अघटीत!!
एक जुनी चांगली मैत्रीण, कॉलेजमधे एकदम बब्ली गर्ल, एकदम एंथु, अस्खलीत ईंग्रजी बोलणरी, जगाची माहिती असणारी, सुंदर, चुलबुली, सर्वांना ती खुप आवडयची, मनमोकळा स्वभाव, हसत खेळत रहाणारी एक गोड मुलगी. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस टच मधे नव्हती.. गेले बरेच दिवस अचानक अचानक खुपच सोशल झाली.. मला शंका आली.. पण म्हंटल की असेल बुवा. कधी कधी ऑनलाईन यायची.. खुप विनोद करायची. आणि विनोदाची अपेक्षा ठेवायची. मला वाटलं काहीतरी चुकतय. मध्यंतरी एका मिपा सदस्याच्या कार्यक्रमाला तिला बोलावलं होतं, काही कारण काढुन तिने टाळलं. पुन्हा बरेच दिवस गेले, मग अचानक फिलॉसॉफिकल कोट्स, वेगवेगळे स्टेटसेस. मला कळत होतं की काहीतरी बिनसलय, पण विचारायची हिम्मत केली नाही आणि मग मध्यंतरी वेळही मिळाला नाही.
अचानक एक दिवस गबोल वर हाय म्हणाली.. मी चक्रावलो, ही कधीही ऑनलाईन येत नाही, आणि आज अचानक हाय??
का ब्वॉ? मी थोड्या गप्पा मारल्या, मग थोडीशी फ्रस्ट आहे असे वाटलं. विषय तिथेच थांबला.
पुन्हा एकदा ऑनलाईन आली.
ती: हाय
मी: कशी आहेस?
ती: मी मजेत, तुझं काय चाल्लय?
मी: (साशंक) मी पण मजेत. कुठे आहेस?
ती: मला जॉब हवा आहे, काहीही करुन.
मी: मी तुला आधीच बोललो होतो, पुणे, मुंबई मधे ये, आणि पुढचे करीयर बघ म्हणुन, तेव्हा तुला तुझ्या छोट्या जगात समाधानी वाटत होतं.
ती: अरे मी सद्ध्या आपल्या कॉलेज मधे एलसी घ्यायला आले आहे, माझं हरवलं आणि कंपनी मागत आहे.
बराच वेळ मग मी तु मुलगी आहेस, तुला हा सेंस नाही , तो नाही असा विनोद करत होतो, मग शेवटी ती सिरिअस झाली.
मी: सगळं व्यवस्थित आहे ना?
ती: नाही रे.. सद्ध्या थोडीशी टेंस्ड आहे.
मी: मला वाटलंच होतं, तु अचानक सोशल झालीस तेव्हा.. एक प्रश्न विचारु?
ती: काय?
मी: Did you choose the right partner?
बराच वेळ शांतता..
ती: आमचा डिवोर्स झाला, काही महिने झाले.
मी: निशब्द.
ती: मला तुझी मदत हवी आहे, पुण्यात तुझ्या काही मैत्रिणींना रुममेटची गरज असेल तर मला नक्की सांग. माझी कंपनी माझ्या ताईच्या घरापासुन बरीच लांब आहे..
मला खरं कारण समजत होतं, मुलगी नव्हे स्त्री, तिला तिच्या लग्न झालेल्या बहिणिच्या घरात किती दिवस जागा मिळणार होती. आणि आई वडिलांच्या घरी आजुबाजुला किती दिवस टोमणे खात फिरणार होती? म्हणतात ना, मारणार्याचे हात धरता येतात, बोलणार्याचे तोंड नाही.
ती: मी खोटं बोलले तुझ्याशी, माझम एलसी हरवलं नाही, ते माझ्या नवर्याजवळ आहे, आणि तो परत देत नाहीये, म्हणून मी ड्युप्लीकेट काढायला आले होते.
मी: तो खुप दारु/नशा करतो का?
ती: ........
ती: तो चांगला आहे, पण प्रत्येक गोष्ट जमेलच असे नाही दोघांत.
यावेळी काय बोलायचं असतं मला माहित नव्हतं. पण तरी
मी: सद्ध्या खुप सार्या कंपनी मधे ओपनींग्स आहेत, थोडा आत्मविश्वास ठेव, सगळ सुरळीत होईल.
ती: मला स्वतःला खुप व्यस्त करुन घ्यायचं आहे.
मी: उगाच स्वतःला शिक्षा देऊ नकोस.
ती: नाही, पण सद्ध्या तरी.
मी: ओके.
ती: तुला खुप त्रास देतेय, पण रुमसाठी नक्की बघ.
मी: नक्की.
ती:........
शेवटी मीचः ठीक आहे, बाय.
ती : बाय.
पुन्हा मी निशब्द!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरेरे!
एक जुनी चांगली मैत्रीण
एका मित्राच्या बायकोची गोष्ट
च्च! वाईट वाटले वाचून.
हम्म्म!!!
एक जुनी चांगली मैत्रीण
आजकाल हे तितकंस अघटीत
+१
निरंजन जी , आपले म्हणने मनात
पुन्हा मी निशब्द!!! >>> आणी
या गोष्टी होत असतात. पण
खरंच.
ठीक आहे...उगाच मानसिक त्रासात