हे जीवन सुंदर आहे असे कोणीतरी म्हणाले आहे,खरोखरच हे जीवन सुंदर आहे, आहे का ? अर्थात, त्या सौंदर्याच्या व्याख्या व्यक्तीगणीक बदलत असतात,कोणाला गाण्यांमध्ये सौंदर्य दिसते तर कोणाला, ज्या वयात, गर्लफ्रेंडला दुचाकीवर घेऊन फिरायचे,त्या वयात दर्या-खोर्यात,राना-वनात सौंदर्य दिसते तर कोणी तिच्या दुचाकीवरच्या ओझरत्या स्पर्शाला सौंदर्य म्हणतो.जीवनात येणार्या अनेक पैलुपैंकी,अनेक घटनापैंकी आपण ज्याच्याकडे नकळतपणे आकर्षित होतो त्यास सौंदर्य म्हणावे का ? हा झाला तत्वज्ञानाचा भाग.पण कधी-कधी माझ्यासमोर येणार्या घटना मला हेलावुन जातात आणी माझ्या मनात असलेली सौंदर्याच्या व्याख्येची प्रतिमा काचेच्या फिश-बोलसारखी खळ्ळकन फुटते.
तेरा-चौदा वर्षाचा असेन मी तेव्हा, अरूण, माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान. तो ऑर्नेलाजचा मिड-फिल्डर,मी जे.एन.पेटीटचा.आमच्या कधी-मधी प्रॅक्टीसच्या चर्चा व्हायच्या,कधे-मधे शनीवारी-रवीवारी पाच नंबरच्या ग्राऊंडवर(येरवड्यातला, आज जिथे 'क्रोमा' नावाचा मॉल आहे.) संध्याकाळी ,चार-पाच ईकडची तिकडची पोरं उचलुन एखादा गेम ही व्हायचा.त्याचा गेम जितका चांगला होता तितकाच त्याचा अभ्यासही,एकुण हुशार पोरगं !! आई येरवडा मनोरुग्नालयात सेविका तर वडील येरवडा कारागृहात शिपाई आणी भाऊ त्याच्याच शाळेत.
एक दिवस मी शाळेतुन परतलो .मेन रोडला गलका झाला,काय झाल असाव असा विचार करत,शर्ट सावरत निघालो,माझ्या ईथल्या मेन रोडवरून, ईंद्रायणीत वाळु ऊपसा करून, चंदननगरचा जकात नाका चुकवण्यासाठी,ट्रक्स भरधाव वेगाने जात असत,मागील महिन्या एक अपघात होता-होता वाचला होता,ट्रक थेट चौकातल्या बंद पानटपरीत घुसायचाच बाकी होता.माझ्या मनातला विचार खरा ठरु नये म्हणुन मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करीत मी मेन रोडला पोचलो.
पण जे न व्हायच तेच झाल होत,एका वाळुच्या ट्रकने दोन जणांना चिरडले होते,गर्दीला सावरत जिथे दोघे पडले होते तिथे गेलो, एक चेहरा अनोळखी होता,पण दुसरा चेहरा बघुन माझ्या पोटात गोळा आला. तो अरूण होता,रक्ताच्या थारोळ्यात,मासांचा चिखल होऊन पडलेला,डोक जरासं शाबुत होत,पण जखमी.मी बधीर होऊन दोन मिनीटे तसाच ऊभा होता,कोणीचातरी 'पाणी आणा !!'म्हणुन आवाज कानावर पडला आणी जरा भानावर आल्यासारखा झालो.मी त्या दोघांच्या अंगावर टाकायसाठी कपडे मागविले,गोधड्या आल्या, एक रिक्षा-टेम्पो आला,मी त्या मासाच्या गठुड्याला गोधडीत गुंडाळुन उचलण्यासाठी हात सरसावले आणी एक हलक्याश्या ऊचकीसारखा आवाज माझ्या कानी पडला.कदाचित तोच त्याचा शेवटचा श्वास होता.पुढे त्याला ऊचलुन ईस्पितळात नेण्यापासुन ते त्याचं कलेवर चितेवर जळेपर्यंत मी त्याच्या सोबत होतो(लोकांनी पंचनाम्याच्या आधी,पोलीसांसमोर ट्रक जाळला.)लोकलज्जेस्तव मी बरीच हिम्मत दाखवली असली तरी आतुन मी अक्षरश हललो होतो.तो गेला,पण त्या घटनेने मला पार ऊध्वस्त करुन टाकल,मला झोपच लागत नसे. सदैव ते रक्ताळलेलं चित्र माझ्या डोळ्यासमोर थैमान घालत असे.शेजारुन सायकल जरी गेली तरी भितीने गाळण ऊडत असे,मी दिवसाढवळ्या घराबाहेर निघायला घाबरायला लागलो.
पंधरा-वीस दिवस असेच निघुन गेले.शेवटी माझ्या,मितभाषी, मोठ्या भावाने मला सायकलवर 'मी आहे ना !! मी आहे ना ' करत मला बंड-गार्डनला नेले.ती संपुर्ण संध्याकाळ त्याने मला समजवण्यात घालविली,तो बरच काही बोलला,ईतपत समजण्याईतकी अक्कल माझ्यात त्यावेळेला असेल अशी माझी मलाच शंका आहे,त्याचा अर्थ ईतकाच होता की मी आयुष्यात येणार्या वास्तवाशी सामना करावा,पळुन जाऊ नये.मला माझा भाऊ निदान माझ्याशी बोलला म्हणुनच की काय,थोडा-फार का व्हायना धीर आला.पण त्याच एक वाक्य माझ्या चांगलच लक्षात राहिल"तु आता मोठा झालायस,सुहास,वेलकम टु द लाईफ !! माय ब्रदर , वेलकम टु द लाईफ !!."
राजचा जेव्हा मला फोन आला की भाड्याने रूमचा बंदोबस्त कर म्हणुन तेव्हा मी स्वत थोडासा गांगरून गेलो कारण त्याने सांगीतलेल्या अटीच तशा होत्या.रूम सदाशिवापासुन जवळ हवी,स्वस्त हवी,आसपासचा एरिया चांगला हवा (हा एखादा एरिया चांगला किंवा वाईट कसा असतो ? हा प्रश्न मला नेहमीच पडत आलेला आहे.) काय करावे ? त्यात आजकाल भैय्या एजटांनी तर तंग केलय ,पण माझ्या लक्षात आल, सांगवी. येस्स सांगवी, जर्मन ईंजिनियरिंगचा चौक पास केला
की युनवर्सिटी-शिवाजीनगर मॉर्डन कॅफे शनीवार वाडा आलो की सदाशिवात, बाईकवर फार-तर २० मिनीटे.बस्स ,राजशी बोलुन फायनल केल आणी सांगवीत दादांना फोन केला.
दादा तसा मुळात कधी एकेकाळी खरोखरचा दादा होता,नंतर दोन-एक वर्षात शांत झाला.शांत बर का ! खच्ची नव्हे,पुढे राजकारण्यांशी हात-मिळवणी करून वाईन-शॉपच लायसन्स पदरी पाडुन घेतल आणी पोलीस-मित्र संघटनेचा मेम्बर झाला.आज भर चौकात,भरपुर गिर्हाईक असलेल्या ,लोकांना पिण्याकरता तयार केलेल्या आडोश्या सकट(तसही तिथुन दोन किमीच्या आसपास एकही बार नाही आणी दादा तस होऊ देईन अस मला आजही वाटत नाही) छानपैंकी चालणारा जवळपास बार-कम-वाईनशॉपचा मालक आहे दादा.
दादानी मला बोलावलं होतं सात-साडेसातच्या दरम्यान दुकानात आणी मी शिफ्ट संपवुन बसलो होतो हिंजवडीत साडे-तीन वाजता.अर्थात 'वाघजाईत' टाईम-पास झाला असता,पण मग परत दादांबरोबर अजुन प्यावी लागली असती तर मला त्या दिवशी दादांच्या घरीच झोपाव लागल असत.पण तिथच मी एक पोरग कामाला लावलं आहे,दहावी नापास आणी लातुर रिटर्न,म्हटल तिथ थांबुया,थोडा टाईमपास करूयात,लोहगाववरनं नुकतच घर बदललेल्या त्या पोराची ख्याली-खुशाली विचारुया, तोवर होईलच संध्याकाळ,चार-साडेचार पर्यंत ऑफिसात टाईम-पास केला,जाताना सिटीएसला पुप्याला भेटलो,आणी सहा वाजता सांगवीत दुकानापाशी हजर झालो.
कांऊटर वरच्या पोरांशी हाय-हॅलो झाल्यावर, माझ तिथल्या आडोश्याकडे लक्ष गेल, तिथ हे चित्र होतं.
क्रमश.
खुलासा : फोटो पुर्वप्रकाशित,तेव्हा डिटेल्स लिहायची ईच्छा नव्हती, आज आहे.
प्रेरणा : एकदा पर्याशी 'कावेरी'त त्याला रेग्युलरली भेटणार्या व्यक्तींविषयी झालेली चर्चा.
आभार : श्रावण मोडक, प्रसन्न केसकर
क्रमश.
खुलासा : फोटो पुर्वप्रकाशित,तेव्हा डिटेल्स लिहायची ईच्छा नव्हती, आज आहे.
प्रेरणा : एकदा पर्याशी 'कावेरी'त त्याला रेग्युलरली भेटणार्या व्यक्तींविषयी झालेली चर्चा.
आभार : श्रावण मोडक, प्रसन्न केसकर
वाचन संख्या
6152
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे!! वाचते आहे...
फार
(विषय दिलेला नाही)
चित्र एव्हढ वाइट आहे, पुढ
वाचतोय.. आणि पुढे लिहाच
वेलकम टू द लाईफ. खरं आहे.
हम्म!!!
वाचतोय रे. तु ह्या विषयाला
वाचु नये असं वाटतं.. पण वेलकम
हम्म
वाचत आहे ! लिहा पुढचा भाग.
In reply to हम्म by sneharani
फोटो पाहून सुन्न. वाचत आहे.
वेल्कम बॅक.....
सहमत
In reply to वेल्कम बॅक..... by प्रसन्न केसकर
वाचतोय....
!
लेख चांगला आहे. पिक पाहुन
:(
हम्म्म्म्म्.
वाचतोय आणि पुढच्या भागाची वाट
....भिडणारं लिहितोस रे !
सुंदर.......
(विषय दिलेला नाही)
पुढचा भाग कधी?
फोटो
पूढचाभागकधीसुहास???
हा घ्या
तिसर्याचीही लिंक द्या. दुसरा
In reply to हा घ्या by सुहास..