Skip to main content

(सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा)

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 19/07/2008 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा, दाऊद होता सभापती मधोमध उभा. दाऊद म्हणाला, दाउद म्हणाला, "मित्रांनो, खंडणीत सूट, खंडणीत सूट ! तुमचे -आमचे सर्वांचे जुळेल सूत ! या हिरोगीरिचे कराल काय? संजय म्हणाला " ढिशांव ढिशांव करुन मी मारीन लोंका " सल्लू म्हणाला,"ध्यानात ठेवीन, ध्यानात ठेवीन मी ही माझ्या गाडीने असेच करीन असेच करीन" शाहरुख म्हणाला," खुषीत येईन तेव्हा, क_क करीत राहीन." प्रिती म्हणाली, "नाही ग बाई, राणीसारखे माझे मुळीच नाही, खूप खूप रागवीन तेंव्हा क्रिकेट खेळीन, क्रिकेट खेळीन". तुषार म्हणाला, "होईल गोची तेव्हा माझ्या बहिणीची मलाच बंडी." अक्षय म्हणाला, "कधी वर, कधी खाली, जहिरातींवर मारीन उडी." जॉनी म्हणाला, "विनोद म्हणजे कठिण काम, कठिण काम करत राहीन सिनेमात, करत राहीन सिनेमात." सैफ म्हणाला, "माझे काय?" "तुझे काय? हा हा हा ! करिना पण समजुन जाय." रेखा म्हणाली, "रोल रोल समजुन करीन, सिनेमात मी, अभिषेकची आई होईन." दाऊद म्हणाला, "छान छान छान! 'भाईच्या' देणगीचा ठेवा मान. आपुल्या भुमिकेचा उपयोग करा." "नाही तर काय होईल?" "न ऐकणार्‍यांगत, तुमचा गेम होऊन जाईल." ------------------------------------------------------------------------- मुळ गाणे - शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो, देवाघरची लूट, देवाघरची लूट ! तुम्हा-आम्हा सर्वांना एक एक शेपूट या शेपटाचे कराल काय ?" गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी मारीन माश्या." घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन," कुत्रा म्हणाला, "खुषीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन." मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही, खूप खूप रागवीन तेंव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन." खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी." माकड म्हणाले, "कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी." मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात." कांगारू म्हणाले, "माझे काय?" "तुझे काय? हा हा हा ! शेपूट म्हणजे पाचवा पाय." मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन पावसाळ्यात नाच मी करीन." पोपट म्हणाला, "छान छान छान! देवाच्या देणगीचा ठेवा मान. आपुल्या शेपटाचा उपयोग करा." "नाही तर काय होईल?" "दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल." गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - दत्ता डावजेकर स्वर - आशा भोसले चित्रपट - पाहू किती रे वाट (१९६३ )
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4923
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

भयानक आवडली कविता... क्या बात है... असलं रूपक सुचणं ग्रेटच... आणि ते मूळ कवितेच्या मीटर मधे चपखल बसले आहे. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>असलं रूपक सुचणं ग्रेटच... आणि ते मूळ कवितेच्या मीटर मधे चपखल बसले आहे. +१ सहमत आहे.

खूप सुन्दर आहे हो तुमची कविता......... फारच आवडली........... कसे काय सुचले हो तुम्हाला असे लि़खण??????? पण मज्जा आली वचताना............... आसेच सुन्दर सुन्दर लिहित रहा................... आमचे मनोरन्जन करत रहा.............. :H

रेखा म्हणाली, "रोल रोल समजुन करीन, सिनेमात मी, अभिषेकची आई होईन." हाहाहा! रेखा आणि अभिषेकची आई? :) मस्त..!

लई भारी ;) चालू दे!

आवडले. स्वाती

हे पण भारी, आजकाल मिपावर रीमिक्स चा जमाना आला आहे काय? मालकः 'विडंबन' म्हणुन नवीन सदर चालु करता येयील काय? सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

उच्च रुपक आणि चपखल विडंबन! हॅट्स ऑफ!! (स्वगत - ह्या कृष्णेच्या पाण्यात विडंबनाचे गुण बाय डिफॉल्ट असतातच का? :? ) चतुरंग

In reply to by चतुरंग

चपखल विडंबन! कृष्णेच्या पाण्यात विडंबनाचे गुण बाय डिफॉल्ट असतातच (सहमत)केशवसुमार

अगदी सुदर विडबन. मस्त शब्द निवड्लेत आणी हडके विडबन. खुप खुप आवडले.

आवडले.. मस्त :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

छान जमलेलं आहे. स्नेहींनी धागा वर काढला म्हणून वाचायला तरी मिळालं...

In reply to by सहज

विडंबन आवडलं! कंटेंपररी संदर्भ असल्यामुळे जास्तच "भावलं"!