डिस्क्लेमरः
आदी शंकराचार्यविरचित चर्पटपंजरिका स्तोत्र खाली लिहिलेले आहे. जालावर बर्याच ठिकाणी पाठभेद दिसलेत. शेवटी माझ्याजवळील पुस्तकात होते त्याप्रमाणे लिहिलेले आहे. चु.भु.द्या.घ्या.
द्वादशपंजरिका व चर्पटपंजरिका अशी दोन स्तोत्रं आहेत. मी केवळ चर्पटपंजरिका स्तोत्राचाच भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. हा भावानुवाद आहे, त्यामुळे मूळ गाभा कायम ठेवून अनुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. जर काही चुका आढळल्यात तर त्या नि:संशय माझ्याच आहेत, त्या दुरुस्त करण्यात जरूर मदत करावी!
भावानुवाद करतांना मला अडचणी आल्यात त्यात नानांना(अवलिया) मदत मागीतली तेव्हा त्यांनी लगेच मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. :)
शुभम्
| चर्पटपंजरिका स्तोत्रः दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसन्तौ पुनरायातौ। कालः क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुञ्चत्याशावायुः।। भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते। प्राप्ते सन्निहते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ् करणे।। अग्रे वह्निः पृष्ठे भानू रात्रौ चिबुक समर्पितजानुः। करतल भिक्षा तरुतलवासः तदपि न मुञ्चत्याशापाशः।। यावत् वित्तोपार्जनसक्तस्तावन् निजपरिवारे रक्तः। पश्चाज्जर्जर भूते देहे वार्ता कोऽपि न पृच्छति गेहे।। जटिलो मुण्डी लुञ्चित केशः काषायाम्बर बहुकृत वेशः। पशयन्नपि च न पश्यति लोकः उदर निमित्तं बहु कृत वेशः।। भगवद्गीता किञ्चिद्धीता गंगा जल लव कणिका पीता। येनाकारि मुरारेरर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चाम्।। अंगं गलितं पलितं मुण्डं दशन विहीनं जातं तुण्डम् । वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चत्याशापिण्डम्।। बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणस्तावत्तरुणीरक्तः। वृद्धस्तावच्चिन्तामग्नः पारे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः।। पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः। पुनरप्ययनं पुनरपि वर्षम तदपि न मुञ्चत्याशामर्षम्।। पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम्। इह संसारे खलु दुस्तारे कृपयाऽपारे पाहि मुरारे।। वयसि गते कः काम विकारः शुष्के नीरे कः कासारः। क्षीणे वित्ते कः परिवारः ज्ञाते तत्वे कः संसारः।। नारीस्तन भर जघन निवेशं मिथ्या माया मोहावेशम्। एतन्मांस वसादि विकारं मनसि विचारय वारंवारम्।। कोऽहं कस्त्वं कुत आयातः का मे जननी को मे तातः। इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम्।। गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपति रूपमजस्रम्। नेयं सज्जन संगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम्।। यावत्पवनो निवसति देहे तावत्पृच्छति कुशलं गेहे । गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन्काये।। सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्त शरीरे रोगः । यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणम् ।। रथ्याकर्पट विरिचित कन्थः पुण्यापुण्य विवर्जित पन्थः। योगी योगनियोजित चित्तो रमते बालोन्मत्तवदेव।। कुरुते गंगा सागर गमनं व्रतपरिपालनमथवा दानम्। ज्ञानविहीने सर्वमतेन मुक्तिर्न भवति जन्म शतेन ।। | भावानुवादः दिवस-रात्रीचा खेळ चालतो, शिशिर-वसंती पुन्हा नाहतो, आयुष्याची सांज उगवते, ईच्छातृप्ती तरीही न होते.. गोविंदाचे भजन करा हो, गोविंदाचे स्मरण करा! प्रेम रुजावे नामामध्ये.. त्याच्यासाठी ध्यास धरा! पाठी-पोटी अग्नी पेटे, रात्र कशीतरी ढकलत जाते, झाडाखाली जगणे हाती, तरिही ईच्छा असते ओठी.. जोवर पैका तुझीया हाती, तोवर सारी नाती-गोती, "आणिक तुजला काय हवे?"-हे, म्हातार्याला कोण विचारे.. जटा वाढवुनी ध्यान धरूनी.. उगाच डोळे मिटून बसशी, संन्याशाचा वेष अनोखा, पोटासाठी फसवी लोकां.. गीता ज्याने थोडी स्मरली, ज्याने गंगा अल्प प्राशली, ज्याने स्मरला एक मुरारी, त्यास यमाची चिंता कसली? आयुष्याच्या सांगाड्याची.. दातांनीही साथ सोडली, आधाराला काठी आली, तरीही ईच्छा नाही सुटली.. बाल्य उलटले खेळण्यात-तव-यौवन सारे मैथुनात रत चिंता, चिता ती वृद्धत्त्वाची, ब्रह्मतत्त्व पण कुठे न वेची.. दिवस-रात्र अन पक्ष-महिने, युगचक्राचे फिरते आरे, वर्षामागुन वर्ष उलटती, तरिही ईच्छा पुन्हा प्रकटती.. पुन्हा पुन्हा हे जगणे-मरणे, आईपोटी पुन्हा निपजणे, भवसागर हा किती भयकारी, तूच केशवा मजला तारी.. वृद्धा कसली कामवासना? नदीच नसता नाव कशाला? पैका नसता कुठले नाते? तत्व समजता कसले जग ते..? कशास फसशी कमनीय देहा..स्तन-नाभीच्या खोट्या मोहा, मांस-अस्थि हे, नश्वर सारे, स्मरण मनाशी ठेव विचारे.. जन्म दिला तुज खरा कुणी रे, स्वरूप स्वत:चे खरे जाण रे, मर्त्य जगी या असार सारे, स्वप्नासम तू त्याग जगा रे.. भगवंताची आस असावी, सत्संगाची कास धरावी, भगवद्गीता नित्य स्मरावी, दीनजनांसी मदत करावी.. देही असतो प्राण जोवरी, घरी तयासी मान तोवरी.. जेव्हा मत्यू ग्रासे शरीरा, पत्नीसुद्धा त्यागे त्याला.. भवरोगाच्या तुच्छ कल्पना..सुखशोधाच्या हीन कामना.. जर्जर देही मृत्यू छाया.. तरीही मोहे कामवासना.. देहभानमुळी नुरे जयांला, पाप-पुण्य हा भेद न त्याला.. बालस्वभावे योगी सारे, आनंदाचे कुंभ निराळे! तीर्थक्षेत्री भ्रमण करा वा व्रत-अनुष्ठाने-दान करा; ज्ञानच नसता शतजन्मेही - मुक्ती नाही, गांठ धरा. |
काव्यरस
वाचने
7684
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख.
+१
In reply to सुरेख. by यशोधरा
+२
In reply to +१ by नगरीनिरंजन
उत्तम....
उत्तम....
किती सुंदर....
खरंय!
In reply to किती सुंदर.... by योगप्रभू
उत्तम
धन्यवाद राघवजी. अन त्या योगे
आवडला
मात्र या ठिकाणी धनंजय यांनी
In reply to आवडला by नितिन थत्ते
खुप सुंदर..टेकनिकलचा
मस्तच रे.. (अवांतर : वेळ
मस्त लिहित रहा .. वाचत आहे
सुंदर...
राघवजी, तुमची मेहनत फळाला
तसे म्हटले तर चर्पटपंजरिका हे
In reply to राघवजी, तुमची मेहनत फळाला by पाषाणभेद
क्या बात है!
लै भारी
छान
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
In reply to छान by धनंजय
सुंदर
ढ विद्यार्थ्याने बनवलेली कथा
In reply to सुंदर by विकास
तो मी नव्हेच!
In reply to ढ विद्यार्थ्याने बनवलेली कथा by धनंजय
वाचलेल्यावर विचारही केलेलाच आहे :-)
In reply to तो मी नव्हेच! by विकास
सर्वांचे मनःपूर्वक आभार!
मस्त अनुवाद आणि श्लोक ही
मस्त !
छान
अतिशय सु रेख!! ग्रेट आहेस