नमस्कार मंडळी.
माहित असलेल्या, नसलेल्या सर्व पाकृ बद्दलच्या छोट्या- मोठ्या टीप्स जमवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
त्यामुळे आयटी नवर्यांना/लग्नाळु लोकांना याने मदत होईल. ;) आणि आयटीवाईव्ज ना नवर्याला स्वयंपाकात या टीप्स देऊन नवर्याला बसल्या जगेवरुन टीवी सिरियल बघता बघता मदत करता येईल. =))
टीप्स:
१. अॅल्युमिनियमची भांडे/कुकर शक्यतो टाळावेत, आणि वापरलीच तर त्यात जास्त वेळ जेवण ठेवु नये.
२. लोखंडी, पितळी भांड्यांमधला स्वयंपाक हा रुचकर आणि सत्वयुक्त होतो, शक्य असल्यास वापरावेत. (भांडी जास्त घासण्याचा थोडा त्रास सहन करावा लागतो)
३. जेवण, दुध फ्रीजमधुन काढुन लगेच गरम करु नये, थोडा वेळ रुम टेंपरेचर ला आणावीत, एनर्जी जास्त लागते आणि जेवणाची चव थोडी बिघडते (अनुभवावरुन)
४. कुकर मधे वेगवेगळ्या भांड्यांमधे अन्न शिजवत असलात तर बटाट्याची साले (असल्यास, उगाच तेवढ्यासाठी बटाटे सोलु नयेत आणि आता बटाट्यांच काय करु हे विचारु नये. ;) ) टाकावीत, कुकर बर्यापैकी स्वच्छ होतो.
५. कोणत्याही रश्शाच्या भाजीला कमी तेलात चांगला तवंग यावा असे वाटत असेल तर भाजीत थोडीशी साखर (थोडी म्हणजे थोडी, आवडते म्हणुन लगेच बचकाभर टाकु नये.) टाकावी. चांगला तवंग येतो.
६. मटण, चिकन, यांच्या रश्श्यामधे बाजरीचे थोडेसे पीठ भाजुन घालावे, हलकासा घट्टपणा येतो आणि चव सुपर्ब. कॉर्नफ्लोर टाकु नये त्याने घट्टपणा येतो पण चव नाही.
७. कोणयाही कोरड्या भाजीला चांगला सुगंध येण्यासाठी अगदी थोडीशी दालचिनी आणि ईलायची सुरुवातीलच तेलात परतुन घ्यावी. छान सुगंध येतो.
८. बिर्याणि, पुलाव करताना भांड्याला तुपाचा हात लावुन घ्यावा, भात भांड्याला लागत नाही, आणि जळका वास जेवताना येत नाही.
९. टोमॅटो नरम झाले असतीत तर मिठाच्या पाण्यात ठेवावेत, कडक होतात.
१०. जेवणाचा सुगंध, रंग, स्वच्छता आणि प्रेझेंटेशनकडे विषेश लक्ष द्यावे, त्याला फारच महत्व आहे असे मला वाटतं.
११. जेवण गरम असावे आणि जेवताना नेहमी आनंदी असावे आणि जेवण बनवणार्याला काँप्लिमेंट्स (कमेंट्स नाही ) नक्की द्याव्यात. ;)
१२. जेवण झाल्यावर ढेकर द्यायला विसरु नये. =))
अजुनही भर पडेलच याची खात्री आहे, कारण ही लिस्ट फारच छोटी आहे. :)
वाचने
9726
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान हं !! छान छान!!!!
अरे वा वा वा!!! म्हणजे आता
मराठमोळ्या, यंदा तुला कर्तव्य
हे हे !!! असेच म्हणते, यंदा
In reply to मराठमोळ्या, यंदा तुला कर्तव्य by विंजिनेर
+१
In reply to हे हे !!! असेच म्हणते, यंदा by दिपाली पाटिल
+२
In reply to +१ by सहज
हॅहॅहॅ!!
परंतु लगीन करून जर चांगले
In reply to हॅहॅहॅ!! by पिवळा डांबिस
हॅहॅहॅ
In reply to परंतु लगीन करून जर चांगले by पर्नल नेने मराठे
+३
In reply to हॅहॅहॅ by प्रीत-मोहर
छान टीप्स
कढीची टिप नविन आहे
In reply to छान टीप्स by रश्मि दाते
कढीची टिप
In reply to कढीची टिप नविन आहे by रेवती
हो, लग्गेच फॉरवर्ड करणार!
In reply to कढीची टिप by कुंदन
अरे ममो वेळ जात नसेल तर एखादा
>>इतक्या टिपा आजकाल लग्नाच्या
In reply to अरे ममो वेळ जात नसेल तर एखादा by Nile
१)बटाटे उकडताना त्यात थोडेसे
शेंगदाणे भाजताना त्याला थोडा
छान
वाचनखुणेची सोय आहे!
In reply to छान by सुनील
Bookmark this
In reply to वाचनखुणेची सोय आहे! by चतुरंग
ती सोय फक्त संपादक मंडळ
In reply to Bookmark this by सुधीर१३७
माझी नुकतीच अनुभवाने शिकलेली
मम्या, ये क्या हो रैला है?
हॅ हॅ हॅ
ओके
ओके ??
In reply to ओके by सद्दाम हुसैन
छान टिप्स.
आमच्या काही टिप्स !!
सुकी बटाटा भाजी करताना त्याला
सुकी बटाटा भाजी करताना त्याला
In reply to सुकी बटाटा भाजी करताना त्याला by निवेदिता-ताई
माझे दोन पैसे...
>> पदार्थ शिजत असताना त्यात
In reply to माझे दोन पैसे... by सुनील
पाककृतीच्या टीप्स न देता काही
छान - पितळ्याबाबत आंशिक असहमती