कॉलेजात असताना मी व माझी मैत्रिण रोज देवळात जायचो कारण वेगळेच असायचे.
हिचा मित्र त्यावेळेत रस्त्यावरुन राऊन्ड मारायचा म्हणुन.
मग दसर्याला त्याने गाडी थाम्बवुन सोने दिलेन.
मग ते २घे व मी हि देवळात गेलो.
मग मात्र नंतर आम्ही ३घे देवळातच भेटायचो =)) माझी मेली उगाच मधे मधे फरफट..
इतर ला मत दिले आहे.
उत्तरः सर्वप्रथम मला स्वतःला.
खुलासा :
एका दिवशी एक कोल्हा नदीत पडला. कोल्हा पाण्यात बुडू लागला. तो ओरडू लागला " जग बुडले जग बुडले जग बुडले"
इतरानी त्याला बाहेर काढले दोन रट्टे देऊन विचारले " लेका तू बुडतो आहेस आणि जग बुडाले म्हणून काय ओरडतोस?"
कोल्हा म्हणाला " मी बुडलो म्हणजे माझ्यापुरते तरी जग बुडल्या सारखेच आहे ना?"
इतरला मत दिले आहे.
आम्ही मंदिरात जात नाही. गेलो तरी कोणाला नमस्कार करीत नाही.
त्यापेक्षा 'ब्लफ मास्टर' मधील नाना पाटेकर प्रमाणे स्वतःलाच नमस्कार करतो ;)
(आज काल नवीन प्रतिक्रिया लिहायची सुविधा दिसत नाही. त्यामुळे एका प्रतिक्रियेला उत्तर म्हणून माझी प्रतिक्रिया लिहित आहे.)
इतर ला मत दिले आहे.
उत्तरः सर्वप्रथम मला स्वतःला.
खुलासा :
एका दिवशी एक कोल्हा नदीत पडला. कोल्हा पाण्यात बुडू लागला. तो ओरडू लागला " जग बुडले जग बुडले जग बुडले"
इतरानी त्याला बाहेर काढले दोन रट्टे देऊन विचारले " लेका तू बुडतो आहेस आणि जग बुडाले म्हणून काय ओरडतोस?"
कोल्हा म्हणाला " मी बुडलो म्हणजे माझ्यापुरते तरी जग बुडल्या सारखेच आहे ना?"
मी देवळात एकटा कधीच जात नाही. कोणाबरोबर नाईलाजाने जावे लागले तर जातो आणि मूर्तीसमोर हात जोडून उभा राहतो. मनात त्यावेळी काहीही नेहमीचे विचार असतात. बहुतेकवेळा असली तर भिंतीवरची चित्रे पाहतो. छान असतात.
मी नास्तिक आहे की आस्तिक आहे की आणखी काही याचा कधी विचार केला नाही. तशी गरज वाटली नाही.
इतरांचे मन राखण्यासाठी किंवा सोबत म्हणून किंवा वाद घालायचा नव्हता म्हणून देवळात गेलो तर देवापुढे उभा राहून हात जोडतो.
(सबब वरील कुणालाही नाही या पर्यायाला मत दिले आहे).
ठरवुन कुणाला नमस्कार करीत नाही.
कुठेही गणपतीची मुर्ती दिसली की आपसुक हात जोडले जातात.
नंदी कासव यांना कधी कधी थोपटावस वाटत.
बरेच वेळा (कदाचीत चार लोक करतात म्हणुन) देवळाच्या पहिल्या पायरीला ही केलाय.
देवळाच्या बाहेर बसलेल्या कृष भिकार्याला पैसे देताना त्याला पण नमस्कार केलाय. (कदाचीत तो मला करतो म्हणुन प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन असेल. तोही भिकारी आणि मीही. फरक काय तो फक्त कपडयांचाच)
बाकी सुहाश्याशी सहमत. या कौलात वरवर काही गैर दिसत नाही पण कौलफोड्या नाना असल्याने काही खर नाही. आता दुकान काढाच पंखांच. ;)
देवळात (म्हणजे देवळाच्या आत) म्हणून पुढे देवळाबाहेरील नंदी, कासव, एखादे प्रतिक, पायरी, कळस यांचे ऑप्शन्स का बरे?
असो, मी माननीय अवलिया साहेबांना त्यांच्या नावाच्या मागे आणि पुढे प्रत्येकी दोन काड्या लावाव्या असे सुचित करतो. त्याशिवाय असे कौल टाकणे व्यर्थ आहे असे वाटते.
>>>>देवळात (म्हणजे देवळाच्या आत) म्हणून पुढे देवळाबाहेरील नंदी, कासव, एखादे प्रतिक, पायरी, कळस यांचे ऑप्शन्स का बरे?
देऊळ म्हटले म्हणजे केवळ गाभारा अभिप्रेत नसुन देवळाच्या आतला भाग, बाहेरचा भाग आणि एकंदर परिसर समाविष्ट होतो. म्हणुन सर्व पर्याय ( तेच ते ऑप्शन्स) दिले आहेत.
>>>>असो, मी माननीय अवलिया साहेबांना त्यांच्या नावाच्या मागे आणि पुढे प्रत्येकी दोन काड्या लावाव्या असे सुचित करतो. त्याशिवाय असे कौल टाकणे व्यर्थ आहे असे वाटते.
आपल्या सुचने बद्दल धन्यवाद. कौल टाकण्यासाठी नावात विशिष्ट अक्षरे असलीच पाहिजेत याची कल्पना नव्हती.
कौल टाकण्यासाठी नावात विशिष्ट अक्षरे असलीच पाहिजेत याची कल्पना नव्हती.
अक्षरे नाही हो काड्या हव्या. काड्या असल्या की कौलारूच्या नावाला एक वेगळाच भारदस्तपणा येतो.
नंदी, कासव, उंदीर वगैरे भारी गोड असतात. त्यांना नमस्कार करते.
मग देव-देवी आदिंना. मला देव आणी देवी जोडीने आवडतात एकटे नाही. इतर देवांचे भरभर आटपते पण पार्वतीमातेच्या पायाशी ५ मिनीटं बसून भक्तीभावपूर्वक नमस्कार करते. गणपतीला ३ प्रदक्षिणा घालते.
काहीतरी गल्लत होतीये मालक. (श्रेयअव्हेर: डान्राव!)
आम्हाला बसल्या जागी गिळायला देणार्या, काही काम न करता पगार देणार्या मायबाप देवाबद्दल मी बोलत होते. असो. चालायचंच.
अवांतरः आम्ही देवाला थंडीत स्वेटर वा पावसात रेनकोट घालत नाही.
एक तर देवळात जातच नाही...गेलेच तर आधी बाहेर बसलेल्या भिकाऱ्याला, मग कळसाला, मग पहिल्या पायरीला, मग शेवटच्या पायरीला, मग नंदी, कासव, घोडा काय असेल त्याला, मधेमधे येणाऱ्या लोकांना, मग पुजाऱ्याला अशे नमस्कार करत करत देव्हार्याजवळ पोहोचले कि देवाला....आणि हा कौल वाचल्यावर तुम्हाला.
'इतर' ला मत दिले आहे. महाराष्ट्रात अनेकानेक मंदिरे आहेत. त्यापैकी अचानक श्रीमंत झालेल्या मंदिरांच्या नादी लागत नाही. शिर्डी वगैरे...त्यांना दुरूनच नमस्कार. पण ह्याच पुरोगामी महाराष्ट्रात कोरीव कामाने रचलेली अनेक शिल्पसमृद्ध हेमाडपंथी मंदिरे आहेत उदा. खिद्रापूरचे कोपेश्वर, नासिकचा काळाराम, नारोशंकर. सर्व ज्योतीर्लिंगे, पुण्याजवळचा भुलेश्वर, त्रिशुंड गणपती, वेरूळ लेण्यातील कैलास लेणे, हरीश्चंद्रेश्वर, रतनवाडीचा अमृतेश्वर, कुकडेश्वर, देहू, आळंदी ही संतांची मांदियाळी तसेच इतरही ज्ञात-अज्ञात.
मी नमस्कार करतो ते ह्या अशी समृद्ध मंदिरे घडवणार्या कलाकारांना, त्यांनी घडवलेल्या मुर्त्यांना. मनोभावे.
देवळासमोर आलो की आधी कळसाला नमस्कार करतो. चमचमता कळस, सुंदर गोपुरे ह्यांच्यासमोर आपोआप नतमस्तक होतो.
देवळात्/गाभार्यात शिरताना पहिल्या पायरीला उजवा हात आपोआप स्पर्शुन कपाळाशी जातो. (हे स्टेजवर जाण्यावेळीही आपोआप व्हायचं तसंच.)
देवळाच्या मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर गाभार्याकडं तोंड करुन नंदीला, कासवाला नमस्कार करतो.
गाभार्यात गेल्यानंतर गारेगार पिंडीवर डोकं टेकलं की मग त्यापुढचे काही क्षण (की मिनिटं? ठाऊक नाही.) मात्र काऽऽही कळत नाही. मी नमस्कार करतोय ते त्या पिंडीला, की त्या पिंडरुपी श्रीशंभोला, की आपल्याही अंतरी वसणार्या त्या ब्रम्हसुत्राला....मलातरी कळत नाही.....एक छानपैकी शांत, प्रसन्न, गारवा पिंडीवर टेकलेल्या कपाळापासून ते थेट अंतःकरणापर्यंत झिरपत जातो आणि सोबत असलेल्या मित्र/नातेवाईकानं "चल रे, जाऊया आता" म्हणल्यावर ते सुख खंडतं एव्हढंच मला पामराला कळतं.
- (नंदी) ध.
प्रतिक्रिया
ह्यावर एखादा लेख प्रकाशित
हा कौल वाचुन नान्याला नमस्कार
In reply to ह्यावर एखादा लेख प्रकाशित by गांधीवादी
आमची नजर दान पेटीवरुन हालत
In reply to हा कौल वाचुन नान्याला नमस्कार by सुहास..
समोर
In reply to आमची नजर दान पेटीवरुन हालत by अविनाशकुलकर्णी
हा (छुपा रुस्तुम) नाना पाध्ये
In reply to समोर by प्रिया देशपांडे
हा हा हा.
In reply to हा (छुपा रुस्तुम) नाना पाध्ये by नितिन थत्ते
कॉलेजात असताना मी व माझी
In reply to हा हा हा. by Nile
कॉलेजात असताना आपल्याला एक
In reply to कॉलेजात असताना मी व माझी by पर्नल नेने मराठे
>>माझी मेली उगाच मधे मधे
In reply to कॉलेजात असताना मी व माझी by पर्नल नेने मराठे
इतर ला मत दिले आहे. उत्तरः
In reply to ह्यावर एखादा लेख प्रकाशित by गांधीवादी
इतर..
In reply to इतर ला मत दिले आहे. उत्तरः by विजुभाऊ
इतर ला मत दिले आहे. उत्तरः
In reply to ह्यावर एखादा लेख प्रकाशित by गांधीवादी
मी देवळात एकटा कधीच जात नाही.
कुणालाही नाही
ठरवुन कुणाला नमस्कार करीत
देवळात सुंदर मुलगी वगैरे असेल
परा तुझ्यासाठी अजुन एक देऊळ
In reply to देवळात सुंदर मुलगी वगैरे असेल by परिकथेतील राजकुमार
इतर हा पर्याय निवडला आहे.
व्यनी करा
In reply to इतर हा पर्याय निवडला आहे. by बिपिन कार्यकर्ते
केला ना सर.
In reply to व्यनी करा by अवलिया
मी तरी देवाच्या मुर्तीकडे
मी देवाला, नंदिला, कासवाला
नानाच्या या काथ्याकुटा
देवळात (म्हणजे देवळाच्या आत)
ठ्ठ्यॉ!! अनामिक... !!
In reply to देवळात (म्हणजे देवळाच्या आत) by अनामिक
>>>>देवळात (म्हणजे देवळाच्या
In reply to देवळात (म्हणजे देवळाच्या आत) by अनामिक
कौल टाकण्यासाठी नावात विशिष्ट
In reply to >>>>देवळात (म्हणजे देवळाच्या by अवलिया
+१
In reply to कौल टाकण्यासाठी नावात विशिष्ट by अनामिक
नंदी, कासव, उंदीर वगैरे भारी
नंदी, कासव, उंदीर वगैरे भारी
In reply to नंदी, कासव, उंदीर वगैरे भारी by शुचि
देवबाप्पा तुम्हाला वरचे वर
In reply to नंदी, कासव, उंदीर वगैरे भारी by ३_१४ विक्षिप्त अदिती
गल्लत
In reply to देवबाप्पा तुम्हाला वरचे वर by गणपा
मी फक्त चमत्कारालाच नमस्कार
नेते
हा हा!!
In reply to नेते by विकास
एक तर देवळात जातच
ज्ञात-अज्ञातांना
वरील सर्वांना...