Skip to main content

तुम्ही कोजागरी पौर्णिमेला काय पिता?

लेखक अवलिया
बुधवार, 20/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1220
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

'इतर' ला मत दिले आहे. कारण आम्ही तर 'केसरयुक्त मसाला' दूध पितो. केसर आणि मसाला असे २ वेगळे पर्याय असल्याने नाईलाजास्ताव 'इतरां'चा सहारा घ्यावा लागला.

In reply to by प्रचेतस

हम तो कुछ नई पीता है.

आम्ही शेजार्याच्या झाडाच्या कैर्या चोरुन आणतो न पन्हे करुन ते पितो. नानाच भारिच डिग्रेडेशन होतेय हे लक्शात येतेय. फाजिल धागा.

In reply to by पर्नल नेने मराठे

>>>आम्ही शेजार्याच्या झाडाच्या कैर्या चोरुन आणतो न पन्हे करुन ते पितो. ऑक्टोबर महिन्यात कैर्‍या ! वा ! तुमच्या शेजार्‍यांच्या आंब्याला लवकर मोहोर येतो असे दिसते. >>नानाच भारिच डिग्रेडेशन होतेय हे लक्शात येतेय. आता उरलो (फुटकळ) कौलापुरता >>>फाजिल धागा. सहमत.

In reply to by अवलिया

__/\__ का बरं तुम्हाला हा कौल पाहिजे आहे? (भरपूर बदाम + पिस्ते + जायफळ + केशर + दुध + साखर हे माझ आवडतं मिश्रण आहे....फेवरेटादी आंग्ल शब्द वापरायची भि वाटते आज्काल्.....धागा राहितो बाजुस अन मिपाकर भलत्याच विषयांवर चर्वण करीत बसतांत्. हे काहि बरें नव्हे)

In reply to by अवलिया

>>आता उरलो (फुटकळ) कौलापुरता +१ सहमत आहे. नानाचे पतन झाल्याचे(केल्याचे) पाहुन डॉले पानावले.

In reply to by सुनील

ईतर. आम्ही स्वर्गात असल्याने, पियुष पितो. आणि कधी कधी पृथ्वीतलावर असलो तर नाना लोकांचे रक्त पितो.

In reply to by मराठमोळा

नाना लोकांचे म्हणजे "वेगवेगळ्या लोकांचे" असे म्हणायचे आहे की "नाना नाव असलेल्या लोकांचे" हे स्पष्ट करावे.

असले फुटकळ कौल काढण्यापेक्षा नानाने त्याच्या पुर्वीच्या क्वालिटीला स्मरुन उत्तम लेख, ललित ह्याची आम्हाला भेट द्यावी असे आवाहन कम विनंती करतो. नान्या ह्यापेक्षा चांगले आणि विधायक जरुर लिहु शकतो असा विश्वास आहे. कित्येक दिवसात नान्याकडुन असे काहीच न आल्याने वाटलेल्या वैतागामुळे हे ४ शब्द लिहीत आहे. बाकी चालु द्यात, जे आवडले नाही ते स्पष्ट सांगितलेले बरे म्हणुन एवढे खरडण्याचे कष्ट घेतले, नान्या आहे म्हणुन जरा आवर्जुनच घेतले. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

उत्तम लेखनाची विंनत्या, आवाहने करून झाले आहेत.पण तुम्ही केलेल्या प्रतिसादलेखनाचे कष्ट कामी येतील असेच नाही. तरीदेखील मी पण टंकायचे कष्ट घेते आहे कारण नेहमीसारख्या उत्तम लेखनाची अपेक्षा आहे.

In reply to by sneharani

त्याचं काय आहे स्नेहाराणी की आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहु. लेट्स सी काय होतेय ते, अगदी काहीच बदल होणार नसेल तर उगाच दगडासमोर डोकं आपटण्याचा शौक आपल्यालाही नाही. नंतर आपला मार्ग मोकळा आहेच की. :)

In reply to by छोटा डॉन

अगदी बरोबर बोललात डान्राव. आम्ही सुद्धा मध्यंतरी दगडासमोर डोके आपट आपट आपटले. तुम्हाला म्हणुन सांगतो अक्षरशः काहीही उपयोग झाला नाही. नुकतेच तीन दिवसांपुर्वी सुद्धा परत आपटले. त्या दगडाच्या समोरच्या होमकुंडावर अजुनही आमच्या कपाळावरच्या सुकलेल्या रक्ताचे डाग दिसतील (पक्षी- योग्य त्या ठिकाणची आमची खरड बघावी) असो. जसे तुम्ही मार्ग निवडणार सांगत आहात तसाच आम्ही काही मार्ग निवडला आहे. भला असो बुरा असो आम्हाला आमच्या मनातल्या निषेधाला वाट करुन देण्याचा हा मार्ग योग्य वाटत आहे. जर कुणाला तो मार्ग योग्य नाही असे वाटत असेल तर त्यांच्या मताचा आदर आहे. जर कुणाला धोरणात बसत नाही असे वाटत असेल तर धागा अप्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य आहे. आणि यावर जर आमचाच त्रास असेल तर सदस्यत्व सुद्धा रद्द करु शकतात. एकतर्फी वागणुक सगळेच करु शकतात. असो. धन्यवाद.

In reply to by अवलिया

नाना !! नाना !! किती किती विनय रे हा !! आपल्याला विनयादशमीच्या शुभेच्छा (शब्दसौजन्य : श्री रा रा आनंदयात्री .)

In reply to by अवलिया

नान्या आजकाल चौपाटी वर जात नाहीस का ? नाही म्हणजे चौपाटीवरची लेखमाला बंद झाली आहे म्हणुन....

इतरला मत दिले आहे कारण नेहमी मसाला, केसर, जायफळ आणि चारोळे घालून आटवलेले गरम दूध पितो. यावेळी मात्र एका काव्यवाचनाच्या कार्यक्रमास हजेरी लावून तिथे कविता वाचून श्रोत्यांचे रक्त पिण्याचा मनसुबा आहे.

"नाना हल्ली फार पियाला लागला आहे" असं परवाच कुठेतरी प्रस्थापितांनी लिहिलेलं वाचलं होतं.

In reply to by नितिन थत्ते

मग ठीक आहे, मी तेच म्हणत होतो, कि अजून कशे नाही पाणावले. काये, हल्ली डोळे पाणावल्याशिवाय प्रतिसादाला वजन येत नाही हो. नॅचरल नाही पाणावले तर डोळ्यात ग्लिसरीन टाकून घ्यावे लागते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>आमच्या कुळातील इतर काहीजण माणसाचे रक्त पितात. तसेच पितात कि गरम करून साखर घालून पितात ? म्हणजे नंतर आम्हाला पण कोशिश करायला.

In reply to by गांधीवादी

>>>म्हणजे नंतर आम्हाला पण कोशिश करायला. मी चुकुन कोशिंबीर वाचलं. च्यायला...चष्मा बदलायला पाहिजे.

इतरला मत दिले आहे. पहिल्या पाचही दुधाच्या प्रकाराशिवाय आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे बासुंदीपर्यंत न आटवलेले दूध. थोडेच आटवायचे आणि केशर, पिस्ते, जायफळ घालायचे. नाना माझ्या धाग्याला आवर्जून प्रतिक्रिया देतात म्हणून मीही त्यांच्या धाग्याला प्रतिसाद देते आहे नाहितर त्यांच्या लेखणीतून यापेक्षाही चांगले लेखन येउ शकते.

इतर... पिवळा रंग प्राप्त झालेले कोणतेही पेय चालते....

मसाला दूध...! -दिलीप बिरुटे