Skip to main content

पाककृती टीप्स

रविवार, 17/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. माहित असलेल्या, नसलेल्या सर्व पाकृ बद्दलच्या छोट्या- मोठ्या टीप्स जमवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे आयटी नवर्‍यांना/लग्नाळु लोकांना याने मदत होईल. ;) आणि आयटीवाईव्ज ना नवर्‍याला स्वयंपाकात या टीप्स देऊन नवर्‍याला बसल्या जगेवरुन टीवी सिरियल बघता बघता मदत करता येईल. =)) टीप्स: १. अ‍ॅल्युमिनियमची भांडे/कुकर शक्यतो टाळावेत, आणि वापरलीच तर त्यात जास्त वेळ जेवण ठेवु नये. २. लोखंडी, पितळी भांड्यांमधला स्वयंपाक हा रुचकर आणि सत्वयुक्त होतो, शक्य असल्यास वापरावेत. (भांडी जास्त घासण्याचा थोडा त्रास सहन करावा लागतो) ३. जेवण, दुध फ्रीजमधुन काढुन लगेच गरम करु नये, थोडा वेळ रुम टेंपरेचर ला आणावीत, एनर्जी जास्त लागते आणि जेवणाची चव थोडी बिघडते (अनुभवावरुन) ४. कुकर मधे वेगवेगळ्या भांड्यांमधे अन्न शिजवत असलात तर बटाट्याची साले (असल्यास, उगाच तेवढ्यासाठी बटाटे सोलु नयेत आणि आता बटाट्यांच काय करु हे विचारु नये. ;) ) टाकावीत, कुकर बर्‍यापैकी स्वच्छ होतो. ५. कोणत्याही रश्शाच्या भाजीला कमी तेलात चांगला तवंग यावा असे वाटत असेल तर भाजीत थोडीशी साखर (थोडी म्हणजे थोडी, आवडते म्हणुन लगेच बचकाभर टाकु नये.) टाकावी. चांगला तवंग येतो. ६. मटण, चिकन, यांच्या रश्श्यामधे बाजरीचे थोडेसे पीठ भाजुन घालावे, हलकासा घट्टपणा येतो आणि चव सुपर्ब. कॉर्नफ्लोर टाकु नये त्याने घट्टपणा येतो पण चव नाही. ७. कोणयाही कोरड्या भाजीला चांगला सुगंध येण्यासाठी अगदी थोडीशी दालचिनी आणि ईलायची सुरुवातीलच तेलात परतुन घ्यावी. छान सुगंध येतो. ८. बिर्याणि, पुलाव करताना भांड्याला तुपाचा हात लावुन घ्यावा, भात भांड्याला लागत नाही, आणि जळका वास जेवताना येत नाही. ९. टोमॅटो नरम झाले असतीत तर मिठाच्या पाण्यात ठेवावेत, कडक होतात. १०. जेवणाचा सुगंध, रंग, स्वच्छता आणि प्रेझेंटेशनकडे विषेश लक्ष द्यावे, त्याला फारच महत्व आहे असे मला वाटतं. ११. जेवण गरम असावे आणि जेवताना नेहमी आनंदी असावे आणि जेवण बनवणार्‍याला काँप्लिमेंट्स (कमेंट्स नाही ) नक्की द्याव्यात. ;) १२. जेवण झाल्यावर ढेकर द्यायला विसरु नये. =)) अजुनही भर पडेलच याची खात्री आहे, कारण ही लिस्ट फारच छोटी आहे. :)

वाचने 9726
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

अरे वा वा वा!!! म्हणजे आता तुझ्या आईला सांगायला पण झाले कि आमच्या मुलाला स्वयंपाक येतोच पण खाचाखोचा पण माहिती आहेत. भाव वाढला म्हणायचा. ;) बाकी कुकरात बटाट्याची साले नसतील तर लिंबाची उरलेली फोड (साल ) घालू शकता.

मराठमोळ्या, यंदा तुला कर्तव्य आहे असे दिसतेय :) जोरदार जाहिरात चालू आहे. प्रभो/सुहास अंमळ कॅनव्हासिंग करून दमलेत तोवर संधी साधून घे कसें? आणि हो.. शुभं भवतु ... :)

In reply to by सहज

+२

आयटीवाईज्ड मुलग्यांना एक वडिलकीचा सल्ला!!! (आयटीवाईज्ड मुलीना सल्ला द्यायची इथे कुणाची माय व्यालीय!!!!!) सल्ला असा की तुम्हां मुलग्यांना *ट कुकिंग येत नाही!! :) ते असो!! परंतु लगीन करून जर चांगले चुंगले पदार्थ खाण्याची अपेक्षा असेल तर...... नॉनआयटीवाइज्ड मुलगी करा...... देन द प्रोबॅबिलिटी इज ऑन युवर साईड..... आमेन!!!!

In reply to by पिवळा डांबिस

परंतु लगीन करून जर चांगले चुंगले पदार्थ खाण्याची अपेक्षा असेल तर...... नॉनआयटीवाइज्ड मुलगी करा...... काका..उगाच काहीही खात्री देत बसु नका. ;) आमची उदाहरणे समोर आहेत ना.

In reply to by प्रीत-मोहर

हॅ हॅ हॅ ... दहावेळा सहमत! ;-)

छान टीप्स आहेत्,त्यात आण्खी भर अंडी उकळतांना फुटुनये म्हणुन ज्या पाण्यात उकळतो त्यात १/२ विन्हेगार टाकावे कढkadhi करताना ती फुटु नये म्हणुन त्यात कणकेचा लहानसा गोळा टाकावा हिरव्या र्मिरच्या जास्त काळ ताज्या राहाव्यात म्हणुन त्यांची देठ काढउन मग फ्रीझ मघे थेवावी दुघ्,लोणि तापवत असतांना भांड्याच्या वरच्या कडेला तेल्,तुपाचाचे बोट फीरवुन घ्यावे उतु जात नाही

अरे ममो वेळ जात नसेल तर एखादा खंबा घेउन ये अन बस की विकेंडाला, ह्या असल्या टिपा काय गोळा करतो लेका? इतक्या टिपा आजकाल लग्नाच्या पोरीसुद्धा गोळा करत नाहीत!!! -निळुत्सु

In reply to by Nile

>>इतक्या टिपा आजकाल लग्नाच्या पोरीसुद्धा गोळा करत नाहीत!!! म्हणूनच त्यांना करायला लागत आहे.

चांगल्या सुचवण्या. वाचनखुणेची सोय द्या बॉ आता!

In reply to by सुनील

लेखाच्या खाली जी लाल रंगाची पट्टी दिसते तिथे 'Bookmark this' असा एक पर्याय दिसतो, त्यावर क्लिकवा. रंगा

In reply to by चतुरंग

लेखाच्या खाली , वर जिथे जिथे लाल रंगाची पट्टी दिसते, तेथे कोठेही 'Bookmark this' असा पर्याय दिसत नाही.

माझी नुकतीच अनुभवाने शिकलेली टिपः- दह्याचा चक्का फ्रिझर मध्ये घाई घाईने तसाच उघडा टाकुन दांडीया खेळायला जाउ नये. तो चक्का दसर्‍या दिवशी परत होते तेव्हढे पाणी घेउन श्रीखंड पातळ होते.

सध्या बायोडेटा अर्रर्र सिव्ही नाही का भलताच जोरात अपडेटवण चाललय.

ओके

In reply to by सद्दाम हुसैन

शब्द चुकला ना भाऊ !!! असो, आम्ही उई उई असेच वाचले :-)

आमच्या काही टिप्स !! १) स्वयंपाक बनविताना, कुठलीही पाकृ बनविताना, त्या पाकृला लागणारे सर्व साहित्य नीटपणे, हाताला लागेल, असे बाळगावे अन्यथा एकीकडे आपण, पकड शोधत असताना, कांद्याचा कोळसा होण्याची शक्यता असते. २) खास आयटी नमुन्यांसाठी, स्वंयपाक बनविताना .ऊघड्या अंगाने,स्वंयपाक करू नये, अंगावर, विशेषता,छातीवर तेल ऊडण्याचा संभव असतो. ३) लाटलेली चपाटी तव्यावर टाकायच्या आधी ,तेलकट केलेला कांदा,तव्यावर फिरवुन घ्यावा. क्रमश ...

In reply to by निवेदिता-ताई

सुकी बटाटा भाजी करताना त्याला थोडेसेच बेसन पिठ लावावे, >>> थोडेसेच बेसन पिठ ...थोडेसेच सुक्के बेसन पिठ असे वाचावे, सोबत मिठ लावलेत तर ऊत्तमच बस का ? आमाला बी सैंपाक येतो म्हणतात

अजुनही भर पडेलच याची खात्री आहे, कारण ही लिस्ट फारच छोटी आहे. हे घ्या माझ्याकडून भर - १) पदार्थ शिजत असताना त्यात साखर घालावी. पदार्थ गोड होतो. २) पदार्थ गरम असेल तर, चमच्याने थोडासाच घेऊन, फूक मारून नंतर तोडात टाकावा. म्हणजे तोंड पोळत नाही.

पाककृतीच्या टीप्स न देता काही लोकांनी आमचा टीपेचा धागा ओवुन आमच्याच पाकृ कौशल्यावर मारलेल्या टीपा पाहुन अंमळ डोळे पाणावले.

पितळ्याचे किंवा तांब्याचे भांडे कल्हई केल्याशिवाय वापरू नये. सत्त्व सोडाच - आम्लाशी संपर्क झाला तर त्यातून धातूचे घातक क्षार अन्नात उतरतात. बाकी नोंदी छानच आहेत.