Skip to main content

तळलेल्या मिरच्या

लेखक जागु
Published on मंगळवार, 12/10/2010
मिरच्या म्हटल म्हणजे खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटत. ह्या मिरच्यांचे बरेच प्रकार आहेत. तळण्यासाठी जाड्या मिरच्या घ्यायच्या. जाड्या मिरच्या बारीक मिरच्यांच्या मानाने कमी तिखट असतात. लागणारे साहित्य: ५-६ जाड्या मिरच्या बेसन गरजे नुसार हिंग हळद मिठ अर्धा चमचा मिरचीपुड तळण्यासाठी तेल पाककृती: प्रथम मिरच्या धुवुन त्याचे मधे चिर पाडून दोन तुकडे करावेत. मिरचीतील बी काढून टाका. एका भांड्यात बेसन, हिंग, हळद, मिठ, मिरचीपुड हे थोडे पाणी घालुन भजीच्या पिठासारखे घट्ट भिजवावे. नंतर भिजवलेल्या पिठात मिरच्या बुडवून तव्यात शॅलोफ्राय किंवा कढईत डिपफ्राय करत ठेवाव्यात. शॅलोफ्रायमुळे तेल कमी लागते. गॅस मिडीयम किंवा मंदच ठेवावा म्हणजे कुरकुरीत होतात. थोडावेळाने पलटी करुन शिजवाव्यात म्हणजे झाल्या रुचकर तळलेल्या मिरच्या तय्यार.

वाचन संख्या 13201
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

In reply to by रामदास

उरला की पाकातल्या मिर्च्या पण करते.
किती लोकं हा आयडी वापरतात हो रामदासकाका? बाकी मिरचीची भजी मलाही आवडतात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जोजोकाकु, अहो रामदासकाका चुचु विषयी टिपणी करत आहेत. खरच वयोमानपरत्वे तुम्ही.... असो...

In reply to by परिकथेतील राजकुमार

रामदासकाकांना वकीलाची गरज कधीपासून निर्माण झाली? असो. रामदासकाका, तुमचा सर्वनाम वापरण्याला काही तात्विक विरोध नाहीये ना?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखीकेचा आणि माझा थोडासा मतभेद आहे. आमच्याकडे बारीक मिर्च्या आल्या ,त्या जाड्या झाल्या, आता त्या सिमल्याच्या मार्गावर आहेत पण पण तिखटपणा काही कमी होत नाहीय्ये.

In reply to by रामदास

रामदासकाका, पाय कुठे आहेत हो तुमचे? _/\_

In reply to by रामदास

रामदास, मिरच्या खाण्याच्या दर्दी माणसाला मिरचीचा तिखटपणा तितकासा जाणवत नाही. पण मिरच्या कमी तिखट होण्यासाठी मिरचीच्या आतले बी काढून टाकायचे म्हणजे कमी तिखट होतात मिरच्या कारण मिरचीची बी मिरचीच्या सालापेक्षा जास्त तिखट असते.

ह्या प्रकाराला आम्ही मिरचीची भजी म्हणतो... मस्तच लागतात...!! आवडल्या... !

In reply to by सुत्रधार

मनी, मी नावच चुकीच दिलय अस मला वाटत. मिरचीची भजीच टाकायला पाहिजे. बदलते मी. सुत्रधार अहो आमच्या घरात ९ माणस आहेत एक व्यक्ती नाही खात एवढ्या मिरच्या.

च र च री त ! मिर्च्यात सारण भरताना पुन्हा मिर्चीपुड म्हणजे पळापळच ;) अजुन एक मिर्चीचा आवडता प्रकार म्हणजे कुटाच्या मिरच्या.

In reply to by प्राजु

राजकुमार, प्राजु कुटाच्या मिरच्या माझ्यापण आवडीच्या. उन्हाळ्यात केल्या की रेसिपी टाकणार. राजकुमार तसे मिरचीपुड नाही टाकली तरी चालु शकेल पण पिठाला पण चव हवी म्हणून किंचीत टाकायची.

छान. घरी गेलो कि बनवतोच. आता कळाले कि आपण भारतिय पाणी का वापरतो ते. अहो, पेपर वापरला तर तो जळणार नाही का? (अवांतरः मलापण चरचरीत आणि झणझणीत पदार्थ आवडतात)

जेव्हा जेव्हा घरी भजी करतात तेव्हा जर माझ्यासाठी मिरचीभजी केल्या नसतील तर तांडव, रुद्रावतार, आकाश-पाताळ एक करणं... वगैरे वगैरे शब्दांचे अर्थ उदाहरणासह स्पष्ट होतात. ;) आपल्याला हा प्रकार लै लै म्हणजे लैच्च आवडतो :)

In reply to by धमाल मुलगा

अहो धमालराव, आपण जे नेहमी करतो ते मिर्च्याचे भजे वेगळे आणि ह्या तळलेल्या मिर्च्या वेगळ्या. निदान फोटो तरी पहायचा की राव ;) असो, ह्या अशा प्रकारच्या मिर्च्या "गुजराथ"मध्ये ढाब्यावर सर्रास आढळतात असे वाटते. दक्षिण भारतातही 'आध्रां स्टाईल' हॉटेल्समध्ये अशा तळलेल्या मिर्च्या कंपल्सरी असतातच टेबलावर. एकदम मस्त कुरकुरीत लागतात. मस्त दही-भात आणि त्याबरोबर ह्या तळलेल्या मिर्च्या म्हणजे स्वर्गसुख. अवांतर : थोड्या वेळात धमालराव "नाकाला झोंबणार्‍या मिर्च्या" ही पाककृती टाकतीलच ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

हापिसात आम्हाला फोटो पहायचा पगार देत नाहीत. त्यामुळं फोटो बॅन असतात. राहिला प्रश्न पाकृ वाचुन अंदाज बांधण्याचा, तर मुळात आमची मजल मॅगी+कॉफी ह्यापुढे नाही. मिरची, डाळीचं पीठ, तळणे एव्हढ्यावरुन अस्सल मराठी माणूस जेव्हढा अंदाज बांधू शकतो तेव्हढ्यावरुन आम्ही बोललो. आंध्रात किंवा गुजरातमधल्य ढाब्यावर जाण्याचे प्रसंग आले नाहीत हो आयुक्षात. >>अवांतर : थोड्या वेळात धमालराव "नाकाला झोंबणार्‍या मिर्च्या" ही पाककृती टाकतीलच मला वाटलं तुम्हीच 'मळलेल्या खुर्च्या' ही पाकृ टाकणार आहात.

In reply to by धमाल मुलगा

>>हापिसात आम्हाला फोटो पहायचा पगार देत नाहीत. त्यामुळं फोटो बॅन असतात. असेल, तसेही असेल, म्हणजे फोटो बॅन असु शकतात. पण तरीही केवळ फोटो पाहण्यासाठी पगार देत असलेली कंपनी माझ्या पाहण्यात नाही, पण तुम्ही म्हणता तशी असु शकते.
राहिला प्रश्न पाकृ वाचुन अंदाज बांधण्याचा, तर मुळात आमची मजल मॅगी+कॉफी ह्यापुढे नाही. मिरची, डाळीचं पीठ, तळणे एव्हढ्यावरुन अस्सल मराठी माणूस जेव्हढा अंदाज बांधू शकतो तेव्हढ्यावरुन आम्ही बोललो. आंध्रात किंवा गुजरातमधल्य ढाब्यावर जाण्याचे प्रसंग आले नाहीत हो आयुक्षात.
बास बास बास !!! वरच्या पॅरामध्ये २-३ ठिकाणी मिरच्या हा शब्द पेरला आणि इअजुन किंचित आदळाआपट भुरभुरली की झालीच की हो "नाकाला झोंबणार्‍या मिरच्या" ही पाककृती, नाय काय म्हणता. तुम्ही तर एकदम छुपे रुस्तम निघालात की ;) - छोटा डॉन

मुळात आमची मजल मॅगी+कॉफी ह्यापुढे नाही >>. आख्ख्या बंगळुरात प्रसिध्द असलेलं ट्रेन्ड सिक्रेट मिपावर ओपन केल्याबद्दल धम्याचा निषेध ... जागु !! एक नंबर ग !!

लै ब्येस लागतात. एका हैद्राबादी हाटेलात खाल्ल्या होत्या. मज्जा आलती. तळून तयार झालेल्या मिर्च्यांचा फटू नाही टाकला का?

हा प्रकार अजुन तरी खाल्ला नाहीये...पण मिरचीची भजी आणि तळलेली सांडगी मिरची लयं मस्त लागते. :) (तिखट-गोड प्रेमी) ;)

पाकृ चान sorry छान आहे. (मिपावर जागुची पाकृ म्हणजे चांगलीच असणार असे समीकरण आहे) (चानचा अर्थ येथे वेगळा आहे हे वेळेतच लक्षात आहे नाहितर...........) ;) पण याला मिरचीची भजी म्हणणे जास्त योग्य आहे. बाकी हैदराबादला ही भजी दोन तीन भेटीत खाल्ली होती. त्यात एक थोडा वेगळा प्रयोग चाखण्यात आला होता. मिरची बेसन आणि त्यात अनेक गोष्टी मिसळुन बनवलेल्या प्रकारात बुडवण्या पुर्वी आत उकडुन स्माश केलेला बटाट्यात थोडे मिठ, कोथिंबीर, तिखट घालुने हे सारण मिरचीत भरल्यावर मग बेसन आणि वरील पदार्थ मिसळलेल्या पिठात बुडवुन तळल्या होत्या. एकदम भन्नाट प्रकार होता. :)

एक नंबर..! तात्या. -- शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!

तळलेल्या मिरच्या इकडे वड्या सोबत खायला देतात त्या वेगळ्या असतात. त्यासाठी बारीक लंवगी मिरच्या मधुन चिरुन घेतात. त्या तेलात चांगल्या तळुन काढतात. व नंतर त्यावर मीठ टाकतात. तसल्या मिरच्या भाकरी सोबत खायला खुप मस्त लागतात.

मागे एकदा करून पाहिल्या होत्या. पण मिरचीच्या पृष्ठभागावर बेसन टिकून राहात नाही आणि तेलात मिरची आणि बेसन सुटे होते. पुन्हा एकदा प्रयत्न करून बघायला हवा.

मागे एकदा करून पाहिल्या होत्या. पण मिरचीच्या पृष्ठभागावर बेसन टिकून राहात नाही आणि तेलात मिरची आणि बेसन सुटे होते. सुनिल पिठ पातळ झाल्यावर अस होत. पिठाचे मिश्रण थोडे घट्ट ठेवायचे म्हणजे पिठ चिकचुन राहत.