मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गावरान मेवा १) तरले

जागु · · पाककृती
तरले म्हणजे ताडगोळ्याच्या नुकत्याच उगवलेल्या रोपाचे मुळ. ताडफळ झाडावरच पिकुन खाली पडतात. त्याला पावसाळ्यात मोड धरतात. हेच मोड जमिनीत रुजुन त्याला चे रोप बनते. पण ह्या छोट्या रोपाची उंचीही किमान १ फुटापेक्षा जास्त असते. हे मुळ काढण्यासाठी मुळाच्या बाजुने गोल खोल खड्डा करत अलगद हे मुळ काढतात. एवढे परिश्रम करुनही हे तरले अपरीचीत असल्याने त्यांना योग्य तो भाव मिळत नाही. केवळ १० रुपयांना एक जुडी मिळते. एका जुडीत ५ तरले असतात. लागणारे साहित्य: गरजेनुसार तरल्यांच्या दोन-तिन जुड्या मिठ उकडण्यासाठी पाणी कृती : प्रथम तरले धुवुन त्यांचे दोन इंचाइतके किंवा आपल्या आवडीनुसार तुकडे करावेत. तुकडे एका टोपात ठेउन ते बुडतील इतक पाणी घालावे. मग अंदाजे मिठ घालून १५ ते २० मिनीटे शिजुन द्यावेत. शिजुन थोडे थंड झाले की प्लेट मध्ये सर्व करावेत. (कामवाली नसेल किंवा भांडी घासायचा कंटाळा आला असेल तर अश्याप्रकारे पेपरडिशमध्ये काढा. फार उपयोगी टिप आहे हो ही) कस खायचे हे तरले ह्या बाबत तुम्ही गोंधळला असाल म्हणून हा खालील फोटो. पहिला बाजुच साल काढुन घ्या. मग निघालेला गर मधुन फोडा. हाताने सहज तुटतो. आता त्यातील मधली कडक दांडी काढून टाका. राहीलेला गर मिटक्या मारत खा. साधारण कसर्‍यासारखे लागतात.

वाचने 11809 वाचनखूण प्रतिक्रिया 25

मनि२७ Mon, 10/11/2010 - 15:50
जागू ताई... just तुला online पाहिलं आणि पाककृती सदराकडे click केल.... मला १००% खात्री होती कि तू नक्की पाकृ टाकली असणार... आणि तसच झाल.....!!! थांब...आता पाकृ पाहते... ! ! ! ! ! हम्म....नवीनच आहे.... मी पहिल्यांदा पाहते आणि वाचतेय... छानच असणार...... मस्त...

जागु Mon, 10/11/2010 - 16:51
प्राजक्ता, स्वाती, राजकुमार धन्यवाद. राजकुमार, कसर ही तळ्यातली कंद असतात. दिसायला अगदी छोट्या केसवाल्या करांद्या सारखी . पण अगदी टणक असतात. ही सोलायलाही कठीण असतात. सुरीने किंवा दातानेच सोलावी लागतात. खातानाही कडकच लागतात. पण चविष्ट असतात. अलिबागला जास्त मिळतात ती. आता आली की फोटो टाकते.

In reply to by जागु

प्राजु Mon, 10/11/2010 - 20:41
कसरा आणि तेरले....छान. पण आता हे करंदे कसे असते? (कसर्‍या सारखे असते असे सांगू नका..) नेहमीप्रमाणेच मस्त.. वेगळाच प्रकार. :)

In reply to by निवेदिता-ताई

जागु Tue, 10/12/2010 - 13:06
ढेसे हा भाजीचा प्रकार आहे. माठाची मोठी जात असते. त्याचे मधले खोड जाड असते. हे खोड म्हणजेच ठेसे. हे ठेसे आमटीत, कोलंबीच्या कालवणात टाकतात. लाल व हिरवे असे दोन प्रकार असतात ह्याच्यात.

priya_d Tue, 10/12/2010 - 04:39
जागु नवीन व माहितीपूर्ण पाकृ. परंतु मला फोटो दिसत नाहीये. असे ब-याचवेळा होते. कोणी सांगु शकेल कां, कशामुळे होत असावे? प्रिया

सहज Tue, 10/12/2010 - 10:17
एखाद्या जंगलवाल्याला मराठीत माहीतीपूर्ण लेखन ना धो महानोरांचे*, एखाद्या गडकिल्लेवाल्याला मराठीत माहीतीपूर्ण लेखन गोनीदांचे* अस्स्सल मराठी, अन्नधान्यवाल्याला मराठीत जालावर माहीतीपूर्ण लेखन जागूतैंचे! * - नंदन कृपया योग्य जागी योग्य लेखक भरणे