Skip to main content

जादु कि आणखी काय?

गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली काही दिवसातला माझा अनुभव असा कि ज्यांच्या खिजगणतितही मी नव्हते त्यांना मी हल्ली आवडायला लागलेय. हे लोक शाळा, कॉलेजात व शेजारी होते व आहेत. एक वर्गातली मुलगी आता समोर आली तरी बोलेल का अशि शंका होती तिने मला चक्क फेस्बुकवर अ‍ॅडलेय, वर मेसजेस व्र मेस्जेस. एकाने तर मुम्बइला आलिस कि लगेच भेट खुप गप्पा मारायच्यात म्हणुन निमंत्रण दिलेय. एका खडुस शेजार्याने पण कशी आहेस काय म्हणतेस म्हणुन मेसेज पाठवलाय. हि ३ उदाहरणे पण प्रत्य्क्शात खुप . आता ही फेसबुकची जादु कि आणखी कसली? हा मला प्रश्न पडलाय. तुम्ही जरा प्रश्न सोडवायला मदत कराल का?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9057
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

लोकांना हल्ली एकट वाटायला लागल आहे. आणि ऑरकुट व फ़ेसबुक ही माध्यम बरी वाटतायत. पण हीच मंडळी प्रत्यक्ष भेटाली तर कदाचित वेगळा अनुभव येऊ शकतो.

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

सहमत फेसबुक आणि ओर्कुट वर लोक वर्चुअल identity किंवा इमेज जपतात ! त्यामुळे असे मुखवटे धारी प्रत्यक्षात भेटले कि त्यांना split personality आहे कि काय असा वाटायला लागता. मि.पा. वरच बघा प्रत्येकाने स्वताला आगळीवेगळी नावं लावलीयेत

छान ग्रहयोग दिसतात. सध्या आमचे वाईट ग्रहमान आहे. असो समदे दिवस सारखे नसत्यात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

छान ग्रहयोग दिसतात. सध्या आमचे वाईट ग्रहमान आहे. असो समदे दिवस सारखे नसत्यात. >>> पकाकाका ,तुमच रुपांगी भविष्य तपासुन घ्या एकदा .. असो .. चुचुदेवी ...माझ्या बरोबर घडलेली फेसबुकाची जादु तुला माहीतच आहे ..काल,सर्वात पहिले तुच मला सरप्राईज केलस की !!

In reply to by सुहास..

पकाकाका ,तुमच रुपांगी भविष्य तपासुन घ्या एकदा ..
हल्ली वरपांगी भविष्य बी बघाया नकु वाटतय. सध्या आम्ही अंतर्मनात डोकावुन सोताचे (कु)(सु) रुप नीट पघतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

छान ग्रहयोग दिसतात...सध्या आमचे वाईट ग्रहमान आहे. अरे वा! प्रकाशराव ग्रहमान बघतात! याचा अर्थ प्रकाशरावांचे माहीत नाही पण ज्योतिषांचे (आणि साक्षात ग्रहांचे) ग्रहमान नक्कीच चांगले दिसतेयं! ;)

In reply to by प्रकाश घाटपांडे

काय झाले तुमचे ग्रहमान बिघडायला? मंगळ तडकला की राहू पिसाळला म्हणायचा?

In reply to by प्रकाश घाटपांडे

छान ग्रहयोग दिसतात. सध्या आमचे वाईट ग्रहमान आहे. असो समदे दिवस सारखे नसत्यात. अंधश्रद्धा वाढवणारा प्रतिसाद.

आता जग खुप बदलले आहे. लोकाच्या आवडीनिवडी तर आजकाल खुप विचित्र झाल्या आहेत. तेव्हा सांभाळुन रहा.

शांत करून घे एकदा.....

काही लोक नुसता फ्रेंड्सचा आकडा फुलवायचा म्हणून add करतात...जर ते प्रत्यक्षात नीट वागत नसतील तर काही कुणाला भाव द्यायची गरज नाही...सरळ डिलीट करून टाकायचं...हाय काय नी नाय काय..

दे ग तुझा फेसबुकचा अ‍ॅड्रेस!

अग मुलिंनो मी कय म्हणतेय्....कि ते लोक सम्बन्ध वाढवत आहेत. उगाच नाहि अ‍ॅड करतेत. लक्शात घ्या ना तुम्ही तरी.

In reply to by पर्नल नेने मराठे

सम्बन्ध वाढवताहेत ! कशा स्वरूपाचे सम्बन्ध वाढवताहेत ? उगाच अ‍ॅड नाही करतेत तर कशाकरता अ‍ॅड करतेत ? सम्बन्धान्करता का ? मला कहिच कळल नहि ! ;-)

In reply to by पर्नल नेने मराठे

अग मुलिंनो मी कय म्हणतेय्....कि ते लोक सम्बन्ध वाढवत आहेत. उगाच नाहि अ‍ॅड करतेत. लक्शात घ्या ना तुम्ही तरी. खी खी खी... ख्या ख्या ख्या... ;) अगं चुचे जी-मेलच्या स्टेटस मधे तुझा फोटो लावल्यावर समदी मंडळी पळुनश्यान गेली होती ना !!! ;)

बाहेर आलीस की काय चुचु? ;)

हातातून गेलेल्या शाळा कॉलेजच्या दिवसांची आठवण होते तेव्हा, 'तेव्हाचं' सगळंच गोड वाटायला लागतं. अगदी मैत्रिणींबरोबरची भांडणंसुद्धा. फेसबुकवरची ही जुनी-नवी मैत्री म्हणजे एकदा हातातून निसटून गेलेली वर्षं पुन्हा जगण्याचा एक प्रयत्न असतो तो. आठव जरा. जुन्या ओळखीच्या कोणीतरी फेसबुकवर किंवा ऑर्कुटवर हाक दिल्यावर तुला पण बरं वाटलं होतं की नाही?

९९.९९% हा स्व:ताचे कौतुक करुन घेण्याचा व बळच चेपु फ्रेंड्स काउंट वाढवायचा हा केविलवाणा प्रसिद्धी स्टंट आहे. ००.०१% पुर्वी कधीही भाव न दिलेले लोक अ‍ॅमवे, जपानी गादी इ इ विकत असतील बघ..

जपानी गादी.... आणि अ‍ॅम वे वाले हल्ली तसे थोडेसे कमी झालेत. हाय कसा आहेस . फार दिवसानी भेटलास रे? काय घरची मंडळी कशी आहेत? मुलं काय म्हणतात. तुला भेटायचे होते अशी चौकशी करणारा कोणी भेटला ( आणि त्याने नुकत्याच मिशा काढून टाकल्या असतील ) की नक्की समजायचे की अ‍ॅमवे वाला आहे. अरे जरा सल्ला हवा होता तुला कधी वेळ आहे असे कोणी म्हणाला की समजा जपानी गादी " एक जब्बार्र्दस्त प्लॅन आहे. तुझ्याशी बोलायचे आहे" असे कोणी म्हणाला की समजा व्हर्साटाईल . किंवा नेटफिनीटी. उगाच नेहमी तुमच्याकडे फारसे लक्ष्य न देणारा/री अगदी हसून बोलु लागला/ली की समजा तुमच्या घरात अ‍ॅमवेची तथाकथीत ती दोनशे रुपयेवाली टूथ पेष्ट आली म्हणून. बाय द वे अ‍ॅम वे विकणारांचे चेहेरे मात्र एकदम उत्साही झालेले असतात. काहीकाळ का होईना ही मंडळी एकदम सौजन्याने हसतमुखाने वागत असतात

In reply to by विजुभाऊ

कारण त्यांची जागा काही इतरांनी घेतली आहे. जसे की पॅन कार्ड, रिलायन्स इन्शुरंश पॉलीसी, आयुर्वेदीक औषधे वै. वै. :)

तरीच म्हटले हल्ली मिस्ड कॉल देणे का बर वाढलय तुझ....

In reply to by पैसा

तुम्ही कृपा करून कृपा करून ते फायरफॉक्स चे यक्षटेंशन Marathi Dictionary वापरा बॉ! म्हणजे आम्हाला तुम्ही नक्की काय लिहिता आहात हे समजून घेता येईल. मला बरेचदा वाटते की आता आपले काय... अर्धी लाकडे स्मशानात गेल्यावर कशाला हे... पण तुमचे मराठी वाचल्यावर असे वाटते की आत्ताच 'गेलो' आहे.

In reply to by पुष्करिणी

अग पुश्के .... त्याने तसे वागावे न्...सारखा माझ्या सॉउन्द्र्यावर जळत अस्तो बघ ;) =)) माझ्या वर जळुन का हा आता तरुन होणारेय.. जरा केलिन स्तुती तर काय बिघडेल..; उलट आम्हिच मान देउ ना वरिश्टांचा.

आज काल मेकअप ला वेळ मिळतोय हे सांगायच्या ह्या अट्टाहासाचा णिशेद! ;)

In reply to by ऋषिकेश

सारखे णिशेद णिशेद करतो आहेस. इतके णिगेटिव व्हायला काय झाले रे तुला? घरी भांडण झाले की काय? थांब जरा, मंगळ वृश्चिकेत गेला की बरे होईल सगळे मग! आणि सगळे 'चान चान' असेल तर वृश्चिकेत गेल्यावर सांभाळून रहा रे बाबा! :)

चुचुकाकू, तुमचे फेसबुकवर टाकलेले तुमचे तरुणपणीचे फोटो काढून टाका, प्रोफाईलला लावलेलाही २० वर्षांपुर्वीचा कॉलेजात जातानाचा फोटो काढून सध्याचा फोटो लावा. आणि आणखी आठवडाभरानं सांगा काय रिझल्ट्स मिळतात ते. :P

In reply to by धमाल मुलगा

+१. बाकी, त्या ठुशीच्या कहाणीसारखं काही झालंय का गं? म्हणजे अचानक मोठं घबाड वगैरे तुला सापडलंय का? किंवा किमान तशी वदंता उठ(व)ली आहे का? नायजेरियन लॉटरी वगैरे काही?

In reply to by श्रावण मोडक

तरूणपणाचे फोटोच काय, नायजेरियन लॉटरी काय ? छे छे !! चुचु , असे विचारवंताचे सल्ले मनावर घ्यायचे नसतात बर का ! तुझ आपल चालु दे..