Skip to main content

रंगांच्या रेषा

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 19/10/2010 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
झुकझुक अगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी! पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाउया!! अगदी मामाचं गाव नसलं तरी इकडे तिकडे प्रवास करताना आपण आगगाडीने प्रवास करतो. आपल्या भारतात मोठी शहरं सोडली तर सगळी कडे डिझेल इंजिनं आगगाडीला...पण वाफेवरचं इंजिन असणार्‍या माथेरान, दार्जिलिंगच्या गाड्यांची बातच और.... असाच एक अनुभव घेतला कनेटीकट मधे. इसेक्स स्टीम ट्रेन चा. फॉल कलर्स साठी.. काही जुने इंजिन्स रेल्वेचे जुने डबे संवर्धन करून ही ट्रेन बनवली आहे... अगदी डोंगरदर्‍यातून जात नसली तरी ही ट्रेन जंगलातून १२ मैलाचा(६ जायचे +६ परतायचे) प्रवास करते. कनेटीकट नदीच्या खोर्‍यातून ह्या गाडीचा प्रवास होतो. ह्या आगगाडीसोबतच बोटीच्या प्रवासाचेही तिकीट हवे असल्यास काढता येते. आम्हाला दुसर्‍या ठिकाणीही जायचे असल्याने आम्ही बोटीचा प्रवास केला नाही. तसेच दोन-तीन दिवसापुर्वी थोडा पाऊस होऊन गेल्याने फॉल कलर्सही थोडेच बघायला मिळाले.. :( क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10082
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

तिच्यायला यात पण "क्रमशः"?? फटू मस्तच! त्यात प्रभोंनी यावेळी थोडंफार लिहिण्याचे कष्ट घेऊन शून्यावरून तडक बारा वाक्यांवर झेप घेतली हे पाहून आनंद झाला! एखादं मस्त प्रवासवर्णन लिहा द्येवा आता! :)

In reply to by धमाल मुलगा

मेघवेड्याशी सहमत असलेल्या घमाल मुलगा शी सहमत

In reply to by पैसा

वरील तिघांशी सहमत :)

In reply to by नंदन

नंदनशी सहमत. :)

In reply to by मराठमोळा

+४ शी सहमत

In reply to by गणपा

सहमत आहे.

In reply to by मेघवेडा

+९

In reply to by अवलिया

+१० १० हा माझा आवडता क्रमांक आहे.

मस्त फोटू! जुनी इंजिने आवडली.:) आता आम्हीही पिकली पानं असल्याने फॉल चे रंग बघायला आवडतात.;)

प्रवासाची एकंदर संकल्पना, त्यातल्या अगिनगाडीने जाण्यातला आनंद , ट्राय-स्टेट मधला फॉल सीझन... भरपूर क्रमशः येऊ देत. वाट पाहातो. अवांतर - कुणी भारतातल्या , युरोपातल्या प्रवासाची चित्रे टाकेल का कधी ? :-) आणिक एक अवांतर : लेखाचे शीर्षक दिलखेचक आहे. दोन साध्या शब्दांच्या संयोगाने निराळेच कायतरी निर्माण होते त्यातले.

रंगांची उधळण फॉलमध्येच अनुभवावी! अजून फिरा आणि फोटु काढा!

सार्‍यांशी सहमत !!!!!!!!!! एव्हढ रंगाळ असुनही ' थोडेच पहायला मिळाले म्हणुन टाकलेल्या रडक्या स्मायलीचा निषेध' !! छान झालाय प्रवास, अन कुं उं आगीन गाडी बी येकदम झक्कास ! देशील किती प्रभो तु?

प्रभो, फोटो आवडले. 'रंगाच्या रेषा' शीर्षक तर सुपर्ब...! -दिलीप बिरुटे

मस्त फोटो आलेत. बाकी जरा लिहीत जा की!

सही रे प्रभो

छानच प्रभो काका...

मस्त फोटो. शेवटचा फोटो कुठला आहे? अथेन्स, जॉर्जिया येथे मिलेज अव्हेन्यू ची एक गल्ली अश्याच एका तळ्याशी संपते. खूपच साम्य वाटलं म्हणून विचारलं. अर्थात अथेन्स सारख्या गावात कोणी जात नाही त्यामुळे हे तिथले नाही याची खात्री आहे. :)

In reply to by नीधप

शेवटचा फोटो हा ' डीप रिव्हर' या गावातल्या कनेटीकट नदिवरच्या धक्क्याजवळचा आहे. तिथून जवळूनच (वर लिहिलेली)बोट राईड मिळते.