Skip to main content

दुचाकीवर चारपायी

लेखक सुत्रधार यांनी मंगळवार, 19/10/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
दसर्‍याला दुचाकीवरुन जरा बाहेर पडलो आणि एक अविस्मरणिय द्रुष्य पहिल. 2V4
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4634
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

:)

१) ट्र्फीक तुरळक आहे, २) दुचाकी वाहनचालक एकाच व योग्य रेषेत जात आहेत ३) रस्त्यावर खड्डे नाहीत

In reply to by सहज

४) ड्रेनेजेच्या खड्ड्यावर (मॅनहोलवर) झाकणंही आहेत. ५) रस्त्यावर दिशादर्शक फलक आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुत्रधार एकदा शहराचे नावही सांगून टाकाच! एक म्हण म्हणायची हुक्की आली आहे!

In reply to by चिंतामणी

पुणे तिथे काय उणे! उगाच पुण्यात गर्दी, रस्त्यावर खड्डे अश्या बोंबा मारायला लोकांना आनंद होतो. अविस्मरणीय पुणे!

In reply to by सहज

आहे खरं! एकाच बाईकवर दोन मोठे, दोन पोरं आणि एक बोकड एवढा ऐवज विद्यापीठाच्या रस्त्यांवरून जाताना पाहिला आणि पुणं अविस्मरणीय असण्याची खात्री पटली.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी अगदी त्या बाईकची 'एम एच - ०४' पाटी पाहीली होती! अजुन काय काय अदभूत बघायला मिळणार पुणेकरांना कोणास ठावूक!

In reply to by सहज

एवढा अद्भुत प्रकार बाईकवर दिसत असताना नंबरप्लेट बघण्याचं सुचलं नाही! कदाचित MH-२० सुद्धा असेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल अशी कुशंका होतीच. ती खरी ठरली हे पाहून अंमळ हळवा झालो.

In reply to by सहज

आत नवी विटी नवं राज्य साहेब.. ..अजूनही "अंमळ हळवे" होता? छ्या! डोळे पाणावले हे वाचून

पुणेच आहे.. दिशादर्शक पाटीच्या बाजुच्या पाटीवरचे घोडीवरचे महाराज आणि त्यावर पहिल्या ओळीतील दोन अक्षरी शब्द यावरून पुणे असल्याची पूर्ण शक्यता आहे

In reply to by ऋषिकेश

>>पुणेच आहे सहमत आहे. फोटुत दिसणारी समोरची पीएमटी, दत्तवाडी, दांडेकर पुल, आणि राजेंद्रनगरला रस्ता दाखवणारी पाटी (पाटीचा पॅटर्न पण पुणे महापालिकेचाच), आणि डिझेलवर चालणारी सहा आसनी रिक्शा. दुचाकीचा नंबरः एम एच १२ - एफ जी - ९७९९ शेजारच्या दुचाकीचा नंबरः एम एच १२- सीडी-४१४९ डाव्या बाजुला कुदळे आणि पाटील बिल्डर्सची बिल्डींग. सिंहगड रोडच्या आसपास किंवा मित्रमंडळ कॉलनीच्याअ आसपास असायला हवा हा रस्ता. :)

आईगं !!! त्या कुत्र्याच्या (फटफटीवरचा मागील प्राणी) सुरक्षेचं काय? भसकन ब्रेक मारला कि काय होईल त्या बिचार्याचं? काय लोक तरी !!!

In reply to by शिल्पा ब

कुत्रा त्या चालकाचा आहे असे गृहित धरता येईल का? दुचाकी चालवताना मागे अचानक कुत्रा येऊन उभा राहिला (त्यालाही चालायचा कंटाळा आला असेल) तर त्या चालकाचे काय होईल बिचार्याचं? काय कुत्रे तरी!!!

साधारण माणिकबागेचा भाग असावा.. सुत्रधार मित्रा, घरची आठवण करुन दिलीस! मी बिग-बझार पाशी रहातो.. :)

शिंगडरोडच्या इंडिनॉयल पंपासमोरचा रस्ता आहे!

पहावं ते नवलच! मंगेश तेंडूलकरांचं व्यंगचित्र ष्टाईल दिसतंय अगदी. मागे एका दुचाकीस्वार आईने लहानगीला गाडीवर उलटं (तिच्याकडं पाठ करून ) बसवलं होतं आणि रस्त्यावरच्या खड्यांमुळे ती एवढीशी मुलगी सतत अंगात आल्यासारखी हलत होती.. आता पडते की मग पडते असं झालं होतं... त्यांना चालत्या गाडीवरच गाठून ते सांगितलं तर म्हणे, "ती सरळ बसतच नाही गाडीवर, तिला तशीच सवय आहे.. पडत नाही!!!" ;-) एकदा भर दिवसा गाडीवरून जाताना एका गाडीवाल्याला "तुमचा हेड लाईट चालु आहे" अशा अर्थाचे हाभाव केले... तो वळून परत आला आणि आम्हालाही त्याने तसेच हाभाव केले... पाहिलं तर आमच्याही गाडीचा हेड लाईट चालु होता.. ;-)