Skip to main content

तुम्ही देवळात नमस्कार कुणाला करता?

लेखक अवलिया
सोमवार, 18/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1271
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

In reply to by गांधीवादी

हा कौल वाचुन नान्याला नमस्कार केला आहे याची नोंद घ्यावी. नवीन पंखाकरिता आगावु शुभेच्छा !!

In reply to by अविनाशकुलकर्णी

नमस्कार समोरच्या मूर्तीला करत असले तरी मनातून तो नमस्कार प्रकांड पंडित नानासाहेब पाध्ये ह्यांनाच असतो.

In reply to by Nile

कॉलेजात असताना मी व माझी मैत्रिण रोज देवळात जायचो कारण वेगळेच असायचे. हिचा मित्र त्यावेळेत रस्त्यावरुन राऊन्ड मारायचा म्हणुन. मग दसर्याला त्याने गाडी थाम्बवुन सोने दिलेन. मग ते २घे व मी हि देवळात गेलो. मग मात्र नंतर आम्ही ३घे देवळातच भेटायचो =)) माझी मेली उगाच मधे मधे फरफट..

In reply to by गांधीवादी

इतर ला मत दिले आहे. उत्तरः सर्वप्रथम मला स्वतःला. खुलासा : एका दिवशी एक कोल्हा नदीत पडला. कोल्हा पाण्यात बुडू लागला. तो ओरडू लागला " जग बुडले जग बुडले जग बुडले" इतरानी त्याला बाहेर काढले दोन रट्टे देऊन विचारले " लेका तू बुडतो आहेस आणि जग बुडाले म्हणून काय ओरडतोस?" कोल्हा म्हणाला " मी बुडलो म्हणजे माझ्यापुरते तरी जग बुडल्या सारखेच आहे ना?"

In reply to by विजुभाऊ

इतरला मत दिले आहे. आम्ही मंदिरात जात नाही. गेलो तरी कोणाला नमस्कार करीत नाही. त्यापेक्षा 'ब्लफ मास्टर' मधील नाना पाटेकर प्रमाणे स्वतःलाच नमस्कार करतो ;) (आज काल नवीन प्रतिक्रिया लिहायची सुविधा दिसत नाही. त्यामुळे एका प्रतिक्रियेला उत्तर म्हणून माझी प्रतिक्रिया लिहित आहे.)

In reply to by गांधीवादी

इतर ला मत दिले आहे. उत्तरः सर्वप्रथम मला स्वतःला. खुलासा : एका दिवशी एक कोल्हा नदीत पडला. कोल्हा पाण्यात बुडू लागला. तो ओरडू लागला " जग बुडले जग बुडले जग बुडले" इतरानी त्याला बाहेर काढले दोन रट्टे देऊन विचारले " लेका तू बुडतो आहेस आणि जग बुडाले म्हणून काय ओरडतोस?" कोल्हा म्हणाला " मी बुडलो म्हणजे माझ्यापुरते तरी जग बुडल्या सारखेच आहे ना?"

मी देवळात एकटा कधीच जात नाही. कोणाबरोबर नाईलाजाने जावे लागले तर जातो आणि मूर्तीसमोर हात जोडून उभा राहतो. मनात त्यावेळी काहीही नेहमीचे विचार असतात. बहुतेकवेळा असली तर भिंतीवरची चित्रे पाहतो. छान असतात. मी नास्तिक आहे की आस्तिक आहे की आणखी काही याचा कधी विचार केला नाही. तशी गरज वाटली नाही.

इतरांचे मन राखण्यासाठी किंवा सोबत म्हणून किंवा वाद घालायचा नव्हता म्हणून देवळात गेलो तर देवापुढे उभा राहून हात जोडतो. (सबब वरील कुणालाही नाही या पर्यायाला मत दिले आहे).

ठरवुन कुणाला नमस्कार करीत नाही. कुठेही गणपतीची मुर्ती दिसली की आपसुक हात जोडले जातात. नंदी कासव यांना कधी कधी थोपटावस वाटत. बरेच वेळा (कदाचीत चार लोक करतात म्हणुन) देवळाच्या पहिल्या पायरीला ही केलाय. देवळाच्या बाहेर बसलेल्या कृष भिकार्‍याला पैसे देताना त्याला पण नमस्कार केलाय. (कदाचीत तो मला करतो म्हणुन प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन असेल. तोही भिकारी आणि मीही. फरक काय तो फक्त कपडयांचाच) बाकी सुहाश्याशी सहमत. या कौलात वरवर काही गैर दिसत नाही पण कौलफोड्या नाना असल्याने काही खर नाही. आता दुकान काढाच पंखांच. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा तुझ्यासाठी अजुन एक देऊळ सांगतो. कमला नेहरु बागेच्या जवळच दत्ताच मंदीर. गुरुवारी संध्याकाळी गेलास तर किमान दोन तास तुला नमस्कार करावा लागेल :P

मी तरी देवाच्या मुर्तीकडे पाहुन देवाला नमस्कार करतो. समोरच्या कासवाला आणि नंदीला पण करतो. कधीकधी पहिल्या पायरीला पण करतो. पण प्रामुख्याने देवाला.

मी देवाला, नंदिला, कासवाला सर्वांना नमस्कार करतो. व एकच मागतो. "देवा मला या देवळाचा मुख्य ट्रस्टी बनव."

देवळात (म्हणजे देवळाच्या आत) म्हणून पुढे देवळाबाहेरील नंदी, कासव, एखादे प्रतिक, पायरी, कळस यांचे ऑप्शन्स का बरे? असो, मी माननीय अवलिया साहेबांना त्यांच्या नावाच्या मागे आणि पुढे प्रत्येकी दोन काड्या लावाव्या असे सुचित करतो. त्याशिवाय असे कौल टाकणे व्यर्थ आहे असे वाटते.

In reply to by अनामिक

>>>>देवळात (म्हणजे देवळाच्या आत) म्हणून पुढे देवळाबाहेरील नंदी, कासव, एखादे प्रतिक, पायरी, कळस यांचे ऑप्शन्स का बरे? देऊळ म्हटले म्हणजे केवळ गाभारा अभिप्रेत नसुन देवळाच्या आतला भाग, बाहेरचा भाग आणि एकंदर परिसर समाविष्ट होतो. म्हणुन सर्व पर्याय ( तेच ते ऑप्शन्स) दिले आहेत. >>>>असो, मी माननीय अवलिया साहेबांना त्यांच्या नावाच्या मागे आणि पुढे प्रत्येकी दोन काड्या लावाव्या असे सुचित करतो. त्याशिवाय असे कौल टाकणे व्यर्थ आहे असे वाटते. आपल्या सुचने बद्दल धन्यवाद. कौल टाकण्यासाठी नावात विशिष्ट अक्षरे असलीच पाहिजेत याची कल्पना नव्हती.

In reply to by अवलिया

कौल टाकण्यासाठी नावात विशिष्ट अक्षरे असलीच पाहिजेत याची कल्पना नव्हती. अक्षरे नाही हो काड्या हव्या. काड्या असल्या की कौलारूच्या नावाला एक वेगळाच भारदस्तपणा येतो.

नंदी, कासव, उंदीर वगैरे भारी गोड असतात. त्यांना नमस्कार करते. मग देव-देवी आदिंना. मला देव आणी देवी जोडीने आवडतात एकटे नाही. इतर देवांचे भरभर आटपते पण पार्वतीमातेच्या पायाशी ५ मिनीटं बसून भक्तीभावपूर्वक नमस्कार करते. गणपतीला ३ प्रदक्षिणा घालते.

In reply to by शुचि

नंदी, कासव, उंदीर वगैरे भारी गोड असतात. त्यांना नमस्कार करते.
मी चुकून नंदन वाचलं! ;-) आम्ही फक्त देखल्या देवा दंडवत घालतो, त्यासाठी देवळात जायची गरज नसते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

देवबाप्पा तुम्हाला वरचे वर भेटतात हे वाचुन आनंद झाला. बरेच दिवसात ईकडे फिरकले नाहीत.

In reply to by गणपा

काहीतरी गल्लत होतीये मालक. (श्रेयअव्हेर: डान्राव!) आम्हाला बसल्या जागी गिळायला देणार्‍या, काही काम न करता पगार देणार्‍या मायबाप देवाबद्दल मी बोलत होते. असो. चालायचंच. अवांतरः आम्ही देवाला थंडीत स्वेटर वा पावसात रेनकोट घालत नाही.

आपले नेते देवळात जाऊन कुठे बघतात तसे बघावे... ;)

In reply to by विकास

अत्यंत बोलकी चित्रे व प्रतीक्रिया :)

एक तर देवळात जातच नाही...गेलेच तर आधी बाहेर बसलेल्या भिकाऱ्याला, मग कळसाला, मग पहिल्या पायरीला, मग शेवटच्या पायरीला, मग नंदी, कासव, घोडा काय असेल त्याला, मधेमधे येणाऱ्या लोकांना, मग पुजाऱ्याला अशे नमस्कार करत करत देव्हार्याजवळ पोहोचले कि देवाला....आणि हा कौल वाचल्यावर तुम्हाला.

'इतर' ला मत दिले आहे. महाराष्ट्रात अनेकानेक मंदिरे आहेत. त्यापैकी अचानक श्रीमंत झालेल्या मंदिरांच्या नादी लागत नाही. शिर्डी वगैरे...त्यांना दुरूनच नमस्कार. पण ह्याच पुरोगामी महाराष्ट्रात कोरीव कामाने रचलेली अनेक शिल्पसमृद्ध हेमाडपंथी मंदिरे आहेत उदा. खिद्रापूरचे कोपेश्वर, नासिकचा काळाराम, नारोशंकर. सर्व ज्योतीर्लिंगे, पुण्याजवळचा भुलेश्वर, त्रिशुंड गणपती, वेरूळ लेण्यातील कैलास लेणे, हरीश्चंद्रेश्वर, रतनवाडीचा अमृतेश्वर, कुकडेश्वर, देहू, आळंदी ही संतांची मांदियाळी तसेच इतरही ज्ञात-अज्ञात. मी नमस्कार करतो ते ह्या अशी समृद्ध मंदिरे घडवणार्‍या कलाकारांना, त्यांनी घडवलेल्या मुर्त्यांना. मनोभावे.

देवळासमोर आलो की आधी कळसाला नमस्कार करतो. चमचमता कळस, सुंदर गोपुरे ह्यांच्यासमोर आपोआप नतमस्तक होतो. देवळात्/गाभार्‍यात शिरताना पहिल्या पायरीला उजवा हात आपोआप स्पर्शुन कपाळाशी जातो. (हे स्टेजवर जाण्यावेळीही आपोआप व्हायचं तसंच.) देवळाच्या मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर गाभार्‍याकडं तोंड करुन नंदीला, कासवाला नमस्कार करतो. गाभार्‍यात गेल्यानंतर गारेगार पिंडीवर डोकं टेकलं की मग त्यापुढचे काही क्षण (की मिनिटं? ठाऊक नाही.) मात्र काऽऽही कळत नाही. मी नमस्कार करतोय ते त्या पिंडीला, की त्या पिंडरुपी श्रीशंभोला, की आपल्याही अंतरी वसणार्‍या त्या ब्रम्हसुत्राला....मलातरी कळत नाही.....एक छानपैकी शांत, प्रसन्न, गारवा पिंडीवर टेकलेल्या कपाळापासून ते थेट अंतःकरणापर्यंत झिरपत जातो आणि सोबत असलेल्या मित्र/नातेवाईकानं "चल रे, जाऊया आता" म्हणल्यावर ते सुख खंडतं एव्हढंच मला पामराला कळतं. - (नंदी) ध.