Skip to main content

नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शुक्रवार, 15/10/2010 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याची मनास भीती तेची घडे अताशा कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा दूरातूनी विराणी सनई उदास गाते ह्रदयास घाव देती अन चौघडे अताशा इतके जपून होते ह्रदयात ठेवले की नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे- मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा? इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा हुंड्या परी अताशा गेल्या जुन्या प्रथाही दिसतात संपलेले हिरवे चुडे अताशा -स्वानंद
लेखनविषय:

वाचने 2498
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा
सुरेख आहेत ह्या द्विपदी! आवडल्या.

झकास! एकेक शेर तोलूनमापून घडवला आहे! जियो! >>इतके जपून होते ह्रदयात ठेवले की >>नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा हृदयस्पर्शी विरोधाभास!

मस्त

एकदम जबरी .. ह्रद्यास छेदुन जाणारे शेर .. आवडले एकदम लिहित रहा .. वाचत आहे

सर्वच द्विपदी आवडल्या! :)

दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? वा.. व्वा.. सुरेख शेर. इतके जपून होते ह्रदयात ठेवले की नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा क्या बात है ! अ फ ला तू न !! गझल आवडली. पुलेशु.

खूप आवडली गझल! दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा इतके जपून होते ह्रदयात ठेवले की नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे- मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा? इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा ... हे शेर खास! लिहिते रहा साहेब; वाचत आहे :)

अर्थपुर्ण गझल आहे.. दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? वा...व्वा.....! क्या बात है..! मस्तच.