दसरा मेळावा
कालच मुंबईत दसरा मेळावा पार पडला.काही लोकाना तो तमाशा वाटला त्याबद्दल वाईट वाटले.बर असो,परत एकदा आपल्या लाडक्या साहेबानी शिवसैनिकाना नवा विचार व नवा नेता दिला.तो नवा विचार कोणता हे खर्या शिवसैनिकाला पुढच्या दसर्या पर्यंतदेखिल कळत नाही हे एक दसर्या मेळाव्याचे विशेष असते.साहेबाची प्रत्येक दसर्या मेळाव्याला कुठेना कुठे भगवा फडकवण्याची इच्छा असते,ह्या मेळाव्याला त्यानी एकदम साधी डोंबिवलीत झेंडा फडकवण्याची इच्छा व्यक्त केली. गेली ५ वर्षापासुन विधानसभेवर झेंडा फडकवण्याची इच्छा मात्र त्यानी त्याचा दोन पिढ्या बघुन दाबुन ठेवली असण्याची शक्यता जास्त वाटते.
साहेबानी सर्वाना परत एकदा शिवसेनेत घराणेशाही नसल्याची पुंगी वाजवुन दाखवली व टाळ्या मिळवल्या. नंतर त्यानी उदयोन्मुख युवानेते श्री मा.आदित्य ठाकरेजीना तलवार बहाल केली व त्याना युवकांच्या साठी काम करण्याची इच्छा असल्याची डरकाळी फोडली.आता आदित्यजी कोणत्या घराण्याचे आहेत असा कोता प्रश्न काही लोक विचारु शकतील .त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. युवकांच्या साठी काम करण्यासाठी आदित्यसाहेबाना दसरा सोडुन एकही चांगला मुहुर्त मिळाला नाही हे एक दसर्या मेळाव्याचे वैशिष्ट होते.आदित्यसाहेबानी तलवार उंचावुन काम करण्याची प्रतिज्ञा घेतली. आता तलवारीने काय काम करायचे हे एक मोठे कोडेच आहे.
नंतर मा. उध्दवजी ठाकरेनी ठाकरे शैलीत महाराष्ट्र सरकार वर नाकर्तेपणाची टिका केली. शेतकर्याच्या आत्महत्या,गाळपा अभावी शिल्लक राहणार उस,कापसाला दर मिळाला पाहिजे,रस्त्यांची दुर्दशा,भुखंडाचे असमतोल वाटप अश्या कित्येक विषयांवर भाषणकरुन त्यानी सरकार दोषी धरले.त्याचे चौफेर आरोप बघुन शिवसैनिक संतप्त झाला व मनातल्या मनात उध्दव साहेबाना मुख्यमंत्री करण्याचा मनात संकल्प केला.परत एकादा गद्दाराना शिव्या देण्यात आल्या व दुसर्या पक्षातील वाट चुकलेल्या लोकाना पवित्र करुन सेनेत प्रवेश देण्यात आला.आदेश भावोजीच्या कार्याची दखल घेवुन त्याना सचिवपदी नेमण्यात आले .
अश्या विवीधअंगी नटलेल्या शिवसेनेच्या दसर्यामेळाव्याची काल सांगता झाली.
याद्या
2074
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
:)
रा.रा. श्री. उद्धव ठाकरे
राज आणि उद्धव यांच्यातील फरक
शिवसेनेत घरानेशाही नाही
वृत्तांत
शेवटची घरघर !!