मेथी पापडनु शाक
साहित्य : मेथीचे दाणे ५ टी स्पून ,किंचीत आंबट दही १ वाटी , पाणी अर्धा वाटी , कच्चे पापड ५, आवडत असल्यास टोमॆटो २ , मोहोरी , हळद एक चमचा , मीठ , तीखट , तूप/ तेल फ़ोडणी साठी
साधरण एक तास अगोदर मेथीचे दाणे भिजत ठेवावे,दही घोटुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात फ़ोडणीसाठी तूप/तेल(२/३ चमचे) तापवत ठेवावे.चांगले तापले की त्यात मोहोरी टाकावी , ही फ़ोडणी झाली की त्याच भांड्यात घोटलेले दही. थोडे पातळ करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकावे.
त्यात भिजवलेले मेथीचे दाणे टाकावे हळद , तिखट चवीपुरते घालावे. तीखट मीठ जरा कमीच टाकावे ( पापडात तीखट, खार/मीठ असते त्यामुळे)आवडत असल्यास टोमॆटो तुकडे करुन टाकावे व मेथीचे दाणे मऊ होई पर्यंत शिजु द्यावे.
चांगली उकळी आल्यावर एका पापडाचे चार तुकडे असे ५ पापड (कच्चे) तुकडे करुन टाकावे. पापड टाकल्यानंतर गॆस बंद करावा फ़ार उकळत ठेवु नये. ( अन्यथा पापडाचे तुकडे गोळा होतात).
वाढताना थोडे गरम करुन पसरट वाटीत वाढावे.
सूचना : यात कितीही इच्छा झाली तरी साखर गूळ वापरु नये./
: आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये.
वाचने
6909
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही ही ही
आळस
In reply to ही ही ही by वरदा
पण....
किंचीत
In reply to पण.... by स्वाती राजेश
शाक
पापड
एकदम..
वेगळा प्रकार..
ह्म्म...!
पेठकर काका
In reply to ह्म्म...! by प्रभाकर पेठकर
भले...
In reply to पेठकर काका by विजुभाऊ
ओ पेठकर काका
वधारे...
In reply to ओ पेठकर काका by वरदा
ह्म्म्म
In reply to वधारे... by प्रभाकर पेठकर
वाहवा ..
पापडाची भाजी
कच्च्या
In reply to पापडाची भाजी by मनिष