बाईचे .. तिचे अथवा राहूलचे काय योगदान आहे देशासाठी ? सोनिया "गांधी" असल्यामुळेच व राहूल "गांधी" असल्यामुळेच मिरवून घेत आहेत हे तुम्हाला मान्य नाही का? राहुल पंतप्रधान होईलही कदचित, झालाच तर आक्षेपही नसणार आहे, पण त्याने पंतप्रधान होण्यासाठी केवळ पुस्तकातले निकष पुर्ण केलेले असतील काय ? तो "गांधी" नसता तर पंतप्रधान होऊ शकेल काय ?

In reply to by पंख

धन्यवाद पंख साहेब.
क्लींटनसाहेब माझा प्रतिसाद हलकेच घेउन त्याला ईतके विवेचनपूर्ण ऊत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
मी गेल्या ४ वर्षांपासून विविध मराठी संस्थळांवर वावरत आहे.या काळात मी कोणतीही चर्चा वैयक्तिक पातळीवर नेलेली नाही आणि यापुढेही नेणार नाही.
प्रतिसादांतून कळतेच आहे कि तुमचा याविषयीचा अभ्यास नक्किच अफाट आहे .
धन्यवाद.
राहूल गांधीचे कर्तुत्त्व काय कि म्हणून तो भावी पंतप्रधान आहे ?
मी या मुद्द्यांना पूर्वीच उत्तरे याच चर्चेत दिली आहेत. पण इतक्या प्रतिसादांच्या गर्दीत मी लिहिलेले काही प्रतिसाद हरवले जायची शक्यता आहे. तेव्हा मी लिहिलेले पुढील प्रतिसाद बघावेत ही विनंती (त्यात आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत) प्रतिसाद १ प्रतिसाद २ माझा मुद्दा हा की राहुल गांधींनी काहीही कर्तुत्व दाखवलेले नाही असे आपल्यासारख्या (मलाही) शिकलेल्यांना वाटते. पण हातावर पोट असलेले मतदार आपण ठेवतो त्या निकषांवर मतदान करत नाहीत.त्यामुळे राहुल गांधींनी कसलेच कर्तृत्व दाखवलेले नाही असे वैयक्तिक पातळीवर मला वाटत असले तरी सर्वसामान्य मतदारांना कदाचित तसे वाटत नसेल.बहुदा सर्वसामान्य मतदारांना राहुल गांधी आपल्या दोन वेळच्या भाकरीची सोय करतील हा विश्वास वाटत असेल कारण कॉंग्रेसचा प्रचार असतो ’कॉंग्रेसका हात आम आदमीके साथ’. याउलट भाजपचा प्रचार असतो राष्ट्रीय अभिमान,अणुचाचण्या, स्विस बॅंकेतून पैसे परत आणणे यासारख्या सामान्यांना अपील न करणाऱ्या गोष्टींवर. या सगळ्या गोष्टी भरल्या पोटी चर्चा करायच्या आहेत.रस्त्यावर झोपणाऱ्या मतदाराला सांगा की आम्ही स्विस बॅंकेतून काळा पैसा परत आणू म्हणून आम्हाला मत द्या. ते त्याला पटेल का? याउलट तो ’आम आदमी’ च्या बरोबर जायचा (बहुतांश वेळा खोटा) दावा करणाऱ्या कॉंग्रेसलाच मत देतो. दिर्घकालीन हिताचा विचार करता असे योग्य नाही हे मलाही पटते. पण केवळ मला राहुल गांधी आवडत नाहीत म्हणून ते सर्वसामान्य मतदारांनाही आवडू नयेत अशी अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे कारण माझे आणि हातावर पोट असलेल्यांचे मापदंड वेगळे आहेत.
तो "गांधी" नसता तर पंतप्रधान होऊ शकेल काय
आजही गांधी नसलेला कोणी नेता सामान्य मतदाराच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करू शकेल तो नक्कीच पंतप्रधान होऊ शकेल. मात्र यासाठी अशा मतदाराला भावतील असे मुद्दे उभे केले पाहिजेत. राममंदिर,राष्ट्रीय सुरक्षा,स्विस बॅंकेतील काळा पैसा परत आणणे यासारख्या त्याच्याशी संबंध नसलेल्या गोष्टींचाच जप केला तर त्याचा उपयोग फार काळ होणार नाही.

In reply to by क्लिंटन

तेव्हा तुम्हाला राहुल गांधी पंतप्रधान म्हणून आवडणार नसतील तर कॉंग्रेसविरोधी मत द्यायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो तुम्ही वापरणार यात कोणतीही शंका नाही.पण लोकशाही ही आकड्यांचा खेळ असतो.जर लोकांनी राहुल गांधींनाच पंतप्रधान व्हायचा जनादेश दिला तर ते पंतप्रधान होतील आणि तसा जनादेश दिला नाही तर होणार नाहीत. ....लोकशाही हा आकडयांचा खेळ आहे. सहमत. .... जर लोकांनी राहुल गांधींनाच पंतप्रधान व्हायचा जनादेश दिला तर ते पंतप्रधान होतील आणि तसा जनादेश दिला नाही तर होणार नाहीत . .....असहमत. खरंच तुम्हाला वाटतं की पंतप्रधान होणे हे इतके स्पष्ट आणि सरळ आहे? जनाधारावर सरकार स्थापन करणे किंवा एका विशिष्ट व्यक्तीने पंतप्रधान होणे हे शक्य आहे जर एकाच पक्षाला स्पष्ट बहूमत मिळालं तर अन्यथा हे अवलंबून आहे निकालानंतरच्या होणार्‍या राजकीय सौदेबाजी वर(युती/आघाडी/आतून समर्थन/बाहेरून समर्थन वै. वै.), जे होताना आपण बघितलं असेलच मागील काही वर्षात आणि तत्कालीन सरकार हे सुद्धा एक उदाहरण आहेच. अर्थ कसा नाही?तुम्ही या पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हीही लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहायला पात्र आहात. निवडून आलात आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळवलात तर श्री. हुप्प्या हे भारताचे पुढील पंतप्रधान असतील. तसे झाले तर निवडून देणारी जनता चांगली आणि राहुल गांधींना निवडून दिले तर असे निवडून देणारी जनता मूर्ख या बोलण्याला काही अर्थ नाही. ....असहमत. कारण वर दिलं आहेच. या बोलण्याला काय आधार आहे?मग शास्त्री, देसाई, चरण सिंह, वि.प्र.सिंह, चंद्रशेखर, नरसिंह राव, वाजपेयी, देवेगौडा, गुजराल, मनमोहन सिंह हे पंतप्रधान झालेच कसे? तुम्हाला निवडणुकीत लागणारा निकाल आवडत नसेल तर तसे वाटायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण आपल्याला न आवडणारा निकाल लागला म्हणून जनता मूर्ख आहे, जनमानसात राजेशाहीच आहे अशा विधानांना मात्र काहीच आधार नाही. .... वर उल्लेखलेले व्यक्ती कसे पंतप्रधान झालेत हे तुम्हाला खरेच माहित करून घ्यायचे आहे का? ह्या सगळ्या व्यक्ती पंतप्रधान झाल्यात त्या जनतेनी त्यांनी पंतप्रधान व्हावे या उद्देशानी मतदान केल्या मुळेच झाल्यात असं तुम्हाला वाटतं का ?

In reply to by क्लिंटन

>> या बोलण्याला काय आधार आहे?मग शास्त्री, देसाई, चरण सिंह, वि.प्र.सिंह, चंद्रशेखर, नरसिंह राव, वाजपेयी, देवेगौडा, गुजराल, मनमोहन सिंह हे पंतप्रधान झालेच कसे? तुम्हाला निवडणुकीत लागणारा निकाल आवडत नसेल तर तसे वाटायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण आपल्याला न आवडणारा निकाल लागला म्हणून जनता मूर्ख आहे, जनमानसात राजेशाहीच आहे अशा विधानांना मात्र काहीच आधार नाही. जनमानसात राजेशाही आहे ह्याला काय आधार? किती मोठी यादी देऊ? माझा नि:पक्षपातीपणा सिद्ध करायला भाजपापासून सुरवात करतो! मुंढे, महाजन, ठाकरे, पवार, भुजबळ, राणे, नाईक, शिंदे (सुशीलकुमार आणि माधवराव), अब्दुल्ला, लालू यादव, जयललिता, शेखावत (पाटील), दत्त, देवरा आणि अर्थातच गांधी. ही यादी आणखी वाढेल. घराणेशाह्यांची इतकी ढळढळीत उदाहरणे असताना त्याला अर्थ नाहि म्हणण्याला काही अर्थ नाही. मला आवडणारा निकाल मिळत नाही म्हणून जनता मूर्ख आहे असे आजिबात नाही. अडाणी, अशिक्षित, असंस्कृत, दरिद्री लोकांची इतकी प्रचंड संख्या ह्या देशात आहे की त्यात सुशिक्षितांची मते पार नगण्य वाटतील. असे लोक मत देताना नागरिकशास्त्र, कायदा, संविधान, भारताच्या गरज, उमेदवाराची पात्रता ह्या गोष्टींकडे बघणार नाहीत. ज्याच्या प्रलोभनाला, धमक्यांना ते बळी पडतील त्यांना ती मते मिळणार. ह्यांना मतदार म्हणून मूर्खच म्हटले पाहिजे. जर चुकून कधी एखादा मोरारजी, एखादा वाजपेयी निवडला जात असेल तर तोही ह्या मूर्ख मतदारांमुळेच. नालायक मतदारांचा भरणा असणारी लोकशाही ही लोकांनाच घातक आहे. पण हे अपवाद आहेत. आपण जी गैर गांधी घराण्यातील पंतप्रधानांची यादी दिलीत त्यांचा त्या पदावरील कालावधी सोयिस्कररित्या वगळलात. त्यातल्या देवीलाल, चंद्रशेखर, गुजराल ह्यांचे पंतप्रधानपद म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. तेव्हा कुणी किती काळ पंतप्रधानपदावर घालवला आहे तेही बघा जरा.

In reply to by हुप्प्या

मुंढे, महाजन, ठाकरे, पवार, भुजबळ, राणे, नाईक, शिंदे (सुशीलकुमार आणि माधवराव), अब्दुल्ला, लालू यादव, जयललिता, शेखावत (पाटील), दत्त, देवरा आणि अर्थातच गांधी. ही यादी आणखी वाढेल.
म्हणजे आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की एकदा एखादा कोणी मंत्री/पंतप्रधान झाला तर त्याच्या नात्यातल्या कोणीही त्या पदावर बसता कामा नये?तुम्हाला तसे वाटत असले तर त्यात इतरांना काही हरकत घेण्यासारखे काहीच नाही.पण आपल्या राज्यघटनेला तसे वाटत नाही त्याचे काय?माधवरावांचा मुलगा म्हणून ज्योतिरादित्य आपोआप वारसाहक्काने गुण्याचा खासदार म्हणून नियुक्त झाला तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे.पण त्याला रितसर मार्गाने लोकांनी निवडून दिले तर त्यात आक्षेपार्ह काय?तेव्हा एखाद्या घराण्यात जन्माला येणे हे कोणत्याही पदासाठीचे qualification नाही त्याचप्रमाणे ते disqualification पण नाही.
नालायक मतदारांचा भरणा असणारी लोकशाही ही लोकांनाच घातक आहे.
अशाच ’नालायक’ मतदारांनी १९७७ साली इंदिरा गांधींना सत्तेवरून खाली खेचले होते.बांगलादेश युद्धानंतर इंदिराजींचा पराभव होईल असे कोणालाही स्वप्नातही वाटले नसेल पण ते प्रत्यक्षात आले.अशाच नालायक मतदारांनी १९९५ मध्ये शरद पवारांची उन्मत्त सत्ता उलथावली.१९८७ मध्ये देवीलाल यांनी कॉंग्रेसला हरियाणात जोरदार चोप दिला पण नंतरच्या काळात त्यांनी आणि त्यांच्या पुत्रांनी धुमाकूळ घातला त्याबद्दल त्याच देवीलालांना हरियाणातील अशाच नालायक मतदारांनी चांगलीच शिक्षा केली.देवीलाल १९८९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले ते शेवटचेच. त्यानंतर ते कुठलीच प्रत्यक्ष निवडणूक जिंकू शकले नाहीत.अशाच नालायक मतदारांनी बिहारमध्ये लालू-राबडीची सत्ता उलथवली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. तेव्हा भारतीय मतदार तुम्ही जितके मूर्ख समजता तितके मूर्ख नक्कीच नाहीत. काही मतदार पैसे घेऊन विकले जात असतीलही पण काही त्याहूनही बिलंदर म्हणजे पैसे घेऊनही विकले जात नसतील असाच अर्थ या सगळ्या धक्कादायक निकालांमधून लागतो की नाही?
आपण जी गैर गांधी घराण्यातील पंतप्रधानांची यादी दिलीत त्यांचा त्या पदावरील कालावधी सोयिस्कररित्या वगळलात.
१९८९ सालापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या २१ वर्षात एकही गांधी पंतप्रधान झालेला नाही.त्यात नरसिंह रावांची पाच वर्षे आणि वाजपेयी-मनमोहन यांची प्रत्येकी ६ वर्षे हा कालावधी मोठा नाही का?

In reply to by क्लिंटन

आज खासदार, आमदार बनणे हे सामान्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. तमाम मोठे पक्ष तिकिटे देताना काय पात्रता बघतात ते समजणे अवघड नाही. आणि मोठ्या पक्षाचे नाव नसेल तर निवडणूक लढवणे म्हणजे डिपॉझिट सरकारजमा करण्यापैकी आहे. तेव्हा लोकशाही मार्ग वगैरे भाबडेपणा सोडा. आज भुजबळांचा मुलगा वा राण्यांचा मुलगा वा महाजनांची मुलगी वा पवारांची मुलगी वा नाईकांचा मुलगा निवडणूकीला उभी राहू शकतो/ते हे काय लोकशाही मार्गाने होते काय? आजिबात नाही. उमेदवारी मिळवणे, प्रचारावर बेसुमार खर्च करणे हे सामान्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. तिथे घराण्याचा भक्कम वारसा असल्याशिवाय वा जातीपातीची फिल्डिंग असल्याशिवाय होत नाही. उमेदवारीच मिळवणे सामान्यांना दुरापास्त आहे तिथे निवडून येण्याविषयी काय बोलावे? त्या फार नंतरच्या गोष्टी आहेत. आपला हा गोड गैरसमज आहे की केवळ योगायोगाने हे लोक त्या घराण्यात जन्माला आले आहेत. मुख्य कारण हे त्यांची कर्तबगारी हेच आहे आणि जनतेची पसंत हेही. १९७७ च्या घटना फार जुन्या आहेत. आजच्या काळात पैसाच निवडणूक जिंकून देतो. कितीतरी कमालीचे भ्रष्ट नेते केवळ पैशावर निवडून आलेले आहेत. निवडणूकीच्या प्रक्रियेत काही क्रांतिकारी बदल झाला तरच हे बदलेल पण ज्या खेळात आजचे नेते जिंकत आहेत त्या खेळाचे नियम आजचे नेते कसे बदलतील? १९८९ पासून कुणी गांधी पंतप्रधान नाही हे केवळ पुस्तकी, कोर्टात सिद्ध करण्यापुरते खरे. पण आज महाराणी सोनियाच ह्याच कर्त्या करवत्या आहेत. पंतप्रधानानी हे जाहीररित्या म्हटले आहे. तेव्हा संशयाला जागा नसावी. बाकी महाराणी राज्याचा लगाम उघडपणे हातात का घेत नाहीत हे एक गौडबंगाल आहे. ते कधी उघडकीस येईल असे वाटत नाही.

In reply to by हुप्प्या

हा प्रतिसाद हुप्प्या यांच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून जरी असला तरी समंजस यांनी वर मांडलेले मुद्दे साधारण सारखेच असल्यामुळे हे उत्तर त्यांच्या प्रतिसादालाही मानावे ही विनंती.
आज खासदार, आमदार बनणे हे सामान्याच्या आवाक्याबाहेरचे आहे.
भरपूर पैसा खर्च करायला लागतो ही सत्य परिस्थितीच आहे.पण सध्याच्या जगात पैसे नसतील तर जवळपास सगळ्याच गोष्टी दुरापास्त आहेत त्यात ही आणखी एक. अर्थात हे निवडणुकीतील धनशक्तीचे समर्थन नाही पण जर सर्वत्र पैसाच बोलत असेल तर निवडणुका मात्र त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहतील ही अपेक्षा आपल्याला करता येणार नाही.
तमाम मोठे पक्ष तिकिटे देताना काय पात्रता बघतात ते समजणे अवघड नाही.
तमाम मोठ्या पक्षांनी निवडणुकीत कोणाला तिकिट द्यावे हा त्यांचा प्रश्न झाला. जर निवडणुका जिंकायच्या असतील तर निवडून यायची क्षमता असलेल्या उमेदवारांना ते तिकिटे देतील.अन्यथा प्रमोद महाजनांच्या मुलीला तिकिट भाजपने दिले तसा प्रकार करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतील.तो त्या पक्षाचा प्रश्न झाला. त्या पक्षांनी अमुक एका व्यक्तीलाच तिकिटे द्यायला हवीत अशी सक्ती इतरांना नक्कीच करता येणार नाही. कायद्याचा आणि निवडणुक आयोगाचा या बाबतीत इंटरेस्ट इतकाच की न्यायालयाने २+ वर्षाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला उमेदवार बनता आले नाही पाहिजे आणि ज्या इतर अटी आहेत त्या पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत. बाकी आपल्याला पाहिजे ते करायला पक्ष मोकळे आहेत.त्यांनी जनतेला पटेल असे केले तर जनता त्यांना निवडून देईल नाहीतर त्यांचा उमेदवार पडेल. आता तुमचा मुद्दा झाला की पक्ष केवळ गुंडांना तिकिटे देतात आणि केवळ असेच उमेदवार निवडून येतात आणि त्यामुळे पूर्ण व्यवस्थेलाच किड लागली आहे तर तो मुद्दा पूर्णपणे मान्य. लोकसभेत अनेक बाहुबली निवडून जातात हे अयोग्य आहे यात शंकाच नाही. पण त्याचा या चर्चेचा एक मुद्दा-- घराणेशाहीशी काही संबंध नाही.
आज भुजबळांचा मुलगा वा राण्यांचा मुलगा वा महाजनांची मुलगी वा पवारांची मुलगी वा नाईकांचा मुलगा निवडणूकीला उभी राहू शकतो/ते हे काय लोकशाही मार्गाने होते काय?
वर म्हटले आहेच की कोणाला उमेदवारी द्यावी हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत मामला आहे.त्यावर इतरांनी बोलायची गरज नाही. जर तो उमेदवार पटला तर लोक निवडून देतील आणि अनेकदा उमेदवार पटला नाही तरी लोक पक्षाला म्हणून त्याच उमेदवाराला मते देतील. पण असे न पटणारे उमेदवार वारंवार एखाद्या पक्षाने दिले तर त्या पक्षाचे बळ फार काळ टिकणार नाही हे पण तितकेच खरे.
आपला हा गोड गैरसमज आहे की केवळ योगायोगाने हे लोक त्या घराण्यात जन्माला आले आहेत. मुख्य कारण हे त्यांची कर्तबगारी हेच आहे आणि जनतेची पसंत हेही.
हा गोड गैरसमज तुमच्यासारख्यांना वाटतोही. पण जर लोक (गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आणि मतदान करताना धमकावण्याचे प्रकार न करणाऱ्या) उमेदवाराला निवडून देत असतील मग तो भले कोणतेही अडनाव धारण करणारा असो तर त्यात तक्रार करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही.
आजच्या काळात पैसाच निवडणूक जिंकून देतो.
निवडणुक आयोगाने किती पैसा खर्च करावा याचे दंडक घालून दिले आहेत त्याची पायमल्ली होते ही सत्य परिस्थिती आहेच. तसेच मतदारांना पैसे लाच म्हणून द्यायचाही प्रयत्न होतो ही पण सत्य परिस्थिती आहे.आणि अशा पैशाचा किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव निवडणुकांमध्ये झाला आहे असे आपले म्हणणे असेल तर तो मुद्दा पूर्णपणे मान्य. पण त्याचा घराणेशाहीशी संबंध काय?

In reply to by क्लिंटन

>>जर सर्वत्र पैसाच बोलत असेल तर निवडणुका मात्र त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहतील ही अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. नागरिकशास्त्राचे पुस्तक मात्र अजून अलिप्त आहे. त्या मध्ये सुद्धा 'पैशाची ताकत' हा मुद्दा जमा केला तरच बाकीच्या मुद्द्यांना 'अर्थ' राहील. >>घराणेशाहीशी काही संबंध नाही. असहमत. 'सुरुवातीला पंखांना जे बळ मिळते ते घराणेशाहीशी मुळेच मिळते' हे जर मान्य केले तर बाकी काही शिल्लक राहत नाही. नागरिकशास्त्राच्या पुस्तक प्रमाणे जरी घराणेशाही चालत नसली तरी राजकारणात (व्यवहारात) घराणेशाहीच चालते. त्यामुळे नागरिकशास्त्राचे पुस्तकची नवीन आवृत्ती निघायला हवी. >>त्या पक्षाचे बळ फार काळ टिकणार नाही हे पण तितकेच खरे फार म्हणजे किती ? किमान ५ वर्षे तरी टिकणारच ना? आणि त्या ५ वर्षात नवीन बळ मिळणार नाही हे कशावरून ? >>पैशाचा किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव निवडणुकांमध्ये झाला आहे असे आपले म्हणणे असेल तर तो मुद्दा पूर्णपणे मान्य. पण त्याचा घराणेशाहीशी संबंध काय? ह्यांचाशी कसे निपटायचे, कायदा कसा गुंडाळून खिशात घालायचा, ह्याचे शिक्षण कोणत्या शाळेत मिळते ? ते शिक्षण केवळ घरातच मिळू शकते. घराणेशाहीशी मुळेच मिळू शकते. अन्यथा एवढ्या लवकर राजकारणात प्रवेश कोणालाही अशक्य. घराणेशाहीशी आहे म्हणून मार्ग खुले आहेत. मागे बळ आहे. संधी आहे.

In reply to by क्लिंटन

या बोलण्याला काय आधार आहे
भारतिय नागरिक विचारधारेपेक्षा व्यक्तिगत करिष्म्याला जास्त महत्व देतात असे मला वाटते.मग कॉंग्रेस असो वा सेना वा भाजपा.काँग्रेसला गांधी नावाची व्यक्ती लागते.भाजपाला अजूनही पोस्टरवर वाजपेयींचा फोटो द्यावा लागतो आणि ठाकरे घराण्याशिवाय सेनेची काय अवस्था होईल?

In reply to by चिरोटा

एकदम बरोबर. पोस्टर बॉय शिवाय काम चालत नाही इथं. निवडणूक लढायला मुद्दा नसला तरी चालेल एक वेळ पण पोस्टर बॉय शिवाय भारतात काम होत नाही!

In reply to by क्लिंटन

(कधीतरी)पत्रकारितेत गेलात तर पुढे लोकसत्तेचे संपादक बनू शकता. (ह. घेणे)

In reply to by भाऊ पाटील

छे हो मला कुमार केतकरांची मते अजिबात पटत नाहीत.माझ्या इथल्या प्रतिसादांवरून वाटायचा संभव आहे की मी सोनिया-राहुलचा कट्टर समर्थक आहे.तसे अजिबात नाही.माझा मुद्दा केवळ हा की राज्यघटनेच्या चौकटीत राहून राहुल पंतप्रधान झाले (आणि तसे झाले तर व्यक्तिश: मलाही आवडणार नाही) तर त्यात चूक काय?जनतेने १९९८-९९ मध्ये वाजपेयींना निवडून दिले तेव्हा तो जनादेश म्हणून स्विकारला तर त्याचप्रमाणे राहुल गांधींना निवडून दिले तर तो ही जनादेश म्हणूनच स्विकारावा असे मला वाटते.

In reply to by क्लिंटन

हलके घेतल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या काही प्रतिसादात असे जाणवले की तुम्ही खूपच आयडिअलिस्टिक्/थिअरॉटिकल लिहिले आहे, म्हणून टोमणा मारायचा मोह आवरला नाही. :)

In reply to by भाऊ पाटील

नकळत का होईना पण वरील प्रतिसादातून असे जाणवू शकते की लोकसत्तेतील अग्रलेख ( श्री. केतकरांचे संपादकीय) हे "आयडिअलिस्टिक्/थिअरॉटिकल" असते. मला वाटते तसे ते साक्षात केतकरांना पण कधी वाटले नसावे. ;)

In reply to by नगरीनिरंजन

"कष्ट" हा शब्द मराठी शब्दकोषामध्ये सापडत नाही आजकाल. नुकताच हरवला की आधीपासून नव्ह्ता ह्याविषयी ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे ही विनंती ! ;)

In reply to by विसोबा खेचर

" रँडचा वध होणार आणि त्याची आगाऊ कल्पना आम्ही त्याला देणार..! " >>> ये हुवी ना बात !! असो, "ज्याच जळत त्यालाच कळत" अशी एक म्हण आहे मराठी. वरील सल्ल्याचा एसी बसुन,राजकारणाचा आमच्याशिवाय कोणाचाच अभ्यास नाही ,असे दर्शविणार्‍या व रोजच्या धावपळीच्या आयुष्यात,जगताना,ऊत्तर भारतीयांचा त्रास सहन करणार्‍या मराठी माणसाशी काही संबध नाही.

आहे कोणीच हा मुद्दा कसा उपस्थीत केला नाही? चला मीच उपस्थीत करतो :) राहूल गांधीचे हे विधान, 'बिहारी लोक हुशार आहेत आणि कष्टाळू देखील. महाराष्ट्र आणि पंजाबसारख्या राज्यांचा विकास होत आहे तो तेथे काम करणा-या बिहारींमुळे. जेव्हा अख्खी दिल्ली झोपलेली असते तेव्हा तेथील बिहारी मंडळी मेट्रो प्रकल्पावर काम करीत असतात' या विधानाच्या पुष्ट्यर्थ राहूल गांधी यांनी काय पुरावा दिला आहे? काय विदा दिला आहे? त्यांनी किंवा त्यांच्या वरील विधानाचे समर्थन करणार्‍यांकडे या बाबतीत काही विदा असल्यास कृपया द्यावा म्हणजे विदा योग्य असल्यास पुढील चर्चा टाळता येईल, अनेकांचे टंकन्याचे कष्ट वाचतील :) पण जर कसलाही विदा/पुरावा देणे शक्य नसल्यास वरील विधान हे एक राजकारणी विधान आहे, एका राजनेत्याचे राजकीय फायदा उकळण्या करीता सत्य सोडून केले गेलेले विधान आहे हे मान्य करून ईथे चर्चा थांबवता येईल ;)

माझ्या वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, राहुल गांधीच्या भाषणाचा मुख्य रोख हा बिहारमध्ये ठप्प झालेली रोजगार निर्मिती हा आहे. हे खरे की खोटे हा भाग वेगळा. पण नितिशकुमारांच्या विकासाच्या मुद्द्याचा प्रतिवाद करताना त्यांनी काढलेले हे उद्गार आहेत. थोडक्यात, बिहारी माणूस कुठेही काम करायला तयार आहे पण त्याच्या राज्यात त्याला रोजगाराच्या संधीच उपलब्ध नाहीत. हे सध्याच्या राजकर्त्यांचे अपयश आहे. हा त्यांच्या राजकीय भाषणाचा मूळ रोख. पण मटाने त्यातील दुय्यम भाग तेवढा उचलला. त्याचा मथळा बनवला. काही मिपाकरांनी त्याला तिखट्-मीठ लावले... परिणाम ह्या काथ्याकुटात दिसतोच आहे...

In reply to by सुनील

"बिहार लोकांवर, इतर राज्यात जाऊन पोट भरण्याची वेळ आली" आमच्या मते इतकेच म्हणायला हवे होते. आता ह्यांना काय बोलायचे ? 'कसे बोलायचे' हेच जर का समजत नसेल तर काय ह्याच्या गळ्यात ***** पद घालून आपण कृत्य कृत्य होणार ?

सगळे प्रतिसाद वाचतोय. छान चर्चा चालु आहे. पण यात भाग घेण्यास मी असमर्थ आहे. तेव्हा तुमची चर्चा चालुद्या. :)

महाराष्ट्राचा विकास कष्टाळू बिहारी लोकांमुळेच : राजपुत्र राहुलजी
असेल. आपल्याला कल्पना नाही. मी स्वतः आळशी आणि कामचुकार आहे येवढे मला माहिती आहे आणि तेच माझ्यासाठी पुरेसे आहे.

क्लिंटन यांच्या म्हणण्याचे थोडे एलॅबोरेशन. इंदिरा - राजीव पंतप्रधान का झाले?- त्यांना लोकसभेतल्या खासदारांचा पाठींबा होता. त्यांना लोकसभेतल्या खासदारांचा पाठींबा का होता? - ते (आपल्यासाठी- म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांसाठी) मते मिळवू शकतात असे त्यांना वाटत होते. असे त्यांना का वाटत होते? - याला उत्तर म्हणून कुरुंदकरांनी एकदा लिहिलेले उद्धृत केलेले वाक्य लिहितो. ते इंदिरा गांधींविषयी होते पण ते कदाचित लागू आहे. "जेव्हा जेव्हा इंदिरा वि मोरारजी, इंदिरा वि कामराज, इंदिरा वि निजलिंगप्पा असे सामने झाले तेव्हा जनता निर्विवादपणे इंदिरा गांधींच्या मागे राहिली". टीप : कुरुंदकर हे इंदिरा गांधी आणि त्यांच्या काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. ज्यावेळी ते मते खेचू शकणार नाहीत असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटले (१९६९- सिंडिकेट, १९७८-चव्हाण-रेड्डी वगैरे, १९९९-पवार-संगमा) तेव्हा काँग्रेसमधल्या नेत्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड केले. पण प्रत्येकवेळी जनतेने त्या नेत्यांना झिडकारले ही वस्तुस्थिती आहे. राहुल गांधी कर्तृत्वहीन आहेत असे तुम्ही बहुसंख्य लोकांना पटवून ते निवडणुकीतल्या मतांमध्ये परिवर्तित करीत नाही तोपर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत. ते कर्तृत्वहीन आहेत असे मूठभरांनी ठरवणे याला हुकूमशाही म्हणतात. टीपः मी काँग्रेसला मत देतो ते माझ्या मनात गांधी घराण्याविषयी प्रेम आहे म्हणून का? तर नाही. जेव्हा गांधी घराण्यातला कोणी कॉंग्रेसचा नेता नव्हता १९९१ ते १९९९ त्याहीवेळी प्रत्येक निवडणुकीत मी काँग्रेसलाच मत दिले. कारण माझ्या मते पक्षातल्या व्यक्तीपेक्षा पक्षाची धोरणे हीच महत्त्वाची आहेत.

In reply to by नितिन थत्ते

राहुल गांधी कर्तृत्वहीन आहेत असे तुम्ही बहुसंख्य लोकांना पटवून ते निवडणुकीतल्या मतांमध्ये परिवर्तित करीत नाही तोपर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत.
अगदी असेच.

In reply to by नितिन थत्ते

>> राहुल गांधी कर्तृत्वहीन आहेत असे तुम्ही बहुसंख्य लोकांना पटवून ते निवडणुकीतल्या मतांमध्ये परिवर्तित करीत नाही तोपर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत. सहमत

In reply to by नितिन थत्ते

राहुल गांधी कर्तृत्वहीन आहेत असे तुम्ही बहुसंख्य लोकांना पटवून ते निवडणुकीतल्या मतांमध्ये परिवर्तित करीत नाही तोपर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत. ह्या वाक्यात विरोधाभास वाटतो. राहूल गांधी स्वतःकडे आणि काँग्रेसपक्षाकडे (ज्या पक्षाने देखील बिहार वरती राज्य केले आहे) सांगण्यासारखे काही नाही म्हणून फुटकळ (फिजूल) गोष्टींकडे लोकांचे लक्ष वेधत आहेत. अर्थातच त्यात यांची कर्तुत्वहीनता दिसते. असे या चर्चेत दाखवण्याचा उद्देश आहे आणि त्या आधारे बहुसंख्यांना पटवून देण्याच्या अनेक प्रयत्नांतील एक प्रयत्न आहे असे देखील म्हणता येईल. मग तसे कोणी करायला लागले तर अगदी फळ दिसले नाही (जसे काँग्रेसला प्रयत्न करूनही गुजरात मधे दिसले नाही तसे) तरी ते फिजूल कसे काय ठरते? :-)

महाराष्टात बिहारी जास्त आहेत की उत्तरप्रदेशीय?? महाराष्टात बिहारींमुळे जर विकास झाला तर गुजराती/पारशी/मारवाडींमुळे काय झालं ?? महाराष्ट म्हणजे फक्त मुंबई की अक्खे ३५ जिल्हे धरून ??

सेन्च्युरी झाली रे :)

बिहारी आणि उत्तर प्रदेशी यातील फरक मला जाणवलेला बिहारी लोकांची भाषा रफ असते, युपीवाले तसे सभ्य व आदराने बोलतात. बिहारी गुंड प्रवृत्तीचे आहेत, तुलनात्मक रित्या युपीवाले गुंडगीरि कमी करतात, युपीवाले यादव जास्त गुंडगीरी करतात. मेहनत करण्यात दोघेही सारखेच मेहनती आहेत. पण दोघातील साम्य कोणी जर त्यांचा बाप भेटला(वरचढ) तर लगेच पाय पकडायला तयार. समुहात असतील तर जगाला फाट्यावर मारतात. आता तेही समुहाने रहायला शिकले आहेत. त्यामुळे त्यांचेही मतदारसंघ आता तयार होऊ लागले आहेत. सध्या मुंबईत मतदार संघ आहेत. काही दिवसानी पुण्यात, कोकणात नक्कीच होतील. जय महाराष्ट्र

In reply to by आप्पा

बिहारी लोकांची भाषा रफ असते, युपीवाले तसे सभ्य व आदराने बोलतात असेल बॉ! पण भाषाशात्राच्या दृष्टीने उत्तर प्रदेशची पश्चिम हिंदी भाषा ही इंडो-आर्यन गटाच्या अंतर उपविभागत मोडते (पंजाबी, गुजराती प्रमाणे) तर, बिहारची भोजपुरी भाषा ही इंडो-आर्यन गटाच्या बाह्य उपविभागात मोडते (मराठी, उडिया, बंगाली प्रमाणे). असो, हे म्हणजे कैच्या कैच अवांतर झाले!!

क्लिंटन साहेब, तुमचे प्रतिसाद आवडले.. बराचसा सहमत पण तरीही काही शंका - भारतीय लोकशाहीमध्ये जनतेला प्रत्यक्ष पंतप्रधान निवडण्याचा हक्क नाही, निवडून आलेल्या खासदारांपैकी बहुमत असलेल्या पक्षाच्या खासदारांचे मत (पक्षी: त्या पक्षाचा अध्यक्ष) पंतप्रधान ठरवतात. त्यातही जर त्या निवडलेल्या व्यक्तिची इच्छा असेल तरच तो पतप्रधान होणार. उदा. २००४ मध्ये बहुसंख्य मत असलेल्या काँग्रेसच्या खासदारांचेही (जवळजवळ सगळ्याच) मत होते की सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावे पण तसे झाले नाही. सामान्यपणे निवडणूकीपूर्वी पक्षाचा पंतप्रधान कोण असेल हे आधीच लोकांपुढे आणले जाते पण तोच पंतप्रधान होईल ह्याची काही सक्ती नाहिच. म्हणजेच, जनतेचा पंतप्रधान कोण होणार हे जनतेच्या हातात नसून त्यांनी निवडून दिलेल्या खासदाराच्या हातात बरेचसे आहे, अगदी त्या पक्षाचे बहुमत असले तरीही (उदा. बारामती मध्ये कुणी सोनिया पंतप्रधान व्हावी म्हणून शरद पवारांना मत दिले असेल, तर ते मत तसे फुकटच! ) सांगायचा मुद्दा एवढाच, की एकदा निवडणूकीत खासदार निवडून दिले की पुढच्या निवडणूकीपर्यंत जनता काहीही करु शकत नाही, पंतप्रधान तर कितीही वेळा बदलता येऊ शकतो, त्यामुळे जास्तीत जास्त खासदारांची निष्ठा (कारण काहीही असो..) एखाद्या घराण्याकडे (इथे गांधी) असेल तर जनता काय करणार! घराणेशाही: मुळात घराणेशाही वाईट हे म्हणणेच आततायिपणाचे वाटते. धीरुभाइच्या मुलांनी चार चांद लावले, शहाजीच्या मुलाने मराठ्यांचे राज्य स्थापले ह्यात कुणाला नाही दिसत ती घराणेशाही? जेव्हा तुम्हाला लहानपणापासूमच घरात व्यावसायिक वातावरण मिळते, परिस्थिती/ माणसे कशी हाताळावीत ह्यांचे शिक्षण आपोआप मिळत जाते, अनुभवसंपन्नता मिळते, तशा विचारांचे संस्कार आंणि जोपासना होते, तेव्हा त्या मार्गाने प्रगती होणारच, तशी झाली नाही तरच नवल.. शिवाय आई-वडिलांच्या पुण्याईमुळे जर पाल्याला जास्त चांगल्या संधी मिळत असतिल तर तेही योग्यच, पुढे त्या संध्यांचे सोने करायचे की चिखल ह्यावर त्या मुलाचे कर्तुत्व मापायचे. सांगायचा मुद्दा काय, की प्रत्येक आईवडिल आपापल्या परिने मुलास योग्य संधी देणारच आणि मुलांनीही घ्यायलाच हव्यात नाहीतर समाज पुढे जाणार कसा.. राजकारणाचे बाळकडू मुलांना घरातच मिळ्त असेल तर चांगलेच आहे की, इंदिरा गांधींनाही मिळालेच ते नेहरूंकडून आणि मग पुढच्या पिढीकडे संक्रमित झालं ते. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की दुसर्‍याला घराणेशाही म्हणून हिणवायचं, स्वतः घराणेशाहीच जोपासायची आणि वर ही घराणेशाही नव्हेच अशी बिनधास्त मखलाशी करायची :) असो चालायचच!! अवांतरः निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावता येईल असं काहीतरी करायला हवं ब्वॉ!!

In reply to by उपास

सामान्यपणे निवडणूकीपूर्वी पक्षाचा पंतप्रधान कोण असेल हे आधीच लोकांपुढे आणले जाते पण तोच पंतप्रधान होईल ह्याची काही सक्ती नाहिच.
हो आपले म्हणणे योग्य आहे.आणि पुढे म्हटल्याप्रमाणे लोकप्रतिनिधीला परत बोलावायची तरतूद हवी हे पण पटण्यासारखेच आहे.पण माझा मुद्दा या चर्चेत ’गांधी म्हणून जन्माला येणे’ हे पंतप्रधानपदासाठीचे क्वालिफिकेशन आहे हा मुद्दा खोडून काढण्यासाठी आहे.तर मला म्हणायचे आहे की पंतप्रधानपदासाठीचे एकमेव क्वालिफिकेशन लोकसभेत बहुमत असणे आणि स्वत: संसदेच्या दोन पैकी एका सभागृहाचे सभासद असणे (आणि नसल्यास सहा महिन्यात बनणे) हे आहे. आणि जर का एखाद्या पक्षाने निवडणुकीसाठी अमुक एखादा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला आणि नंतर जिंकल्यावर भलत्यालाच पंतप्रधान केले तर ते Letter of constitution अन्वये चुकीचे नाही कारण प्रत्येक पक्षाने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे असे अजिबात बंधन नाही. पण ज्या लोकांसाठी लोकशाही राबवायची त्यांना मात्र फसविण्याचाच हा प्रकार होईल आणि म्हणून तो Spirit of constitution अन्वये अनुचित आहे असे मला वाटते. अवांतरः माझे प्रतिसाद आवडल्याबद्दल आणि तसे मुद्दामून म्हटल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by उपास

>>अवांतरः निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावता येईल असं काहीतरी करायला हवं ब्वॉ!! आपल्या लोकशाहीने परिपूर्ण होण्यासाठी एक पाऊल अजून पुढे टाकले पाहिजे असा निदान विचार कुठेतरी सुरु झाला आहे ह्याचे कौतुक वाटते. नाहीतर आपल्या लोकशाही किती महान आहे असे गोदाव्यांचे भजन गात असताना सामन्यांचा आक्रोश त्यात दाबला जातो. तरी पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न उरतोच. कारण आज पर्यंत त्यांच्या अस्तित्वाला जिथे कुठे थोडा धोका निर्माण झाला कि हे पांढरे दहशतवादी कसाही करून त्या व्यक्तीचा काटा काढतात, नाहीतर सरळ सरळ त्याचा खून करतात. भारतीय लोकशाही म्हणजे लोकांची एक क्रूर थट्टा आहे. बस्स बाकी काही नाही. तिचे गोडवे गाणार्यांना ती लखलाभो. क्लिंटन साहेबांना एक अवांतर प्रश्न. माहिती अधिकाराचा वापर करणार्यांचा खून करून मारून टाकणे, हे नागरिकशास्त्राच्या पुस्तकात लिहिले आहे काय ?

In reply to by गांधीवादी

क्लिंटन साहेबांना एक अवांतर प्रश्न. माहिती अधिकाराचा वापर करणार्यांचा खून करून मारून टाकणे, हे नागरिकशास्त्राच्या पुस्तकात लिहिले आहे काय ?
हे बघा श्री.गांधीवादी, या चर्चेची सुरवात झाली राहुल गांधींचे बिहारी लोकांविषयीच्या कथित वक्तव्यावरून आणि त्यांना ’युवराज’ आणि भावी पंतप्रधान म्हटल्यावरून. त्यांना युवराज आणि भावी पंतप्रधान का म्हटले याचे कारण ते गांधी घराण्यातील आहेत आणि म्हणून घराणेशाही आहे असे म्हटले हेच आहे बरोबर?म्हणजेच या चर्चेत बिहारी लोकांविषयीचे राहुल गांधींचे वक्तव्य आणि घराणेशाही असे दोन मुद्दे झाले. त्यातील बिहारी लोकांवरच्या वक्तव्यावर मी काहीही म्हटले नाही पण घराणेशाहीवर मी माझे भाष्य केले. जोपर्यंत लोक मतदानयंत्रातून एकाच घराण्यातील व्यक्तींना अधिकाराच्या पदांवर निवडून देत असतील तर त्याला घराणेशाही म्हणता कामा नये हा एकच मुद्दा मी परत परत मांडत आहे. राज्यघटनेचे spirit आणि कायदा याचे उल्लंघन करणारे प्रकार (गुन्हेगारी, मतदारांना लाच द्यायचा प्रयत्न करणे वगैरे) याचे मी अजिबात समर्थन करत नाही हे याच चर्चेत मी अनेक वेळा म्हटले आहे. तरीही परतपरत अमुक नागरिकशास्त्राच्या पुस्तकात म्हटले आहे का, तमुक म्हटले आहे का असे प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय? तुम्हाला इथे लिहिलेले प्रतिसाद वाचता येत नाहीत की जाणूनबुजून लिहिलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करायचे तुम्ही ठरवले आहे? आणि अशा प्रश्नांचा मूळ चर्चेतल्या एका तरी मुद्द्याशी संबंध आहे का? अकारण संबंध नसलेल्या मुद्द्यांना इथे उपस्थित करून चर्चेला वेगळा रंग देऊन तुम्हाला काय मिळते? सतीश शेट्टींच्या हत्येत राहुल गांधींचा हात आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? आता यापुढे असे बादरायण संबंध लावलेले प्रश्न विचारलेत तर त्याची दखल घ्यायलाही मी अजिबात बांधील नाही.

In reply to by क्लिंटन

>>जोपर्यंत लोक मतदानयंत्रातून एकाच घराण्यातील व्यक्तींना अधिकाराच्या पदांवर निवडून देत असतील तर त्याला घराणेशाही म्हणता कामा नये हा एकच मुद्दा मी परत परत मांडत आहे. आपल्या भावना, मुद्दे, सर्व काही पोहोचले. धन्यवाद. काही वेडेवाकडे बोलून गेलो असेल तर क्षमा करा. राजकारण म्हणजे, कोणीतरी निवडणुकीला उभे राहणे, आणि लोकांनी त्याला एक बटन दाबून निवडून देणे, ह्याच्या खूप खूप पलीकडे आजकाल गेलेले आहे, हे जो पर्यंत आपण हे मान्य करत नाही. तो पर्यंत आपला सूर एक होऊच शकत नाही. घटना, घटना, घटना असे हजारदा जरी ओरडून सांगितले तरी त्या कागदी गठ्यांचा वापर केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लोकांसमोर भाषणे झोडण्यासाठी होतो. त्या कागदाच्या गठ्यांना इतर वेळेस कुलुपात बंद करून त्यातील तत्वांवर बलात्कार होतो आणि असा हा बलात्कार वारंवार करून परत वर कायद्याच्या भाषेत क्लीन चीट मिळविण्यासाठी, लाखो लोकांसमोर हातात तालावर घेऊन उभे राहण्यासाठी, आणि मुंबईच्या लोकल्स मधून सुरक्षा रक्षकांच्या गरद्यासाहित फिरण्यासाठी घराणेशाहीच हवी असते.

In reply to by गांधीवादी

घराण्यातल्या नसलेल्यांनी पण गृहमंत्री होऊन सीबीआय कडून स्वतःला क्लीन चिट मिळवल्याचे (आणि सहकार्‍यांना वार्‍यावर सोडल्याचे) पाहिले आहे.

बिहारींमुळे मलेरिया होतो विकास नाय. हे राहुलजीना माहित नाय काय? आयला मलेरिया निर्मुलन का काय तो कार्यक्राम ताबडतोब घ्यायला हवा. म्हणजे बिहारींना हाकलायचं दुसर कारण शोधायची गरजच पडणार नाय. येवडा सोपा उपाय असतांना आपले विद्वान बिहारींच्या प्रश्नावर येवडा तात्विक आनि गहण वाद का घालत बसलेत काय कलत नाय. आमा शैणीकांचे उपाय कसे यकदम सोपे आनि सरळ असातात. धर की हान्न तिच्यायला !!! भेजा डोक्यात असला की लय तुरू तुरू आणि लय लांबवर चालतो. कारन गुडगे दुकत नायत ना! आता हे येवडं सगलं वर लिवलेलं कोण वाचणार ? एक बिहारी मच्छर आदमी को इतना हिजडा बना देती है?

राहुल गांधींच्या "मर्कटलीला' थांबवाव्यात सुरक्षा दलातील व्यक्तींची जात, धर्म, भाषा काढणे हा गुन्हा आहे. पण, त्यांनीच तो केला. राहुल गांधी यांना बिहारींचे एवढेच प्रेम असेल, तर त्यांना आपल्या मतदारसंघात घेऊन जा आणि विकास घडवा.